Home Blog Page 3151

विनोदाला सांस्कृतिक प्रतिष्ठा मिळाली पाहिजे : मंगला गोडबोले

जागतिक हास्य दिनानिमित्त रंगला ‘ विनोद- साहित्य – आनंद मेळा ‘ !
पुणे :येणाऱ्या रसिकाचे काढले जाणारे अर्कचित्र, व्यासपीठावर ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द. फडणीस , मंगला गोडबोले यांची नर्मविनोदी पण नेमकी भाषणे, मकरंद टिल्लू यांच्या हास्ययोगाने झालेली हसरी सुरवात, विनोदी कथा लेखक रवींद्र कोकरे यांचे कथाकथन आणि विविध किस्से सांगून निर्माण झालेला हास्यकल्लोळ यामुळे   रविवारची सायंकाळ  रंगली !
निमित्त होते लायन्स क्लब ऑफ पुणे औंध – पाषाण ,महाराष्ट्र साहित्य परिषद यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘ विनोद- साहित्य _ आनंद मेळा ‘  या कार्यक्रमाचे . जागतिक हास्य दिनानिमित्त हा कार्यक्रम निवारा वृद्धाश्रम सभागृह येथे झाला.
व्यासपीठावर  शि.द. फडणीस, मंगला गोडबोले, रवींद्र कोकरे,लायन्स क्लबचे नियोजित प्रांत पाल रमेश शहा, डॉ. सतीश देसाई, प्रा. मिलींद जोशी, मकरंद टिल्लू, सुनीताराजे पवार हे मान्यवर उपस्थित होते.
‘जनावरे हसू शकत नाहीत, माणसे हसू शकतात, पण ती हसत नाहीत. हसून जीवनाचा रसरशीत आस्वाद घेतला पाहिजे ‘ असे प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविकात सांगितले.
मन, शरीर तंदुरुस्त करण्यासाठी विनोद उपयुक्त ठरतो. मात्र,एकच व्यंगचित्र वेगवेगळ्या वयोगटात वेगवेगळा संदेश देते. वेगवेगळ्या रितीने पोचते. त्याचा आस्वाद घेणे जमले पाहिजे.विनोद लेखन, व्यंगचित्रकला क्षेत्रात महिला कमी आहेत, पण मंगला गोडबोले यांचा आदर्श ठेवून ही संख्या वाढली पाहिजे, अशी अपेक्षा शि.द. फडणीस यांनी व्यक्त केली.
मंगला गोडबोले म्हणाल्या, ‘ विनोदाचं गाडं घरंगळत चाललं आहे.विनोदाचे मर्म म्हणजे तो योग्य ठिकाणी थांबला पाहिजे. हल्ली विनोदी लेखनाचीच अतिरेकी मागणी होते आहे का ? असा प्रश्नही पडतो.
माणसांना विचार करायचा नाही, म्हणून सतत करमणुकीची मागणी होते का, याचाही विचार केला पाहिजे. आमचे जीवन स्ट्रेसफुल आहे, अशी तक्रार आमची पिढी करते. ही सबब चुकीची असून ताण नको असेल तर रेसमध्ये धावणे थांबवले पाहिजे.
जिथे तिथे हलक्या फुलक्या वातावरणाची अपेक्षा ठेवणेही योग्य नाही.जुन्या कोटया असलेला विनोद, कृत्रिम विनोद घडवणारे लेखन, सहजता गमावलेला विनोद , बाल बुध्दीचा विनोद सध्या दिसत आहे.
विनोदी लेखकांनी  स्पर्धत उतरून उत्स्फूर्त लेखन हरवू देऊ नये. विनोदातील  ‘वि ‘ हा शब्द विवेकातही आहे, हे व्यावसायिक विनोदकारांनी लक्षात ठेवले पाहिजे. कान धरणारेही कोणी उरले नाही.वाहिन्यांवरचा विनोद आवडला नाही तर दोन ओळीचा निषेधही व्यक्त होत नाही, अशी खंतही मंगला गोडबोले यांनी व्यक्त केली.
हास्यामुळे आयुष्यातील आशावाद वाढतो. तरीही विनोदाला दुय्यम स्थान दिले जाते.विनोदाला सांस्कृतिक प्रतिष्ठा दिली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या
प्रदीप बर्गे यांनी सूत्रसंचालन केले. निवारा वृद्धाश्रम सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमाला पुणेकरांची मोठी उपस्थिती होती.

अमेरिकन कॉन्स्युलेट च्या वतीने ‘इफेक्टिव्ह डिजिटल स्टोरी टेलिंग ‘ विषयावर एक दिवसीय कार्यशाळा

0
पुणे :अमेरिकन कॉन्स्युलेट च्या वतीने ‘इफेक्टिव्ह डिजिटल स्टोरी टेलिंग’ विषयावर शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांसाठी एक दिवसीय कार्यशाळेंचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा १७ मे रोजी पुण्यात होईल. बहुमाध्यम (मल्टी मीडिया) तज्ज्ञ डॉ. बाळकृष्ण दिगंबर दामले मार्गदर्शन करतील. बाळकृष्ण दामले यांनी कम्युनिकेशन टेकनॉलिजिमध्ये एम. एस. (अमेरिका) केले आहे. ते ‘फुलबब्राइट स्कॉलर’ असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मधील ‘एज्युकेशनल मल्टिमीडिया रिसर्च सेंटर’ मध्ये कार्यरत आहेत .
शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांचे सोशल मीडिया विषयक काम करणाऱ्यांना या प्रशिक्षण कार्यशाळेला उपस्थित राहता येईल . कार्यशाळा विनामूल्य आहे.
नाव नोंदणी आवश्यक असून, अधिक माहिती साठी MumbaiIEA@state.gov  या ई-मेल आयडी वर संपर्क साधू शकता तसेच दूरध्वनीवर ११ मे पर्यंत नावनोंदणी करता येईल . प्रत्येक संस्थेतील २ जणांना प्रवेश दिला जाईल. प्रत्येक सहभागींना प्रशस्तिपत्रक देण्यात येईल. कार्यशाळेला येताना लॅपटॉप घेऊन यावे लागणार आहे.

