Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

KP हीट अँण्ड रन..तो आमदार कोण ? हे जाहीर करा..

Date:

The speed of Porsche car in Kalyaninagar accident can be estimated from this video. The youth who turned alive in 17 seconds turned into a ‘dead body’ in the next five seconds…


KP हीट अँण्ड रन प्रकरणात कालच आरोपी अल्पवयीन मुलाच्या पालकावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली गेली पाहीजे होती. या मुलाला पब मध्ये प्रवेश देऊन दारू देणाऱ्या पब चालकावर कारवाई देखील व्हायला हवी होती आणि रस्त्यावर विनानंबरची पावणेदोन कोटी ची गाडी पाठविणाऱ्या डीलर वर देखील कालच तातडीने कारवाई व्हायला हवी होती .पण माध्यमांनी ओरड केल्यावर ,आणि जागृत नागरिक रस्त्यावर आल्यावर पोलीस जागे झाले आणि त्यांना राजकीय दबाव झुगारून द्यावा लागल्याचे चित्र आज निर्माण झाल्यावर अनेक राजकीय पुढाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना भेटण्याची आणि निवेदने देण्याची स्पर्धा सुरु केली . …असा एखादा अपघात झाला कि सारेच जागे होतात आणि पत्रके निघू लागतात .. आणि मागण्यांचा पाउस पडतो , संस्कृती सर्वांना आठवू लागते आणि त्यात आरोपी चा बाप तर बडा बिल्डर म्हटल्यावर काय …? हे सर्व होऊ नये असे कोणाचे मत नाही , हे व्हायलाच हवे पण हे मनापासून जर करायचे असेल तर, तेवढे छातीठोक पणे सांगावे.. आणि… सर्वच पब , बार १२ च्या आत बंद करा यासाठी आज पर्यंत सातत्याने का लढला नाहीत ? याचे उत्तर द्यावे . लढला असता तर… कदाचित हे २ जीव वाचले नसते ? आणि या प्रकरणातील बिल्डरवर कारवाई होऊ नये त्याच्या मुलाची सुटका व्हावी म्हणून याच राजकीय गोतावळ्यातला एक आमदार पोलिसांच्यावर दबाव आणीत होता , हे सर्वांना ठाऊक आहे, एक दोघा पत्रकारांनी त्याचे नाव बिनदिक्कत पणे पुढे आणलेही आहे . पण मग तरीही पोलीस आयुक्तांची या आमदाराचे नाव सांगायला का हिंमत होऊ नये ? बरे आयुक्त हे सरकारी कर्मचारी ..सोडा त्यांचे … बाकीचे होते ना सर्व पक्षीय प्रतिनिधी .. त्यांनी का या आमदाराचे नाव जाहीर करुन 2तरुण जीवांचा बळी घेतलेल्या आरोपीसाठी पोलिसांवर दबाव आणण्याचे, घृणास्पद कृत्य केलेल्या आमदाराचा मुखवटा ओरबाडला नाही? तो त्यांनी ओरबाडायलाच हवा होता .. आणि नाही ओरबाडला म्हणूनच.. यांची सर्वांची निवेदनघाई हि तात्पुरत्या मलमपट्टी च्या किंवा राजकीय शो पलीकडील भासणार नाही

या प्रकरणात एकीकडे होती ती पोलिसांची हतबलता, राजकीय प्रतिनिधीचा दबाव, घटनेनंतर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीला वाचवण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न, वरीष्ठ स्तरावर केलेले फोन काँल्स , केस weak करण्यासाठी झालेला खटाटोप आणि दुसरीकडे मात्र पोटच्या मुलांचे मृतदेह घेऊन जाणाऱ्या आईवडिलांचा आक्रोश… या प्रकरणात सहआरोपी कुटुंबीयांना वाचवण्यासाठी रात्री 3 वाजता पोलीस ठाण्यात बसलेले आमदार, वरीष्ठ पोलीस अधिकारी, अल्पवयीन मुलांना दारू विक्री करणारे Pubs, restaurants, आणि सत्तेत बसलेले राजकीय नेते यांनी नेमके काय केले असावे हे कोणाला कोणी सांगण्याची गरज भासणार नाही त्यामुळे तर आरोपीची Alcohol test Negative आली नाही ? मग cosie हाँटेलमध्ये टेबल नं- 15 वर आरोपी आणि त्याच्या मित्रांनी भरमसाठ दारू कोणासाठी आँर्डर केली होती? Hotel Marriott suits च्या सागर चोरडिया यांच्या विरुद्ध अल्पवयीन मुलांना दारु विक्री केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली, cosie hotel चे प्रल्हाद भुतडा यांच्या विरोधात देखील याच कारणासाठी गुन्हा दाखल करण्यात आला, मग आरोपी ची टेस्ट negative कशी येते ? कोणत्या स्तरापर्यंत असली जीवघेणी देखील प्रकरणे मँनेज करण्यात येतात याबाबत सर्वसामान्य माणसाने या घटनेपासून बरेच काही जाणून घेतले असेल तर नवल नाही , कारण या प्रकरणात पोलिसांनी घेतलेली सावध भूमिका, राजकीय दबाव, आणि system failure हे.सगळंच पुणेकरांनी जवळून बघीतलं आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तुकडेबंदी कायदा रद्द अधिसूचना जारी … बावनकुळे

मुंबई- सरकारने याच अधिवेशनात केलेल्या घोषणेप्रमाणे तुक्देबंदी कायदा रद्द...

मीरा-भाईंदर शहरातील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटचा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १६ : मेट्रो लाईन समवेत असणारे काशिगाव मेट्रो...

आम आदमी पार्टी जिल्ह्यात सर्व स्थानिक निवडणुका लढवणार

पुणे-राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गण,...