Home Blog Page 3140

खेळाच्या रूपात प्रथमच चमकणार लाल मातीतील गोटया

बालपणीच्या गोटया खेळण्याच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात ताज्या असतील. मोबाईल विश्वात हरवलेल्या आजच्या छोटया पिढीला गोटया आणि त्यांचा खेळ कसा असतो हे कदाचित ठाऊक नसलं तरी गोटयांचा खेळ त्यांना खऱ्या अर्थाने लवकरच समजणार आहे. बालपणी जीवापाड जपत खेळलेल्या गोटयांकडे व्यावहारिक जगात केवळ ‘टाइमपास’ म्हणून पाहिलं जात असलं तरी या मानसिकतेला छेद देत गोटया हा खेळ कसा उत्तम आहे हे गोटयाया आगामी मराठी सिनेमात पहायला मिळणार आहे.

केतनभाई सोमैया प्रस्तुत, विहान प्रोडक्शन द्वारा मोशन पिक्चरची निर्मिती असलेल्या गोटयाची कथा-पटकथा-संवाद-गीतलेखन-दिग्दर्शन भगवान पाचोरे यांनी केलं आहे. जय केतनभाई सोमैया या सिनेमाचे निर्माते असून, नैनेश दावडा आणि निशांत राजानी सहनिर्माते आहेत. गोटया या शीर्षकावरून या सिनेमाची कथा एखाद्या लहान मुलाभोवती गुंफण्यात आली असावी असा अंदाज लावला जाणं साहजिक असलं तरी हा सिनेमा पूर्णतः  गोटया या खेळावर आधारित आहे. शीर्षकाप्रमाणेच गोटयांचा खेळच खऱ्या अर्थाने या सिनेमाचा नायकही आहे.

अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळलेल्या भगवान वसंतराव पाचोरे यांनी गोटयांचा खेळाला अपेक्षित मान-सन्मान मिळवून देण्याच्या उद्देशाने या सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन केलं आहे. केवळ मैदानावरच नव्हे, तर बोलीभाषेतही गोटया कायम उपेक्षितच राहिल्या आहेत. ‘गोटया खेळणं’ हा रिकामटेकड्यांचं काम… ‘गोटया खेळायला आलो’ म्हणजे टाइमपास करायला आलोय का..? या अर्थाने बोलीभाषेत आजही गोटयांचा वापर केला जातो. हे चुकीचं असून गोटया हा बुद्धी तल्लख करणारा आणि शारीरिक कौशल्य दाखवणारा  खेळ असल्याचं बालपणापासून गोटयांसाठी जणू वेडे असलेल्या पाचोरे यांचं म्हणणं आहे. गोटया हा खेळाला आपल्या देशात जरी दर्जा दिला  जात नसला तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र या खेळाला महत्त्वाचं स्थान असून गोटया या सिनेमात तेच दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं पाचोरे म्हणतात. 

ऋषिकेश वानखेडे, राजेश श्रृंगारपुरे, सयाजी शिंदे, आनंद इंगळे, कमलाकर सातपुते, सुरेखा कुडची, हेमांगी राव, शरद सांखला, शशांक दरणे, पोर्णिमा आहिरे, विजय साळवे, जस्सी कपूर, धनंजय वाबळे, निलेश सुर्यवंशी, नेल्सन लिआओ, कृष्णा, श्लोक देवरे, अविष्कार चाबुकस्वार, धनुष पाचोरे, कृष्णा विजयदत्ता, मनोज नागपुरे, स्मिता प्रभू, वंदना कचरे, पल्लवी ओढेकर, राजेंद्र घुगे आदी कलाकारांच्या या सिनेमात भूमिका आहेत. छायांकन बाशालाल सय्यद यांनी केलं असून, राहुल भातणकर यांनी संकलन केलं आहे. संगीत दिग्दर्शन अवधूत गुप्तेचं, तर नृत्य दिग्दर्शन गणेश आचार्य यांच आहे. रोहित नागभिडे यांनी या सिनेमाला पार्श्वसंगीत दिलं आहे. बाबासाहेब पाटील आणि विशाल चव्हाण या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत. ६ जुलै ला ‘गोटया’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

राजी सिनेमानंतर आता अमृता खानविलकर दिसणार हिंदी वेबसीरिजमध्ये !

धर्मा प्रॉडक्शन्सच्या राजी सिनेमात पाकिस्तानी गृहिणी मुनिराच्या भूमिकेत दिसलेल्या अमृता खानविलकरने ह्या भूमिकेतून ब़ॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवलाय. अमृताच्या ह्या भूमिकेला फक्त चाहत्यांकडूनच नाही तर समीक्षकांकडूनही दाद मिळाली. राजी चित्रपटातून अमृताने दाखवून दिलं, की ती दिसायला सुंदर आहेच पण एक चांगली अभिनेत्रीही आहे. राजीच्या मुनिरा भूमिकेमूळे अमृताला ब़ॉलीवूडची कवाडं खुली झाली.

राजीच्या शालीन आणि घरंदाज गृहिणीनंतर आता अमृता आपल्या चाहत्यांना एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या अनुसार, अमृताने आपल्या आजवरच्या करीयरमध्ये कधीही अशी भूमिका केलेली नाही. एवढी ही भूमिका तिच्यासाठी वेगळी आणि आव्हानात्मक असणार आहे.

अमृताचा लवकरच डिजीटल दूनियेत डेब्यू होतो आहे. तिच्या नव्या वेबसीरिजमध्ये असलेली ही तिची भूमिका रहस्यमय स्वरूपाची आहे.

सूत्रांच्या अनुसार, अमृता सध्या आपल्या करीयरच्या शिखरावर आहे. ह्या शिखरावर गेल्यावर अर्थातच कलाकारांना अष्टपैलू भूमिका करण्याची इच्छा असते. अमृता नुकतीच एका घरंदाज गृहिणीच्या भूमिकेत राजीमध्ये दिसली होती. त्यानंतर ती आता एका बोल्ड आणि हिंसक भूमिकेत दिसेल.

लवकरच सुरू होणा-या ह्या वेबसीरिजमध्ये अमृता मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अमृताच्या ह्या भूमिकेच्या आसपासच कथानक विणलं गेलं आहे.

ह्याविषयी अमृता सांगते, “मला करीयरच्या ह्या वळणावर विविध प्रकारच्या भूमिका करण्याची इच्छा आहे. रूढिबध्द भूमिका न करता काहीतरी वेगळं करण्याची आणि त्यासाठी कोणत्याही कसोटीवरही माझी उतरण्याची तयारी आहे. माझी ही नवी भूमिकाही माझी कसोटी पणाला लावणारी आहे.”

