Home Blog Page 3178

प्रदूषणाची सुरवात घरापासुन होते: माधवराव गाडगीळ

0
पुणे : ‘घरातील किटक, डास, झुरळे यांचा नाश करण्याच्या नादात जी रासायनिक फवारणी, कॉईल जाळण्याचे  प्रकार घरात चालतात त्यामुळे कर्करोग, फुफ्फुसाचे आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या फवारणीमुळे प्रदूषणाला सुरुवात होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसत आहे, असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.
निमित्त्त होते ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन’ तर्फे आयोजित ‘ग्रीन सॊसायटी’ स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचे.
‘ग्रीन सॊसायटी’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण डॉ. माधव गाडगीळ यांच्या हस्ते झाले.  ‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’  स्पर्धेचे प्रायोजक होते.
यावेळी रोटरीचे माजी प्रांतपाल विनय कुलकर्णी , ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन’चे अध्यक्ष गणेश जाधव,  ‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’  चे राजेंद्र आवटे, रोटेरियन गिरीश मठकर आणि विश्वास लेले उपस्थित होते.
डॉ. माधव गाडगीळ म्हणाले, ‘समाजात होणाऱ्या विविध प्रकारच्या प्रदूषणाबाबत अनेकदा चर्चा होते. परंतु त्याची सुरुवात आपण घरातूनच करत असतो. घरामध्ये विविध प्रकारचे फवारे वापरणे, कीटकनाशके यामुळे आपण नकळत हवा आणि पाण्याचे प्रदूषण करत असतो. प्रदूषण नियंत्रणाची सुरुवात प्रथम घरापासून व्हायला हवी. ऊर्जा, आणि पाणीबचत काळाची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून रोटरी क्लब गांधीभवनचा ‘ग्रीन सॊसायटी स्पर्धा’ हा उपक्रम स्तुत्य आणि समाजोपयोगी ठरेल.’
ग्रीन सॊसायटी स्पर्धा व्यक्तिगत सदनिका, बंगला, एक इमारत सोसायटी तसेच मोठ्या गृहसंकुलांसाठी खुली होती. पुण्यातील एकूण ४५ सोसायटयांनी सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेत सौर ऊर्जा वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कचरा निर्मूलन, पाणी बचत, वृक्षारोपण, बायोगॅस या निकषांद्वारे मूल्यमापन करण्यात आले, असे स्पर्धेचे निमंत्रक विश्वास लेले यांनी सांगितले.
राजेंद्र आवटे म्हणाले, ‘शहरीकरणामुळे नैसर्गिक संपदेवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. म्हणून प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. याकरिता अशा प्रकारच्या स्पर्धेची गरज भासत आहे. ‘
‘पुणे पालिका, ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन’, ‘सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज्’, ‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’, ‘पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ’, ‘सस्टेनेबल लिव्हिंग इंटिग्रेटेड सोल्युशन्स’, या संस्थांनी एकत्रितपणे या स्पर्धेचे आयोजन केले होते’, अशी माहिती प्रास्ताविकात गणेश जाधव यांनी दिली. आभार गिरीश मठकर यांनी मानले.
स्पर्धेचे परीक्षण पर्यावरण क्षेत्रातील विविध विभागातील तज्ज्ञ अनघा पुरोहित, मनीषा कोष्टी, धनश्री कुलकर्णी, अमरनाथ चक्रदेव आणि निरंजन उपासनी यांनी केले.
*स्पर्धेचा निकाल :*
१. एक सदनिका / घर यामध्ये प्रमोद तांबे (‘स्नेह सेवा’, सदाशिव पेठ) यांना ,
 २. वैयक्तिक बंगला / रो हाऊस : प्रथम क्रमांक मयूर भावे (‘वूडलॅंड्स ड्रीम’, कोथरूड), व्दितीय क्रमांक : जितेंद्र गानला (कोथरूड) यांना,
३.  एक इमारत सोसायटी या मध्ये स्टर्लिंग हॅबिटॅट, बावधन
४. गृह संकुल :  प्रथम क्रमांक : युथिका, बाणेर,  व्दितीय क्रमांक : रोहन सेहेर, बाणेर) आणि तृतीय क्रमांक रहेजा वूड्स, कल्याणीनगर
जूरी विशेष पुरस्कार : कुमार सबलाईम, कोंढवा आणि न्याती एन्विरोन्स, विश्रांतवाडी यांनी पटकाविले.

ऱ्हिदम वाघोलीकर, रचना खडीकर-शहा यांना कलागौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

0

पुणे ःसंगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्मित्त्वांवर लेखन करणारे युवा लेखक र्‍हिदम वाघोलीकर आणि रचना खडीकर – शहा यांना कलागौरव राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. भारतीय पत्रकार संघ, कृतिका बहुद्देशीय संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात आला.

नासिक येथे ११ मार्च रोजी कुसुमाग्रज स्मारक सभागृह येथे सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या हस्ते र्‍हिदम वाघोलीकर आणि रचना खडीकर – शहा यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

‘युवक मंडळी संगीत विषयात आणि या क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांवर अभ्यास करून लिखाण करतात. हे उल्लेखनीय आहे’, असे गौैरी सावंत यांनी भाषणात सांगितले.

पालकमंत्री गिरीश महाजन, हेमंत टकले, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, सुधीर वाघोलीकर, अनु वाघोलीकर, संजय लोणारी, आशय वाघोलीकर यावेळी उपस्थित होते.

-हीदम वाघोलीकर आणि रचना खडीकर -शहा यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यावर पुस्तके लिहिली आहेत. रचना खडीकर -शहा या लता मंगेशकर यांची भाची आहेत.लता मंगेशकर यांच्यावरील पुस्तक अनोख्या ग्रामोफोन आकारात त्यांच्याच हस्ते प्रकाशित झाले होते, तर किशोरीताईंवरील पुस्तक ‘स्वरमंङळ ‘ ( इंडियन हार्प ) आकारात प्रकाशित होत आहे.

पुणे परिमंडलात नवीन वीजमीटरची मुबलक उपलब्धता

0

पुणे पुणे परिमंडलातील नवीन वीजजोडण्या तसेच सदोष वीजमीटर बदलण्यासाठी महावितरणच्या विविध कार्यालयांमध्ये सद्यस्थितीत सिंगल व थ्री फेजचे 79 हजार 481 नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. त्यामुळे नवीन वीजमीटरचा तुटवडा असल्याबाबत कोणीही दिलेल्या माहितीवर वीजग्राहकांनी विश्वास ठेऊ नये तसेच नवीन वीजमीटर मिळत नसल्यास तक्रार करण्याचेही आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

पुणे परिमंडलातील विविध कार्यालयांत सध्या सिंगल फेजचे 42,703 नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. यात गणेशखिंड मंडल अंतर्गत भोसरी, कोथरूड, पिंपरी व शिवाजीनगर विभागांमध्ये 22 हजार 800, रास्तापेठ मंडल अंतर्गत रास्तापेठ, पद्मावती, बंडगार्डन, नगररोड, पर्वती या पाच विभागांत 7 हजार 454 आणि पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत मुळशी, मंचर व राजगुरुनगर विभागांत 12 हजार 370 नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. यासोबतच तिनही मंडल कार्यालयांना प्रत्येकी 10 हजार असे एकूण 30 हजार नवीन वीजमीटर सोमवारी (दि. 12) देण्यात आले आहेत. त्यामुळे सिंगल फेजचे 72 हजार 703 नवीन वीजमीटर उपलब्ध झालेले आहेत. ही संख्या सद्यस्थितीत नवीन वीजजोडणी तसेच सदोष किंवा नादुरुस्त वीजमीटर बदलण्याच्या तुलनेत दुप्पटीहून अधिक आहे. यासोबतच थ्री फेजचेही पुणे परिमंडलात 6 हजार 772 नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात गणेशखिंड मंडल – 3245, रास्तापेठ मंडल – 2784 व पुणे ग्रामीण मंडलमध्ये 1743 नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे सुद्धा सध्या असलेल्या पेडपेडींगपेक्षा कितीतरी जास्त आहेत.