 

अवधूत गुप्तेचे अभिनय क्षेत्रात पदार्पण

  बालचित्रपट मंकी बातचा भन्नाट ट्रेलर रिलीज

बालपण म्हणजे खुशाल बागडण्याची, धम्माल मस्ती करण्याची पर्वणीच असते. उद्यानांमध्ये आपल्याला निरनिराळ्या रंगांची, सुगंधांची आणि आकारांची सुंदर सुंदर फुले दिसतात. त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये देखील अनेक रंगांचे आणि छटांचे मिश्रण असते. अशाच बालपणीच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या ‘मंकी बात’या धम्माल बालचित्रपटाचा भन्नाट ट्रेलर रिलीज झाला आहे.

चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक लहान मुलगा (वायू) दिसतो. त्याला सगळीकडे सतत दुर्लक्षित केले जाते. त्याच्या वयाची मुले त्याच्याबरोबर खेळत नाहीत. शाळेतील शिक्षक त्याची त्याच्या पालकांकडे तक्रार करत असतात,  सोसायटीचा वॉचमन देखील त्याच्याबद्दल सातत्याने तक्रार करत असतो. एकंदरीत सर्वांचीच वायुबाबत काही न काही तक्रार असल्याने त्याचे पालकही त्याच्यावर नाराज होतात. दुसरीकडे सतत डावललं जाण्याच्या भावनेने वायू हताश होतो. कुणीही आपलंस करत नाही या भावनेने त्याची कुचंबणा होते. “आपले वागणे नेहमीच इतरांना चुकीचे वाटते, त्यामुळे आता चुकीचेच वागायचे”, असे तो ठरवतो. पुढे जी काही धम्माल करतो ती या ट्रेलर मध्ये दिसते. तसेच यामध्ये एक अनोखे सरप्राईज दडलेले आहे, त्या व्यक्तीचे वागणे, बोलणे, वेशभूषा सगळं काही आकर्षक असतं. कधी तो कॅप घालून स्टायलिश लुकमध्ये दिसतो तर कधी नोकराच्या भूमिकेत, तर कधी मिशी वाढलेली. कधी साधी पांढरी टोपी घालून दिसतो तर कधी कामगाराचे कपडे घालून वावरताना दिसतो. विशेष म्हणजे त्याच्या हातात सतत वही, पुस्तके, चावी, फिजेट स्पिनर असे काही ना काही फिरताना दिसते ती व्यक्ती म्हणजे अवधूत गुप्ते. वेदांत आपटे आणि त्यांच्यातील अनोख्या संवादामुळे चित्रपटाची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.

दिग्दर्शक विजू माने यांची  ‘मंकी बात’ हि कलाकृती लहान मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामधली खास मेजवानी ठरणार आहे. प्रोऍक्टिव्ह प्रस्तुत, निष्ठा प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाची प्रस्तुती आकाश पेंढारकर, विनोद सातव, अभय ठाकूर, प्रसाद चव्हाण, शंकर कोंडे यांची असून विवेक डी, रश्मी करंबेळकर, मंदार टिल्लू आणि विजू माने निर्माते आहेत. चित्रपटाची कथा महेंद्र कदम आणि विजू माने यांची, गीते आणि संवाद  संदीप खरे यांचे तर संगीत डॉ. सलील कुलकर्णी यांनी दिले आहे.  ‘मंकी बात’ मध्ये बालकलाकार वेदांत आपटे, पुष्कर श्रोत्री, भार्गवी चिरमुले, अवधूत गुप्ते, मंगेश देसाई, विजय कदम, नयन जाधव आदी कलाकार आहेत बच्चेकंपनीसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत धम्माल मनोरंजन घेउन येणारा ‘मंकी बात’ येत्या १८ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

