नसरापूर चिमुकली अत्याचार-खून: 25 जूनला निकाल..राज्याचे लक्ष

Date:

पुणे-नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्घृण खून प्रकरणाचा अंतिम निकाल येत्या २५ जून २०२६ रोजी जाहीर होणार आहे. हा खटला महाराष्ट्राच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात जलदगतीने चालविलेला खटला ठरण्याची दाट शक्यता आहे, कारण अवघ्या एका महिन्याच्या आतच या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन निकाल समोर येत आहे.

या संवेदनशील प्रकरणात गुन्हा घडल्यापासून तपास यंत्रणा आणि न्यायालयाने अत्यंत कौतुकास्पद व वेगाने काम केले आहे. केवळ १६ दिवसांत पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले. त्यानंतर पुढील १६ दिवसांत सर्व महत्त्वाच्या साक्षी व पुरावे नोंदवून घेण्यात आले. यानंतर २० दिवसांमध्ये अंतिम युक्तिवादही पूर्ण करण्यात आला. संपूर्ण खटल्याची प्रक्रिया अतिशय वेगाने पार पडल्यामुळे महिन्याभराच्या आतच पीडितेला अंतिम न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या खटल्याचा अंतिम युक्तिवाद देखील पूर्ण झाला आहे. विशेष सरकारी वकील अजय मिसार यांनी न्यायालयात सरकारची बाजू अत्यंत भक्कमपणे मांडली. त्यांनी न्यायालयात गुन्ह्याचा सविस्तर घटनाक्रम दर्शवणारा टाईमलाईन चार्ट, वैद्यकीय पुराव्यांचे विश्लेषण, फॉरेन्सिक डेटा चार्ट, डीएनए प्रोफाईलिंग मॅट्रिक्स आणि आरोपीचा गुन्ह्याशी थेट संबंध सिद्ध करणारा कनेक्टिव्हिटी चार्ट सादर केला. या भक्कम वैज्ञानिक व तांत्रिक पुराव्यांसोबतच ऐतिहासिक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा संदर्भ देत सविस्तर लेखी युक्तिवाद न्यायालयासमोर ठेवण्यात आला.

बचाव पक्षानेही आपला अंतिम युक्तिवाद पूर्ण केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद सविस्तरपणे ऐकल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला असून, अंतिम निकालासाठी २५ जून २०२६ ही तारीख निश्चित केली आहे. नसरापूरमधील या अत्यंत संतापजनक प्रकरणामध्ये पीडित चिमुकलीला लवकरात लवकर आणि कठोर न्याय मिळावा, अशी संपूर्ण महाराष्ट्राची भावना होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा नवा डिजीटल प्रवास २० जून पासून 

‘मराठी वारसा’ यूट्यूब वाहिनीवर पहिला भाग प्रसारित अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात आपलं...

पुणे महानगर प्रदेशातील वाहतूककोंडी फुटणार; ‘पीएमआरडीए’ आणि ‘महारेल’मध्ये सामंजस्य करार!

रेल्वेफाटकमुक्तीच्या दिशेने ‘पीएमआरडीए’चे महत्त्वाचे पाऊल! पुणे : पुणे महानगर प्रदेश...

RTI मधील बदलांवर अण्णा हजारे संतप्त; फडणवीस सरकारला उपोषणाचा इशारा

अहिल्यानगर-देशात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात माहिती अधिकार (RTI) कायदा लागू...