ब्लॉकबस्टर राजी चित्रपटातल्या मुनिरा भूमिकेमुळे अमृताचं सर्वच स्तरांतून कौतुक झालं. ह्याविषयी ती सांगते, “मला अजूनही भरभरून प्रतिक्रिया मिळतायत. ह्या भूमिकेसाठी मी घेतलेली मेहनत कामी आल्याचा आनंद वाटतोय. माझे चाहते, फिल्मइंडस्ट्रीतली मित्र-मंडळी ह्यांच्याकडून पाठ थोपटली जातेय, त्यामूळे आता अजून जबाबदारीने काम करायची जाणीवही मला होतेय. “

अमृताच्या नव्या वेबसीरिजविषयीची माहिती अद्याप गुलदस्त्यातच असली तरीही, सूत्रांच्या अनुसार, अनेक खून केल्याचा आरोप असलेल्या अपराध्याच्या भूमिकेत अमृता ह्यात दिसणार असल्याचं समजतंय.

आपल्या भूमिकेविषयी अमृता म्हणते, “ ह्या भूमिकेत मी तुम्हांला ग्रे-शेड्समध्ये दिसेन. ही एक स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. जिचं आयुष्य आणि त्यातले निर्णय खूप बोल्ड आहेत. मला आनंद आहे, की राजीनंतर आता मला अशा भूमिका ऑफर होउ लागल्यात. आज सिनेक्षेत्रात अशा कथांची आणि अशा भूमिकांची खूप गरज असल्याचं मला वाटतं. ”

बजाज अॅलियान्झ लाइफ इन्शुरन्सतर्फे योजनाधारकांसाठी वन-टाइम विशेष बोनस जाहीर

बोनसच्या रकमेमुळे 13 लाख योजनाधारकांना फायदा होणार

 पुणे: बजाज अॅलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी लि. या भारतातील आघाडीच्या खासगी आयुर्विमा कंपनीने 31 मार्च 2018 पर्यंत योजना सुरू असलेल्या योजनाधारकांसाठी वन-टाइम विशेष बोनस देण्याची घोषणा केली आहे. संबंधित योजनेसाठी जाहीर करण्यात आलेल्या कम्पाउंडेड रिव्हर्शनरी बोनसच्या व्यतिरिक्त हा वन-टाइम विशेष बोनस दिला जाणार आहे. गुंतवणूक कायम ठेवलेल्या व कंपनीवर विश्वास असलेल्या अंदाजे 13 लाख योजनाधारकांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे.

वन-टाइम विशेष बोनस केवळ आर्थिक वर्ष 2017-18 साठी, दाव्याच्या वेळी देय असलेल्या सम अॅश्युअर्डच्या 1% असेल. वन-टाइम विशेष बोनसबरोबरच, बजाज अॅलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीने वार्षिक कम्पाउंडेड रिव्हर्शनरी बोनसही जाहीर केला आहे. कम्पाउंडेड रिव्हर्शनरी बोनस सम अॅश्युअर्डच्या व सर्व संचित बोनसच्या अनुषंगाने मोजला जातो.

योजनाधारकांसाठीच्या वन-टाइम विशेष बोनसविषयी बोलताना बजाज अॅलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण चुघ म्हणाले,आमच्या कंपनीला भांडवली नफा झाला आहे व त्याचा लाभ योजना सुरू असलेल्या योजनाधारकांनाही देण्याचे आम्ही ठरवले आहे. वार्षिक बोनसव्यतिरिक्त देण्यात येणाऱ्या वन-टाइम विशेष बोनसमुळे आमच्या ग्राहकांना आमच्याबरोबरची गुंतवणूक कायम ठेवल्याचा फायदा मिळेल व त्यांची जीवनातील उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मदत होईल”.

बोनसचा परिणाम

बोनसचा परिणाम समजून घेण्यासाठी, ग्राहकाने 20 वर्षे कालावधी असलेली, 20,00,000 रुपये सम अॅश्युअर्ड असलेली बजाज अॅलियान्झ एलिट ही योजना गेल्या वर्षी खरेदी केली, असे गृहित धरू.  या आर्थिक वर्षात, 4.5% कम्पाउंडेड रिव्हर्शनरी बोनस जाहीर केला असून त्याची रक्कम 90,000 रुपये आहे. याबरोबरच, बेस सम अॅश्युअर्डच्या 1% विशेष बोनसही जाहीर करण्यात आला आहे. ग्राहकासाठी ही रक्कम 20,000 वन-टाइम विशेष बोनस इतकी असेल.

बजाज अॅलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडविषयी

बजाज अॅलियान्झ लाइफ इन्शुरन्स ही भारतातील एक आघाडीची खासगी विमा कंपनी आहे. ही बजाज समूहासाठी वित्तीय सेवा हाताळणारा व्यवसाय बजाज फिनसर्व्ह लिमिटेड व जगातील आघाडीचा विमा समूह व जगातील एक सर्वात मोठी संपत्ती व्यवस्थापक अॅलियान्झ एसई यांच्यातील संयुक्त भागीदारी आहे.

बजाज अॅलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने 2001 मध्ये कार्य सुरू केले आणि आज 30 एप्रिल 2018 पर्यंत कंपनीच्या देशात 632 हून अधिक शाखा आहेत. कंपनी आपल्या सक्षम उत्पादनांद्वारे आयुर्विमा उत्पादने उपलब्ध करते व त्यामध्ये ग्राहकांना त्यांच्या जीवनातील उद्दिष्टे पूर्ण करता यावीत म्हणून पारंपरिक विमा उत्पादने व युलिप यांचा समावेश आहे. कंपनी समूह विमा व आरोग्य विमा योजनाही उपलब्ध करते.

महिंद्रा इलेक्ट्रिक व झूमकार यांनी मुंबईमध्ये सेल्फ-ड्राइव्ह ईव्ही सुविधा देण्यासाठी केला सहयोग

         शहरातील निवासी व व्हिजिटर यांना भाड्याने देण्यासाठी महिंद्रा e2oPlus ची सुविधा

  • मैसुरु, हैदराबाद, जयपूर व नवी दिल्ली येथे अशाच प्रकारे सहयोग केल्यानंतर मुंबईमध्ये केला विस्तार

मुंबई : 19 अब्ज डॉलर उलाढालीच्या महिंद्रा समूहाचा भाग असलेली महिंद्रा इलेक्ट्रिक आणि शेअर्ड मोबिलिटी सुविधा देणारी भारतातील आघाडीची झूमकार यांनी शेअर्ड मोबिलिटी सोल्यूशन म्हणून ईव्ही देण्याच्या विशेष सेवेमध्ये करून देशातील एका सर्वात महत्त्वाच्या व्यवसाय केंद्रामध्ये ही सेवा उपलब्ध केल्याचे आज जाहीर केले आहे. यानुसार, कंपनी महाराष्ट्रात e2oPlus या महिंद्राच्या पूर्णतः इलेक्ट्रिक 50 सिटी स्मार्ट कार झूमकारवर उपलब्ध करणार आहे व आगामी तिमाहीत ही संख्या 100 ईव्हींपर्यंत वाढवली जाणार आहे.

मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वाहनांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

सरकारच्या 2030 व्हिजनविषयी निती आयोगाने आपल्या अहवालात नमूद केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने कनेक्टेड, शेअर्ड व इलेक्ट्रिक मोबिलिटी हे मॉडेल म्हणून लोकप्रिय करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. मुंबई हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे केंद्र असून, महत्त्वाचे बिझनेस केंद्र आहे व त्यामुळेच या उपक्रमासाठी योग्य ठिकाण आहे. महाराष्ट्राच्या ईव्ही धोरणाच्या संदर्भात जाहीर करण्यात आलेल्या सुरुवातीच्या काही उपक्रमांमध्ये या घोषणेचाही समावेश आहे.

यानिमित्त बोलताना, महिंद्रा इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू यांनी सांगितले, “महिंद्रा इलेक्ट्रिक अंदाजे दशकभर ईव्ही क्षेत्रामध्ये आघाडीची कंपनी राहिली आहे. झूमकारबरोबरचा आमचा सहयोग वाढवणे व आमची ईव्ही मुंबईत शेअर्ड मोबिलिटी पद्धतीने दाखल करणे हे अतिशय अभिमानास्पद आहे. आमच्यासाठी महाराष्ट्र हे राज्य अतिशय महत्त्वाचे आहे आणि आम्ही येथे उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी गुंतवणुकीचे केलेले नियोजन अगोदरच जाहीर केले आहे. ईव्हींना पाठिंबा देण्यासाठी सकारात्मक पाऊल ठरेल, अशा ईव्ही धोरणाची घोषणा सरकार करत असतानाच, आम्ही ही घोषणा करत असल्याने आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आमच्या उपक्रमामुळे लोकांना एक तंत्रज्ञान म्हणून एव्हीचा अवलंब करण्यासाठी मदत होईल आणि हरित भविष्याच्या दृष्टीने राज्याची वाटचाल करण्यासाठी योगदान दिले जाईल.”

झूमकारचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग मॉरन यांनी सांगितले, “भारतातील शेअर्ड मोबिलिटीमधील प्रवर्तक म्हणून, झूमकारला मुंबईमध्ये पहिल्यांदाच शेअर्ड मोबिलिटी पद्धतीने ईव्ही दाखल करताना अतिशय आनंद होत आहे. महाराष्ट्र सरकारने ईव्हीविषयी घेतलेल्या प्रगतीशील भूमिकेमुळे येत्या काही महिन्यांत व वर्षांत इलेक्ट्रिक इकोसिस्टीमच्या विस्तारामध्ये निश्चितच योगदान मिळणार आहे. या घडामोडींना चालना देण्यासाठी झूमकार महिंद्रा इलेक्ट्रिकबरोबर पुन्हा काम करण्यासाठी उत्सुक आहे.”

या उपक्रमांतर्गत समाविष्ट होणाऱ्या वाहनांना झूमकार व लीजप्लान यांच्यातील सहयोगानुसार अर्थपुरवठा केला जाणार आहे व यामुळे झूमकारला कस्टमाइज्ड ईव्ही अर्थपुरवठा उपलब्ध होणार आहे. झूमकार व महिंद्रा ईलेक्ट्रिक यांना ईव्हीसाठी अर्थपुरवठ्यासाठी महिंद्रा फायनान्स विविध शहरांत यापुढेही फायनान्सिंग पार्टनर असणार आहे.

झूमकारविषयी:
2013 मध्ये कार शेअरिंग सेवा व 2017 मध्ये सायकल शेअरिंग सेवा दाखल करणारी झूमकार भारतातील पहिली सेल्फ-ड्राइव्ह मोबिलिटी सुविधा आहे. मोबाइल अनुभवावर सर्वाधिक भर देणारी झूमकार ग्राहकांना तास, दिवस, आठवडा किंवा महिना या नुसार कार भाड्याने देते. सायकल 30 मिनिटांच्या हिशोबाने भाड्याने दिल्या जातात. 2013 मध्ये स्थापन झालेल्या व बेंगळुरू येथे मुख्यालय असलेली झूमकार भारतातील अंदाजे 30 शहरांत कार्यरत आहे. 2017 मध्ये, झूमकारने झॅप दाखल करून भारतातील पहिला पीअर2पीअर आधारित सेवा सुरू केली. फेब्रुवारी 2018 मध्ये झूमकारने झॅप अंतर्गत भारतातील पहिल्या कार सबस्क्रिप्शन कार्यक्राला सुरुवात केली.

महिंद्रा इलेक्ट्रिकविषयी

महिंद्रा इलेक्ट्रिक ही 19 अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या महिंद्रा समूहाचा भाग असलेली कंपनी इलेक्ट्रिक वाहनांचा विकास व उत्पादन यातील जागतिक स्तरावरील प्रणेती आहे. जागतिक स्तरावर गौरव मिळालेले ईव्ही तंत्रज्ञान भारतात विकसित केलेली महिंद्रा इलेक्ट्रिक ही भारतातील एकमेव ईव्ही उत्पादक आहे. महिंद्रा समूहाकडे अतिशय वैविध्यपूर्ण इलेक्ट्रिक वाहने असून त्यामध्ये ई2ओप्लस हॅच, ईव्हेरिटो सेदान, ईसुप्रो मिनी व्हॅन व पॅनल व्हॅन्स यांचा समावेश आहे.

तंत्रज्ञान व नावीन्य यांच्या कक्षा रूंदावत, महिंद्राने वाहतुकीमध्ये बदल करण्याची गरज वेळोवेळी ओळखली आहे. यातूनच परिवर्तनासाठीचे व्हिजन अस्तित्वात आले; असे व्हिजन जे अधिक टिकाऊ व अवलंबून राहण्याजोगी कल्पनाशक्ती दर्शवते. पर्यायी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे महिंद्राला स्वच्छ, हरित व अधिक स्मार्ट भविष्य घडवण्याच्या दृष्टीने मदत झाली आहे.

महिंद्राविषयी

19 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या या कंपन्यांच्या समूहाचा नेहमीच प्रयत्न असतो की, ग्रामीण भागात भरभराट झाली पाहिजे, शहरातील जीवनशैली सुधारली पाहिजे आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढली पाहिजे. त्यामुळे लोकांना चालना मिळून त्यांचा विकास होईल. समूह भारतात युटिलिटी व्हेइकल्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा व व्हेकेशन ओनरशिप यामध्ये आघाडीच्या स्थानी आहे व व्हॉल्युमच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. कृषिव्यवसाय, एअरोस्पेस, कम्पोनंट्स, सल्ला सेवा, संरक्षण, ऊर्जा, औद्योगिक उपकरणे, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, स्टील, रिटेल, व्यावसायिक वाहने व दुचाकी व्यवसायांतही अग्रेसर आहे. भारतात मुख्यालय असलेल्या महिंद्रामध्ये 100 देशांत अंदाजे 200,000 कर्मचारी आहेत.

वेस्‍टसाइडतर्फे पुणेकरांसाठी अनोखा शॉपिंग अनुभव

पुणे : वेस्‍टसाइड या टाटा ग्रूपच्‍या भारतातील आघाडीच्‍या फॅशन रिटेलर्सने पुण्‍यामध्‍ये त्‍यांचे सातवे स्‍टोअर सुरू केले. हे स्‍टोअर जीके मॉल (तळमजला), नाशिक फाटा रोड, पिंपरी सौदागर येथे आहे. या स्‍टोअरमध्‍ये कपडे, फूटवेअर व अॅक्‍सेसरीज उपलब्‍ध आहेत.