पुणे परिमंडलातील सर्वच कार्यालयांना मुबलक प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे नवीन वीजजोडणी देण्याची तसेच नादुरुस्त वीजमीटर सुद्धा तातडीने बदलण्यात यावेत व त्याची महावितरण अंतर्गत ईआरपीमध्येही (एंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग) तात्काळ नोंद करण्याचे आदेश स्थानिक कार्यालयांना देण्यात आले आहेत. वीजमीटर उपलब्ध नसल्याचे कारण सांगून वीजग्राहकांची दिशाभूल केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास महावितरणच्या संबंधित कर्मचार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी याआधीच स्पष्ट केले आहे.

नवीन मीटर वीजजोडणीसाठी किंवा नादुरुस्त मीटरऐवजी बदलून मिळण्यास विलंब होत असल्यास महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयात ग्राहकांनी ताबडतोब संपर्क साधावा. याशिवाय मुंबई येथील विशेष मदत कक्षातील 022-26478989 किंवा 022-26478899 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत तसेच 24×7 सुरु असललेल्या 1912 किंवा 18002003435 किंवा 18002333435 या टोल फ्री क्रमांकावर वीजग्राहकांनी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा गुरुवारी पालिकेवर एक वर्ष अंधाराचे निषेध मोर्चा

पुणे :
भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेतील सत्तापूर्तीला येत्या गुरुवारी १५ मार्च रोजी वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्तीतील भाजप सरकारच्या कारभाराबद्दल असंतोष व्यक्त करण्यासाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने एक वर्ष अंधकाराचे निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
लाल महाल ते महापालिका असा मोर्चाचा मार्ग असून, दुपारी ३ वाजता मोर्चास प्रारंभ होणार आहे. या मोर्च्यात नगरसेवक, सेल अध्यक्ष,  पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
‘भाजप सरकारचे अंधारमय सत्तेचे एक वर्ष पूर्ण होत आहे. ही भाजप सत्तेची वर्षपूर्ती नसून, पुणेकरांच्या अंधकाराची वर्षपूर्ती आहे. पुणेकरांनी अत्यंत विश्वासाने विकासासाठी महापालिकेत भाजप ला सत्ता दिली; परंतु गुंडगिरी, निविदांमध्ये संगनमताच्या प्रकारे नातेवाईकांना विकास कामे देणे, भ्रष्टाचार यांचे प्रमाण वाढले आहे. याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा पक्षाच्या वतीने काढण्यात येणार असल्याचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी सांगितले.

अविनाश – विश्वजितला मिळाली तब्बल आठ नामांकने

0

संगीतकार अविनाश-विश्वजित यांचे ‘ह्रदयात वाजे समथिंग’ हे गाणे खूप गाजले. ‘ती सध्या काय करते…’ चित्रपटातील हे गाणे खुद्द विश्वजित जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांनी लिहिले आहे. त्यांना या गाण्यासाठी संगीतकार आणि गीतकार अशी दुहेरी नामांकने महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण, झी गौरव, मटा सन्मान, रेडीओ सिटी आदी विविध पुरस्कारांसाठी मिळाली आहेत, तर यंदाच्या ‘मिर्ची म्युझिक अवॉर्ड’ साठी त्यांना तब्बल आठ नामांकने मिळाली असून लवकरच ‘मंत्र’ हा सिनेमा घेऊन ते चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. विशेष म्हणजे या सिनेमाची निर्मिती संकल्पना विश्वजित जोशी यांची असून वेदार्थ क्रिएशन्सच्या सहयोगाने ड्रीमबुक प्रॉडक्शन्सने ‘मंत्र’ची निर्मिती केली आहे.

विविध नामांकने आणि ‘मंत्र’ विषयी बोलताना विश्वजित जोशी म्हणाले, मागील १२ – १५ वर्षांपासून आम्ही मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये विविध सांगीतीक प्रयोग करत आहोत, त्याला रसिक प्रेक्षक आणि समिक्षक अशी दुहेरी पसंती मिळाली आहे याचा आम्हाला आनंद वाटतो. विविध पुरस्कार हे त्यांच्या मुळेच मिळालेले आहेत. २०१७ मध्ये आम्ही संगीत दिलेले २ सिनेमे प्रदर्शित झाले होते ‘ती सध्या काय करते’ आणि ‘कंडीशन्स अप्लाय’ या दोन्ही सिनेमांच्या संगीताला श्रोते आणि समीक्षकांची पसंती मिळाली आहे. याशिवाय मी लिहीलेल्या गीतालाही नामांकने मिळाले आहे याचा निश्चितच आनंद वाटतोय, आपण केलेल्या कामाची पुरस्काररुपी मिळालेली कौतुकाची थाप प्रेरणादायी ठरते.

‘मंत्र’ या आगामी सिनेमात आमाची ४ गाणी आहेत यातील तीन गाणी मी लिहिली आहेत असे सांगताना विश्वजित म्हणाले, ‘मंत्र’ ही कथा ऐकल्यानंतर या कथेवर सिनेमा निर्माण व्हावा असे मला वाटले, मी लेखक – दिग्दर्शक हर्षवर्धन यांच्याशी चर्चा करून निर्मितीची संकल्पना मांडली, यामुळे हा माझ्या अत्यंत जवळचा सिनेमा आहे. ‘मंत्र’ची कथा हेच त्याचं बलस्थान आहे आणि त्यातल्या व्यक्तिरेखा वेगवेगळ्या विचारसरणीच्या वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. ह्या चित्रपटास येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला ह्यातलं एकतरी पात्र त्यांच्या विचाराशी साधर्म्य असलेलं आढळेल. यामुळे वैविध्यपूर्ण प्रेक्षकांना आवडतील अशी गाणी असावीत असं दिग्दर्शक हर्षवर्धन यांचे मत होते, त्याप्रमाणे एक वेस्टर्न बाजाचं दोस्तीचं गाणं, एक चक्क ढोलावरचं गाणं आणि एक विरहगीत मी बांधलं. पाहिलं गाण तरुणाई, त्यांच्या स्वप्नांबद्दल आणि मैत्री वर भाष्य करतं. त्यासाठी मी, रोहित आणि धवलचा आवाज वापरायचा ठरवला. ढोलाच्या गाण्यासाठी मला अवधूत गुप्तेचा आवाज हवा होता. दुसऱ्या एका गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या दिवशी मी अवधूतला हे ही गाणं गाशील का? म्हणून विचारलं, तो लगेच हो म्हणाला. ढोल वाजवणाऱ्या मुलीवरचे हे गाणे हमखास ठेका धरून नाचवणार आहे. तिसरं विरह गीत हे खूप भावपूर्ण आहे, त्यासाठी मी अजय गोगावले यांना विचारणा केली, त्यांनी तत्काळ होकार दिला. या गाण्याच्या निमित्ताने आम्ही १९९९ नंतर एकत्र काम केले. अजयने गाण्याला त्याचा जो टच दिलाय त्याला तोड नाही. ‘मंत्र’चे टायटल सॉंगसाठी विनया क्षीरसागर यांनी खूप छान संस्कृत काव्य मला हव्या त्या मीटर मध्ये लिहून दिलं. ते करतानाच आपण काहीतरी छान करतोय याचं समाधान वाटत होतं. आजपर्यत रसिकांनी आमच्या कामावर पेम केले आहे, ‘मंत्र’च्या गीतांच्या प्रेमात रसिक पडतील असा मला आणि अविनाशला विश्वास आहे.