रायरेश्‍वरावरील शिवशौर्य शिबीरात बालकांनी घेतली स्वच्छ चारित्र्याची शपथ

पिंपरी । प्रतिनिधी:
शिवकालीन मैदानी खेळ, कसरती, लाठीकाठी, कुरघोडी, सुरपाट्या, हुतुतु, संमोलन, अभ्यासातील एकाग्रता, योगा, श्‍लोक, निसर्गचित्रे, हरिपाठ, वारकरी पावल्या, नाटुकल्या, शिवकालीन शस्त्रे, शिवकालीन इतिहास, किल्ले आदींविषयी माहिती घेत रायरेश्‍वरावरील शिवशौर्य शिबीरात 180 शिबीरार्थींनी स्वच्छ चारित्र्याची शपथ घेतली.
शिव विचार जागर अभियान, शिवशाही संघटना, सणसबाबा आश्रम व मराठवाडा जनविकास संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रायरेश्‍वरावर चार दिवसीय शिवशौर्य साहसी बाल संस्कार निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, ओयासिस कौन्सिलरचे आंतरराष्ट्रीय संमोहनतज्ज्ञ डॉ. राजेंद्र मोरे, राष्ट्रीय शिवकीर्तनकार डॉ. गजानन महाराज वाव्हळ, मुकुंद  मासाळ,  उद्योजक शंकर तांबे, राजेश गाटे, नागेश महाराज पवार, जांबुवंत महाराज तुळजापुरकर, नगरसेवक जगदिश किरवे, प्रा. क्षितीज कदम, काशीचे संस्कृत भाषा शास्त्री किसन महाराज शास्त्री, शिवशाही संघटनेचे संस्थापक अमित थोपटे, सचिन मांगडे, आण्णा महाराज साबळे , डॉ.  सचिन जगताप, सणसबाबा आश्रम प्रमुख नामदेव महाराज किंद्रे, हनुमंतराव जाधव, प्रतिक वर्‍हाडी  आदी उपस्थित होते.
शिबीरामध्ये पहिल्या दिवशी भोर येथे नगरसेवक जगदिश किरवे यांनी  शिबीरार्थींचे यथोचित स्वागत करीत भोर येथील पंत सचिवांचा राजवाडा दाखवला. उद्घाटनानंतर ‘मी संमोहनाचा जादुगार’ या सत्रात डॉ. राजेंद्र मोरे यांनी अभ्यासातील एकाग्रतेविषयी मार्गदर्शन केले. सायंकाळच्या सत्रात शिवकालीन मैदानी खेळ  कुरघोडी, सुरपाट्या, हुतुतु पार पडले. रात्री शेकोटी संमेलनाच्या सत्रात शिबीरार्थींनी आपल्यातील अंगभुत कला दाखवल्या. उद्घाटनानंतर प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अरुण पवार म्हणाले, मुले ही देवाघरची फुले असली, तरी त्यांना लोण्याचा गोळा बनवू नका, जेणेकरून ते उन्हात गेले की वितळून जातील,  आपल्या मुलांना कणखर बनवले पाहिजे, ही काळाची गरज आहे. मुला-मुलींना साहसी शिबीरांना पाठवून सह्याद्रीच्या कातळासारखे मजबूत बनवा. म्हणजे त्यावर देशाच्या भविष्याचे सुंदर लेने कोरता येईल.
दुसर्‍या दिवसाचा प्रारंभ योगा व श्लोक पठनाणे झाला. या सत्रात किसन महाराज शास्त्री यांनी मार्गदर्शन केले. त्या नंतर प्रा. राजश्री ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मी शिल्पकार कागदांचा’ सत्र पार पडले. प्रा. भारती किर्दक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मी सखा रंगांचा’ या सत्रात शिबीरार्थींनी मुक्तछंदात निसर्ग चित्र काढले. सायंकाळच्या सत्रात नागेश महाराज पवार व जांबुवंत महाराज तुळजापुरकर यांच्या नेतृत्वाखाली हरीपाठ व वारकरी पावल्यांचा आनंद शिबीरार्थींनी लुटला. रात्री स्वयंस्फुर्त समुह नाट्य सादर झाली.
तिसर्‍या दिवसाचा प्रारंभ पारंपरिक भारतीय मैदानी खेळांनी झाला. त्यानंतर अंगावर शहारे आणणारे गिर्यारोहण करून शिबीरार्थीं रायरेश्वर मंदिराजवळ पोहचले. तिथे शिबीरार्थींना रायगडावरील शिव समाधी जवळील पवित्र माती देवून स्वच्छ  चारित्र्याची शपथ देण्यात आली. रात्री वक्तृत्व व गायन स्पर्धा संपन्न झाल्या.
चौथ्या दिवसाचा प्रारंभ शिवकलीन कसरती व लाठीकाठीने झाला. या सत्रात  शिवयौध्दा मर्दानी आखाड्याचे संस्थापक अध्यक्ष प्रतिक वर्‍हाडी व शितल वर्‍हाडी  यांनी शिबीरार्थींना शिवकालीन शस्त्रांची सखोल माहिती दिली. दुपारच्या सत्रात डॉ.  गजानन महाराज वाव्हळ यांच्या ‘संगीत बाल शिवायाण’ हा विशेष भाग सादर केला. यामध्ये शिवजन्म, स्वराज्य शपथ, अफजलखान वध, शाहिस्तेखान फजीती, आग्रा भेट व राज्याभिषेक सोहळा इत्यादी प्रसंग सादर केले. शोभायात्रेने संगीत बाल शिवायाणची सांगता झाली.
शिबीराचा सांगता समारंभ रामायनाचार्य मनोहर बापू महाराज शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यांनी सद्यस्थितीत अशा शिबीरांची आवश्यकता असल्याचे सांगितले.
शिबीरात 180 शिबीरार्थींचे तानाजी, येसाजी, कान्होजी, नेताजी, प्रतापराव, हंबीरराव, बाजी अशा सात संघात विभाजन करण्यात आले होते. यांचे नेतृत्व  प्रतिक वर्‍हाडी, ऋषीकेश  शेलार, मुकेश चव्हाण, प्रा. राजश्री ढोरे, शितल वर्हाडी, प्रा. भारती किर्दक, विश्वजीत पाटील, माधव मोरे, गणेश अडागळे, ऋत्विक उदावंत, माऊली ढवळे, लिना ढोरे, प्रतिक्षा टिळेकर, श्रध्दा पवार, ऋषीकेश ठाकुर, ओंकार शेलार, श्रृती गजघाटे, ऋतुजा गोळे, रोहिणी  वाव्हळ, अर्चना थोपटे, श्रावणी चितारे यांनी केले. तर सर्व शिबीरार्थींच्या प्रवासाची व्यवस्था अरूणपवार यांनी केली.

