‘गंगामातेने मला बोलावलं होतं आणि आता सगळीकडे कमळच!’ पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

Date:

“गंगोत्रीपासून गंगा सागरपर्यंत सगळीकडे कमळ”
दिल्ली: आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. मी बंगाल, तमिलनाडूच्या आणि केरळच्या जनतेचा आदरपूर्वक नमन करतो आणि धन्यवाद मानतो. आज भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. सगळ्या कार्यकर्त्यांनी कमाल केलीय, कमळ फुलवलंय. वर्षानुवर्षांची साधना विजयात बदलते तेव्हा होणारा हा आनंद आहे. अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या निकालांवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

” भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं नवा इतिहास घडवला आहे. नितीन नवीन यांच्या नियुक्तीनंतरची ही पहिली निवडणूक होती. आज लोकतंत्रच नाहीतर भारताचं संविधान देखील जिंकलं आहे. नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. पोटनिवडणुकांमध्येही जनतेनं एनडीएला कौल दिला आहे. एनडीएच्या सहकारी सुनेत्रा पवारांना जनतेनं कौल दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये ९३ टक्के ऐतिहासिक मतदानाची नोंद करण्यात आली आहे. लोकशाही हा आमच्या नसानसात घुमणारा आवाज आहे.आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. हा केवळ भाजपचा विजय नाही, तर भारताच्या लोकशाहीचा आणि संविधानाचा विजय आहे,” असे म्हणत पंतप्रधान मोदींनी बंगाल, तमिळनाडू आणि केरळमधील पक्षविस्तार आणि विजयानंतर मोदींनी जनतेचे आभार मानत कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे तोंडभरून कौतुक केले.
ते पुढे म्हणाले की, “आसाम,पुदुच्चेरी आणि केरळमध्येही मोठ्या प्रमाणावर मतदान झालं आहे. भारताच्या लोकशाहीची प्रतिष्ठा जनतेनं कायम राखली. १४ नोव्हेंबरला मागच्या वर्षीच बिहारच्या निकालावेळी बंगालच्या विजयाचे संकेत दिले होते. मी तेव्हाच सांगितलं होतं की, गंगामातेनं मला बोलावलं आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि आता पश्चिम बंगालमध्येही एनडीए सरकार स्थापन झालं आहे. गंगोत्रीपासून गंगा सागरपर्यंत सगळीकडे कमळ फुललं आहे. गंगामातेसोबतच ब्रह्मपुत्र आणि कामख्या देवीचेही आशीर्वाद आमच्यासोबत आहेत. आसाममध्येही भाजपला अभूतपूर्व यश मिळालं आहे. पुदुच्चेरी जनतेसमोर ठेवलेल्या व्हिजनवर विश्वास ठेवला.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आयुष्मान कार्ड अनिवार्य ; ई-केवायसी प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी नोंदणीचे आवाहन

मुंबई दि.४ : ‘एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव...

व्यंगरेषांतून उमटणार विचाररेखा ; पुण्यात रंगणार आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सव

पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे आयोजन ; ४२ देशांतील २९१...

कात्रज-येरवडा ट्वीन टनेलच्या कामासाठी स्वतंत्र विशेष उद्देश वहन संस्था निर्माण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पीएमआरडीए व पुणे महापालिकेला संयुक्तपणे कार्यवाही करण्याचे आदेश मुंबई,...