वेस्‍टसाइड ही देशातील आघाडीची फॅशन रिटेल आहे. ही कंपनी १२९ स्‍टोअर्ससोबतच नुकतेच पुण्‍यामध्‍ये नवीन सादर करण्‍यात आलेल्‍या स्‍टोअरचे कार्यसंचालन पाहते. या स्‍टोअरला शहरी व आकर्षक सजावटीचे रूप देण्‍यात आले आहे आणि विविध सुधारणांसह हे स्‍टोअर तयार करण्‍यात आले आहे. या स्‍टोअरमध्‍ये फॅशनेबल व ट्रेण्‍डी कलेक्‍शन्‍सचा समावेश असण्‍यासोबतच टाटा ग्रूपमधील सर्वोत्‍तम दर्जाच्‍या वस्‍तूंचा समावेश आहे. या स्‍टोअरमध्‍ये बॉम्‍बे पैसले, न्‍युऑन, वार्क, वार्डरोब, उत्‍सा असे लोकप्रिय वेस्‍टसाइड ब्रॅण्‍ड्स उपलब्‍ध असतील.

 

वेस्‍टसाइड विशेषत: आजच्‍या महिलांसाठी तयार करण्‍यात आलेल्‍या समकालीन व आकर्षक कपड्यांची व्‍यापक रेंज देते. वॉर्डरोबचे ९ टू ९ कलेक्शन असो, कॅज्युअल आणि कॉन्फिडंट एलओव्ही, यंग, एजी व आकर्षक न्यूऑन, सुंदर व कमनीय स्त्रियांसाठीचा सॅसी सोडा अॅण्ड जिआ, तुमची वैयक्तिक फॅशन आणखी सुंदर करण्यासाठी वंडरलव्ह असो, वार्कचे फेस्टिव्ह व आकर्षक कलेक्शन, तरुणांसाठीच्या एथनिक वेअरमध्ये अनेक पर्याय देणारे बॉम्बे पैसले, रेशमी कपड्यांसाठी प्रसिद्ध झुबा असो की कायम लोकप्रिय राहिलेले उत्सा असो… वेस्टसाइडमध्ये प्रत्येकासाठी काही ना काही आहेच.

फॅशनमधील आधुनिक ट्रेण्‍ड्स कायम राखत वेस्‍टसाइड पुरुषांसाठी कपड्यांची व्‍यापक व वैविध्‍यपूर्ण रेंज देते. पुरुषांसाठी इथे न्युऑन, वेस्टस्पोर्ट, अॅस्कॉट, ईटीए आणि वेस्टस्ट्रीट असे ब्रॅण्ड्स आहेत. वेस्टसाइडच्या कलेक्शनमधील पुरुषांसाठीच्या प्रासंगिक तरीही स्टायलिश अशा कपड्यांमध्ये कम्‍फर्टेबल लिनन आणि कॉटन शर्ट्स, कॅज्‍युअल व आकर्षक क्रू नेक टीज, कार्गो पँट्स, क्राँट्रा फॉर्मल क्लोदिंग आणि अशा अनेक पर्यायांचा समावेश आहे.

लहान मुलांना आकर्षक ड्रेसेस घेण्‍याची इच्‍छा असलेले पालक वेस्‍टसाइडमधील बेबी हॉप, हॉप आणि वाय अॅण्ड एफ सारख्या ब्रँड्ससह त्‍यांच्‍या लहान मुलांना स्‍टाइलिश बनवू शकतात. या ब्रॅण्‍ड्सच्या डेनिम्स व पोलो टीजपासून क्युट दिसणारे पफ स्लीव्ह्ज टीशर्ट्स आणि बरेच काही इथे आहे.

या स्टोअर्समध्ये स्टुडिओ वेस्टही असणार आहे. हा ब्रॅण्ड समकालीन भारतीय स्त्रीला देतो कॉस्मेटिक्स, अप्रतिम फ्रेगनेन्स आणि एक्झॉटिक बाथ अॅण्ड बॉडी प्रोडक्ट्सची व्यापक रेंज.

ट्रेण्‍टविषयी :

१९९८ मध्ये सुरू झालेला ट्रेण्ट हा टाटा ग्रूपचा भाग आहे. त्यांचे मुख्यालय मुंबईत असले तरी त्यांची कार्यव्याप्ती भारतभर आहे. ट्रेण्टतर्फे भारतातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक वेगाने वाढणारी वेस्टसाइड ही रीटेल चेन चालवली जाते.

या कंपनीने आजवर ६३ शहरांमध्ये ८००० ते ३४००० चौ.फूट अशा जागेत १२९ वेस्टसाइड स्टोअर्स सुरू केली आहेत. वेस्टसाइडमध्ये त्यांच्या स्वत:च्या ब्रँडेड फॅशनेबल कपड्यांची व्यापक श्रेणी उपलब्ध आहे आणि कंपनीच्या रीटेल व्यवसायातील हा सातत्याने एक मुख्य भाग राहिला आहे. यात महिला, पुरुष आणि लहान मुलांसाठीचे कपडे, फूटवेअर, कॉस्मेटिक्स, परफ्युम्स आणि हँडबॅग्स, घरगुती फर्निचर अॅक्सेसरी, लाँजरी आणि भेटवस्तू असे विविध विभाग आहेत.

देशातील सर्वात लहान मानांकन प्राप्त बुद्धिबळपटू सार्थक

 पुणे -येथे झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत पाच वर्षीय सार्थक यशोधन देशपांडे याने 1-जून-2018रोजी देशातील सध्याचा सर्वात लहान मानांकन प्राप्त बुद्धिबळपटू होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. सार्थकचे फीडे रेटींग 1064 आहे. तो कुंटे चेस अॅकेडेमी मध्ये प्रशिक्षण घेत असून या यशा मध्ये मृणालिनी कुंटे यांचा मोठा सहभाग आहे
 वयाच्या दुसर्या वर्षी सार्थकजगाच्या नकाशावर 110 देश व त्यांचे झेंडे ओळखत असे “मुलाचे पाय पाळण्यात दिसतात “या उक्तीप्रमाणे ओळखून त्याच्या पालकांनी  वयाच्या चौथ्या वर्षी बुद्धीबळ खेळाची ओळख करून दिली.
  कॅनडा मध्ये असतांना वॉटरलूमधील क्षेत्रिय शालेय स्पर्धेत ज्युनियर केजीतील सार्थकने इयत्ता पहिली विभागात सहभाग घेत दुसरा क्रमांक पटकावला होता. वयाच्या चौथ्या वर्षी ओंटॅरीयो राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेत किंडर गार्टन मध्ये प्रथम स्थानासाठी बरोबरी साधली होती.
 भारतात परत आल्यावर त्याने गेल्या सहा महिन्यात पुणे मुंबई सातारा येथे विविध स्पर्धेत सहभागी होऊन बर्‍याच ट्रॉफी, मेडल्स पटकावले आहेत. तो पुण्यातील श्री श्री रविशंकर बालमंदिर शाळेचा विद्यार्थी असून त्याला वेळोवेळी शाळेने उत्तम सहकार्य केलेले आहे.
नाव: सार्थक यशोधन देशपांडे
जन्म तारीख: 25-06-2012
Fide id : 25963694
FIDE Rating : 1064
स्थान: पुणे
वडील : यशोधन देशपांडे
आई  :दीपा देशपांडे

