पुणे : सीए इंटरमिजीएटचे ऑल इंडिया रँकर, महेश प्रोफेशनल फॉरम आणि विदर्भ महेश असोसिएशनचे माजी अध्यक्ष असलेले सीए आनंद आर जाखोटिया यांची आयसीएआयच्या पुणे शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. अध्यक्षपदाचा कार्यभार घेण्यापूर्वी त्यांनी कोषाध्यक्ष, सचिव आणि उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. विकासाच्या अध्यक्षपदाचा कार्यभारही त्यांनी ह्यापूर्वी सांभाळला आहे जे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी काम करते. सीए आनंद आर जाखोटिया यांच्या कार्यकाळात विकासाच्या पुणे शाखेने २०१५-२०१६ मध्ये बेस्ट ब्रांच इन दि रिजन आणि बेस्ट ब्रांच इन दि नेशन हे अवॉर्ड प्राप्त केले होते. सीए आनंद आर जाखोटिया हे एमव्हीपीएम, माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाच्या महेश विद्यालय कोथरूडच्या मॅनेजिंग कमिटीतदेखील आहेत.
अध्यक्ष सीए आनंद आर जाखोटिया ह्यांच्याप्रमाणेच सीए ऋता चितळे ह्यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली असून सीए राजेश अग्रवाल हे सचिव आणि विकासाचे अध्यक्ष म्हणून तर सीए अभिषेक धामणे यांची आयसीआयच्या कोषाध्यक्षपदी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी त्यांना अतिशय आवश्यक आणि महत्वाचे असलेले ग्रंथालय आणि अभ्यासिकांची सोय आयसीएआयचे नवे अध्यक्ष सीए आनंद जाखोटिया करणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी फक्त शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक कार्यक्रमाचे आयोजनदेखील ते करणार आहेत. सदस्यांकरिता सीपीइ आणि नॉन-सीपीइ कार्यक्रमांचे अगदी वाजवी किमतीत आयोजन करण्याची त्यांची इच्छा आहे. सदस्यांसाठी नेहमीच्या ट्रेनिंग कार्यक्रमांव्यतिरिक्त आणखी कार्यक्रम आयोजित करण्याचा त्यांचा अजेंडा आहे.
सीए आनंद आर जाखोटिया यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार घेतल्यानंतर ३ मार्चला मेगा बँकिंग समिट हॉटेल शेरेटन ग्रँड येथे आयोजित करण्यात आले आहे ज्यात वेगवेगळ्या शहरातून ३०० लोक सहभागी होणार आहेत. मोठमोठ्या बँकांचे एमडी, इडी, रिजनल हेड्स आणि अनेक एक्स्पर्ट फॅकल्टीस या समीटमध्ये उपस्थित असतील. डब्लूआरसीचे नवे अध्यक्ष सीए संदीप जैन आणि त्यांची टीमही या समीटला उपस्थित असेल.