पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने महाराष्ट्राचे शिल्पकार माजी उपपंतप्रधान स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
हिराबाग येथील पक्ष कार्यालयात स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला रजनी पाचंगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी शंकर शिंदे, कालिंदी गोडांबे, सुरेश पवार, संजय गायकवाड, संजय गाडे, योगेश वराडे, वैभव जाधव, अविनाश वेल्हाळ, किरण मते, श्रीकांत पवार, हेमंत येवलेकर, बाळासाहेब ढमाले आदी उपस्थित होते.