सिंहगड इन्स्टिट्यूट पिडीत विद्यार्थ्यांना पाठिंबा
पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेस, खासदार सुप्रिया सुळे यांनी सिंहगड इन्स्टिट्यूट येथील प्राध्यापकांच्या आंदोलनाबाबत तोडगा निघावा व विद्यार्थ्यांची गळचेपी होऊ नये यासाठी काल सिंहगड इन्स्टिट्यूट येथे भेट दिली.
या प्राध्यापकांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे खा. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आज पिडीत विद्यार्थ्यांना पाठिंबा देत विद्यापीठात निदर्शने करण्यात आली.
यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्ष मनाली भिलारे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष ऋषी परदेशी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली .
राष्ट्रवादी काॅंग्रेस संघटनेच्यावतीने तेथील विद्यार्थी व पालकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. तसेच आमदार सतीश चव्हाण आणि विधीमंडळ नेते धनंजय मुंडे हे विद्यार्थ्यांच्या बाजुने आवाज उठविणार असल्याचे मनाली भिलारे यांनी सांगितले.
यावेळी स्नेहल शिंगारे (राष्ट्रवादी युवती काँग्रेस पदाधिकारी), पूजा वाघमारे, गीतांजली सारगे, सवेंदू शिंदे, नंदकुमार हंगे, रवी अमरावती, केशव माने, सौरभ माने आदी उपस्थित होते.
सिंहगड इन्स्टिट्यूट येथील प्राध्यापकांच्या आंदोलना मुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे तरी याबाबत लवकरात तोडगा काढण्यात यावा आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने पुणे विद्यापीठ येथे निदर्शन करून करण्यात आली.