 

इंधन दराबाबत जनतेची लुट आणि थट्टा-रमेश बागवे

पुणे-

पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये फक्त १ पैश्याची दर कपात केल्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा
काँग्रेस कमिटतर्फे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली अलका टॉकिज चौक येथे निदर्शने करण्यात
आली. दि. १४ मे पासून सलग १६ दिवस पेट्रोल – डिझेलचे दर वाढत आहेत. काल पेट्रोल – डिझेलच्या
दरामध्ये ६० पैश्यांची कपात झाली असे सकाळी सांगण्यात आले. परंतु ही मानवी चूक आहे असे सांगून
तासाभरातच सरकारी तेल कंपन्यांनी जाहिर केला की फक्त १ पैश्यांनी दर कमी करण्यात आले आहेत.
आपल्या भाषणात शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, ‘‘पेट्रोल – डिझेल दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे
भाव वाढलेले आहे. सामान्य नागरिकाला जगणे मुश्किल झाले आहे. जनतेच्या हिताचा विचार न करता
या मोदी सरकारने इंधन दरवाढीमध्ये १ पैसा कपात करून लोकशाही व जनतेची थट्टा केली आहे. मोदी
सरकारने लोकांना अच्छे दिन येणार असे आश्वासन दिले होते पण ते केवळ स्वप्नच राहिले. जनता
संतापलेली आहे आणि त्यांचा आक्रोश ते येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय
जनता पक्षाला दाखवून देतील.’’
यानंतर सौ. कमल व्यवहारे व गोपाळ तिवारी यांचीही भाषणे झाली.
या आंदोलनात माजी आमदार मोहन जोशी, दिप्ती चवधरी, ॲड.अभय छाजेड, सदानंद शेट्टी,
दत्तात्रय गायकवाड, अजित दरेकर, अविनाश बागवे, संगीता तिवारी, बाळासाहेब दाभेकर, सुनिल शिंदे, रवि
पाटोळे, सोनाली मारणे, राजेंद्र शिरसाट, शिवराज भोकरे, विजय खळदकर, हरजीतसिंग बेदी, निलेश
बोराटे, विश्वास दिघे, अनुसया गायकवाड, शेखर कपोते, राजेंद्र भुतडा, जयकुमार ठोंबरे, मीरा शिंदे, विक्रम
खन्ना, दिपक ओव्हाळ, बाळासाहेब अमराळे, द.स.पोळेकर, नारायण पाटोळे, दिलीप ढवळे, राजू साठे,
राहुल तायडे, विनय ढेरे, राजेंद्र पेशने, भारती कोंडे, रजिया बल्लारी आदीसह असंख्य कार्यकर्ते सहभागी
झाले होते.

वाकणकर मेमोरियल एटीएफ आशिया 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेस 2 जून पासून प्रारंभ

0
पुणे- पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे एमएसएलटीए केपीआयटी अरूण वाकणकर यांच्या स्मरणार्थ अरूण वाकणकर मेमोरियल एटीएफ आशिया 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील एमएसएलटीए स्कुल ऑफ  टेनिस येथे 2 ते 9 जून 2018 या कालावधीत होणार आहे.
 
स्पर्धेचे हे सलग बारावे वर्ष असून याविषयी अधिक माहिती देताना एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, एटीएफ आशिया 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धा भारताव्यतिरिक्त थायलंड, कतार, चीन, कझाकस्तान, लेब्नन, मलेशिया, कोरिया, इराण, इंडोनेशिया, श्रीलंका आणि बांग्लादेश या देशांतही यावर्षी आयोजित करण्यात येणार आहे. 
 
 एटीएफ आशिया 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धा या अशियायी टेनिस फेडरेशन यांनी आयोजित केलेल्या आशियायी कुमार मालिका स्पर्धांचा एक भाग आहे. ज्यामध्ये आशियातील सर्व खेळाडु सहभागी होतात. या मालिका स्पर्धांनंतरच आशियायी 14 वर्षाखालील मास्टर्स स्पर्धा होते. मालिका स्पर्धेतील अव्वल आठ मानांकित आशियायी मुले व मुली हे मास्टर्स स्पर्धेसाठी पात्र ठरतात, असे स्पर्धा संचालक पीएमडीटीएचे खजीनदार कौस्तुभ शहा यांनी सांगितले. 
 
 ते पुढे म्हणाले की, गेले 4 वर्ष ही स्पर्धा खेळणारे युवा खेळाडू आता आशियामधील अव्वल मानांकित कुमार खेळाडू झाले आहेत. ते आता आयटीएफ कुमार मालिकांमध्ये सहभागी होत असल्याच बघुन आम्हाला आनंद होत आहे. अर्जुन कढे, अंकिता रैना, नताशा पल्हा, साहिल देशमुख व ऋतुजा भोसले, स्नेहा देवी रेड्डी, स्नेहल माने, मिहिका यादव, परिक्षित सोमानी, सिध्दांत बांठिया, मल्लिका मराठे, गार्गी पवार, ऋतुजा चाफळकर, अर्जुन गोहड यांसारख्या मानांकित खेळाडुंना या स्पर्धेचा मोठा फायदा झाला असून ते आता देशाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.  
 
स्पर्धेत बॅक ड्रॉ असणार आहे. म्हणजेच मुख्य ड्रॉमधील पराभूत खेळाडूला प्लेट सामने खेळावे लागतील व त्यामधील कामगिरीनुसार प्रत्येक खेळाडूला गुण मिळतील. स्पर्धेतील विजेत्याला 300 एटीएफ गुण तर उपविजेत्या खेळाडूस 200 एटीएफ  गुण मिळणार आहेत. स्पर्धेत तिसर्‍या स्थानापासून ते 31व्यास्थानापर्यंतच्या खेळाडूंना गुण मिळणार आहेत. स्पर्धेच्या मुख्य  फेरीला सोमवार, दि.4 जूनपासून सुरूवात होणार असून एकेरीचा अंतिम सामना 9 जून रोजी खेळविण्यात येणार आहे. 
 
 आयटीएफ व्हाईट बॅच रेफ्री वैशाली शेकटकर यांची या स्पर्धेसाठी एटीएफ निरिक्षक म्हणुन निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये अभिषेक ताम्हाणे,  प्रविण झिटे आणि आश्विन गिरमे यांचा समावेश आहे.
 
* गुणतक्ताः आशियायी मालिका 14 वर्षाखालील स्पर्धाः • एकेरीतील सामने व त्यानुसार मिळणारे गुणः 
32 वाः 0 गुण, 31 वाः 1 गुण, 30 वाः 3 गुण, 29 वाः 3 गुण, 28 वाः 4 गुण, 27 वाः 5 गुण, 26 वाः 6 गुण, 25 वाः 7 गुण, 24 वाः 8 गुण, 23 वाः 9 गुण, 22 वाः 10 गुण, 21 वाः 11 गुण, 20 वाः 12 गुण, 19 वाः 13 गुण, 18 वाः 14 गुण, 17 वाः 15 गुण, 16 वाः 17 गुण, 15 वाः 20 गुण, 14 वाः 25 गुण, 13 वाः 30 गुण, 12 वाः 35 गुण, 11 वाः 40 गुण, 10 वाः 45 गुण, 9 वाः 50 गुण, 8 वाः 60 गुण, 7 वाः 70 गुण, 6 वाः 80 गुण, 5 वाः 90 गुण, 4 थाः 120 गुण, 3 राः 150 गुण, 2 राः 200 गुण, 1 लाः 300 गुण. 
 
गतविजेते खेळाडू- 
 2007 : नताशा पल्हा/रोहित बिश्त, 2008:अम्रीता मुखर्जी/अर्जून कढे, 2009 : सी साई संहिता/टी.एस जुडे रेमंड, 2010 :   जास्मिन कैर बजाज/गरवित बत्रा, 2011 :  प्रभुती सिंघानीया/बी.आर निक्षेप, 2012 :  मिहिका यादव/वशिष्ठ चेरूकू, 2013 :   झील देसाई/परिक्षीत सोमानी, 2014 :  साई दिपिया यडूल्ला/पुजन देसाई, 2015 :  मुबाशीरा शेख/विपुल मेहता, 2016 :  गार्गी पवार/अर्यन झवेरी, 2017 :  ऋतुजा चाफळकर/अर्जून गोहड

क़ृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

0

मुंबई-राज्याचे क़ृषीमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे  आज पहाटे साडेचारच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले . त्यांनी मुंबईतील सोमय्या रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ६७ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत.

पांडुरंग फुंडकर यांनी बुधवारी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन तपासणी केली होती. त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज पहाटे चारच्या सुमारास त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी सुरक्षा रक्षकांना रुग्णालयात नेण्यास सांगितले. पण, सोमय्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयात नेत असतानाच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालविली होती.

बुलडाणा, खामगाव परिसरात भाजपला वाढविण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. शेतकऱ्यांशी भाजपला जोडण्याचे काम फुंडकर करत होते. राज्यात शेतकऱ्यांची आंदोलने होत असताना फुंडकर यांनी कुशलतेने  ती हाताळली. सामान्य नागरिकांशी नाळ जोडलेला नेता अशी त्यांची ओळख होती.

भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी नेते म्हणून फुंडकर यांची ओळख होती. भाजपच्या वाटचालीत त्यांचा मोठा वाटा होता.

डाॅ. विश्वजीत कदम यांनी घेतली आमदारकीची शपथ

0

मुंबई –
पलूस कडेगाव मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले काॅंग्रेसचे उमेदवार डाॅ. विश्वजीत पतंगराव कदम यांनी बुधवारी मुंबईत विधिमंडळात आमदारकीची शपध घेतली. काॅंग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते, आमदार आणि कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व. पतंगराव कदम यांची काम करण्याची धडाडी आणि पक्षनिष्ठा यांचा आदर्श ठेवून विधिमंडळाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवून, अशी ग्वाही डाॅ. विश्वजीत कदम यांनी या वेळी दिली.
विधानसभेचे सभापती हरिभाऊ बगाडे यांनी डाॅ. विश्वजीत कदम यांना आमदारकीची शपध दिली. कदम कुटुंबीयांसह मोहनदादा कदम, डाॅ. शिवाजीराव कदम यांच्यासह मतदारसंघातील स्धानिक नेते-कार्यकर्ते या वेळी आवर्जून उपस्थित होते.  काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार प्रदीप रणपिसे, हुसेन दलवाई, प्रणिती शिंदे, हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुनील तटकरे, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आदी या वेळी उपस्थित होते.
विधिमंडळातील  काॅंग्रेसच्या कार्यालयात या वेळी डाॅ.  विश्वजीत कदम यांचा सत्कार करण्यात आला. तरूण धडाडीचे नेतृत्व म्हणून डाॅ.  विश्वजीत नक्कीच उल्लेखनीय कामगिरी करतील, त्यांना राजकारणात उज्ज्वल व दीर्घ पल्ल्याचे भवितव्य असून,  2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत ते विक्रमी मतांनी निवडून येतील,  असा विश्वास व्यक्त करण्यांत  आला.
स्व. पतंगराव कदम यांची काम करण्याची धडाडी आणि पक्षनिष्ठा यांचा आदर्श ठेवून विधिमंडळाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवू, अशी ग्वाही डाॅ. विश्वजीत कदम यांनी या वेळी दिली.
शेतकरी समस्या, युवकांच्या समस्या, महिला-अल्पसंख्याक घटक आदींसाठी मी कायमच झटेन. तसेच, पलूस – कडेगाव आणि सांगली जिल्हा केंद्रस्थानी ठेवून विधिमंडळाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करून विकासाभिमुख काम करेन, असेही डाॅ.  विश्वजीत कदम म्हणाले.

देशसेवा हाच खरा धर्म : राष्ट्रपती कोविंद

0

पुणे – तुम्ही आता युवकांचे आदर्श, देशाचे संरक्षक बनला आहात. सेवा परमो धर्म: हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) ब्रीदवाक्‍य आहे. ते तुमच्या हृदयात कोरून ठेवा व आयुष्यात आणि देशसेवेसाठी त्याचा अवलंब करा, असा सल्ला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी छात्रांना दिला.

‘एनडीए’ चा १३४ वा दीक्षान्त संचलन सोहळा राष्ट्रपती कोविंद यांच्या उपस्थित पार पडला. शिस्तबंध आणि दिमाखदार संचलन तसेच छात्रसैनिकांची मानवंदना स्वीकारल्यानंतर त्यांनी छात्रांना उद्देशून भाषण केले. प्रबोधिनीचे कमांडंट एअर मार्शल आयपी विपिन, डेप्युटी कमांडंट एस. के. ग्रेवाल, प्राचार्य ओमप्रकाश शुक्‍ला, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते.

