जुन्नर-तालुक्यातील हिवरे खुर्द गावाच्या हद्दीत बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. हा बिबट्या ८ ते ९ वर्षांचा असल्याची आणि नर जातीचा असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. या बिबट्याने मागच्या महिन्यात उसतोड कामगार महिलेवर हल्ला करून तिला ठार केले होते. त्यामुळे हिवरे खुर्द भागात या बिबट्याची दहशत पसरली होती. त्यानंतर गावकऱ्यांनी वन विभागाला बिबट्याबाबत माहिती दिली. बिबट्याला पकडण्यासाठी हिवरे खुर्द भागात पिंजरा लावण्यात आला होता. त्याच पिंजऱ्यात या बिबट्याला जेरबंद करण्यात आले. या बिबट्यात वनविभागाच्या मदतीने बिबट निवारण केंद्रात पाठवले जाणार आहे. हिवरे खुर्द गावात या बिबट्याची दहशत पसरली होती. त्याला जेरबंद केल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.