पुणे – पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असताना अद्यापही नालेसफाईची कामे पूर्ण झाली नसून, स्थायी समितीनेही मंगळवारच्या बैठकीत त्याचा आढावा घेतला नाही.
शहरात पाणी तुंबण्याचे, नाल्यातील पाणी रस्त्यावर, घरांत शिरण्याचे प्रकार दरवर्षीच अतिक्रमणांमुळेच हे प्रकार घडतात. असे असतानाही स्थायी समितीने नालेसफाईच्या कामाचा आढावाच घेतला नाही. मागील महिन्यात नालेसफाईच्या कामांची बैठक घेतली. त्यावेळी 50 टक्केच कामे झाल्याचे दिसून आले होते. मात्र महापौरांनी आदेश दिल्यानंतर किती काम झाले, सद्यस्थिती काय याची माहिती घेणे अपेक्षित होते. मात्र राष्ट्रपतींच्या कार्यक्रमानिमित्त सर्व अधिकारी कार्यक्रमाच्या आयोजनात व्यग्र असल्याने कामाचा आढावा घेऊ शकलो नाही, असे उत्तर स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिले.