पुणे-
पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये फक्त १ पैश्याची दर कपात केल्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा
काँग्रेस कमिटतर्फे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली अलका टॉकिज चौक येथे निदर्शने करण्यात
आली. दि. १४ मे पासून सलग १६ दिवस पेट्रोल – डिझेलचे दर वाढत आहेत. काल पेट्रोल – डिझेलच्या
दरामध्ये ६० पैश्यांची कपात झाली असे सकाळी सांगण्यात आले. परंतु ही मानवी चूक आहे असे सांगून
तासाभरातच सरकारी तेल कंपन्यांनी जाहिर केला की फक्त १ पैश्यांनी दर कमी करण्यात आले आहेत.
आपल्या भाषणात शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, ‘‘पेट्रोल – डिझेल दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे
भाव वाढलेले आहे. सामान्य नागरिकाला जगणे मुश्किल झाले आहे. जनतेच्या हिताचा विचार न करता
या मोदी सरकारने इंधन दरवाढीमध्ये १ पैसा कपात करून लोकशाही व जनतेची थट्टा केली आहे. मोदी
सरकारने लोकांना अच्छे दिन येणार असे आश्वासन दिले होते पण ते केवळ स्वप्नच राहिले. जनता
संतापलेली आहे आणि त्यांचा आक्रोश ते येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय
जनता पक्षाला दाखवून देतील.’’
यानंतर सौ. कमल व्यवहारे व गोपाळ तिवारी यांचीही भाषणे झाली.
या आंदोलनात माजी आमदार मोहन जोशी, दिप्ती चवधरी, ॲड.अभय छाजेड, सदानंद शेट्टी,
दत्तात्रय गायकवाड, अजित दरेकर, अविनाश बागवे, संगीता तिवारी, बाळासाहेब दाभेकर, सुनिल शिंदे, रवि
पाटोळे, सोनाली मारणे, राजेंद्र शिरसाट, शिवराज भोकरे, विजय खळदकर, हरजीतसिंग बेदी, निलेश
बोराटे, विश्वास दिघे, अनुसया गायकवाड, शेखर कपोते, राजेंद्र भुतडा, जयकुमार ठोंबरे, मीरा शिंदे, विक्रम
खन्ना, दिपक ओव्हाळ, बाळासाहेब अमराळे, द.स.पोळेकर, नारायण पाटोळे, दिलीप ढवळे, राजू साठे,
राहुल तायडे, विनय ढेरे, राजेंद्र पेशने, भारती कोंडे, रजिया बल्लारी आदीसह असंख्य कार्यकर्ते सहभागी
झाले होते.