Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

स्वप्नपूर्तीसाठीच्या मोहिमेसाठी पी. व्ही. सिंधूची ‘स्टे फ्री‌’बरोबर हातमिळवणी

Date:

सॅनिटरी नॅपकिन निर्मिती क्षेत्रातील प्रमुख ब्रॅंड असलेल्या ‘स्टे फ्री’ कंपनीने आज रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या प्रसिद्ध बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांची ब्रॅंड अॅम्बेसेडरपदी निवड केली, तसेच ‘ड्रीम्स ऑफ प्रोग्रेस’ (प्रगतीची स्वप्ने) या प्रसिद्धीमोहिमेचीही घोषणा केली. या मोहिमेद्वारे मुलींनी आपल्या मासिक पाळीदरम्यानदेखील आपल्या स्वप्नपूर्तीचा पाठपुरावा करावा यासाठी पाठबळ देण्यात आले आहे.

 

या प्रसिद्धीमोहिमेबद्दल पी. व्ही. सिंधू म्हणाल्या, “कोणत्याही मुलीच्या मनात मासिक पाळीदरम्यान असलेली भीती म्हणजे आपले संरक्षण कधीही निघून जाऊ शकते याची. त्यामुळे आपल्या स्वप्नपूर्तीच्या प्रवासात पाळी हा अडथळा आहे, असे तिचे मत बनते. मात्र ‌‘ड्रीम्स ऑफ प्रोग्रेस’मुळे मुलींना पुढे जाणे शक्य होणार असून त्यांना आपली स्वप्ने वास्तवात आणता येणार असल्यामुळेच मी या मोहिमेशी जोडले गेले आहे. या मोहिमेमुळे मुलींचे मन:परिवर्तन होऊन पाळीदरम्यान न खचता त्यांना प्रेरणा मिळेल, अशी आम्हाला आशा आहे.”

‘जॉन्सन अॅंड जॉन्सन’ ही कंपनी गेल्या ५० वर्षांपासून भारतामध्ये ‘स्टेफ्री’ नॅपकिन्सची निर्मिती करीत आहे.  या कंपनीने भारतामधील शाळा तसेच जाहिरातींमधून हा उपक्रम सर्वदूर पसरवला आहे. ही कंपनी भारतामधील महिलांसाठी विविध प्रकारचे नॅपकीन्स बनविण्यात आघाडीवर आहे. त्या मध्ये विनाबेल्ट आणि रात्री उपयोगाला येणाऱ्या नॅपकीन्सचा समावेश आहे.

‘जॉन्सन अॅंड जॉन्सन इंडिया’च्या ग्राहक प्रॉडक्ट विभागाच्या विपणन उपाध्यक्षा डिंपल सीधर म्हणाल्या, “स्त्रियांचे आरोग्य चांगले राखण्यात पुढाकार घेणाऱ्या ‘स्टेफ्री’ हा ब्रॅंड मासिक पाळीला सामोऱ्या जाणाऱ्या मुलींच्या मानसिकतेमध्ये होणाऱ्या बदलांवर आजपर्यंत काम करीत आला आहे. ‘ड्रीम्स ऑफ प्रोग्रेस’ या मोहिमेद्वारे मुलींनी मासिक पाळीदरम्यान आपली स्वप्ने पाहणे थांबवू नये, असे आवाहन आम्ही करीत आहोत. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी मुलींना मासिक पाळीदरम्यान जे संरक्षण हवे आहे, ते आमच्या ब्रॅंडने उपलब्ध केले आहे. मुलींच्या शक्तीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून पी. व्ही. सिंधू हे नाव आपल्या समोर आहे. त्यामुळे सिंधू यांचा या मोहिमेबरोबरचा सहभाग हा ‘स्टेफ्री’च्या भूमिकेशी सुसंगत आहे.”

“भारतामधील लक्षावधी मुली दररोज मासिक पाळी सुरू असतानाही आपल्या स्वप्नपूर्ततेसाठी प्रयत्न करीत असतात. ‘स्टे फ्री’ ब्रॅंडद्वारे मुलींना त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या प्रवासात कोणताही अडथळा न येण्याचे दीर्घकालीन

संरक्षण पुरविले जाते. भारतामधील मुली आणि महिलांच्या प्रगतीला आमचा पाठिंबा राहणार आहे. त्यामुळेच आजच्या काळातील मुलींची ‌‘रोलमॉडेल’ असणाऱ्या पी. व्ही. सिंधू या साहजिकच आमच्या ‘ब्रॅंड अॅम्बेसेडर’ आहेत,” असे प्रतिपादन ‘जॉन्सन अॅंड जॉन्सन इंडिया’च्या महिला आरोग्य, ग्राहक प्रॉडक्ट विभागाच्या महाविपणन व्यवस्थापक सरोज मिश्रा यांनी केले.

