कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रश्न संबंधी संरक्षण मंत्र्यांशी खा.अनिल शिरोळेंची चर्चा –
पुणे-:- कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विविध प्रश्नांसंबंधी केंद्रीय संरक्षण मंत्रालयातर्फे देशभरातील ६३ बोर्डांच्या लोकप्रतिनिधी बरोबर दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन ह्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. ह्या बैठकीत पुणे शहरातील कॅटोंमेंट बोर्डांच्या विविध प्रश्नांसंबंधी खासदार अनिल शिरोळे ह्यांनी पुणेकॅटोंमेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रियांका श्रीगिरी तसेच देहूरोड बोर्डाचे अभय सावंत ह्यांच्या समवेत दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मलासीताराम ह्यांची भेट घेऊन बोर्डांच्या संबंधी विविध प्रश्नांवर चर्चा केली. ह्या मध्ये प्रामुख्याने GST च्या उत्पन्नातील मधील बोर्डाचा हिस्सा तसेचराज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या मिळणाऱ्या लाभात कॅटोंमेंट बोर्डातील नागरीकांना मिळणाऱ्याअडचणी, अतिरिक्त FSI, तसेच वानवडी आणि घोरपडी ह्यापरिसरातील STP प्लांट साठी जमीन उपलब्ध होणे, बोर्डातील बांधकामांसाठी जाचक अटी दूर करणे, भाडे करार दुरुस्ती करणे, बोर्डाच्या जमिनींचे हस्तांतरण सुलभ करणे अशा विविध समस्यांवरकेंद्रीय संरक्षण मंत्री ह्यांचेशी सविस्तर चर्चा झाली असून ह्या पुढील काळात संरक्षण मंत्रालयातील प्रशासकीय पातळीवर ह्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढील टप्यात प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे ह्यांनी भेटीनंतरबोलताना दिली.
तसेच दीर्घकालीन उपाय योजना म्हणून शहरी भागातील कॅन्टोन्मेंट आस्थापनातील संरक्षण विषयक कामकाज शहराबाहेर स्थलांतरित करावे जेणेकरून बोर्डाच्या नागरी समस्या सोडविणे सोपे होईल अशी विनंती देखील शिरोळे ह्यांनी संरक्षण मंत्र्यांना बैठकीत बोलताना केली.