शहाजीराजे भोसले यांच्या 424 व्या जयंती महोत्सवानिमित्त येत्या 18 मार्च रोजी वेरुळ येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन

0
पिंपरी,  :
महाराष्ट्र शासन आणि स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 18 मार्च 2018 रोजी शहाजीराजे भोसले यांची 424 वी जयंती छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खा. संभाजीराजे भोसले (कोल्हापूर घराणे), प्रिन्स ऑफ तंजावर म्हणजे तंजावर घराण्याचे राजे मा. श्री. शिवाजीराजे भोसले आणि नागपूर घराण्याचे रा राजे मुधोजी भोसले या राजघराण्याच्या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली वेरुळ येथे हा सोहळा संपन्न होत आहे,  अशी माहिती शहाजीराजे भोसले जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष विलासभाऊ पांगारकर, छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोरभाऊ चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष रामभाऊ जाधव, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन गावंडे पाटील, शहाजीराजे भोसले जयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष राजू सावळे, उद्भवराजे काळे, राजेंद्र चव्हाण, गणेश सोनवणे, सुमित टूमलाईत, सुनील सावंत, इम्रान शेख, सुमित लोहरे आदी उपस्थित होते.
या सोहळ्याला विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी खास बाब म्हणून उपस्थित राहणार आहेत. जयंती महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे बांधकाम तथा महसूल मंत्री मा.ना. श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणात असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत हे राहणार आहेत. सावंत हेच शासन नियुक्त शहाजीराजे भोसले स्मारक सल्लागार समितीचे अध्यक्ष आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय न्याय राज्यमंत्री . रामदास आठवले, महात्मा गांधी मिशन ट्रस्टचे सचिव  श्री. अंकुशराव कदम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रो कुलगुरु डॉ. अशोक तेजनकर, औरंगाबाद महसूल विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी तथा स्मारक नियोजन आढावा समितीचे अध्यक्षनवल किशोर राम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते . पृथ्वीराजभाऊ पवार, तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा  श्रीमती रेखाताई चव्हाण आदी मान्यवरांसह वेरुळ गावचे सरपंच  साहेबसिंग गुमलाडू आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमस्थळी प्रसिद्ध शाहिर  सुरेश जाधव यांचे शहाजीराजांच्या जीवन चरित्रावर पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी, शिवकालीन युद्धनिती आणि विविध हत्यारासहचे प्रात्यक्षित  गोरक्षनाथ कुंडलवाल यांचे पथक साजरे करणार आहे. त्याचप्रमाणे प्रसिद्ध व्याख्याते प्रदीपदादा साळुंके यांचे व्याख्यान होणार आहे. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांचा जयंती उत्सव गेल्या पंधरा वर्षापासून अथक परिश्रम घेऊन जयंती महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष किशोरभाऊ चव्हाण करीत आहेत.
या नियोजित स्मारकाबाबत मालोजीराजे आणि विठोजीराजे भोसले यांनी या भागामध्ये त्याचवेळेस 100 एकरपेक्षाही जास्त भागावर भव्य असे तलावाचे निर्माण केले होते. जे की पाणी व्यवस्थापनाचे अत्यंत व्यापक आणि मोठे उदाहरण ठरणार असून, चार शतकापूर्वी त्यांनी निर्माण केलेल्या तत्कालीन पाणी आणि सिंचन व्यवस्थापन आजही मार्गदर्शक ठरू शकत असल्यामुळे या स्मारकाला मतीतार्थाने आंतरराष्ट्रीय स्मारक करण्याच्या दृष्टीने समितीचे प्रयत्न असून, त्यास मान्यता सुद्धा मिळण्याची अपेक्षा समितीने 6 फेब्रु. 2018 रोजी मंत्रालय मुंबई येथे झालेल्या बैठकीत व्यक्त केली होती. नियोजित स्मारकाच्या मागील बाजूला असलेल्या 133 एकर जागेचा समावेश सदरच्या नियोजित आराखड्यात व्हावा, अशी मागणी समितीची गेल्या अनेक वर्षापासून असल्यामुळे आराखड्यामध्ये त्याचा समावेश करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मान्यता दिली असून, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना पुढील कार्यवाही करण्यासाठी आदेशित केल्यावरून डॉ. भापकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आणि अधिक्षक अभियंता यांना सदर बाबत आदेश देऊन योग्य असा आणि समितीच्या मागणीप्रमाणे चर्चेअंतिम झालेया स्मारकाचा नियोजित आराखडा दि. 15 मार्च 2018 पर्यंत सादर करण्याचे आदेश सुद्धा दिलेले असून, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या बैठकीत आठ लाख पन्नास हजार रुपयांच्या स्मारक परिसर आणि पुतळा परिसर येथे भव्य रोषणाईसाठी मान्यता या बैठकीत होणार असून, यासाठी शासन स्तरावर विविध तांत्रिक व प्रशासकीय बाजू मंजुरी घेण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत राज्य पुरातत्व विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य पर्यटन विभाग यांचा संयुक्त असा कृती आराखडा सुद्धा विचारात घेतला जाणार असल्यामुळे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांचे सदरचे स्मारक अत्यंत भव्यदिव्य करून घेण्यासाठी शिवकालीन इतिहास, शिवकालीन मार्गदर्शक तत्वे आणि त्या अनुषंगाने दूरदृष्टीने तयार करण्यात आलेले आराखडे तथा तत्कालीन अवलंबीत करण्यात आलेल्या सर्व नितीचा समावेश या भव्यदिव्य आराखड्यात व्हावा, यासाठी समिती प्रयत्नशील आहे.
जयंती महोत्सव कार्यकारिणी जाहीर
सन 2018-19 साठीची जयंती महोत्सव कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष किशोरभाऊ चव्हाण यांनी जाहीर केली असून, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले जयंती समितीच्या अध्यक्षपदी विलास पांगारकर यांची निवड करण्यात आली आहे. तर समितीच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र दाते पाटील यांच्यासह प्रा. डॉ. शिवानंद भानुसे, चंद्रकांत भराट, रमेश केरे पाटील, रवींद्र काळे पाटील, सुरेश वाकडे, सुनील कोटकर, विलास चव्हाण, योगेश केवारे, विवेकानंद बाबर, ज्ञानेश्‍वर गायकवाड आदींचा समावेश आहे. समितीच्या कार्याध्यक्षपदी सचिन गावंडे, किशोर शितोळे, नागराज गायकवाड, करण गायकर, अप्पासाहेब कुढेकर, रामभाऊ जाधव, राजुभाऊ सावळे, सुमीत टुगलाईट, दत्ता जाधव, गणेश सोनवणे, दीपक शिंदे, सुनीलभाऊ जाधव, ज्ञानेश्‍वर उर्फ माउली यादव आदींची निवड करण्यात आली आहे. समितीच्या सरचिटणीसपदी अशोक वाघ, नितीन कदम, शैलेश क्षीरसागर, विजय काकडे, मनोज गायके, विवेक उर्किडे पाटील, मनोज पाटील, संजय सावंत, योगेश शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. सचिवपदी प्रकाश पाटील, नाना ठाकरे, लक्ष्मण मिसाळ, राजू वरकड, नाना कदम, राजेंद्र चव्हाण, रमेश वाघ, रवींद्र बोडखे, महेंद्र दगडफोडे, वैभव किर्दक, किशोर काळे, प्रा. गोपाळ चव्हाण, प्रा. राजकुमार गाजरे, प्रमोद खैरनार, मच्छिंद्र घोरपडे, दादाराव शेळके, अनिल श्रीखंडे, रमेश गायकवाड, उद्धव काळे, प्रमोद देशमुख यांची, तर कोषाध्यक्ष म्हणून अशोक खानापुरे; सल्लागार म्हणून इंजि. तानाजी हुस्सेकर, डॉ. त्र्यंबक पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