 

–  एनडीएचा १३४ व्या तुडकीचा शिस्तबद्ध दिमाखदार दीक्षांत सोहळा
तीन वर्षांचे यशस्वीपणे पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण… देशसेवेसाठी सज्ज असणारे तरुण… आणि येणा-या आव्हानाला सामोरे जाण्याचा त्यांच्या चेह-यावर झळकणारा आत्मविश्वास… अशा उत्साही वातावरणात  राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १३४ वा शिस्तबद्ध दीक्षांत सोहळा बुधवारी खेत्रपाल परेड ग्राऊंडवर दिमाखात पार पडला.
यावेळी अकॅडमी कॅडेट अक्षत राज याने सर्व शाखांमध्ये प्रथम येत राष्ट्रपतींच्या सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर छात्रसैनिक सोहेल इस्लाम याने सर्व शाखांमध्ये दुसरा येत रौप्य पदकाचा सन्मान मिळविला. अली अहमद चौधरी याने तिसरे स्थान पटकावत कांस्य पदक मिळविले. ‘किलो’ स्क्वॉड्रनला ‘चीफ आॅफ स्टाफ बॅनर’ पुरस्कार मिळाला. विजेत्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
संचलनात एकुण ३४४ कॅडेट सहभागी झाले होते. यातील २३८ छात्र लष्कराचे, २६ छात्र नौदलाचे आणि ८० छात्र हवाईदलातील होते. याशिवाय अफगाणिस्थान, भूतान , किरगीजस्थान, लाओस, नायजेरिया, मालदिव, तजाकीस्थान येथील १५ छात्रांचाही संचलन सोहळ्यात समावेश होता.

अक्षत राज हा छात्र सर्वोत्तम ठरला. राष्ट्रपतींच्या हस्ते त्याला सुवर्णपदक देण्यात आले. महंमद सोहेल इस्लाम याला रौप्य, तर अली अहमद चौधरी याला कांस्यपदक प्रदान करण्यात आले. ‘के’ ही स्क्वाड्रन सर्वोत्तम ठरली. त्यांना चिफ्स ऑफ स्टाफ बॅनर देण्यात आले.

सकाळी सात वाजता बिगुल वाजवून या सोहळ्यास सुरवात करण्यात आली. सव्वासातच्या सुमारास राष्ट्रपतींचे आगमन झाल्यानंतर चेतक हेलिकॉप्टरने त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर त्यांनी वाहनातून संचलनाची पाहणी केली. नंतर लष्कर आणि हवाईदलाच्या बॅंड वादनाच्या तालावर छात्रांबरोबर सुखोई विमानांनीही राष्ट्रपतींना मानवंदना दिली.

-सुखोई, मिराज विमानांनी दिली मानवंदना
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधितीतून बाहेर पडणा-या छात्रसैनिकांना भारतीय हवाई दलातील सर्वाधिक आधूनिक आणि वेगवान अशा ‘सुखोई ३०’, आणि ‘मिराज’ या विमानांनी थ्री फॉरमेशनमध्ये येत मानवंदना दिली.  यावेळी  उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
-लहाणपणापासून लष्करात येण्याची ईच्छा
माझे वडील हे लष्करातून सुभेदार म्हणून निवृत्त झाले आहे. यामुळे मी लहाणपनापासून लष्करी अधीकारी पाहत होतो. त्यामुळे लष्करात अधिकारी व्हायचे हे स्वप्न होते. सैनिक स्कूलमध्ये शिक्षण झाल्यामुळे मी ही परीक्षा  पास होऊ शकलो. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनितील तीन वर्षांचे प्रशिक्षण खूप खडतर होते. यामुळे शारिरिक मानसिकरित्या आम्ही सक्षम झालो. मी माझ्या आई वडिलांचे आणि भावाचे खुप आभार मानतो. त्यांच्या पाठींब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळे मी हे तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करू शकलो, अशी भावना आसाम येथील मुळ असलेला कांस्य पदक विजेता अली अहमद चौधरी याने व्यक्त केले.
-वडिलांचे स्वप्न केले पूर्ण
लहाणपणी इंजिनिअर व्हायचे होते. पण वडील लष्करात  होते. मी सुद्धा लष्करात अधिकारी होवून त्यांची ईच्छा पूर्ण करावी अशी त्यांची ईच्छा होती. यामुळे मी सुद्धा लष्करात दाखल होण्याचा निर्णय घेतला. एनडीएमध्ये येण्यासाठी मला त्यांचे मार्गदर्शन मिळाले.  आई वडीलांचे प्रोत्साहान, एनडीएतील ड्रील प्रशिक्षक तसेच वर्गातील उत्साद यांच्या मार्गदर्शनामुळे मी माझे येथील तीन वर्ष यशस्वी पणे पुर्ण करू शकलो.  आजच्या संचलन सोहळळ्याचे नेतृत्व करतांना खूप आनंद होत आहे. माझ्या आयुष्यातील हा महत्वाचा क्षण आहे. मी आर्मी कॅडेड असल्याने इंडीयन मिलीटरी अ‍ॅकडमीत जाणार असून त्यानंतर पायदळात दाखल होणार आहे, अशी भावना आसाम येथील मुळचा तसेच आजच्या संचलन सोहळ्याचे नेतृत्व करणारा रौप्य पदक विजेता सोहेल इस्लाम याने व्यक्त केली.
– राष्ट्रपदी सुवर्ण पदकाचा मानकरी ठरल्याने समाधानी
राष्ट्रपती सुवर्ण पदकाचा मानकरी ठरल्याने आज मला खूप समाधान मिळाले आहे. हे मी माझ्या आईवडीलांमुळे शक्य करू शकलो. त्यांनी मला या प्रतिष्ठीत संस्थेत येण्यास परवानगी दिली आणि मला नेहमी प्रोत्साहित केले. या ठिकाणी आल्यावर येथील प्रशिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे हे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. तीन वर्षात ऐकी, शिस्त आणि टीम स्पीरीट शिकलो. आर्मी कॅडेट असल्यामुळे भारतील लष्करात दाखल व्हायचे आहे, अशी भावना बिहार येथील चंपारण्य येथीलमुळ अससलेला तसेच राष्ट्रपती सुवर्ण पदकाचा मानकरी कॅडेट अक्षत राज यांनी व्यक्त केली.

 

चाटे शिक्षण समूहाच्या विद्यार्थ्यांचे १२ वीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश

पुणे-राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षाचा  इयत्ता 12 वी परीक्षेच्या च्या  निकालात आज चाटे शिक्षण समूहाच्या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले असून चाटे शिक्षण समुहाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा  विराजमान झाला आहे.चाटे ज्यु. काॅलेज सायन्स (Resi./Daycare) गाऊडदरा सातारा रोड पुणे चा १२ वी २०१८ बोर्ड परिक्षेमध्ये १००% निकाल लागला .
अमेय झरकर याला 95.38 % गुण मिळवले आहेत.  तर रिद्धी ताकवले 94.46%, मेघना चाटे 93.08 %, अनामिका दीक्षित 91.23 %, दक्ष शेट्टी 91.08 %, अथर्व चासकर 91.08 % सिद्धार्थ मिश्रा 90.92 %, गपत सुदर्शन 90.77 %, वैष्णवी काळे 90.15 % आकांक्षा मोरे 90.15 % यांनी अशा प्रकारे यश सपादन केले आहे,
तर बी एच चाटे स्कुल मध्ये एकूण 477 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, यातून 90 टक्क्यांच्या वर 8 विद्यार्थी, 80 ते 90 % 237 विद्यार्थी व 76 ते 80 टक्के गुण असलेले विद्यार्थी 181 विद्यार्थ्यांनी गुण संपादन करून चाटे शिक्षण समूहाने शैक्षणिक क्षेत्रातील दबदबा कायम ठेवला आहे, 
सण 2017-18 या वर्षीच्या दहावी- सी बी एस सी बोर्ड परीक्षेत देखील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवले आहे, त्यामध्ये सुशेंन वनमाने 97 % , शिंदे मानसी 96%,आदीश्री पाटील 95.80 वनशीता बागल 95 % गुण मिळाले आहेत. व इतर विद्यार्थ्यांनी देखील उत्तुंग यश संपादन केले आहे.
याबाबत चाटे शिक्षण संस्थेचे पुणे संचालक प्रा.फुलचंद चाटे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पालकांना धन्यवाद दिले त्याचबरोबर विद्यार्थ्यानी करीयर ध्येय समोर ठेऊन अभ्यास केल्यास नक्कीच कोणत्याही परीक्षेत यश मिळत असते. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करून देशातील विद्यार्थ्यां सोबत आपले स्थान अबाधित राखले आहे.

पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स रद्द करण्याचा केरळ सरकारचा निर्णय

0

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेला केरळ सरकारने दिलासा दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलवर राज्य सरकारकडून आकारण्यात आलेला टॅक्स न घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे केरळमध्ये आता पेट्रोल आणि डिझेलचे दर 1 रुपयांचे कमी होणार आहेत.

केरळच्या मलयाला मनोरमाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले की, कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलवरील टॅक्स हटविण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर उद्यापासून लागू करण्यात येणार आहेत.

केरळमध्ये सध्या पेट्रोलवर 32.02 टक्के टॅक्स आकारण्यात येतो, तर डिझेलवर 25.58 टक्के टॅक्स लावला जातो. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलवर 1 टक्का सेस सुद्धा आकारण्यात येतो. गेल्या वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात आलेल्या टॅक्सपासून राज्य सरकारला 7795 कोटी रुपयांचे महसूल मिळाले आहे.

बारावीचा निकाल ८८. ४१ टक्के

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. गेल्या फेब्रुवारी-मार्चमध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातून १४ लाख ४५ हजार १३२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यामध्ये कला शाखेच्या ४ लाख ८९ हजार, विज्ञान शाखेच्या ५ लाख ८० हजार तर वाणिज्य शाखेच्या ३ लाख ६६ हजार विद्यार्थ्यांचा समावेश होता, अशी माहिती राज्य मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली .

राज्यात कोकण विभागाचा निकाल ९४.८५ टक्के एवढा सर्वाधिक लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी ८६.१३ टक्के लागला आहे. या निकालात देखील मुलींनी बाजी मारली असून उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचे प्रमाण ९२.३६ टक्के आहे. तर, मुलांचे ८५.२३ एवढे टक्के आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल १ वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येणार आहे. कोकण विभागाचा एकूण निकाल राज्यात सर्वाधिक असला तरी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांच प्रमाण कोकण विभागात सर्वात कमी आहे.

राज्याचा बारावीचा निकाल एका टक्क्य़ाने कमी झाला असताना त्याचा परिणाम पुणे विभागावरही झाला. पुणे विभागाचा निकाल ८९.५८ टक्के लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात जवळपास दोन टक्क्य़ांनी घसरण झाली आहे. राज्यात यंदाही पुणे विभागाला तिसरे स्थान मिळाले. यंदा निकालात घट झाली असली, तरी प्रथम वर्षांच्या प्रवेश प्रक्रियेची स्थिती मागील वर्षांप्रमाणेच राहण्याची शक्यता आहे.

श्रेणी/ गुणसुधार विद्यार्थ्यांना श्रेणी/ गुणसुधार योजनेंतर्गत परीक्षेला पुन्हा बसण्याची संधी देण्यात आली आहे. जुलै-आॅगस्टमध्ये पुरवणी परीक्षा व फेब्रुवारी-मार्च २०१९ ची परीक्षा अशा दोन संधी मिळतील. अनुत्तीर्ण व श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्यांसाठीही जुलै-आॅगस्टमध्ये पुरवणी परीक्षा होईल. निकालानंतर दुस-या दिवसापासून गुणपडताळणी व छायाप्रतींसाठी अर्ज करता येणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठी ३१ मे ते ९ जून या काळात तर छायांकित प्रतीसाठी ३१ मे ते १९ जूनपर्यंत अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेच्या प्रती मिळाल्यानंतर ५ दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावे लागतील.

सकाळी 11 वाजता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येतील. बोर्डाने विविध संकेतस्थळावर निकाल पाहण्याची सोय केली आहे.

कुठे पाहाल निकाल?
http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. या निकालाकडे राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट :

1. www.mahresult.nic.in
2. www.result.mkcl.org
3. www.maharashtraeducation.com
4. www.rediff.com/exams
5. http://maharashtra12.jagranjosh.com 

कसा पाहाल निकाल?

बारावीचा निकाल पाहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.

समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.

९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत राज्यासह पुणे विभागातील निकाल घटला असला, तरी गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या अभ्याक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये चुरस निर्माण होणार असल्याचे चित्र आहे.

यंदा राज्यभरात ५ हजार ४८६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवले. ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्यावर्षी ३ हजार ८१९ होती. केवळ पुणे विभागात यंदा ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७९० आहे. गेल्या वर्षी ही संख्या ४४४ होती. ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे वाढते प्रमाण हा गेल्या दोन वर्षांतील नवा पैलू असल्याचे दिसून येत आहे. राज्य मंडळाच्या परीक्षेसह सीबीएसई आणि आयसीएसई परीक्षेतही ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून आले होते. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेतील गुणांवर अवलंबून नसतात. मात्र, ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी व्यवस्थापन, वित्त, संगणक विज्ञान अशा अभ्यासक्रमांना प्राधान्य देतात. या पाश्र्वभूमीवर, हे अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या आणि विद्यार्थ्यांची पसंती असलेल्या महाविद्यालयांतील ‘कट ऑफ’ वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

नालेसफाईचा आढावा स्थायी समितीने टाळला?

पुणे – पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असताना अद्यापही नालेसफाईची कामे पूर्ण झाली नसून, स्थायी समितीनेही मंगळवारच्या बैठकीत त्याचा आढावा घेतला नाही.

शहरात पाणी तुंबण्याचे, नाल्यातील पाणी रस्त्यावर, घरांत शिरण्याचे प्रकार दरवर्षीच अतिक्रमणांमुळेच हे प्रकार घडतात. असे असतानाही स्थायी समितीने नालेसफाईच्या कामाचा आढावाच घेतला नाही. मागील महिन्यात नालेसफाईच्या कामांची बैठक घेतली. त्यावेळी 50 टक्केच कामे झाल्याचे दिसून आले होते. मात्र महापौरांनी आदेश दिल्यानंतर किती काम झाले, सद्यस्थिती काय याची माहिती घेणे अपेक्षित होते. मात्र राष्ट्रपतींच्या कार्यक्रमानिमित्त सर्व अधिकारी कार्यक्रमाच्या आयोजनात व्यग्र असल्याने कामाचा आढावा घेऊ शकलो नाही, असे उत्तर स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिले.