पुणे: पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज २०१८ स्पर्धेत १० वर्षाखालील मुलांच्या गटात नमिश हूड, स्वराज ढमढेरे, अथर्व येलभर, सुर्या काकडे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.
सिल्वर स्पोर्ट्स क्लब, वाकड येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत १० वर्षाखालील मुलांच्या गटात सातव्या मानांकित स्वराज ढमढेरेने श्रीराम जोशीचा ५-२ असा पराभव करून आगेकूच केली. सोळाव्या मानांकित नमिश हूडने त्रिशिक वाकलकरचा ५-० असा तर, अथर्व येलभरने देवेश रेड्डीचा ५-१असा पराभव केला. पंधराव्या मानांकित अर्जुन परदेशी व दहाव्या मानांकित कार्तिक शेवाळे यांनी अनुक्रमे सनत कढले व पृथ्वीराज हिरेमठ यांचा ५-२ अशा सारख्याच फरकाने पराभव करून दुसरी फेरी गाठली.
सहाव्या मानांकित अमन शहाने वैष्णव रानवडेवर ५-०असा विजय मिळवला. पाचव्या मानांकित अभय नागराजनने कैवल्य क्षीरसागरचे आव्हान ५-०असे सहज मोडीत काढले. स्पर्धेच्या दुसऱ्या मालिकेत एकूण १०० हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: १० वर्षाखालील मुले: स्वराज ढमढेरे(७)वि.वि.श्रीराम जोशी ५-२; नमिश हूड(१६)वि.वि.त्रिशिक वाकलकर ५-०; अथर्व येलभर वि.वि.देवेश रेड्डी ५-१; दक्ष पाटील वि.वि.आशमान पाटील ५-०; अर्जुन परदेशी(१५)वि.वि.सनत कढले ५-२; अमन शहा(६)वि.वि.वैष्णव रानवडे ५-०; कार्तिक शेवाळे(१०)वि.वि.पृथ्वीराज हिरेमठ ५-२; अभय नागराजन(५)वि.वि.कैवल्य क्षीरसागर ५-०; सुर्या काकडे(८)वि.वि.विश्वराज इंगवले ५-१.