आयुक्तांचे आदेश फाट्यावर ..काम सुरु रस्त्यावर.. नंतर टेंडर ची जाहिरात पेपरावर

0

पुणे- महापालिकेच्या कारभाराचे हल्ली वाभाडे तरी किती काढायचे … असा प्रश्न लिखाण करताना पडू लागला आहे . आयुक्त कुणाल कुमार यांनी १२ मीटर रुंदीच्या रस्त्यावर काँक्रीटिकरणाचे काम करू नये असे आदेश काढले होते . आणि आज चक्क एका वृत्तपत्रात भवानी पेठेतील एकाच रस्त्याचे 3 टेंडर ची जाहिरात प्रसिद्ध झाली . बरे नुसती जाहिरात प्रसिद्ध झाली नाही तर प्रत्यक्षात याबाबत या रस्त्यावर या अगोदरच कोणी ठेकेदाराने काम हि सुरु केलेले  आहे . रस्ता उखडून ठेवला आहे . आयुक्तांच्या आदेशाला चक्क केराची टोपली दाखवून ,टेंडरची जाहिरात आज प्रसिद्ध केली , अन टेंडर येण्यापुर्वीच ठेकेदार ठरला ,कामाची सुरुवात हि झाली …असा अजब गजब कारभार कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी आज विविध कागदपत्रे सादर करीत उघडकीस आणला आहे . याबाबत त्यांनी आयुक्तांकडे तक्रार केली असून तातडीने याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी केली आहे … पहा आणी ऐका नेमके याप्रकरणी बागवे यांनी काय म्हटले आहे .

मेट्रो अन बीआरटी च्या बाजारात पुणेकरांच्या १०० कोटीचा ‘अस्सा’ चुराडा

0

पुणे- शिवाजीनगर ते हिंजेवाडी मेट्रो मार्गावरच आता १०० कोटी रुपये खर्च करून बीआरटी चे काम सुरु केल्याचा आरोप करीत  विरोधी पक्ष नेते चेतन तुपे पाटील यांनी आज भाजपच्या आणि महापालिकेतील प्रशासनाच्या नावाने संताप व्यक्त केला . पुणेकरांच्या १०० कोटीचा as चुराडा उघड्या डोळ्याने बघण्याची वेळ आल्याची निष्प्रभता हि त्यांनी यावेळी दर्शविली .
आज या मार्गावर जिथे बीआरटी चे काम सुरु आहे त्याच ठिकाणी उद्या ते उखडून मेट्रोचे काम होईल .. असे त्यांनी सांगितले ..पहा आणि ऐका नेमके त्यांनी काय म्हटले आहे ….

महावितरण आणि ग्राहकसेवा

0

 

महावितरणने राज्यातील सुमारे 2 कोटी 50 लाख वीजग्राहकांना वीजविषयक ग्राहकसेवा देण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. वीजग्राहकांच्या आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत महावितरणच्या ग्राहकसेवा पुढीलप्रमाणे.

1)    लघुदाब ग्राहकांसाठी मुदतीत व मुदतीनंतरही ऑनलाईन पेमेंटची सोय- महावितरणने लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in या वेबसाईटद्वारे सोय उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर जून 2016 मध्ये वीजग्राहकांसाठी मोबाईल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली. या अ‍ॅपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्‌सचा पर्याय उपलब्ध आहे तर भरलेल्या पावतीचा तपशीलही मिळत आहे. ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. याआधी वीजदेयके भरण्याची मुदत संपल्यानंतर संबंधीत देयक ऑनलाईन भरणा करणे शक्य नव्हते. आता मुदतीनंतरही ऑनलाईन देयके भरणा करणे शक्य झाले आहे. पुणे परिमंडलात सद्यस्थितीत सरासरी 7 लाख 35 हजार वीजग्राहक दरमहा ऑनलाईन पेमेंट करीत आहेत.

2) 24×7 टोल फ्री कॉल सेंटर- शहरी व ग्रामीण क्षेत्रातील वीजग्राहकांसाठी 24×7 सुरु असणारे टोल फ्री कॉल सेंटर कार्यरत आहे. वीजसेवेबाबत कोणतीही तक्रार करण्यासाठी दूरध्वनी व मोबाईलधारक वीजग्राहकांसाठी 1912 किंवा 18002003435 किंवा 18002333435 हे तीन टोलफ्री क्रमांक उपलब्ध करून दिलेले आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारीसह सर्व प्रकारच्या तक्रारी या टोल फ्री क्रमांकावर दाखल करू शकतात. तक्रारदार ग्राहकांना तक्रार क्रमांक देण्यात येतो तसेच तक्रारीचे निवारण करण्याची कार्यवाही लगेचच सुरु होते.

3)  गो-ग्रीनमध्ये ई-बीलाचा पर्याय – पर्यावरणाला पुरक अशा गो-ग्रीन संकल्पनेतून महावितरणने लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना कागदाऐवजी इमेलद्वारे वीजदेयके मिळविण्याचा पर्याय दिलेला आहे. यासाठी ग्राहकांना दरमहा देयकात तीन रुपये सूट दिली जात आहे. गो-ग्रीन सेवेतून कागदाऐवजी फक्त इमेलद्वारे वीजदेयके मिळविण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर किंवा महावितरणच्या http://wss.mahadiscom.in/wss/wss या वेब सेल्फ सर्व्हीसच्या पेजवर जाऊन वीजग्राहकांना सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करावे लागेल. यात आवश्यक माहिती भरल्यानंतर वीजग्राहकांना महावितरणच्या ऑनलाईनद्वारे देण्यात येणार्‍या सर्व सुविधा उपलब्ध होतील.

