Home Blog Page 3184

महिला दिनानिमित्त महिला मॅरेथॉन

0

पुणे- दिनांक 8 मार्च 2018 रोजी महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने महिलांमध्ये निवडणूक विषयक जागरूकता निर्माण व्हावी या दृष्टीने निवडणूक विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्त दिनांक 3 मार्च 2018 रोजी  कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय, कर्वेनगर, पुणे येथून महिलांची 4 कि.मी. ची मॅरेथॉन स्पर्धा आयोजीत करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत 200 ते 300 विद्यार्थिनी व महिला सहभागी होणार आहेत. या स्पर्धेची सूरुवात कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय, कर्वेनगर येथून सकाळी 7 वाजता होणार असून सहभागींनी या ठिकाणी सकाळी 6.30 वाजता उपस्थित रहावे. मॅरेथॉन कर्वेनगर चौक-वनदेवीमंदिर- हहाणूकर कॉलनी मार्गे, कर्वे पूतळा व कर्वे रोड पासून परत त्याच मार्गे कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय, कर्वेनगर येथे सकाळी 8 वाजता येवून समाप्त होणार आहे.

तसेच दिनांक 8 मार्च 2018 रोजी अल्पबचत भवन, पुणे येथेही महिला दिनाच्या अनुषंगाने निवडणूक विषयक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी  माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे  दिली आहे.

सीए आनंद आर जाखोटिया आयसीआय पुणे शाखेच्या अध्यक्षपदी

0

पुणे : सीए इंटरमिजीएटचे ऑल इंडिया रँकर, महेश प्रोफेशनल फॉरम आणि विदर्भ महेश असोसिएशनचे माजी अध्यक्ष असलेले सीए आनंद आर जाखोटिया यांची आयसीएआयच्या पुणे शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. अध्यक्षपदाचा कार्यभार घेण्यापूर्वी त्यांनी कोषाध्यक्ष, सचिव आणि उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. विकासाच्या अध्यक्षपदाचा कार्यभारही त्यांनी ह्यापूर्वी सांभाळला आहे जे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी काम करते. सीए आनंद आर जाखोटिया यांच्या कार्यकाळात विकासाच्या पुणे शाखेने २०१५-२०१६ मध्ये बेस्ट ब्रांच इन दि रिजन आणि बेस्ट ब्रांच इन दि नेशन हे अवॉर्ड प्राप्त केले होते. सीए आनंद आर जाखोटिया हे एमव्हीपीएम, माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाच्या महेश विद्यालय कोथरूडच्या मॅनेजिंग कमिटीतदेखील आहेत.

अध्यक्ष सीए आनंद आर जाखोटिया ह्यांच्याप्रमाणेच सीए ऋता चितळे ह्यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली असून सीए राजेश अग्रवाल हे सचिव आणि विकासाचे अध्यक्ष म्हणून तर सीए अभिषेक धामणे यांची आयसीआयच्या कोषाध्यक्षपदी निवड झाली आहे.

विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी त्यांना अतिशय आवश्यक आणि महत्वाचे असलेले ग्रंथालय आणि अभ्यासिकांची सोय आयसीएआयचे नवे अध्यक्ष सीए आनंद जाखोटिया करणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी फक्त शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक कार्यक्रमाचे आयोजनदेखील ते करणार आहेत. सदस्यांकरिता सीपीइ आणि नॉन-सीपीइ कार्यक्रमांचे अगदी वाजवी किमतीत आयोजन करण्याची त्यांची इच्छा आहे. सदस्यांसाठी नेहमीच्या ट्रेनिंग कार्यक्रमांव्यतिरिक्त आणखी कार्यक्रम आयोजित करण्याचा त्यांचा अजेंडा आहे.

सीए आनंद आर जाखोटिया यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार घेतल्यानंतर ३ मार्चला मेगा बँकिंग समिट हॉटेल शेरेटन ग्रँड येथे आयोजित करण्यात आले आहे ज्यात वेगवेगळ्या शहरातून ३०० लोक सहभागी होणार आहेत. मोठमोठ्या बँकांचे एमडी, इडी, रिजनल हेड्स आणि अनेक एक्स्पर्ट फॅकल्टीस या समीटमध्ये उपस्थित असतील. डब्लूआरसीचे नवे अध्यक्ष सीए संदीप जैन आणि त्यांची टीमही या समीटला उपस्थित असेल.

गुलमोहर ची पुढील कथा ‘वडापाव वेड्स खांडवी’

0

झी युवावर सोमवारी आणि मंगळवारी दाखवण्यात येणारी गुलमोहर ही मालिका लोकप्रिय होत आहे. एक गोष्टीचे केवळ दोन भागात चित्रीकरण करून वेगवेगळ्या हृदयस्पर्शी कथा सांगणारी गुलमोहर ही मालिका सध्या सगळ्यांचीच आवडती झाली आहे.५ आणि ६ मार्च ला संध्याकाळी ९:३० वाजता ‘’ गुलमोहर’ या मालिकेत, सर्वांची आवडती अभिनेत्री सायली संजीव आणि आणि अतिशय डॅशिंग असा अभिनेता संग्राम साळवी हे दोघें त्यांची प्रेमकथा घेऊन येत आहेत. मराठी आणि गुजराती खाद्य संस्कृतीची ओळख, त्यावर सुरु असणारा कुटुंबाचा धंदा आणि त्यातून घडणारे प्रेम या कथेतून प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

युवराज, ज्याचे वडील वर्षोनवर्षे महाराष्ट्राची ओळख असलेला वडापाव चा धंदा करत असतात, तर या धंद्याला चॅलेंज देण्यासाठी गुजराथ ची खांडवी घेऊन सेजल येते आणि त्यानंतर सुरु होते एकमेकांचा धंदा बंद करण्याची चढाओढ. एकमेकांचा धंदा बंद करण्यासाठी सुरु असलेल्या या स्पर्धेत अनेक मजेशीर घटना घडतात. दोन भिन्न संस्कृतीचे खाद्य पदार्थ, बनवण्याची प्रक्रिया, लोकांच्या आवडीनिवडी यामुळे ही कथा रुचकर ठरते. हे सर्व सुरु असतांना, एका क्षणाला त्या दोघांच्या लक्षात येते की दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहेत. आता धंदा कि प्रेम या व्दिस्तीथीत अडकलेल्या या दोघांची कथा म्हणजे वडापाव वेड्स खांडवी!!