​​ बॅक ऑफ महाराष्ट्र चे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र मराठे यांचे हस्ते दृष्टि बाधित कर्मचा-यासाठी ब्रैल लिपितील कर्मचारी टेलीफ़ोन डायरीचे अनावरण

पुणे-बॅक ऑफ महाराष्ट्र ओफीसर्स ओर्गनईजेशन आयोजीत  तर्फे नाविन्यपूर्ण उपक्रमात  बॅकेतील दृष्टि बाधित कर्मचारी आणि अधिका-यानसाठी “ब्रैल लिपितील पॉकेट टेलीफोन डायरीचे संस्करण तैयार करन्यात  आले ह्या ब्रैल लिपितील पॉकेट टेलीफोन डायरीच्या  संस्कर्नाचे  प्रकाशन बॅकेचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री रविद्र मराठे यांचे हस्ते दी.07.05.2018 रोजी करण्यात आले.

ह्या प्रसंगी बोलताना श्री मराठे हयानी ह्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे विशेष कौतुक करताना म्हटले की बैंकिंग क्षेत्रात  प्रथमच दृष्टि बाधित कर्मचारी आणि अधिका-साठी “ब्रैल लिपितील पॉकेट डायरी निर्माण केली गेली आहे व हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. मा. श्री रविद्र मराठे हयाच्या हस्ते सदर ब्रैल लिपितील कर्मचारी टेलीफ़ोन डायरीचे  वाटप बॅकेतील दृष्टि बाधित कर्मचारी आणि अधिका-याना केले गेले.

सदर ब्रैल लिपि डायरी तयार करण्याचे मूर्त स्वरूप देण्याचे काम श्री निशांत शाह ( प्रबंधक) हयानी केले त्याबद्दल श्री मराठे हयाच्या हस्ते पुष्पगुछ देवून सत्कार करण्यात आला.

या प्रसगी श्री आर के गुप्ता , कार्यकारी संचालक, श्री ए सी राऊत, कार्यकारी संचालक, श्री राजकिरण  भोईर , महाप्रबंधक  तसेच बॅक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स ऑर्गनाइजेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एस. यू. देशपांडे, महामंत्री श्री विराज टिकेकर, कार्यकारी अध्यक्ष श्री अजीत भाटवडेकर, श्री मिलिंद सोमण, श्री गदादे व मोठ्या संखेने  कर्मचारी उपस्थित होते

ज्येष्ठ गायक अरुण दाते यांचं निधन

0

मुंबई-ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. ते ८४ वर्षांचे होते. पहाटे सहा वाजता त्यांनी मुंबईतील कांजूरमार्ग येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी दोन वाजता मुंबईतील सायन स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे. मराठी भावसंगीताचा शुक्रतारा निखळल्याची भावना त्यांच्या निधनानंतर व्यक्त होत आहे.

अरुण दाते यांचे वडील रामूभैय्या दाते इंदूरमधील प्रतिष्ठित गायक होते. वडिलांच्या इच्छेनुसार अरुण दाते यांनी गायन क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर १९५५ पासून आकाशवाणीवर गायला सुरुवात केली. वयाच्या पन्‍नाशीत त्यांनी भावगीतांवर लक्ष केंद्रित केलं. १९६२मध्ये अरुण दाते यांच्या शुक्रतारा मंदवारा या पहिल्या गीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली. ‘शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी’…’येशील येशील येशील, राणी पहाटे पहाटे येशील’…’भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’….’दिवस तुझे हे फुलायचे’…’अखेरचे येतील माझ्या शब्द तेच कानी’…आणि ‘या जगण्यावर या मरण्यावर शतदा प्रेम करावे’…अशा हळुवार आणि सुरेल गीतांनी भावगीतांना नवा आयाम देत त्यांनी दोन पिढ्यांवर अधिराज्य केलं.

राजकारणी बिल्डरांचे धाबे दणाणणार ?अनधिकृत बांधकामांची खरेदी -विक्री थांबवा-आदेश

0

पुणे–राज्यातील नागरी क्षेत्रातील अनधिकृत इमारती अथवा प्लॉटिंगची समस्या रोखण्यासाठी नगरविकास विभागाने धाडसी निर्णय घेत अशा मालमत्तांची खरेदी-विक्री होऊ नये म्हणून उपाययोजना केली आहे. यानुसार ३ मे २०१८ रोजी परिपत्रक जारी करण्यात आले असून राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व विविध प्राधिकरणांना आपल्या क्षेत्रातील अधिकृत, अनधिकृत बांधकामांची वॉर्डनिहाय माहिती दुय्यम निबंधकांकडे देण्याची सक्ती करण्यात आली आहे. अशा अनधिकृत मालमत्तांची नोंदणीच निबंधकांनी करून घेऊ नये, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व विकास प्राधिकरणांनी गट क्रमांक व विकासकांच्या नावासह अनधिकृत मालमत्तांची (बांधकामे व इतर) माहिती आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी व त्यासंबंधी वर्तमानपत्रांमधूनही प्रसिद्धी द्यावी, असे परिपत्रकात सूचित आहे. फसवणूक रोखण्यासाठी प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ कायद्यातील ५२, ५३, व ५४ तसेच महानगरपालिका अधिनियम २६०, २६७, २६७ (अ) आणि कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

फसवणूक टळणार :विकासकांकडून बांधकामासंबंधी पुरेशा परवानग्या न घेताच मालमत्ता विक्री केल्या जातात. या अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई केली जाते. तेव्हा नागरिकांना खरेदीची मालमत्ता अनधिकृत असल्याचे समजते. ही फसवणूक आता टळेल.