4)  ईमेलद्वारे ई-बील उपलब्ध – महावितरणकडून लघुदाब वीजग्राहकांना त्यांच्या इमेलवर संबंधीत वीजबील दरमहा उपलब्ध करून देण्यात येत आहे. छापील कागदाच्या देयकासह दरमहा इमेलद्वारे वीजदेयके मिळविण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर किंवा महावितरणच्या http://wss.mahadiscom.in/wss/wss या वेब सेल्फ सर्व्हीसच्या पेजवर जाऊन वीजग्राहकांना सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर रिक्वेस्ट फॉर ई-बील ऑप्शनमध्ये लघुदाब वीजग्राहकांनी ग्राहक क्रमांक, प्रोसेसींग सायकल, बिलींग युनिट आणि ई-बील प्राप्त करण्यासाठी इमेल अ‍ॅड्रेस याची माहिती भरल्यानंतर ई-बील उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सेवेसोबतच दरमहा छापील वीजदेयके देण्याची प्रक्रिया कायम राहणार आहे.

5)   एसएमएसद्वारे वीजबीलाची व इतर माहिती – वीजग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी झाल्यानंतर वीजबिलाचा तपशील, वीजपुरवठा बंद असल्याचा कालावधी किंवा देखभाल व दुरुस्तीच्या कालावधीची माहिती महावितरणकडून ‘एसएमएस’द्वारे पाठविण्यात येत आहे. यासाठी वीजग्राहकांनी त्यांच्या ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची नोंदणी करणे आवश्यक आहे. महावितरणकडून वीजग्राहकांना मोबाईल क्रमांक किंवा इमेलची नोंदणी करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9225592255 या क्रमांकावर MREG (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून ‘एसएमएस’ केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होणार आहे. नोंदणी केलेल्या वीजग्राहकांना महावितरणकडून वीजबिलासह इतर माहिती एसएमएसद्वारे सुरु करण्यात येत आहे. याशिवाय कॉल सेंटरमध्ये संपर्क साधून, मोबाईल अ‍ॅप किंवा इंटरनेटवरूनही मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे. सोबतच वीजबिलाच्या एसएमएसद्वारेही वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध झालेली आहे.

6) वीजग्राहकांसाठी मोबाईल अ‍ॅप – महावितरणने वीजग्राहकांसाठी तयार केलेले मोबाईल अ‍ॅप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध असून ‘अ‍ॅन्ड्राईड’, ‘विन्डोज’ व ‘आयओएस’ ऑपरेटींग सिस्टीमच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप डाऊनलोड होईल अशी सुविधा आहे. महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटसह गुगल प्ले-स्टोअर, अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरमधून हे अ‍ॅप डाऊनलोड करण्याची सोय आहे.

वीजग्राहकांसाठी असलेल्या मोबाईल अ‍ॅपमधून उच्च व लघुदाब (एलटी व एचटी) वीजजोडणीची मागणी करता येणे शक्य झाले आहे. चालू व मागील देयके पाहणे आणि त्याचा भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्‌सचा पर्याय आहे तर भरलेल्या पावतीचा तपशीलही मिळणार आहे. वीजसेवेबाबत टोल फ्री क्रमांकावर संपर्काची व तक्रारी करण्याची सोय आहे. ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांना इतर सेवांसाठी मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडीची नोंदणी किंवा ते अद्यायावत करण्याची सोय आहे. मीटर रिडींग न घेतलेल्या वीजजोडण्यांच्या ग्राहकांना देयके तयार करण्यापूर्वी एसएमएसद्वारे लिंक पाठविण्यात येणार असून संबंधीत ग्राहकांना त्यांच्या मोबाईलमधील अ‍ॅपद्वारे मीटर रिडींग घेऊन ते महावितरणकडे पाठविण्याची सोय होणार आहे. सोबतच ब्रेकडाऊन किंवा देखभाल व दुरुस्तीमुळे ज्या वाहिनीवरील वीजपुरवठा खंडित होईल तो पूर्ववत होण्याचा कालावधी वीजग्राहकांना एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. यासह महावितरणच्या सेवेबाबत वीजग्राहकांना फिडबॅक देण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

8) नवीन वीजजोडणीसाठी ‘ऑनलाईन’ पर्याय – कृषी, घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक अशा सर्वच वर्गवारीतील ग्राहकांना आता नवीन वीजजोडणीच्या अर्जासाठी मोबाईल अ‍ॅप किंवा www.mahadiscom.in या वेबसाईटद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध झाली आहे. ऑनलाईन अर्ज करणार्‍या ग्राहकांना संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल पत्ता देणे बंधनकारक आहे. कंपनीचे कॉलसेंटर या ऑनलाईन अर्जदार ग्राहकाशी संपर्क साधून त्यांनी दिलेल्या माहितीची खात्री करून घेईल आणि संबंधीत कार्यालयाकडे हा तपशील पाठवतात. त्यानंतर शहरी भागात 07 दिवसांत व ग्रामीण भागात 10 दिवसांत संबंधीत उपविभागीय कार्यालयाचे कर्मचारी ग्राहकाशी संपर्क साधतात. वीजजोडणीच्या जागेची पाहणी करून नवीन जोडणीच्या ए-1 फॉर्मवर संबंधीत ग्राहकाची सही व संबंधीत कागदपत्रे घेतली जाते व त्यानंतर संबंधीत उपविभागीय कार्यालयाकडून नवीन वीजजोडणी देण्याची कार्यवाही सुरु होते.

9) नवीन वीजजोडणीची अंतर्गत प्रक्रिया आता ‘ऑनलाईन’ – नवीन वीजजोडणी, नवीन किंवा वाढीव वीजभार मंजुरी आदींबाबत ग्राहकाने महावितरणच्या कार्यालयात जाऊन अर्ज दिल्यानंतर किंवा इंटरनेटवरील संकेतस्थळावरून ‘ऑनलाईन’ अर्ज दाखल केल्यानंतर त्यापुढे होणारी महावितरण अंतर्गत सर्व प्रक्रिया ‘ऑनलाईन’ करण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज केल्यापासून ते वीजजोडणी मिळेपर्यंतची महावितरण अंतर्गत सर्व प्रक्रिया ‘ऑनलाईन’ व पारदर्शक होत आहे.

10) महावितरणचा विशेष मदत कक्ष – महावितरणच्या ग्राहकांना नवीन वीजजोडणी तसेच ग्राहक नावात बदल करण्याच्या प्रक्रियेत तक्रार असल्यास ती तातडीने सोडविली जावी यासाठी महावितरणच्या मुंबई येथील प्रकाशगड मुख्यालयात विशेष मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. महावितरणच्या नवीन वीजग्राहकांना वीजजोडणी घेताना आणि ग्राहक नावात बदल करताना विविध कारणांमुळे अडचणी आल्यास किंवा काही तक्रार असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी हा विशेष मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षाला संपर्क साधण्यासाठी 022-26478989 व 022-26478899 हे दोन दूरध्वनी क्रमांक कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत.

