पुणे- पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे एमएसएलटीए केपीआयटी अरूण वाकणकर यांच्या स्मरणार्थ अरूण वाकणकर मेमोरियल एटीएफ आशिया 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस येथे 2 ते 9 जून 2018 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेचे हे सलग बारावे वर्ष असून याविषयी अधिक माहिती देताना एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, एटीएफ आशिया 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धा भारताव्यतिरिक्त थायलंड, कतार, चीन, कझाकस्तान, लेब्नन, मलेशिया, कोरिया, इराण, इंडोनेशिया, श्रीलंका आणि बांग्लादेश या देशांतही यावर्षी आयोजित करण्यात येणार आहे.
एटीएफ आशिया 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धा या अशियायी टेनिस फेडरेशन यांनी आयोजित केलेल्या आशियायी कुमार मालिका स्पर्धांचा एक भाग आहे. ज्यामध्ये आशियातील सर्व खेळाडु सहभागी होतात. या मालिका स्पर्धांनंतरच आशियायी 14 वर्षाखालील मास्टर्स स्पर्धा होते. मालिका स्पर्धेतील अव्वल आठ मानांकित आशियायी मुले व मुली हे मास्टर्स स्पर्धेसाठी पात्र ठरतात, असे स्पर्धा संचालक पीएमडीटीएचे खजीनदार कौस्तुभ शहा यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, गेले 4 वर्ष ही स्पर्धा खेळणारे युवा खेळाडू आता आशियामधील अव्वल मानांकित कुमार खेळाडू झाले आहेत. ते आता आयटीएफ कुमार मालिकांमध्ये सहभागी होत असल्याच बघुन आम्हाला आनंद होत आहे. अर्जुन कढे, अंकिता रैना, नताशा पल्हा, साहिल देशमुख व ऋतुजा भोसले, स्नेहा देवी रेड्डी, स्नेहल माने, मिहिका यादव, परिक्षित सोमानी, सिध्दांत बांठिया, मल्लिका मराठे, गार्गी पवार, ऋतुजा चाफळकर, अर्जुन गोहड यांसारख्या मानांकित खेळाडुंना या स्पर्धेचा मोठा फायदा झाला असून ते आता देशाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.
स्पर्धेत बॅक ड्रॉ असणार आहे. म्हणजेच मुख्य ड्रॉमधील पराभूत खेळाडूला प्लेट सामने खेळावे लागतील व त्यामधील कामगिरीनुसार प्रत्येक खेळाडूला गुण मिळतील. स्पर्धेतील विजेत्याला 300 एटीएफ गुण तर उपविजेत्या खेळाडूस 200 एटीएफ गुण मिळणार आहेत. स्पर्धेत तिसर्या स्थानापासून ते 31व्यास्थानापर्यंतच्या खेळाडूंना गुण मिळणार आहेत. स्पर्धेच्या मुख्य फेरीला सोमवार, दि.4 जूनपासून सुरूवात होणार असून एकेरीचा अंतिम सामना 9 जून रोजी खेळविण्यात येणार आहे.
आयटीएफ व्हाईट बॅच रेफ्री वैशाली शेकटकर यांची या स्पर्धेसाठी एटीएफ निरिक्षक म्हणुन निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये अभिषेक ताम्हाणे, प्रविण झिटे आणि आश्विन गिरमे यांचा समावेश आहे.
* गुणतक्ताः आशियायी मालिका 14 वर्षाखालील स्पर्धाः • एकेरीतील सामने व त्यानुसार मिळणारे गुणः
32 वाः 0 गुण, 31 वाः 1 गुण, 30 वाः 3 गुण, 29 वाः 3 गुण, 28 वाः 4 गुण, 27 वाः 5 गुण, 26 वाः 6 गुण, 25 वाः 7 गुण, 24 वाः 8 गुण, 23 वाः 9 गुण, 22 वाः 10 गुण, 21 वाः 11 गुण, 20 वाः 12 गुण, 19 वाः 13 गुण, 18 वाः 14 गुण, 17 वाः 15 गुण, 16 वाः 17 गुण, 15 वाः 20 गुण, 14 वाः 25 गुण, 13 वाः 30 गुण, 12 वाः 35 गुण, 11 वाः 40 गुण, 10 वाः 45 गुण, 9 वाः 50 गुण, 8 वाः 60 गुण, 7 वाः 70 गुण, 6 वाः 80 गुण, 5 वाः 90 गुण, 4 थाः 120 गुण, 3 राः 150 गुण, 2 राः 200 गुण, 1 लाः 300 गुण.
गतविजेते खेळाडू-
2007 : नताशा पल्हा/रोहित बिश्त, 2008:अम्रीता मुखर्जी/अर्जून कढे, 2009 : सी साई संहिता/टी.एस जुडे रेमंड, 2010 : जास्मिन कैर बजाज/गरवित बत्रा, 2011 : प्रभुती सिंघानीया/बी.आर निक्षेप, 2012 : मिहिका यादव/वशिष्ठ चेरूकू, 2013 : झील देसाई/परिक्षीत सोमानी, 2014 : साई दिपिया यडूल्ला/पुजन देसाई, 2015 : मुबाशीरा शेख/विपुल मेहता, 2016 : गार्गी पवार/अर्यन झवेरी, 2017 : ऋतुजा चाफळकर/अर्जून गोहड