अशा असतील उपाययोजना

१) स्थानिक स्वराज्य संस्था आणि विकास प्राधिकरणे आपल्या क्षेत्रात असलेल्या अधिकृत आणि अनधिकृत मालमत्तांची यादी त्या विभागाच्या संकेतस्थळावर टाकतील. अनधिकृत मालमत्तांच्या यादीस स्थानिक वर्तमानपत्रात ठळक प्रसिद्धी द्यावी लागेल.
२) अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची नोटीस संबंधित विकासक अथवा मालमत्ताधारकांवर बजावल्यानंतर तत्काळ कोर्टात कॅव्हेट दाखल करावे लागेल. जेणेकरून पुढील कारवाईस स्थगितीसाठी प्राधिकरणांची बाजू भक्कम राहील.

३) दुय्यम निबंधकाकडे अशा अनधिकृत मालमत्तांची माहिती नोंदवून रजिस्ट्री करण्यात येऊ नये, असा सूचना देण्याचे निर्देश.

४) न्यायालयात ज्या प्रकरणांमध्ये स्थगिती आदेश आहेत अशा प्रकरणात स्वत: हजर होऊन नागरिकांची कशा प्रकारे फसवणूक होत आहे ही बाब ठळकपणे मांडावी.
५) ज्या अधिकाऱ्याच्या वाॅर्ड अथवा प्रभागात अनधिकृत बांधकामे सुरू असतील अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर २ मार्च २००९ च्या कायद्यानुसार दोषी धरून कारवाई करण्यात येईल.

शहीद अब्दुल हमीद यांच्या वीर पत्नी रसुलन बीबींचा पुण्यात यशोदा पुरस्काराने सन्मान (व्हिडीओ)

पुणे- परमवीर चक्र विजेते कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार शहीद अब्दुल हमीद यांच्या पत्नी रासुलन बीबी यांचा आज पुण्यात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते यशोदा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. स्वर्गीय मालतीताई माधवराव मानकर यांच्या स्मरणार्थ दिवा प्रतिष्ठान आणि वीर हनुमान मित्र मंडळ यांच्या वतीने हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो .
माजी उपमहापौर दीपक मानकर ,आणि मानकर परिवार तसेच उद्योजक विठ्ठल शेठ मणियार, माजी आमदार उल्हास दादा पवार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते माजी महापौर अंकुश काकडे तसेच माजी विरोधी पक्षनेता दत्ता सागरे, ब्रिगेडीअर प्रसाद जोशी ,शहीद अब्दुल हमीद यांचे नातू जमील आलम , मयूर जाधव,आनंद सराफ,हर्षवर्धन मानकर ,करण मानकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
वीर अब्दुल हमीद यांनी १९६२ च्या भारत चीनयुद्धात भारतासाठी विशेष पराक्रम केला होता. त्यानंतर १९६५ मध्ये त्यांनी पाकिस्तानशी झालेल्या युद्धात पाकचे 3 टैंक उधवस्त करून चौथा टैंक उधवस्त करण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना अमरत्व प्राप्त झाले .
महावीर चक्र आणि परमवीर चक्र देवून त्यांचा भारत सरकारने सन्मान केला होता .. आज पुण्यात त्यांच्या पत्नीचा झालेल्या सन्मान सोहळ्याची हि झलक नक्की पहा ….

कृष्णाखोऱ्यातील सर्व सिंचन प्रकल्पाची अपूर्ण कामे पुर्ण करावीत -मंत्री गिरीश महाजन

पुणे दि. 5- कृष्णा खोऱ्यातील सर्व सिंचन प्रकल्पाची अपूर्ण कामे पुर्ण करावीत, अशा सूचना जलसंपादा मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.

येथील महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळ येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे,  खासदार अनिल शिरोळे, आदी मान्यवर  उपस्थित होते.

कृष्णा खोऱ्यातील विविध प्रकल्प हे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहेत. उर्वरित सिंचन प्रकल्पही लवकरात लवकर पुर्ण करुन  कृष्णा खोऱ्याची सिंचन क्षमता अधिक वाढण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. जास्तीत जास्त पाणीसाठा निर्माण करुन त्याचा योग्य उपयोग व्हावा याची अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. प्रकल्प पूर्ण करत असतांना प्रकल्पाच्या कामाचा दर्जा उत्कृष्ट असला पाहिजे. यावेळी कृष्णाखोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी  सादरीकरणाव्दारे प्रकल्पांच्या सद्यस्थिती  व एकूण सिंचन क्षमतेबाबत माहिती दिली.

कृष्णाखोरे विकास महामंडळातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मंत्रीमहोदयांच्या  हस्ते प्रशस्तीपत्र  देवून गौरविण्यात आले.