11) नवीन वीजजोडणीच्या प्रक्रियेत एजंटांना थारा देऊ नये – महावितरणमध्ये नवीन वीजजोडणी, वाढीव वीजभार मंजुरी, नावात बदल आदींबाबतची प्रक्रिया सुटसुटीत व पारदर्शक करण्यात आली असून या कामांसाठी कोणत्याही स्वयंघोषित एजंटांना वीजग्राहकांनी थारा देऊ नये.

महावितरणने वेबसाईट किंवा मोबाईल अ‍ॅपद्वारे नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय वेबसाईटवर नवीन वीजजोडणीचा एक पानी अर्ज उपलब्ध आहे व लागणारी आवश्यक कागदपत्रे व महत्वाचे म्हणजे वीजजोडणीसाठी लागणाऱ्या शुल्काची माहिती सुद्धा देण्यात आली आहे. ऑनलॉईन किंवा अर्ज भरून दाखल केलेल्या नवीन वीजजोडणीची महावितरण अंतर्गत प्रक्रिया ही पूर्णतः ऑनलाईन करण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्ज दाखल केल्यानंतर त्याची स्थिती ही ग्राहकांना स्वतः वेबसाईटवर पाहता येते किंवा महावितरण कार्यालयातून त्याबाबत माहिती घेता येते.

वीजग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी महावितरण नेहमीच तत्पर असते. नवीन वीजजोडणी, नावांत बदल किंवा वाढीव वीजभार मंजुरी आदींची प्रक्रिया महावितरणने अतिशय सुलभ व पारदर्शक केलेली आहे. त्यामुळे ग्राहकांनी स्वतः कार्यालयात येऊन त्याचा लाभ घ्यावा. आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर प्रशासकीय दिरंगाई होत असल्याची तक्रार असल्यास 1800-200-3435 व 1800-233-3435 किंवा 1912 या तीन टोल फ्री क्रमांकांवर 24(7 संपर्क साधावा. याशिवाय मुंबई येथील मुख्यालयात विशेष मदत कक्ष सुरु करण्यात आला असून 022-26478989 किंवा 022-26478899 या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

वीजयंत्रणेत बिघाड असल्यास किंवा दोष असल्यास त्याचा परिणाम मीटरमधील वीजवापराच्या रिडींगवर होण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांनी वीजमीटरपुढील सर्व वायरिंग सुस्थितीत व दोषविरहित ठेवण्यासाठी नियमित तपासणी करून घेणे मात्र अतिशय आवश्यक आहे.

हे सर्व असताना वीजग्राहकांना कोणत्याही स्वयंघोषित एजंटांकडे जाण्याची कुठलीही आवश्यकता नाही. हे स्वयंघोषित एजंट स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वीजग्राहकांची फसवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करतात. त्यामुळे वीजग्राहकांनी अशा स्वयंघोषित एजंटांना थारा न देता महावितरणच्या सेवांचा थेट लाभ घ्यावा.

निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, पुणे

What’s up लग्न १६ मार्चला

0

रुपेरी पडद्यावरील लग्नांबाबत बोलायचं झालं तर इथली बरीच लग्न अविस्मरणीय ठरली आहेत. रुपेरी पडद्यावरील अशाच एका लग्नाची चर्चा मागील काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीत सुरू आहे. हे अनोखं लग्न मोठ्या पडद्यावर कधी पहायला मिळतंय याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली होती, पण आता ती संपली आहे. मराठी रसिकांचे लाडके कलाकार म्हणजेच वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘What’s up लग्न हा चित्रपट १६ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ‘फिनक्राफ्ट मीडिया’ अँड ‘एन्टरटेन्मेंट प्रा. लि’. या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केले आहे.

‘नटसम्राट’ चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या विश्वास जोशी यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने आपली दिग्दर्शकीय इनिंग सुरु केली आहे. जाई जोशी व व्हिडीओ पॅलेस यांची प्रस्तुती असणाऱ्या ‘What’s up लग्न या चित्रपटाच्या प्री प्रोडक्शन व मार्केटिंग बाबत नानूभाई जयसिंघानी यांचे सुरुवातीपासून सहकार्य लाभले आहे. या चित्रपटातील गीते सध्या गाजतायेत त्यामागे दिग्दर्शकांनी दाखवलेला दृष्टीकोन मोलाचा ठरला आहे. संगीतसुद्धा चित्रपटासाठी महत्त्वाचे असल्याने चित्रपट चित्रिकरणाच्या आधीपासून या गीतांचे नियोजन करण्यात आले.

‘कॉफी आणि बरंच काही’आणि मि. अँड मिस्टर सदाचारी  या चित्रपटानंतर वैभव आणि प्रार्थना या हिट जोडीचा हा तिसरा  चित्रपट आहे. या जोडीसोबत विक्रम गोखले, वंदना गुप्ते, विद्याधर जोशी, स्नेहा रायकर, अश्विनी कुलकर्णी,  ‘राधा प्रेम रंगी रंगली’ फेम विनी जगताप आदी मराठीतील नामवंत कलाकार या चित्रपटात आहेत. सोबत सुनील बर्वे, सविता मालपेकर आणि जयवंत वाडकर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.

या चित्रपटाची संकल्पना आणि लेखनसहाय्य विश्वास जोशी यांचं आहे. अभिराम भडकमकर आणि विश्वास जोशी यांनी मिळून ‘What’s up लग्न ची कथा लिहिली असून, पटकथा व संवादलेखन मिताली जोशी, अश्विनी शेंडे आणि विश्वास जोशी यांनी केलं आहे. तेरे नाम,ओएमजी, वॅाण्टेड या हिंदी चित्रपटाचे  छायांकन करणारे सेतु श्रीराम या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपट करीत आहेत. संकलनाची जबाबदारी फैजल महाडीक आणि इम्रान महाडीक यांनी पार पाडली आहे. अश्विनी शेंडे आणि क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार निलेश मोहरीर, ट्रॅाय-आरीफ आणि यांनी संगीत दिलं आहे. हृषिकेश रानडे, निहीरा जोशी-देशपांडे, केतकी माटेगावकर, श्रुती जोशी या गायकांनी WHAT’S UP लग्न’ मधील गाण्यांना सुमधूर सूर दिला आहे. या गाण्यांवर फुलवा खामकर, सुजीत कुमार आणि भक्ती नाईक यांनी कोरिओग्राफी केली आहे. आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे, तर कला दिग्दर्शन शैलेश महाडीक यांनी केलं आहे.

नातेसंबध, सध्याची जीवनशैली दाखवतानाच तंत्रज्ञानाने आपल्याला कवेत घेतले आहे की, आपण तंत्रज्ञानाला कवेत घेतले आहे यावर ‘What’s up लग्न’ मार्मिक पद्धतीने भाष्य करतो. धावपळीच्या युगात स्मार्ट सवांद साधत नातेसंबधाची वीण कशा पद्धतीने जपली जाते हे दाखवणारा ‘What’s up लग्न’ हा चित्रपट प्रेक्षकांना काहीतरी वेगळं देऊन जाईल हे नक्की.

