राज्याचे कर्ज ४ पटीने वाढवून जीडीपी कसा फुगवला? काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारींचा मुख्यमंत्री फडणवीसांना प्रश्न

Date:

महायुती सरकारने हिंमत असेल तर ‘श्वेतपत्रिका’ काढावी काँग्रेसची मागणी

मुंबई दि २५ मे २६-
राज्याचे जबाबदार अर्थमंत्री व मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज ‘राणा भिमदेवी थाटात’ राज्याच्या व देशाच्या ओढून ताणून फुगवलेल्या जीडीपी व अर्थव्यवस्थे विषयी तथ्यहीन व बेलगाम वल्गना केल्याची प्रखर टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, देशावरील आर्थिक संकट, भाषणजीवी पंतप्रधानांनी स्वतःच्या कृतीने ओढवून घेतलेले ‘ईराण-रशिया’चे तणावग्रस्त संबंध, त्यामुळे भारताची होणारी आर्थिक कोंडी, तेल व गॅस’चे संकट व वाढती महागाई यावरून लक्ष हटवण्यासाठी देश वासीयांना “सब कुछ चंगा – सर्व काही आलबेल” असल्याचे दाखवण्याचा आटापिटा भाजप’नेते करत असून, त्याचाच एक भाग म्हणून ‘तथ्यहीन व आभासात्मक अर्थव्यवस्थे’चे भ्रामक चित्र, भाजप’चे बोलघेवडे मुख्यमंत्री करत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, जर खरोखरच ‘दावोस व तत्संबधित परकीय गुंतवणूकीचे’ करारात्मक प्रकल्प राज्यात आले असतील तर त्या बाबत, काँग्रेस ने वारंवार मागणी करूनही ‘महायुती सरकार’ श्वेतपत्रिका का काढत नाही ?असा सवाल ही केला. काँग्रेस ने म्हटले आहे की, एकीकडे २०१४ तुलनेत देश व राज्यावर ४ पटीने कर्ज वाढले आहे, मात्र त्याकडे सरकार सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. भाषणजीवी मुख्यमंत्री यांनी ‘राज्याच्या क्रांतीकारक आर्थिक प्रगतीची व भरघोस परकीय गुंतवणूकीची माहिती “पत्रकारपरीषदा” घेऊन जाहीरपणे सांगितल्या पाहिजेत, तसे करण्यास भाजप नेते का धजावत नाहीत? असा परखड सवाल ही गोपाळदादा यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, आयएमएफ (International Monetary Fund) मधील भारताचे माजी कार्य. संचालक आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे माजी सदस्य, आर्थिक आयोगाचे माजी अध्यक्ष असलेल्या श्री सुरजीत भल्ला यांनी नुकताच
देशाच्या अर्थ व्यवस्थेची पोलखोल करणारा लेख,
इंग्रजी वृत्त माध्यमातुन नुकताच प्रसिद्ध केला असून, त्यावर प्रतिवाद करणारी एक ही प्रतिक्रिया भाजप’च्या सत्ताधाऱ्यांकडून आजतागायत आलेली नाही.
किंबहुना ‘भाजपच्या राजवटीत आर्थिक सुधारणा मंदावल्याचा’ सुरजित भल्ला यांचा इशारा व त्यांनी (इंडिया टुडे) टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत भारताच्या आर्थिक वाटचालीवर केलेली टीका भारताची भ्रामक आर्थिक-स्थिती पोलखोल करणारी असल्याचे ही काँग्रेस चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.
मोदी काळातील, निती आयोगाचे माजी उपाध्यक्ष श्री अरविंद पनगारीया व आर्थिक आयोगाचे माजी अध्यक्ष सुरजीत भल्ला यांनी भारताच्या ‘सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था’ असल्याच्या दाव्यावर असहमती व्यक्त करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले(?) हे कशाचे द्योतक असल्याचा प्रतिप्रश्न ही तिवारी यांनी उपस्थित केला.
फडणवीसांचा दावा धादांत खोटा व वस्तुतः चुकीचा असल्याचे सांगत त्यांनी नमूद केले की, अमेरिकन डॉलरमधील दरडोई जीडीपी वाढीच्या बाबतीत भारत बांगलादेश आणि इथिओपियासारख्या देशांच्या ही मागे आहे ही शोकांतिका असल्याची टीका ही काँग्रेस प्रवक्त्यांनी केली.

अर्थ तज्ञांच्या मते सुद्धा ९ व्या स्थानावर असलेली भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) ५ व्या क्रमांकावर असल्याचा दावा भाजप नेते कशाच्या आधारावर करतात.. त्यांचे निष्कर्ष चुकीचे असल्याचे मोदी काळात असलेले त्यांचेच आर्थिक सल्लागार सांगतात तरीही भाजप नेते आपल्या खोटेपणाचा हेका सोडत नाहीत वा त्या विषयी ‘पत्रकार परिषदेत’ तथ्यांच्या आधारे आपले म्हणणे सिद्ध करत ही नाहीत.. हे मुर्खांच्या नंदनवनात एकतर्फी वल्गना करण्या सारखे असल्याची कडवट टिका काँग्रेस प्रवक्त्यांनी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्यापारी एकतेचा उत्सव : व्यापार भूषणसह विविध मानाचे पुरस्कार जाहीर

व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन ; माजी...

ईदच्या सुट्टीतील बदलामुळे 28 मे रोजीच्या नियोजित पारपत्र मुलाखती आता 27 मे रोजी होणार

पुणे, 25 मे 2026 सरकारने जारी केलेल्या सुधारित सुट्टीसंदर्भातील अधिसूचनेनुसार,...

समाज जीवनातील वास्तव पुस्तक रूपात शब्दबद्द करण्याची गरज : फ.मु.शिंदे

राज्यस्तरीय दोन दिवसीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न  केडगाव,ता.२५...