सायली संजीव ला या मालिकेबद्दल विचारले असता ती म्हणाली, “मराठी नंतर बिहारी आणि आता गुजराथी या तिन्ही भूमिका साकारताना तशी मला खूप मजा आली. मुंबई सारख्या शहरात सगळ्याच संस्कृती एकमेकांशी अतिशय प्रेमाने राहतात. माझ्या कॉलनी मध्ये अनेक गुजराथी कुटुंब असल्यामुळे मला शब्दांची चांगली ओळख होती. त्यामुळे ही भूमिका करणे मला अतिशय सोपे गेले. ही माझी दुसरीच मालिका असल्यामुळे गुलमोहर माझे विशेष प्रेमाचे आहे. या नवीन फॉरमॅट मध्ये मंदार देवस्थळी सारख्या दिग्गज दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचा अनुभव अतिशय सुंदर होता.

पालिकेच्या स्थायी अध्यक्ष पदासाठी ३ आमदारात स्पर्धा

0

पुणे : मंत्रीपदासाठी आमदारात स्पर्धा ऐकली असेल, पण  इथल्या राजकारणात हल्ली अजब गजब गोष्टी घडत आहेत , महापालिकेच्या तिजोरीची चावी स्थायी समितीच्या अध्यक्षाकडे असे मानले जाते .हा स्थायी समितीच्या अध्यक्ष कोण असणार ? याची उत्सुकता आता वाढली आहे. कारण हे पद आपल्या घरात ..म्हणजे घरातील नातलग असलेल्या नगरसेवकाला मिळावे या साठी तीन आमदारांमध्ये  स्पर्धा लागली आहे . यांच्यात जिंकणार कोण ? कि तिघे हारणार ? याचा निर्णय अर्थात भाजपचे पक्षश्रेष्ठी म्हणजे मुख्यमंत्रीच घेतील असे दिसते आहे .
स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री रंजना टिळेकर, आमदार जगदीश मुळीक यांचे भाऊ योगेश मुळीक, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे भाऊ सुनील कांबळे यांच्यात स्पर्धा निर्माण झाली आहेत. महापालिकेतील सत्ताकाळात आपण एकदाही पदाची मागणी केलेली नाही, त्यामुळे आईला हे पद द्यावे, अशी टिळेकर यांची आग्रही मागणी आहे. मात्र महापौरपदी पुढील सव्वावर्ष पुन्हा महिलाच असल्याने महापालिकेतील दोन महत्त्वाची पदे महिलांकडे कशी द्यायची, असा प्रश्न यात निर्माण झाला आहे. तरीही शिल्लक राहिलेल्या नावांमध्येही जोरदार चुरस आहे.
आमदार जगदीश मुळीक यांनीही आपला  विधानसभा मतदार संघ भक्कम ठेवण्याच्या आपल्या राजकीय व्युहाचा एक भाग म्हणून योगेश यांना संधी द्यावी, असे त्यांचे म्हणणे आहे. तसाच दावा  सुनील कांबळे यांचा ही आहे. कांबळे गेली अनेक वर्षे कासेवाडी, लोहियानगर सारख्या भागात भाजपाचे काम करीत आहेत. मात्र समाजकल्याण राज्यमंत्रीपद त्यांच्या घरात असल्याने एकाच घरात दोन महत्त्वाची पदे द्यायची का, अशी विचारणा करण्यात येत आहे. त्याचा प्रतिवाद कांबळे यांच्याकडून भावाचे राजकारण वेगळे व माझे वेगळे, भाऊ मंत्री झाल्याने ,मग मला कधीच संधी मिळणारच नाही का? असा प्रश्न सुनील कांबळे च्या बाबतीत उपस्थित केला जातो आहे .

अध्यक्षपद कोणाला द्यायचे, याचा निर्णय सर्वस्वी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर अवलंबून आहे असे सांगण्यात येत असले तरी त्यात काही तथ्य दिसत नाही .ते निर्णय जाहीर करतील पण गिरीश बापट हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील तेच नाव जाहीर करतील. येत्या शनिवारी (दि.३) दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यादिवशी भाजपाकडून एकच अर्ज दाखल झाला तर त्याचदिवशी अध्यक्ष कोण होणार याचा निकाल लागेल. मात्र एकापेक्षा जास्त अर्ज दाखल झाले तर त्यासाठी निवडणुकीच्या दिवसापर्यंत (दि.७ मार्च) प्रतीक्षा करावी लागणार आहे.
-समितीमधील विरोधकांचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना यांचे वर्चस्व अगदीच कमी म्हणजे ६ सदस्य इतकेच आहे. भाजपाचे १० सदस्य आहेत. त्यामुळे विरोधकांकडून केवळ अस्तित्व दाखविण्यासाठी  निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आहे किंवा न लढवण्याचा निर्णय झाला तर अध्यक्षपद बिनविरोधही निवडले जाईल.

वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

0

जुन्नर-तालुक्यातील हिवरे खुर्द गावाच्या हद्दीत बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. हा बिबट्या ८ ते ९ वर्षांचा असल्याची आणि नर जातीचा असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. या बिबट्याने मागच्या महिन्यात उसतोड कामगार महिलेवर हल्ला करून तिला ठार केले होते. त्यामुळे हिवरे खुर्द भागात या बिबट्याची दहशत पसरली होती. त्यानंतर गावकऱ्यांनी वन विभागाला बिबट्याबाबत माहिती दिली. बिबट्याला पकडण्यासाठी हिवरे खुर्द भागात पिंजरा लावण्यात आला होता. त्याच पिंजऱ्यात या बिबट्याला जेरबंद करण्यात आले. या बिबट्यात वनविभागाच्या मदतीने बिबट निवारण केंद्रात पाठवले जाणार आहे. हिवरे खुर्द गावात या बिबट्याची दहशत पसरली होती. त्याला जेरबंद केल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी ‘ती’ झाली न्यायाधीश

0

पुणे – वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जेएमएफसी परीक्षा उत्तीर्ण होत न्यायाधीश होण्याचे असामान्य काम पुण्यातल्या सायली शेंडगे हिने केले आहे. पुण्यातल्या दत्तवाडी परिसरात सर्वसाधारण कुटुंबातल्या सायलीने मिळवलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

टेलरींग व्यवसायाच्या जोरावर आपले कुटूंब पोसणाऱ्या सायलीच्या वडिलांनी आपल्या तिन्ही मुलींना चांगले शिक्षण देत स्वतःच्या पायावर उभ केले. सायलीने विधी महाविद्यालयात प्रवेश घेत एलएलएमपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर ज्यूडीशियल मॅजिस्ट्रेटची परीक्षा दिली होती. मात्र अवघ्या एका गुणाने तिची ती संधी हुकली होती. या अपयशाने खचून न जाता सायलीने जिद्दीने अभ्यास सुरूच ठेवला आणि गेल्या वर्षी झालेल्या जेएमएफसी परीक्षेत घवघवीत यश मिळवत न्यायाधीश बनण्याचे स्वप्न साकारले. दत्तवाडी हा तसा पुण्यातला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला परिसर, अशा भागात राहत तसेच प्रसंगी वडिलांच्या टेलरींग व्यवसायात मदत करत सायलीने जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. फक्त इथेच न थांबता काहीतरी बनण्याच्या ध्येयाने सायलीने नेटाने प्रयत्न केले आणि अखेर तिला यश आले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वाय -फाय ,फोरजीच्या युगात ‘त्यांनी ‘प्रथमच हाताळला संगणक !

0
पदपथावरील मुलांसाठी  ‘ संगणक  आपल्या दारी’ उपक्रमाचा शुभारंभ    
 
पुणे 
घरची हलाखीची परिस्थिती इतकेच काय राहावयासही घर नाही,पदपथावर आडोसा करुन,ज्या ठिकाणी सोयीसुविधा नाहीत अशा ठिकाणी वास्तव्य करून  पोटाची खळगी भरण्यासाठी   आई -वडिलांना मदत व्हावी यासाठी सिग्नलवर फुले ,चिक्की विक्री करणाऱ्या मुलांनी  वाय -फाय ,फोरजीच्या युगात प्रथमच संगणक हाताळला. 
निमित्त होते, पदपथावरील मुलांसाठी माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल आणि मित्रपरिवाराने सुरु केलेल्या   ‘संगणक आपल्या दारी’ या उपक्रमाच्या शुभारंभाचे.आयुष्यात प्रथमच संगणक पाहणाऱ्या या मुलामुलींच्या चेहऱ्यावर कुतूहलाचे भाव दिसले आणि मला जमेल कि नाही हा  प्रश्नार्थक भावही चेहऱ्यावर दिसत होता मात्र शिक्षक जस जशी माहिती देत होते तसे या मुलांचे चेहरे खुलत होते.  माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या उपस्थितीत आणि मुलांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. 
या उपक्रमाअंतर्गत आठवड्यातून दोन दिवस शहरातील विविध पदपथांवर राहणाऱ्या मुलामुलींना संगणकाची माहिती व्हावी, आर्थिक दुर्बल घटकांतील ;पण शिक्षण घेत असलेल्या मुलानांही  संगणक शिक्षणाचे धडे दिले जाणार आहे. याबाबत या उपक्रमाचे संयोजक व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल म्हणाले, आज वाय -फाय ,फोरजी च्या युगात समाजातील अशी कित्येक घटक आहेत कि,ज्यांना परिस्थितीमुळे संगणक काय असतो याची माहितीही नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी आई -वडिलांना हातभार लावताना ते त्यांच्या बालपणालाही मुकले आहेत.मोबाईल काय असतो हे त्यांना केवळ माहित आहे ते लोकांच्या हातात दिसत असल्याने ;पण इंटरनेट काय असते ,संगणक कसा असतो याची माहिती तर त्यांना अजिबात नाही. जे शिकत आहेत त्यांना थोडीफार माहिती आहे मात्र त्यांना संगणक कधी हाताळायला मिळालेलाच नाही. एकदिवस या मुलांसमवेत चर्चा केली,त्यांनी आम्हाला संगणक कसा असतो ? दाखवाल का ?हे प्रश्न जसे विचारले तसे  आम्हाला शिकायचे अशी अपेक्षाही  व्यक्त केली आणि त्यातूनच संगणक आपल्या दारी या उपक्रमाचे नियोजन आम्ही केले . आठवड्यातून दोन दिवस हा उपक्रम पदपथावरील, गरीब कुटुंबातील मुलामुलींसाठी राबविला जाणार आहे. यावेळी  पुणे नवरात्रौ महोत्सवाचे घनःश्याम सावंत , नंदकुमार बानगुडे तसेच  अभिषेक बागुल , इम्तियाज तांबोळी,   राजू पोळ , समीर शिंदे , नारायण टेकाडे ,अरुण कामठे , स्वप्नील नाईक , धनंजय कांबळे  विक्रम खन्ना ,  , सुरेश कांबळे , हेरॉल मसी , सागर आटोळे , भरत तेलंग , महेश ढवळे ,  राजू ससाणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.  
 
मी समाजासाठी … 
मी समाजासाठी ,समाज माझ्यासाठी हे ब्रीदवाक्य घेऊन समाजपयोगी कार्य करताना  काशीयात्रा असो किंवा  ,अंध व्यक्ती , पदपथावरील मुलांसमवेत दिवाळी ,एड्सग्रत मुलांसमवेत रंगपंचमी, हवाई सफर, यासह विविध उपक्रम सदैव राबविणारे माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले, वंचित घटकांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेतले पाहिजे, तेही या समाजाचे घटक आहेत. त्यांच्यासाठी आपण सर्वांनी सरसावले पाहिजे, या हेतूने आता हा उपक्रम सुरु केला आहे. भविष्यात या मुलांच्या शिक्षणासाठी खास व्यवस्था करण्यासाठी नियोजन केले जाणार आहे.   