डॉ.पतंगराव कदम यांच्या ध्यासामुळे जगभर “भारती विद्यापीठ’चे विद्यार्थी

0
पुणे : 
“डॉ. पतंगराव कदम यांच्या ध्यास पाहून आम्ही संस्थेत कार्यरत झालो, त्यांना पाहून जागेवरून आदरयुक्त उठायची सवय होती, आज मात्र श्रद्धांजलीसाठी उठून उभे राहण्याची वेळ आली, हे कल्पनेपालिकडचे दुर्दैव आहे.’ अशा शब्दात “भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ऍण्ड आंत्रप्रुरशीप डेव्हलपमेंट’चे संचालक आणि विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर यांनी आज श्रद्धांजली अर्पण केली.
“आयएमईडी’मध्ये सोमवारी सकाळी डॉ. पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्राध्यापक, विद्यार्थ्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.’ त्यावेळी डॉ. वेर्णेकर बोलत होते.
“डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्चशिक्षण घेऊन जगभर गेले. हे मोठे शैक्षणिक कार्य आहे. भारती विद्यापीठात सर्वधर्मीय, अध्यापक काम करतात आणि सर्व प्रांतातील विद्यार्थी शिक्षण घेतात, हा व्यापक दृष्टीकोण डॉ. पतंगराव कदम यांच्यामुळे तयार झाला,’ असेही डॉ. वेर्णेकर यावेळी बोलताना म्हणाले.
डॉ. सचिन वेर्णेकर म्हणाले, “भारती विद्यापीठाचा दिल्ली कॅम्पस सांभाळण्याची कामगिरी 11 वर्षे माझ्यावर सोपविण्यात आली. या सर्व काळात डॉ. पतंगराव कदम यांची नेतृत्वशैली आणि व्यक्तिमत्त्व अभ्यासता आले.
आयएमईडी पौड रस्ता येथे झालेल्या श्रद्धांजली सभेवेळी एमबीए, एमसीएचे प्राध्यापक, विद्यार्थी, सेवक वर्ग उपस्थित होते.’

भारतातील अॅटलास कॉप्को कॉम्प्रेसर कारखान्याला सोलार पॅनलद्वारे वीजपुरवठा

अॅटलास कॉप्को या शाश्वत उत्पादकता सोल्यूशन्स पुरवणाऱ्या आघाडीच्या कंपनीने भारतातील चाकण येथील आपल्या कारखान्याला सोलार पॅनलद्वारे वीजपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयामुळे, व्यवसायामुळे होणारा पर्यावरणीय परिणाम सातत्याने कमी करण्याचे अॅटलास कॉप्कोचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत होणार आहे.

या अद्ययावत प्रकल्पाचे उद्घाटन 2013 मध्ये करण्यात आले. त्यामध्ये भारतीय व जागतिक बाजारासाठी औद्योगिक व पोर्टेबल कॉम्प्रेसर्सची निर्मिती केली जाते. एअर कंडिशनिंगची गरज भासू नये म्हणून रुफ इन्सुलेशनसह, सुरुवातीपासूनच या प्रकल्पात ऊर्जाक्षमतेवर भर देण्यात आला आहे. पावसाचे पाणी साठवण्यासाठी केलेल्या पर्यावरणपूरक डिझाइनमुळे वर्षातून 8 महिने पाण्याची उपलब्धता होते. कारखान्याची ही ग्रीन इमारत लीडच्या (लीडरशिप इन एन्व्हॉयर्नमेंटल एनर्जी अँड डिझाइन) सर्वोत्तम पद्धतींना अनुसरून आयजीबीसी (इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल) गोल्ड प्रमाणित आहे. तसेच, कारखान्याला आयएसओ 14001, ओएचएसएएस 18001, आयएसओ 9001 य तिहेरी प्रमाणपत्राबरोबरच, ऊर्जा व्यवस्थापनासाठी 2016 मध्ये आयएसए 50001 प्रमाणपत्र मिळाले आहे.  

अॅटलास कॉप्कोने ऊर्जाक्षमतेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे आणि हा आधुनिक कारखाना उत्पादन प्रकल्पाबाबत भारतात नवे मापदंड निर्माण करत असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो,” असे अॅटलास कॉप्कोच्या कॉम्प्रेसर टेक्निक बिझनेसचे अध्यक्ष व्हॅग्नर रेगो यांनी सांगितले. यामुळे पर्यावरण व आमचे अर्थकारण या दोन्हीना फायदा मिळणार आहे.”

 अॅटलास कॉप्को प्रॉडक्ट कंपनी, चाकण, ही लीन उत्पादनातील आघाडीची कंपनी असून ती सातत्याने सुधारणा करत असते, जसे, छतावर सोलार सेल्स बसवणे. हा प्रकल्प आता विजेच्या बाबतीत स्वायत्त झाला असून त्यास 80% अपारंपरिक ऊर्जा पुरवली जाते. हा कारखाना आता दरवर्षी 600 टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन रोखणार आहे.

 

स्व.यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त अभिवादन

0
पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने महाराष्ट्राचे शिल्पकार माजी उपपंतप्रधान स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
हिराबाग येथील पक्ष कार्यालयात स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला रजनी पाचंगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी शंकर शिंदे, कालिंदी गोडांबे, सुरेश पवार, संजय गायकवाड, संजय गाडे, योगेश वराडे, वैभव जाधव, अविनाश वेल्हाळ, किरण मते, श्रीकांत पवार, हेमंत येवलेकर, बाळासाहेब ढमाले आदी उपस्थित होते.

रेडीरेकनर वाढ नकोच उलट दर कमी करा : क्रेडाई महाराष्ट्र

0

पुणे:- घरे आणि जमिनींच्या दरांमध्ये वाढ होण्यास कारणीभूत ठरणार्‍या घटकांपैकी प्रमुख असलेल्या रेडीरेकनरच्या दरांमध्ये यंदाही वाढ होणार असल्याचे दिसते आहे.शासनाचा कल हा वास्तवतेतील परिस्थितीपेक्षा महसुलात अधिक असल्याचे दिसते.  स्टँम्प अॅक्ट या कायद्यानुसार ज्यात दरवाढीची तरतूद आहे. पण दर कमी झाले तरी ते कमी करण्याची तरतूद त्यात नाही.हे बरोबर नाही. बांधकामाचे असलेले दर अवास्तव असल्याचे दिसते. २००९ प्रमाणे रेडीरेकनरचे दर न वाढवता ते उलट आवश्यक तेथे कमी करावेत अशी विनंती देखील क्रेडाई महाराष्ट्र कडून करण्यात आली.

गेली अनेक वर्ष मागणी करून सुद्धा शासन रेडीरेकनर दर ठरवण्याची  सदोष पद्धत सुधारण्यासाठी कुठलीही ठोस पाउल उचलेली दिसत नाही. उलट महसूल वाढीच्या चुकीच्या पद्धतीमध्ये दर वाढ चालूच आहे. अनेक आमदारांनी रेडीरेकनरच्या दर न वाढविण्यासंदर्भात केलेल्या मागणीचीही शासनाने दखल घेतली नाही असे वाटते तळटीपांमध्ये वस्तूस्थितीत दुरुस्त्या केल्या जाव्यात. तळटीपांमुळे मिळकतीचे दुहेरी मुल्यांकन होत आहे. असे देखील क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी सांगितले. मूल्यदर तक्त्यातील चूक दुरुस्तीची कार्यपद्धत पारदर्शक, गतिमान,वस्तुनिष्ठ सर्व प्रकल्पाला एक असावी.