यावेळी कृष्णाखोरे विकास महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित हो

​शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी प्रयत्नशील -जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

पुणे दि. 5- पिण्याचे पाणी शुद्ध असणे आवश्यक असल्याने  पिण्यासाठी सर्वांना शुद्ध पाणी  पुरविणे  हे कर्तव्य असून  त्यासाठी शासन नेहमीच  प्रयत्नशील असते, असे प्रतिपादन जलसंपादन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

पर्वती येथील जलशुध्दीकरण प्रकल्पाचे उद्घाटन श्री. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय पाटील, आमदार माधुरी मिसाळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, महापौर मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते.

श्री. महाजन म्हणाले, अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी अशुद्ध असल्याने विविध रोग होत आहेत. पुण्यासारख्या शहरात असा अत्याधुनिक जलसुध्दीकरण प्रकल्प झाल्याने नागरिकांना शुध्द पाणी मिळेल आणि नागरिकांचे आरोग्य सुस्थितीत राहील. या प्रकल्पामुळे पाण्याची होणारी गळती देखील कमी झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाण्याच्या एकुण वापरापेक्षा गळतीचे प्रमाण अधिक असल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. पुणे शहरात देखील लवकरच पाणी वापराचे मुल्यमापन करुन पाणी गळती पुर्णपणे थांबविण्यासाठी प्रयत्न करता येतील. शहरातील जलसंपदा विभागाशी निगडीत प्रश्नांसाठी लवकरच बैठक घेऊन त्यावर उपाययोजना करण्यात येतील.

यावेळी श्री. महाजन यांनी जलशुध्दीकरण प्रकल्पाच्या फलकाचे तसेच रिमोट कंट्रोलव्दारे जलशुध्दीकरण प्रकल्पाचे अनावरण केले. यावेळी  प्रकल्पासाठी उत्कृष्ट काम केलेल्या अधिकाऱ्यांना  गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती मुक्ता टिळक यांनी केले तर आभार उपमहापौर सिध्दार्थ झेंडे यांनी मानले. यावेळी  आमदार माधुरी मिसाळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, खासदार अनिल शिरोळे यांची समयोचित भाषणे झाली.

यावेळी   महापालिकेचे नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कोल्हापूरहून ग्रीन कॉरीडोर द्वारे आणलेल्या यकृतामुळे मिळाले पुण्यातील व्यक्तीला जीवनदान

0

पुणे-एका ब्रेन डेड रुग्णांचे यकृत आज (दि.५) कोल्हापूर येथून ग्रीन कॉरीडोरचा उपयोग करून पुण्यातील ज्युपिटर  हॉस्पिटल बाणेर येथे आणण्यात आले. ज्युपिटर हॉस्पिटलची टीम हे यकृत कोल्हापूरहून घेउन सायंकाळी ५ वाजता निघाली  व ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर  येथे ८ वाजता पोहोचली. ग्रीन कॉरीडोर  हे कोल्हापूर पासून पुण्यापर्यंत तयार करण्यात आले होते. या ग्रीन कॉरीडोर मार्फत यकृत केवळ ३ तासात पुण्यात पोहोचले. सर्व सामान्यपणे या प्रवासासाठी ६ तास लागतात.

कोल्हापूर येथील ३३वर्षीय व्यक्तीचा ३० एप्रिल रोजी अपघातात झाल्याने त्यांना त्वरित एस्टर आधार हॉस्पिटल, कोल्हापूर येथे  दाखल करण्यात आले परंतु ४ मे ला रुग्णांने वैद्यकीय उपचारांना कोणताही प्रतिसाद दिला नसून  काही  आवश्यक चाचण्या केल्यानंतर ४ मे  रोजी  डॉक्टरांनी रुग्णास ब्रेन डेड घोषित केले. एस्टर आधार हॉस्पिटल, कोल्हापूर च्या मेडिकल टीमने ब्रेन डेड रुग्णाच्या नातेवाईकांचे अवयवदाना संदर्भात समुपदेशन केले व त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी अवयव दानाचा निर्णय घेतला.

ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर  येथील यकृत तज्ञांनी त्वरित कोल्हापूर येथे जाऊन ऑर्गन रिट्रीव्हलची प्रक्रिया आज दुपारीच पूर्ण केली.कोल्हापूरचे पोलीस महानिरीक्षक (आय. जी. पी) विश्वास नांगरे पाटील व पुण्याचे पोलीस उपायुक्त(डी. सी .पी) अशोक मोराळे यांच्या सहकार्यामुळे ग्रीन कॉरीडोर द्वारा कोल्हापूरपासून पुण्यापर्यंत यकृत केवळ ३ तासात आणता आले. ज्युपिटर हॉस्पिटल मधील ६० वर्षीय व्यक्तीच्या यकृताच्या विकारामुळे या रुग्णाला एक महिन्या पूर्वी त्यांच्या मुलीने यकृताचा काही भाग दान केला होता.योग्य उपचारा नंतर त्यांना घरी देखील सोडण्यात आले होते. मात्र एक महिन्या नंतर त्यांच्या यकृतामध्ये पुन्हा बिघाड झाल्यामुळे त्यांना तातडीने यकृत प्रत्यारोपणाची गरज होती. ही गरज पाहून पुण्याच्या विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राने या यकृत प्रत्यारोपणाची मान्यता देऊन या रुग्णाचा जीव वाचवला.