‘नेल्सन’च्या आकडेवारीनुसार भारतीय सॅनिटरी नॅपकीन्सच्या बाजारपेठेची उलाढाल आता ४ हजार कोटींपर्यंत जाऊन पोचली आहे. जलद गतीने होणारे शहरीकरण, मध्यमवर्गाची वाढती संख्या, जागरुकता, नोकरी करणाऱ्या महिलांची वाढलेली संख्या आणि सरकारी यंत्रणा तसेच खासगी कंपन्यांनी केलेल्या शरीराच्या आरोग्याबद्दलच्या जागरुकतेमुळे येत्या काही वर्षांमध्ये सॅनिटरी नॅपकीन्सची बाजारपेठ आणखी फोफावणार आहे. तरुण मुलींपर्यंत योग्य संदेश पोचण्यासाठी सिंधू यांनी ‘स्टेफ्री’बरोबर दूरचित्रवाहिन्यांसाठी एक जाहिरातदेखील केली आहे. त्यामध्ये सिंधू यांनी मुलींना ‘स्वप्नपूर्तीच्या प्रवासात कोणताही व्यत्यय आणू देऊ नका, विशेषत: मासिक पाळीदरम्यान…’ असे आवाहन केले आहे.

जॉन्सन अॅंड जॉन्सनबद्दल :

चांगले जगणे आणि त्यामधून साध्य होणारी प्रगती यांचा पाया हा उत्तम आरोग्यात दडला आहे यावर आम्ही विश्वास ठेवतो. त्यामुळेच गेल्या १३० वर्षांमध्ये ग्राहकांना वयाच्या कोणत्याही टप्प्यावर चांगले ठेवण्याचे ध्येय आम्ही आखले आहे. ‘जॉन्सन अॅंड जॉन्सन’ ही आरोग्य सुविधा पुरविणारी जगभरामधील एक आघाडीची संस्था असून आम्ही आमची सर्वदूर पसरलेली व्याप्ती चांगल्या कामासाठी उपयोगात आणतो. अधिकाधिका लोकांपर्यंत पोचणे, ग्राहकांना परवडेल अशा दरात आमचे प्रॉडक्ट उपलब्ध करणे यासाठी आमचा प्रयत्न सुरू असतो. त्यामधून निरोगी मन, निरोगी शरीर आणि निरोगी समाज निर्मिण्यावर मचा भर आहे.

जॉन्सन अॅंड जॉन्सन इंडियाबद्दल

‘जॉन्सन अॅंड जॉन्सन’ या कंपनीची ७० वर्षांपूर्वी भारतामध्ये स्थापना झाली. त्यानंतर आजपर्यंत या कंपनीने भारतीय ग्राहकांचे आरोग्य चांगले राहावे या दृष्टीने अनेक नावीन्यपूर्ण कल्पनांची अंमलबजावणी करीत वेगवेगळी उत्पादने बाजारात आणली. या कंपनीमध्ये सध्या ३५०० कर्मचारी काम करतात. ग्राहक आरोग्यसेवा, वैद्यकीय उपकरणे आणि औषधे या तीन क्षेत्रांमध्ये सध्या ही कंपनी कार्यरत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

265 मृतदेह रुग्णालयात आणले:DNA सॅम्पलिंग सुरू; PM मोदींचा घटनास्थळी दौरा

अहमदाबाद:एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान गुरुवारी दुपारी अहमदाबादमध्ये...

दोन्ही इंजिन बंद पडल्याने अपघात..मृत्यूच्या थरारक प्रवासाचा भारतासोबत अमेरिकाही करणार तपास..

६२५ फुटांवरून ४७५ फूट प्रतिमिनिट वेगाने… अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या...

चमत्कार! तो प्रवासी भयावह विमान अपघातातून वाचला…

अ हमदाबाद-लंडन विमानाचा आज भीषण अपघात झाला आहे. सुमारे...