ते पुढे  म्हणाले  आमच्यातील बरेचसे विकसक  म्हाडाच्या दरापेक्षा कमी दरात परवडणारी घरे देण्यासाठी तयार आहेत. परंतु रेडीरेकनर दर वास्तवतेपेक्षा जास्त असल्यामुळे व्यवहार होत नाहीत. जनता घर घेऊ शकत नाही. त्यामुळे मग सरकारचा महसूलही बुडतो.याचे भान ठेवून तरी शासनाने आवश्यक त्या ठिकाणी दर कमी करावेत.

 

‘पार्किंग धोरण ‘-पुणेकरांच्या लुटमारीला कोण कोण लावणार हाथ ..?

0

पुणे-बी आर टी नंतर आता सायकल ट्रॅक आणून खाजगी वाहनांचा गळा दाबू पाहणाऱ्या महापालिकेच्या  आयुक्त कुणाल कुमार यांचा , दिल्लीला कूच करण्यापूर्वी अखेर  पुणेकरांची  आर्थिक लुटमार करणारा,  ‘औरंगजेबी  वार ‘ ठरणारा प्रस्ताव  उद्या सकाळी ९ वाजता होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत, भाजपची मंजुरी  मागायला दाखल होतो आहे . अखेर महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी या प्रस्तावाद्वारे का होईनात ,’औरंगजेबाला शरमेने मान खाली घालायला लावील ‘असा  .. हा ‘अखेरचा वार’ पुणेकरांवर केला आहे , असे कोणी म्हटले तर नवल वाटणार नाही .. पण भविष्यात नक्कीच महापालिकेतील भाजपचे तख्त उलथवून टाकल्याशिवाय रहाणार नाही असा हा ‘वार ‘ पुणेकरांच्या वर्मी बसणार आहे . आता हा वार करणाऱ्या  या ‘औरंगजेबी’ प्रस्तावाला बळ द्यायचे कि नाही याचा निर्णय … आमदार जगदीश मुळीक यांचे स्थायी समिती अध्यक्ष  झालेले बंधू योगेश मुळीक यांना आणि त्यांच्या स्थायी समितीतील सदस्यांना घ्यायचा आहे .मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पहिल्या बैठकीत हा प्रस्ताव येतो आहे . त्या दृष्टीने त्यांची आणि शहर भाजपा अध्यक्ष गोगावले यांची देखील या प्रस्तावाद्वारे कसोटी लागणार आहे .
अगदी सामान्यातल्या सामान्य , आणि मध्यमवर्गीयांची  लुट करणाऱ्या या प्रस्तावाचे नाव आहे …
पे अँड पार्क …
पे अँड पार्क … असे या प्रस्तावाचे नाव असले तरी काळजी पूर्वक वाचा , कारण तो नेहमीप्रमाणे नाही …
दरवर्षाला हा प्रस्ताव झोपडपट्टीपासून ,गल्ली बोळा पासून ते शहरातील सर्व सार्वजनिक रस्त्यावर लागू करण्यासाठी आणला जातो आहे . ज्याद्वारे प्रत्येकाच्या घरातून हजारो रुपयांची ‘लुट ‘करण्यात येणार आहे .विशेष म्हणजे अद्याप कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी अशा विरोधी पक्षांनी याबाबत अवाक्षरही न काढल्याने त्यांच्या महापालिकेतील सदस्यांबाबत देखील संतापाचे वातावरण जनतेत पसरू शकणार आहे .
—————————————————————–
काय आहे हा प्रस्ताव, जो महापालिका आयुक्त कुणालकुमार यांनी ठेवला आहे  …
सार्वजनिक रस्त्यावर पार्किंग
सकाळी ८ ते रात्री १० यावेळेत
प्रती तास जागेच्या आकारमानानुसार 50 रुपये होतात
पण आपण ३५ रुपये  प्रती तास आकारू ….
रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत पार्किंग ची वार्षिक आकारणी होईल ती असले १८ हजार २५० रुपये .
आता पुण्यात जिथे अविकसित  वाडे इमारती आहेत , घरे आहेत किंवा समाविष्ट गावांमधील इमारती घरे आहेत तिथे होणाऱ्या पार्किंगसाठी रात्री १० ते सकाळी ८ या वेळेत वार्षिक पार्किंग चे दर असतील ९ हजार १२५ रुपये
जिथे झोपडपट्टी आहे आणि वाहने पार्क केली जातात तिथे वार्षिक पार्किंग भाडे असेल 4 हजार ५६२ रुपये
पर नाईट पद्धतीने देखील पार्किंग शुल्क आकारले जाईल .जे साडेबारा रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत असेल .
अशा पद्धतीने शुल्क न भारता लावली जाणारी वाहने उचलून नेण्यात येतील आणि ती सोडविण्यासाठी … ती उचलून नेण्यासाठी आलेला खर्च आणि दुप्पट ते चौपट दंडाची आकारणी प्रती दिवस , किंवा प्रती रात्र या प्रमाणे होईल ..
शहरातील फुटपाथ, सायकल ट्रॅक येथे जर वाहने पार्क केली तर अडीच हजार रुपये दंड करण्यात येईल .
वार्षिक पार्किंग शुल्क भरून महापालिकेकडून परवाने देण्याची सोय करण्यात येईल .
आणि दिवसा प्रती तास प्रमाणे वसुली साठी शहराच्या विविध भागात ठेकेदारांची नेमणूक करण्यात येईल .
——————————————————–
खरे तर एवढा जाचक , आणि पुणेकरांची आर्थिक लुटमार करणारा प्रस्ताव महापालिकेचा एखादा आयुक्त कधी ठेवू शकेल असे पुणेकरांना स्वप्नात हि वाटले नसेल ..पण हा प्रस्ताव ठेवला आहे त्याच्या फोटो कॉपी आम्ही येथे देत आहोत …
त्यामध्ये सविस्तर वाचता येईल ..

 


———————————–
पुणे महापालिका २००९ च्या ठरावानुसार काही ठिकाणी पार्किंग शुल्क आकारते आहे ते चार चाकीला पहिल्या तासाला 5 रुपये आणि त्यापुधील तासाला १० रुपये 11 तासाकरता हा दर २० रुपये एवढा आहे . दुचाकींना सुट दिलेली आहे .मात्र काही वाहनतळांवर दुचाकींना 2 रुपये आणि चार चाकींना 5 रुपये असा दर ठेवण्यात आला आहे .
आता कुणाल कुमार यांनी मांडलेल्या नव्या पार्किंग धोरणाच्या प्रस्तावाचे सत्ताधारी भाजप स्वागत करणार ,कि फेटाळून लावणार … कि मधला मार्ग काढीत कातडीबचाव धोरण स्वीकारणार .. हे लवकरच समजणार आहे ..