ज्युपिटर हॉस्पिटल येथील यकृत तज्ञ डॉ.शरण नरुटे म्हणाले की, “ब्रेन डेड रुग्णांच्या नातेवाईकांनी त्या रुग्णाच्या यकृत दानाचा घेतलेला निर्णय प्रशंसनीय आहे. आपण सर्वांनीच ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. अवयव दानाद्वारे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला नवे जीवन देऊ शकते.  एक व्यक्तीच्या अवयव दानमुळे जवळपास नऊ लोकांचे प्राण वाचू शकतात. अवयव दाना बाबतीत जनजागृकता वाढवण्यासाठी ज्युपिटर हॉस्पिटल प्रयत्न करीत आहे.”

यावेळी ज्युपिटर हॉस्पिटल मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील राव म्हणाले, “यासारखे अधिक लोक अवयवदानासाठी पुढे येतात तर समाजाला फायदा मिळेल” पुढे ते असेही म्हणाले कि, “ आम्ही पोलीस महानिरीक्षक (आय. जी. पी) विश्वास नांगरे पाटील, पोलीस उपायुक्त(डी. सी .पी) अशोक मोराळे व आरती गोखले, समन्वयक (ZTCC) तसेच पुणे व कोल्हापूर  वाहतूक नियंत्रण पथकाचे हि आभारी आहोत” तसेच या यकृत प्रत्यारोपणाच्या टीम मध्ये डॉ. सोमनाथ चट्टेर्जी व डॉ.शरण नरुटे यांचा समावेश होता आणि ट्रान्सप्लॅन्ट समन्वयक श्री सागर काकड ज्युपिटर  हॉस्पिटल, बाणेर यांचे या सर्व प्रक्रियेत योगदान होते.

कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रश्न संबंधी संरक्षण मंत्र्यांशी खा.अनिल शिरोळेंची चर्चा –

पुणे-:-  कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विविध प्रश्नांसंबंधी केंद्रीय संरक्षण मंत्रालयातर्फे देशभरातील ६३ बोर्डांच्या लोकप्रतिनिधी बरोबर दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन ह्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. ह्या बैठकीत पुणे शहरातील कॅटोंमेंट बोर्डांच्या विविध प्रश्नांसंबंधी खासदार अनिल शिरोळे ह्यांनी पुणेकॅटोंमेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रियांका श्रीगिरी तसेच देहूरोड बोर्डाचे अभय सावंत ह्यांच्या समवेत दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मलासीताराम ह्यांची भेट घेऊन बोर्डांच्या संबंधी विविध प्रश्नांवर चर्चा केली. ह्या मध्ये प्रामुख्याने GST च्या उत्पन्नातील मधील बोर्डाचा हिस्सा तसेचराज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या मिळणाऱ्या लाभात कॅटोंमेंट बोर्डातील नागरीकांना मिळणाऱ्याअडचणी, अतिरिक्त FSI, तसेच वानवडी आणि घोरपडी ह्यापरिसरातील STP प्लांट साठी जमीन उपलब्ध होणे,  बोर्डातील बांधकामांसाठी जाचक अटी दूर करणे, भाडे करार दुरुस्ती करणे, बोर्डाच्या जमिनींचे हस्तांतरण सुलभ करणे अशा विविध समस्यांवरकेंद्रीय संरक्षण मंत्री ह्यांचेशी सविस्तर चर्चा  झाली असून ह्या पुढील काळात संरक्षण मंत्रालयातील प्रशासकीय पातळीवर ह्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढील टप्यात प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे ह्यांनी भेटीनंतरबोलताना दिली.
तसेच दीर्घकालीन उपाय योजना म्हणून शहरी भागातील कॅन्टोन्मेंट आस्थापनातील संरक्षण विषयक कामकाज शहराबाहेर स्थलांतरित करावे जेणेकरून बोर्डाच्या नागरी समस्या सोडविणे सोपे होईल अशी विनंती देखील शिरोळे ह्यांनी संरक्षण मंत्र्यांना बैठकीत बोलताना केली.

आगामी सर्व निवडणुका काँग्रेस-ऱाष्ट्रवादी एकत्र लढवणार : प्रफुल्ल पटेल

नवी दिल्ली -राज्यात भंडारा-गोंदिया आणि पालघर पोटनिवडणुकांसह आगामी विधानसभा-लोकसभेच्या निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढवणार आहे. दिल्लीत राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

पटेल म्हणाले, नाना पटोले हे माझ्या लहान भावासारखे आहेत. त्यामुळे आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, येत्या काळात आम्ही सोबत काम करु. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार असेल. याबाबत येत्या ९ मे रोजी उमेदवाराची घोषणा करण्यात येईल. पक्षश्रेष्ठींनी यापुढील काळात भाजपा-सेनेविरोधात मोर्चे काढण्याच्या सूचनाही दिल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर नाना पटोले यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रफुल्ल पटेल आणि माझ्यातील वाद आता संपला आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपमुक्त करायचा यावर आमचे एकमत झाले आहे. त्यामुळे ही निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन लढवतील, याबाबत दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील हा निर्णय आम्हाला दोघांनाही मान्य असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या कार्यपद्धतीवर टीका करीत भाजपामधून बाहेर पडलेले माजी खासदार नाना पटोले यांनी गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाच्या खासदारकीचा १२ डिसेंबर २०१७ रोजी राजीनामा दिला होता. तर १४ डिसेंबर २०१७ रोजी त्यांचा राजीनामा भाजपाने मंजूर केला होता. त्यामुळे पालघरसह या मतदारसंघात २८ मे रोजी पोटनिवडणूक होत आहे.आता नाना पटोले भाजपाला रामराम करीत पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे आता या जागेवरील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने दावा केल्याची चर्चा आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी हा मतदारसंघ आमचा असून आम्हीच ही जागा लढवणार त्याला पर्याय नाही अशी भुमिका घेतली आहे. त्यामुळे या जागेवर आता काँग्रेस-राष्ट्रवादीपैकी कुठल्या पक्षाच्या उमेदवाराली येथून संधी मिळते हे पाहणे महत्वाचे ठऱणार आहे.