होळी साजरी करा जपून महावितरणचे आवाहन

0
पुणे : होळी व धुळवड उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
        होळी पेटवताना सभोवताली वीजवाहिन्या किंवा वितरण रोहित्रे नाहीत याची खातरजमा करून घ्यावी, अन्यथा होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जिवंत तार खाली पडून भीषण अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय अनेक ठिकाणी वीजवाहिन्या भूमिगत असल्याने, त्यापासून लांब अंतरावरच होळी पेटवावी जेणेकरून होळीच्या उष्णतेपासूनभूमिगत वीजवाहिन्या सुरक्षित राहतील, होळीभूमिगत शक्यतो मोकळया जागेचा वापर करा. ट्रक किंवा इतर वाहनांतून होळी आणताना होळीचा स्पर्श रस्त्यालगतच्या वीजवाहिन्यांना होणार नाही याची खबरदारी घ्या.  
       त्याचप्रमाणे धुळवड वा रंगपंचमीला रंगोत्सव साजरा करताना पाण्याचे फवारे वीजवाहिन्यांपर्यंत उडणार नाहीत याची काळजी घ्या. रंग भरलेले फुगे फेकताना ते विजेचे खांब आणि वीजवाहिन्या यांना लागणार नाही याची खबरदारी घ्या. वीज वितरण यंत्रणेची रोहित्रे व तत्सम वितरण उपकरणे बसविलेल्या जागेपासून लांब अंतरावरच रंग खेळा. रंग खेळताना ओल्याचिंब शरीराने वीज खांबाला स्पर्श झाल्यास अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे विजेच्या खांबांना स्पर्श करू नका. विजेच्या खांबांभोवती पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्या. घरात रंग खेळताना वीज मीटर, प्लग, वीजतारा आणि विजेचे बटन किंवा उपकरणांना ओल्या हाताने स्पर्श करू नका व या उपकरणांना पाणी लागणार नाही याची काळजी घ्या. होळीचा सण हा आनंदाचा उत्सव असल्याने खबरदारी घेऊन होळीचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
 
हे लक्षात ठेवा :-
• वीज वितरण यंत्रणेपासून लांब अंतरावर होळी पेटवा. 
• होळी आणताना तिचा स्पर्श वीज वाहिन्यांना होऊ नये. 
• वीज वाहिन्या, वितरण रोहित्रांवर पाणी फेकू नका.
• ओल्या शरीराने वीज उपकरणांना स्पर्श करू नका. 
• वीज खांब किंवा वीजयंत्रणेवर जवळ पाणी साचू देऊ नका. 

स्वप्नपूर्तीसाठीच्या मोहिमेसाठी पी. व्ही. सिंधूची ‘स्टे फ्री‌’बरोबर हातमिळवणी

0

सॅनिटरी नॅपकिन निर्मिती क्षेत्रातील प्रमुख ब्रॅंड असलेल्या ‘स्टे फ्री’ कंपनीने आज रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या प्रसिद्ध बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांची ब्रॅंड अॅम्बेसेडरपदी निवड केली, तसेच ‘ड्रीम्स ऑफ प्रोग्रेस’ (प्रगतीची स्वप्ने) या प्रसिद्धीमोहिमेचीही घोषणा केली. या मोहिमेद्वारे मुलींनी आपल्या मासिक पाळीदरम्यानदेखील आपल्या स्वप्नपूर्तीचा पाठपुरावा करावा यासाठी पाठबळ देण्यात आले आहे.

 

या प्रसिद्धीमोहिमेबद्दल पी. व्ही. सिंधू म्हणाल्या, “कोणत्याही मुलीच्या मनात मासिक पाळीदरम्यान असलेली भीती म्हणजे आपले संरक्षण कधीही निघून जाऊ शकते याची. त्यामुळे आपल्या स्वप्नपूर्तीच्या प्रवासात पाळी हा अडथळा आहे, असे तिचे मत बनते. मात्र ‌‘ड्रीम्स ऑफ प्रोग्रेस’मुळे मुलींना पुढे जाणे शक्य होणार असून त्यांना आपली स्वप्ने वास्तवात आणता येणार असल्यामुळेच मी या मोहिमेशी जोडले गेले आहे. या मोहिमेमुळे मुलींचे मन:परिवर्तन होऊन पाळीदरम्यान न खचता त्यांना प्रेरणा मिळेल, अशी आम्हाला आशा आहे.”

‘जॉन्सन अॅंड जॉन्सन’ ही कंपनी गेल्या ५० वर्षांपासून भारतामध्ये ‘स्टेफ्री’ नॅपकिन्सची निर्मिती करीत आहे.  या कंपनीने भारतामधील शाळा तसेच जाहिरातींमधून हा उपक्रम सर्वदूर पसरवला आहे. ही कंपनी भारतामधील महिलांसाठी विविध प्रकारचे नॅपकीन्स बनविण्यात आघाडीवर आहे. त्या मध्ये विनाबेल्ट आणि रात्री उपयोगाला येणाऱ्या नॅपकीन्सचा समावेश आहे.

‘जॉन्सन अॅंड जॉन्सन इंडिया’च्या ग्राहक प्रॉडक्ट विभागाच्या विपणन उपाध्यक्षा डिंपल सीधर म्हणाल्या, “स्त्रियांचे आरोग्य चांगले राखण्यात पुढाकार घेणाऱ्या ‘स्टेफ्री’ हा ब्रॅंड मासिक पाळीला सामोऱ्या जाणाऱ्या मुलींच्या मानसिकतेमध्ये होणाऱ्या बदलांवर आजपर्यंत काम करीत आला आहे. ‘ड्रीम्स ऑफ प्रोग्रेस’ या मोहिमेद्वारे मुलींनी मासिक पाळीदरम्यान आपली स्वप्ने पाहणे थांबवू नये, असे आवाहन आम्ही करीत आहोत. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी मुलींना मासिक पाळीदरम्यान जे संरक्षण हवे आहे, ते आमच्या ब्रॅंडने उपलब्ध केले आहे. मुलींच्या शक्तीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून पी. व्ही. सिंधू हे नाव आपल्या समोर आहे. त्यामुळे सिंधू यांचा या मोहिमेबरोबरचा सहभाग हा ‘स्टेफ्री’च्या भूमिकेशी सुसंगत आहे.”

