देशातील सर्वात लहान मानांकन प्राप्त बुद्धिबळपटू सार्थक
पुणे -येथे झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत पाच वर्षीय सार्थक यशोधन देशपांडे याने 1-जून-2018रोजी देशातील सध्याचा सर्वात लहान मानांकन प्राप्त बुद्धिबळपटू होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. सार्थकचे फीडे रेटींग 1064 आहे. तो कुंटे चेस अॅकेडेमी मध्ये प्रशिक्षण घेत असून या यशा मध्ये मृणालिनी कुंटे यांचा मोठा सहभाग आहे
वयाच्या दुसर्या वर्षी सार्थकजगाच्या नकाशावर 110 देश व त्यांचे झेंडे ओळखत असे “मुलाचे पाय पाळण्यात दिसतात “या उक्तीप्रमाणे ओळखून त्याच्या पालकांनी वयाच्या चौथ्या वर्षी बुद्धीबळ खेळाची ओळख करून दिली.
कॅनडा मध्ये असतांना वॉटरलूमधील क्षेत्रिय शालेय स्पर्धेत ज्युनियर केजीतील सार्थकने इयत्ता पहिली विभागात सहभाग घेत दुसरा क्रमांक पटकावला होता. वयाच्या चौथ्या वर्षी ओंटॅरीयो राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेत किंडर गार्टन मध्ये प्रथम स्थानासाठी बरोबरी साधली होती.
भारतात परत आल्यावर त्याने गेल्या सहा महिन्यात पुणे मुंबई सातारा येथे विविध स्पर्धेत सहभागी होऊन बर्याच ट्रॉफी, मेडल्स पटकावले आहेत. तो पुण्यातील श्री श्री रविशंकर बालमंदिर शाळेचा विद्यार्थी असून त्याला वेळोवेळी शाळेने उत्तम सहकार्य केलेले आहे.
नाव: सार्थक यशोधन देशपांडे
जन्म तारीख: 25-06-2012
Fide id : 25963694
FIDE Rating : 1064
स्थान: पुणे
वडील : यशोधन देशपांडे
आई :दीपा देशपांडे