ग्राम स्वराज अभियानांतर्गत राज्यातील साडेआठ हजार कुटुंबांना वीजजोडणी

0

मुंबई-राज्यात ग्राम स्वराज अभियानांतर्गत 192 गावांतील सुमारे 8 हजार 820 लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आली असून निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपूर्वीच केली आहे. देशात महाराष्ट्राने या अभियानात सर्वप्रथम उद्दिष्ट गाठले आहे.

        केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. 14 एप्रिल 2018 ते 5 मे 2018 पर्यन्त राज्यातग्रामस्वराज अभियानराबविण्यात येत आहे. या अभियानातसौभाग्ययोजनेतून राज्यातील ज्या 192 गावात 80 टक्क्यांपेक्षा अधिक दलितवस्ती आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल दारिद्ररेषेखालील कुटुंबांची संख्या अधिक आहे, अशा सर्व लाभार्थ्यांना 100 टक्के  वीजजोडणी देण्याचे उदिष्ट होते. त्यानुसार राज्याच्या 23 जिल्हयांतील 192 गावात वीजजोडणी नसलेल्या सर्व लाभार्थ्यांना दि. 5 मे 2018 पर्यंत वीजजोडणी द्यावयाची होती. मात्र महावितरणने हे उद्दिष्ट     दि. 01 मे 2018 रोजीच पूर्ण केले असून या 192 गावातील 8 हजार 820 लाभार्थ्यांना वीजजोडणी दिली आहे. देशात महावितरणने सर्वातप्रथम उद्दिष्टांची पूर्तता केली आहे.

 महावितरणचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक (प्रकल्प) श्री. दिनेशचंद्र साबु, कार्यकारी संचालक (पायाभूत आराखडा) श्री. प्रसाद रेशमे तसेच मुख्यालयासह क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी अथक परिश्रम केल्यामुळे राज्यातील 8 हजार 820 लाभार्थ्यांना मागील 16 दिवसांत वीजजोडणी देण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यात दुर्गम संवेदनशील अशा गडचिरोली जिल्हयातील संपूर्ण 8, गोंदिया जिल्ह्यातील 3  गावांचा समावेश आहे. तसेच भंडारा, चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ, नांदेड इत्यादी मागास जिल्हयातही वीजजोडणीचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करण्यात आले आहे. 

नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत कुणाल पवार, आर्यन कोटस्थाने, सिद्धार्थ माधवन यांचे संघर्षपूर्ण विजय

0

पाचगणी- रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 14 वर्षाखालील नॅशनल सिरीज्  टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात  कुणाल पवार,  आर्यन कोटस्थाने, सिद्धार्थ माधवन,  अनिश रांजळकर या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्टवर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात  कुणाल पवारने अनमोल नागपुरेचा टायब्रेकमध्ये 9-8(6)असा संघर्षपूर्ण पराभव केला.  आर्यन कोटस्थाने याने आर्यन हूडवर टायब्रेकमध्ये 9-8(5) असा विजय मिळवला.  अर्णव पापरकरने देबरता प्रधानवर 9-3अशा फरकाने मत केली.  आर्यन देवकर याने तपन मूळेला 9-0असे नमविले.

मुलींच्या गटात  गौतमी खैरेने पूर्वा भुजबळचा 9-4 असा तर, सानिया मोरेने प्राप्ती पाटीलचा 9-7असा पराभव करून आगेकूच केली. जिया परेराने संचिता नगरकरला 9-1असे पराभूत केले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: 14 वर्षाखालील मुले: पहिली पात्रता फेरी:  अनिश रांजळकर वि.वि.वेद पवार 9-7; आर्यन देवकर वि.वि.तपन मूळे 9-0; चेतन सौंवेद वि.वि.वेद ठाकूर 9-4; आदी कपूर वि.वि.अथर्व रत्नोजी 9-1; ओम पाटोळे वि.वि.ईशान गोदभरले 9-5; कुणाल पवार वि.वि.अनमोल नागपुरे 9-8(6); योहान चोखनी वि.वि.ओंकार शिंदे 9-4; जय गाला वि.वि.बिस्वा प्रधान 9-3; आर्यन कोटस्थाने वि.वि.आर्यन हूड 9-8(5); सिद्धार्थ माधवन वि.वि.प्रथमेश पाटील 9-7; राधेय शहाणे वि.वि.शंतनु गुरव 9-6; यश पोळ वि.वि.सार्थक पोतदार 9-3; आदित्य तलाठी वि.वि.अश्विन नरसिंघानी 9-3; अर्णव पापरकर वि.वि.देबरता प्रधान 9-3; शर्विल पाटील वि.वि.आर्यन सुतार  9-5;

14 वर्षाखालील मुली:  गौतमी खैरे वि.वि.पूर्वा भुजबळ 9-4; सानिया मोरे वि.वि.प्राप्ती पाटील 9-7; जिया परेरा वि.वि.संचिता नगरकर 9-1; हिया मेहता वि.वि.गार्गी शहा 9-2; संजीवनी कुतवळ वि.वि.श्रुन्या सिरसाठ 9-3.