“भारतामधील लक्षावधी मुली दररोज मासिक पाळी सुरू असतानाही आपल्या स्वप्नपूर्ततेसाठी प्रयत्न करीत असतात. ‘स्टे फ्री’ ब्रॅंडद्वारे मुलींना त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या प्रवासात कोणताही अडथळा न येण्याचे दीर्घकालीन

संरक्षण पुरविले जाते. भारतामधील मुली आणि महिलांच्या प्रगतीला आमचा पाठिंबा राहणार आहे. त्यामुळेच आजच्या काळातील मुलींची ‌‘रोलमॉडेल’ असणाऱ्या पी. व्ही. सिंधू या साहजिकच आमच्या ‘ब्रॅंड अॅम्बेसेडर’ आहेत,” असे प्रतिपादन ‘जॉन्सन अॅंड जॉन्सन इंडिया’च्या महिला आरोग्य, ग्राहक प्रॉडक्ट विभागाच्या महाविपणन व्यवस्थापक सरोज मिश्रा यांनी केले.

‘नेल्सन’च्या आकडेवारीनुसार भारतीय सॅनिटरी नॅपकीन्सच्या बाजारपेठेची उलाढाल आता ४ हजार कोटींपर्यंत जाऊन पोचली आहे. जलद गतीने होणारे शहरीकरण, मध्यमवर्गाची वाढती संख्या, जागरुकता, नोकरी करणाऱ्या महिलांची वाढलेली संख्या आणि सरकारी यंत्रणा तसेच खासगी कंपन्यांनी केलेल्या शरीराच्या आरोग्याबद्दलच्या जागरुकतेमुळे येत्या काही वर्षांमध्ये सॅनिटरी नॅपकीन्सची बाजारपेठ आणखी फोफावणार आहे. तरुण मुलींपर्यंत योग्य संदेश पोचण्यासाठी सिंधू यांनी ‘स्टेफ्री’बरोबर दूरचित्रवाहिन्यांसाठी एक जाहिरातदेखील केली आहे. त्यामध्ये सिंधू यांनी मुलींना ‘स्वप्नपूर्तीच्या प्रवासात कोणताही व्यत्यय आणू देऊ नका, विशेषत: मासिक पाळीदरम्यान…’ असे आवाहन केले आहे.

जॉन्सन अॅंड जॉन्सनबद्दल :

चांगले जगणे आणि त्यामधून साध्य होणारी प्रगती यांचा पाया हा उत्तम आरोग्यात दडला आहे यावर आम्ही विश्वास ठेवतो. त्यामुळेच गेल्या १३० वर्षांमध्ये ग्राहकांना वयाच्या कोणत्याही टप्प्यावर चांगले ठेवण्याचे ध्येय आम्ही आखले आहे. ‘जॉन्सन अॅंड जॉन्सन’ ही आरोग्य सुविधा पुरविणारी जगभरामधील एक आघाडीची संस्था असून आम्ही आमची सर्वदूर पसरलेली व्याप्ती चांगल्या कामासाठी उपयोगात आणतो. अधिकाधिका लोकांपर्यंत पोचणे, ग्राहकांना परवडेल अशा दरात आमचे प्रॉडक्ट उपलब्ध करणे यासाठी आमचा प्रयत्न सुरू असतो. त्यामधून निरोगी मन, निरोगी शरीर आणि निरोगी समाज निर्मिण्यावर मचा भर आहे.

जॉन्सन अॅंड जॉन्सन इंडियाबद्दल

‘जॉन्सन अॅंड जॉन्सन’ या कंपनीची ७० वर्षांपूर्वी भारतामध्ये स्थापना झाली. त्यानंतर आजपर्यंत या कंपनीने भारतीय ग्राहकांचे आरोग्य चांगले राहावे या दृष्टीने अनेक नावीन्यपूर्ण कल्पनांची अंमलबजावणी करीत वेगवेगळी उत्पादने बाजारात आणली. या कंपनीमध्ये सध्या ३५०० कर्मचारी काम करतात. ग्राहक आरोग्यसेवा, वैद्यकीय उपकरणे आणि औषधे या तीन क्षेत्रांमध्ये सध्या ही कंपनी कार्यरत आहे.

महिंद्रा लॉजिस्टिक्सतर्फे पुण्यातील चाकण येथे सर्वात मोठ्या मल्टी-यूजर सुविधेला सुरुवात

0

पुणे : एम्बसी इंडस्ट्रीअल पार्क, ही एम्बरी ग्रूप या भारतातील अग्रणीच्या मालमत्ता विकासक आणि वॉरबर्ग पिनकस या अग्रणीच्या खासगी इक्विटी प्लेअरची संलग्नित सेवा आहे, त्यांच्यातर्फे महिंद्रा लॉजिस्टिक, या देशातील 3पीएल लॉजिस्टिक फर्ममधील अग्रणीच्या फर्मबरोबर, पुण्यातील चाकण येथील प्रकल्पासाठी ग्राहक म्हणून करार केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. महिंद्रा ल़ॉजिस्टिक्सने सर्वात मोठ्या जागेसाठी करारावर सह्या केल्या आहेत, ही जागा वेअरहाऊससाठी वापरली जाणार आहे. एम्बसी इंडस्ट्रीअल पार्कने पुण्याच्या चाकण येथे 1.1 दशलक्ष स्क्वेअर फुटांवरील इंडस्ट्रीअल पार्कच्या उभारणीसाठी 350 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्रकल्पातर्फे 50,000 स्क्वेअर फूट ते 2 लाख स्क्वेअर फूटांपर्यतच्या श्रेणीत या सुविधेचा विस्तार करण्यात येणार आहे.

एम्बसी इंडस्ट्रीअल पार्कची स्थापना, देशातील निवडक पट्ट्यातील धोरणात्मक जमिनीचे संपादन करण्यासाठी करण्यात आलेली आहे. कंपनीने प्रमुख शहरांमधील 7 इंडस्ट्रीअल पार्कच्या उभारणीसाठी 250 दशलक्ष यूएस डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे आणि पुणे, हरयाणा, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि चेन्नई यासारख्या शहरांमधील उभारणीसाठी यापूर्वीच गुंतवणूक करण्यात आलेली असून, हरयाणा आणि पश्चिम बंगालच्या सरकारबरोबर सामंजस्य करारावर (एमओयू) सह्याही करण्यात आल्या आहेत.

एम्बसी इंडस्ट्रीअल पार्कचे सीईओ श्री. अंशुल सिंघल म्हणाले की, “ जागा, दर आणि बांधकाम अशी सर्व टप्प्यांवरील कामे वेळेत पूर्ण करून वेळेत डिलिव्हरी देणे हे इंडस्ट्रीअल पार्कचे ब्रीदवाक्यच आहे. आम्ही महिंद्रा लॉजिस्टिकशी आमचे प्रमुख ग्राहक म्हणून जोडले गेलेलो आहोत. आमच्या ग्राहकांना नेमकं काय हवं आहे ते आम्ही समजून घेतो आणि त्यानुसार आमचा प्राधान्यक्रम ठरवून कामाला सुरुवात करतो. उत्पादन योग्यच असावे, अशी सेवा आम्ही देतो आणि यामुळेच आम्ही वेअरहाउस उपाययोजनांमध्ये नेहमीच अ दर्जा गाठून वेगवेगळ्या उंचीवर आमचे काम नेले आहे.”

महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडचे सीओओ श्री. सुशिल राठी म्हणाले की, “महिंद्रा लॉजिस्टिक्सने नेहमीच परिणामकारक आणि सक्षम सेवा आमच्या ग्राहकांना दिल्या आहेत. चाकणमधील नवे वेअरहाउस हा आमच्या जीएसटी धोरणानंतरच भाग आहे, याद्वारे धोरणात्मकरीत्या सेवासुविधा पुरवल्या जातात, आणि मोठ्या प्रमाणात दिल्या जातात. यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे वेअरहाऊस हे मल्टी प्रोडक्ट, मल्टी-यूजर वन आहे आणि याच्या क्षमता लवचीक आहेत. यामुळे आमच्या ग्राहकांना मदत होतेच शिवाय ऑटोमोटिव घटकांच्या उत्पादकही चाकण पट्ट्यात उपलब्ध होतात.

भारतीय लॉजिस्टिक्स क्षेत्रात विविध घटकांमुळे चालना मिळत असते, यात जीएसटीची अंमलबाजवणी, प्रशासनाद्वारे चालवणाऱ्या पायाभूत सुविधांचे स्टेटस, तांत्रिक अत्याधुनिकता यांचा समावेश आहे. स्थानिक लॉजिस्टिक क्षेत्रातील प्रकल्पांचा विकास सीएजीआर 13 टक्क्यांचा आहे, आर्थिक वर्ष 20पर्यंत तो 9.2 ट्रिलियन इतका होईल, आर्थिक वर्ष 2017मध्ये तो 6.4 ट्रिलियन इतका आहे. याशिवाय थर्ड पार्टी लॉजिस्टिक क्षेत्रात 2019-20पर्यंतचा विकास 580 अब्ज रुपयांचा असेल, आर्थिक वर्ष 2017मध्ये तो 335 अब्ज रुपये होता, म्हणजेच यात 19 ते 20 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.

महिद्रा लॉजिस्टिक्सबद्दल

महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड (एमएलएल) ही 19 अब्ज यूएस डॉलर्सच्या महिंद्रा ग्रूपची 1 अब्ज यूएस डॉलर्सची भांडवल विभाजिका असलेल्या महिंद्रा पार्टनर्सची पोर्टफोलिओ कंपनी आहे. महिंद्रा लॉजिस्टिक्स ही एक थर्ड पार्टी लॉजिस्टिक (3पीएल) सेवा पुरवठादार एकीकृत कंपनी आहे, तिच्यातर्फे पुरवठा शृंखला व्यवस्थापन आणि लोकांसाठी वाहतूक उपाययोजना पुरवल्या जातात.

एक दशकापेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या एमएलएलद्वारे ऑटोमोबाइल, इंजिनिअरिंग, कन्झ्युमर गुड्स आणि इ-कॉमर्ससारख्या विविध उद्योगक्षेत्रांमधील 300 कॉर्पोरेट ग्राहकांना पुरवली जाते. तसेच कंपनीतर्फे वेअरहाउस व्यवस्थापन, वाहतूक, कारखान्यातील लॉजिस्टिक आणि पॅकेजिंग व लेबलिंगसारख्या मूल्याधिष्ठित सेवा दिल्या जातात.

महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या देशी तांत्रिक नावीन्यपूर्णतेमुळे कंट्रोल टॉवर ऑपरेशन्स, वेअरहाउस व्यवस्थापन यंत्रणा आणि वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा याद्वारे स्मूथ डिलिव्हरीची खात्री दिली जाते आणि याद्वारे संलग्नितपणे लॉजिस्टिक व्यवस्थापनाचीही खात्री दिली जाते. आमच्या वेअरहाउसमध्ये उत्पादन सुधारणा आणि सक्षमता वाढीसाठी आवश्यक असलेली सामग्री आहे. हे तंत्रज्ञान सकारात्मकतेत शुल्क मिळण्यास मदत करते आणि पारदर्शकता पुरवते. कंपनीतर्फे “अॅसेट-लाइट” व्यावसायिक मॉडेल पुरवले जाते, सानुकूल आणि तंत्रज्ञान प्रवण उपाययोजनाही पुरवल्या जातात.

नविन मराठी शाळेत राजभाषा दिन उत्साहात साजरा

0

पुणे-डेक्कनची एज्युकेशन सोसयटीच्या नवीन मराठी शाळेत मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग‘ज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्या सौ. बागेश्री मंठाळकर मा. मुख्याध्यापक सौ. कल्पना वाघ यांच्या हस्ते सरस्वती पूजन व कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस माननीय मु‘याध्यापिका यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मराठी दिनाचे औचित्य साधून इयत्ता चौथी पुरंदर वर्गातील विद्यार्थ्यांनी मराठी साहित्यिक व त्यांची पुस्तके यांवर आधारित परिपाठ सादर केला. ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी’ हे गाणे सौ. मनाली गोवंडे यांनी सादर केले. सौ. सोनाली मुंढे यांनी मराठी राजभाषा दिनाची माहिती सांगितली. प्रमुख पाहुण्यांची ओळख सौ. प्रतिभा पाखरे यांनी करुन दिली.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. बागेश्री मंठाळकर यांनी रोज एक तरी गोष्टीचे पुस्तक वाचायचेच असा संकल्प करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मराठी राजभाषा दिनानिमित्त शिक्षण विवेक तर्फे घेण्यात आलेल्या सांगू का गोष्ट या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम करण्यात आला. तसेच भाषा ऑलिम्पियाडमध्ये यश संपादन केलेल्या २९ विद्यार्थ्यांचा देखील बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सूत्रसंचालन सौ. सोनाली मुंढे व आभार प्रदर्शन सौ. स्वाती तळपे यांनी केले.

स्‍वच्‍छता ही चळवळ नागरिकांच्‍या सहकार्याशिवाय यशस्‍वी होणे अशक्‍य- नगराध्‍यक्षा वैशाली वाखारे

0

पुणे- स्‍वच्‍छता ही एक चळवळ झाली असून सर्व नागरिकांच्‍या सहकार्याशिवाय ती यशस्‍वी होणार नाही, असे प्रतिपादन शिरुर नगर परिषदेच्‍या नगराध्‍यक्षा वैशाली वाखारे यांनी केले. शिरुर येथे स्‍वच्‍छ भारत अभियान-स्‍वच्छता सर्वेक्षण 2018 च्‍या जनजागृती कार्यक्रमात त्‍या बोलत होत्‍या. यावेळी शिरुरचे तहसिलदार रणजीत भोसले,जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, मुख्‍याधिकारी विद्यादेवी पोळ, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, क्षेत्रीय प्रचार सहायक पी. कुमार, स्‍वच्‍छता दूत व हरियाली संस्‍थेचे अध्‍यक्ष सुरेश खामकर, पर्यावरणतज्ञ प्रशांत अवचट, दत्‍तात्रय  बर्गे आदी उपस्थित होते.

नगराध्‍यक्षा वाखारे म्‍हणाल्‍या, शहर असो की ग्रामीण भाग स्‍वच्‍छता पाळणे, ती टिकवणे ही काळाची गरज आहे. आपल्‍या सर्वांच्‍या उत्‍तम आरोग्‍यासाठी, पर्यावरण संरक्षणासाठी स्‍वच्‍छतेचे मोठे महत्‍त्‍व आहे.

शिरुरचे तहसिलदार रणजीत भोसले यांनी आपल्‍या मनोगतात गावाने ठरवले तर कोणतीही गोष्‍ट अंमलात आणणे अवघड नाही. स्‍वच्‍छता हा आपल्‍या जीवनाचा अविभाज्‍य भाग बनली पाहिजे. स्‍वच्‍छतेबाबत जनतेमध्‍ये जाणीवजागृती होत असल्‍याबद्दल त्यांनी समाधान व्‍यक्‍त केले.

जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्‍या वतीने शासकीय योजनांच्‍या प्रसिध्‍दीसाठी आकाशवाणी, दूरचित्रवाणी, मुद्रीत माध्‍यमे आणि सोशल मिडीयाचा वापर नियमितपणे केला जात असल्‍याचे सांगितले. लोकराज्‍य मासिकांतून शासनाच्‍या विविध योजनांची माहिती दिली जात असून या मासिकाचे वर्गणीदार होण्‍याचे आवाहनही त्‍यांनी केले.

स्‍वच्‍छता दूत व हरियाली संस्‍थेचे अध्‍यक्ष सुरेश खामकर यांनी स्‍वच्‍छता आणि आरोग्‍य याबाबत आपले मनोगत मांडले. पर्यावरणतज्ञ प्रशांत अवचट यांनी प्‍लास्‍टीक आणि थर्माकोलचा वापर टाळण्‍याचे कळकळीचे आवाहन केले.  मुख्‍याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी शिरुर नगर परिषदेच्‍या वतीने स्‍वच्‍छता अभियानाबाबत हाती घेतलेल्‍या उपाययोजनांची माहिती दिली.

क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी केंद्र सरकारच्‍या शहरी विकास मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्‍या क्षेत्रीय प्रचार संचालनालय आणि शिरुर नगरपरिषदेच्‍या मदतीने जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्‍यात येत असल्‍याचे प्रास्‍ताविकात सांगितले.

कार्यक्रमात लोकजागृती कला पथक, वसुंधरा पपेट शो आणि स्‍त्री शक्‍ती, आदी शक्‍ती या बचतगटाने मनोरंजनपर प्रबोधक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमस्‍थळी शासनाचे मुखपत्र असलेल्‍या लोकराज्‍य मासिकाचा स्‍टॉल लावण्‍यात आला होता. त्‍यास शिरुर नगर परिषदेच्‍या नगराध्‍यक्षा वैशाली वाखारे यांच्‍यासह इतर मान्‍यवरांनी भेट दिली.

जनजागृती कार्यक्रमानिमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या विविध स्‍पर्धांमधील विजेत्‍यांना पारितोषिके वितरित करण्‍यात आली. यामध्‍ये रांगोळी स्‍पर्धेतील प्रियंका काळे,वैभवी वाटेकर, आकांक्षा वरखेडे, पल्‍लवी शेंडगे, संस्‍कृती भोसले, सानिका साळुंखे,  कोमल गायकवाड तर निबंध स्‍पर्धेत अनुष्‍का गावित्रे, ऋतुजा शेवाळे, अक्षदा खिल्‍लारे, सायली थापा, मुक्‍ता कळसकर यांचा आणि वक्‍तृत्‍व स्‍पर्धेत  देवेंद्र वेताळ, क्रांती गायकवाड आणि कोमल गायकवाड यांचा समावेश होता.

प्रारंभी विद्याधाम हायस्‍कूल च्‍या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची जनजागरण रॅली काढण्‍यात आली. या रॅलीला हिरवा झेंडा शिरुर नगर परिषदेच्‍या नगराध्‍यक्षा वैशाली वाखारे यांनी दाखवला. कार्यक्रमास नगरपरिषदेचे अधिकारी,कर्मचारी,नागरिक, स्‍वच्‍छता दूत, विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने निदर्शने

0
सिंहगड इन्स्टिट्यूट पिडीत विद्यार्थ्यांना पाठिंबा 
पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेस, खासदार सुप्रिया सुळे यांनी सिंहगड इन्स्टिट्यूट येथील प्राध्यापकांच्या आंदोलनाबाबत तोडगा निघावा व विद्यार्थ्यांची गळचेपी होऊ नये यासाठी काल सिंहगड इन्स्टिट्यूट येथे भेट दिली.
या प्राध्यापकांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे खा. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आज पिडीत विद्यार्थ्यांना पाठिंबा देत विद्यापीठात निदर्शने करण्यात आली.
यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्ष मनाली भिलारे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष ऋषी परदेशी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली .
राष्ट्रवादी काॅंग्रेस संघटनेच्यावतीने तेथील विद्यार्थी व पालकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. तसेच आमदार सतीश चव्हाण आणि विधीमंडळ नेते धनंजय मुंडे हे विद्यार्थ्यांच्या बाजुने आवाज उठविणार असल्याचे मनाली भिलारे यांनी सांगितले.
यावेळी स्नेहल शिंगारे (राष्ट्रवादी युवती काँग्रेस पदाधिकारी), पूजा वाघमारे, गीतांजली सारगे, सवेंदू शिंदे, नंदकुमार हंगे, रवी अमरावती, केशव माने, सौरभ माने आदी उपस्थित होते.
सिंहगड इन्स्टिट्यूट येथील प्राध्यापकांच्या आंदोलना मुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे तरी याबाबत लवकरात तोडगा काढण्यात यावा आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने पुणे विद्यापीठ येथे निदर्शन करून करण्यात आली.

उद्योजकांना पाठिंबा देण्याकरता देआसरा फाउंडेशन आणि जनता सहकारी बँक एकत्र

0

पुणे-महाराष्ट्रातील उद्योजकांना सहाय्य करण्यासाठी देआसरा फाउंडेशनचा जनता सहकारी बँके सोबत  सामंजस्य करार आहे. त्याच बरोबर बँकेने छोट्या उद्योजकांसाठी सुलभ कर्ज योजना तयार केली आहे. या योजनेअंतर्गत जनता सहकारी बँकेमध्ये व्यावसायिक कर्जासाठी येणाऱ्या तरुण उद्योजकांना व्यवसाय, कर्ज विषयक मार्गदर्शन तसेच प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी देआसरा फाउंडेशन सहाय्य करणार आहे.

जनता सहकारी बँकेतर्फे “जनता स्टार्ट-अप कर्ज” हि योजना चालू करण्यात आली आहे. या  अंतर्गत व्यवसायभिमुख शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व इतर तरुणांना दहा हजार ते दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे कर्ज बँकेच्या महाराष्ट्रातील ७० शाखांमध्ये उपलब्ध असून देआसरा फाउंडेशनच्या मदतीने उद्योजकांना प्रोजेक्ट रिपोर्ट  व व्यवसायासाठी लागणाऱ्या अन्य सेवा यासाठी मदत करण्यात येणार आहे. या कर्जाचे व्याजदर महिलांसाठी ११.२५% तर पुरुषांसाठी ११.५०% असा ठेवण्यात आला असून, हि योजना ग्रामीण आणि शहरी भागातील नवीन उद्योजकांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्यास आणि विस्तार करण्यास प्रोत्साहित करीत आहे.

या  योजनेबाबत माहिती देताना प्रज्ञा गोडबोले म्हणाल्या की, “देआसरा अनेक योजना आणि प्रकल्पांच्या सहाय्याने स्थानिक आर्थिक विकासात योगदान देते. त्यामुळे तरुण उद्योजकांमध्ये कार्याक्षमता वाढते व ते स्पर्धेच्या जगात टिकून राहतात”.  उद्योजकता वाढवणे, उद्योजकांना पाठिंबा देणे आणि नवीन नोकरीच्या संधी निर्माण करणे असा प्रयत्न देआसरा फाउंडेशन कायमच करीत असते. “उद्योजकांना स्थानिक तसेच प्रादेशिक पातळीवर व्यवसायात योग्य मार्गदर्शन आणि मदत करण्यासाठी आम्ही ही,जनता स्टार्टअप योजना तयार केली असून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी देआसरा फाऊन्डेशन आम्हाला सहकार्य करत आहे. व्यवसायात वाढ होण्यासाठी आवश्यक साधनांसह त्यांची क्षमता वाढवण्याचा आमचा प्रयत्न असेल” असे जनता सहकारी बँकेचे पदाधिकारी म्हणाले.

वंदना चव्हाण यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी

0

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेसाठी वंदना चव्हाण यांना पुन्हा एकदा संधी देण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबई येथे केली.

वंदना चव्हाण या विधानपरिषदेच्या आमदार देखील होत्या. त्यांनी पुणे महापालिकेत महापौरपद भूषवले असून त्या सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षा देखील आहेत.