आषाढी वारीत “महिला उन्नती वारी” उपक्रमाद्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश

Date:

महिला आयोगाच्या विशेष उपक्रमाचा उरुळीकांचन येथून शुभारंभ

मुंबई, दि. ११ जुलै २०२६ : महिला व बालविकास विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने आषाढी वारी काळात “महिला उन्नती वारी” हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ रविवार, १२ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता पालखी तळ, उरुळीकांचन, पुणे येथे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे.

आषाढी वारीमध्ये राज्यभरातून लाखो वारकरी सहभागी होत असतात. या मोठ्या लोकसहभागाच्या सोहळ्यादरम्यान महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसेच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने “महिला उन्नती वारी” हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे.

या उपक्रमांतर्गत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावर डिजिटल चित्ररथांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच महिला व बालकांसाठी असलेल्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, महिलांसाठी उपलब्ध विविध हेल्पलाईन्स तसेच महिलांशी संबंधित विविध कायद्यांची माहिती व प्रचार-प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी लोककला सादरीकरणाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, स्त्री सुरक्षा, सामाजिक प्रश्न तसेच शासनाच्या विविध योजनांवर आधारित प्रबोधनपर कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. या माध्यमातून महिला आयोगाच्या विविध उपक्रमांची तसेच महिलांसाठी उपलब्ध शासकीय सेवांची माहिती लाखो वारकरी आणि नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

आध्यात्मिक परंपरा आणि सामाजिक उत्तरदायित्व यांची सांगड घालणारा “महिला उन्नती वारी” हा उपक्रम महिलांचे सक्षमीकरण, सुरक्षितता, हक्कांविषयी जागरूकता आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या उपक्रमामध्ये अधिकाधिक वारकरी आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

श्यामाप्रसाद मुखर्जींबद्दल नगरसेवकांनी दहा मिनिटे बोलावे; बालवडकरांच्या उपसूचनेवर सभागृहात गदारोळ

तैलचित्र लावण्याच्या भाजपच्या प्रस्तावावर राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर यांची उपसूचना;...

‘भूमी ग्रीन’च्या ५७७ कोटींच्या कचरा प्रकल्पाला अखेर मंजुरी

विरोधकांचे आक्षेप फेटाळले; तिन्ही उपसूचना १०९ विरुद्ध ३६ मतांनी...

दुचाकीचे ३, चारचाकीचे १४; वसुली मात्र १०० ते २०० रुपये! पार्किंग दरावरून महापालिकेत रणकंदन

महात्मा फुले मंडईतील वाहनतळाच्या प्रस्तावावर नगरसेवक आक्रमक; ठेकेदारांविरोधातील तक्रारींची...

निधी वाटपाच्या वैधानिकतेवर प्रश्नचिन्ह; अमोल बालवडकर आक्रमक

‘स’ यादीतील हजारो कोटींचे वाटप कोणत्या कायद्यानुसार? सर्वसाधारण सभेत...