आरेमधील 65 एकरवर वृक्ष लागवडीचे नियोजन करा

Date:

मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई, दि. 4 मे
आरे वसाहती मधील विविध प्राधिकरणाकडे असलेल्या 65 एकर जागेवर येत्या पावसाळ्यात झाडे लावण्याचे नियोजन करा, तसेच आरे जंगलाची घनता वाढविण्यासाठीच्या उपाययोजनां बाबत ही कृती आराखडा तयार करा असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांनी आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्या प्रमाणे
राज्य शासनाकडून ३०० कोटी वृक्षलागवड मोहिम हाती घेण्यात येणार आहे. मुंबईचे वाढते तापमान लक्षात घेता,
या योजनेत मुंबई उपनगराचा सहभाग वाढवण्यासाठी आज
आरे वसाहतीचा मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांनी पाहणी दौरा केला. या वसाहती मध्ये जी शासकीय प्राधिकरणे व कार्यालये आहेत, त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचे कामकाज समजून घेतले, त्यांना जिल्हा नियोजनातून काही मदत करता येईल का?
तसेच त्यांच्याकडे असलेल्या जागांपैकी मोकळी जागा आहे का? असल्यास किती वृक्ष लागवड करता येईल? याबाबत प्रत्येक शासकीय कार्यालयात जाऊन हा आढावा घेण्यात आला. या दौऱ्यात मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी, मुंबई महापालिका, एमएमआरडीए अशा संबंधित अधिकाऱ्यांना नोंदी करायला सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी या जागेवर वृक्ष किती लागू शकतात, कोणते लावणे अपेक्षित आहे तसेच काही ठिकाणी मियावाकी जंगल वाढवता येईल का? आरे मधील जंगलाची घनता वाढविण्यासाठी काय करता येईल ? याचे संपूर्ण नियोजन व कृती आराखडा सादर करा असे निर्देश मंत्री शेलार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
या दौऱ्यात गोरेगाव पशुवैद्यकीय रुग्णालय, महानंद डेरीचे मुख्यालय, आरे वसाहतीमधील
राज्य राखीव पोलीस बल,गट क्र 8 आणि फोर्स 1 कार्यालय,कृषी उद्योग विकास महामंडळाच्या कार्यालयात,पशुसंवर्धन गुणनियंत्रण प्रयोगशाळा, केंद्रीय कुक्कुटपालन व विकास संघटन, माँडर्न बेकरी कँम्पससह परिसराची त्यांनी आज पाहणी केली. प्रथमदर्शनी पाहणीमध्ये या कार्यांकडे असलेल्या जागांपैकी सुमारे 65 एकर जागा वृक्षारोपणासाठी उपलब्ध होईल असा अशी माहिती समोर आली आहे. अजूनही सविस्तर अभ्यास करुन जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा असे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले.
तसेच मेट्रो भवनसाठी जी जागा प्रस्तावित करण्यात आली होती ती रिक्त असून त्या जागेवर वृक्षारोपण करता येईल का? तसेच आरे मेट्रो कारशेड मध्ये जी जागा रिक्त आहे त्यावर वृक्षारोपण करण्यात आले आहे त्याची घनता वाढविण्यासाठी काय करावे याबाबत ही कृती आराखडा तयार. करण्याचे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आयुष्मान कार्ड अनिवार्य ; ई-केवायसी प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी नोंदणीचे आवाहन

मुंबई दि.४ : ‘एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव...

‘गंगामातेने मला बोलावलं होतं आणि आता सगळीकडे कमळच!’ पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

"गंगोत्रीपासून गंगा सागरपर्यंत सगळीकडे कमळ"दिल्ली: आजचा दिवस ऐतिहासिक आणि...

व्यंगरेषांतून उमटणार विचाररेखा ; पुण्यात रंगणार आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सव

पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे आयोजन ; ४२ देशांतील २९१...