शहरातील निवासी व व्हिजिटर यांना भाड्याने देण्यासाठी महिंद्रा e2oPlus ची सुविधा
- मैसुरु, हैदराबाद, जयपूर व नवी दिल्ली येथे अशाच प्रकारे सहयोग केल्यानंतर मुंबईमध्ये केला विस्तार
मुंबई : 19 अब्ज डॉलर उलाढालीच्या महिंद्रा समूहाचा भाग असलेली महिंद्रा इलेक्ट्रिक आणि शेअर्ड मोबिलिटी सुविधा देणारी भारतातील आघाडीची झूमकार यांनी शेअर्ड मोबिलिटी सोल्यूशन म्हणून ईव्ही देण्याच्या विशेष सेवेमध्ये करून देशातील एका सर्वात महत्त्वाच्या व्यवसाय केंद्रामध्ये ही सेवा उपलब्ध केल्याचे आज जाहीर केले आहे. यानुसार, कंपनी महाराष्ट्रात e2oPlus या महिंद्राच्या पूर्णतः इलेक्ट्रिक 50 सिटी स्मार्ट कार झूमकारवर उपलब्ध करणार आहे व आगामी तिमाहीत ही संख्या 100 ईव्हींपर्यंत वाढवली जाणार आहे.
मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वाहनांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
सरकारच्या 2030 व्हिजनविषयी निती आयोगाने आपल्या अहवालात नमूद केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने कनेक्टेड, शेअर्ड व इलेक्ट्रिक मोबिलिटी हे मॉडेल म्हणून लोकप्रिय करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. मुंबई हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे केंद्र असून, महत्त्वाचे बिझनेस केंद्र आहे व त्यामुळेच या उपक्रमासाठी योग्य ठिकाण आहे. महाराष्ट्राच्या ईव्ही धोरणाच्या संदर्भात जाहीर करण्यात आलेल्या सुरुवातीच्या काही उपक्रमांमध्ये या घोषणेचाही समावेश आहे.
यानिमित्त बोलताना, महिंद्रा इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू यांनी सांगितले, “महिंद्रा इलेक्ट्रिक अंदाजे दशकभर ईव्ही क्षेत्रामध्ये आघाडीची कंपनी राहिली आहे. झूमकारबरोबरचा आमचा सहयोग वाढवणे व आमची ईव्ही मुंबईत शेअर्ड मोबिलिटी पद्धतीने दाखल करणे हे अतिशय अभिमानास्पद आहे. आमच्यासाठी महाराष्ट्र हे राज्य अतिशय महत्त्वाचे आहे आणि आम्ही येथे उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी गुंतवणुकीचे केलेले नियोजन अगोदरच जाहीर केले आहे. ईव्हींना पाठिंबा देण्यासाठी सकारात्मक पाऊल ठरेल, अशा ईव्ही धोरणाची घोषणा सरकार करत असतानाच, आम्ही ही घोषणा करत असल्याने आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आमच्या उपक्रमामुळे लोकांना एक तंत्रज्ञान म्हणून एव्हीचा अवलंब करण्यासाठी मदत होईल आणि हरित भविष्याच्या दृष्टीने राज्याची वाटचाल करण्यासाठी योगदान दिले जाईल.”
झूमकारचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग मॉरन यांनी सांगितले, “भारतातील शेअर्ड मोबिलिटीमधील प्रवर्तक म्हणून, झूमकारला मुंबईमध्ये पहिल्यांदाच शेअर्ड मोबिलिटी पद्धतीने ईव्ही दाखल करताना अतिशय आनंद होत आहे. महाराष्ट्र सरकारने ईव्हीविषयी घेतलेल्या प्रगतीशील भूमिकेमुळे येत्या काही महिन्यांत व वर्षांत इलेक्ट्रिक इकोसिस्टीमच्या विस्तारामध्ये निश्चितच योगदान मिळणार आहे. या घडामोडींना चालना देण्यासाठी झूमकार महिंद्रा इलेक्ट्रिकबरोबर पुन्हा काम करण्यासाठी उत्सुक आहे.”
या उपक्रमांतर्गत समाविष्ट होणाऱ्या वाहनांना झूमकार व लीजप्लान यांच्यातील सहयोगानुसार अर्थपुरवठा केला जाणार आहे व यामुळे झूमकारला कस्टमाइज्ड ईव्ही अर्थपुरवठा उपलब्ध होणार आहे. झूमकार व महिंद्रा ईलेक्ट्रिक यांना ईव्हीसाठी अर्थपुरवठ्यासाठी महिंद्रा फायनान्स विविध शहरांत यापुढेही फायनान्सिंग पार्टनर असणार आहे.
झूमकारविषयी:
2013 मध्ये कार शेअरिंग सेवा व 2017 मध्ये सायकल शेअरिंग सेवा दाखल करणारी झूमकार भारतातील पहिली सेल्फ-ड्राइव्ह मोबिलिटी सुविधा आहे. मोबाइल अनुभवावर सर्वाधिक भर देणारी झूमकार ग्राहकांना तास, दिवस, आठवडा किंवा महिना या नुसार कार भाड्याने देते. सायकल 30 मिनिटांच्या हिशोबाने भाड्याने दिल्या जातात. 2013 मध्ये स्थापन झालेल्या व बेंगळुरू येथे मुख्यालय असलेली झूमकार भारतातील अंदाजे 30 शहरांत कार्यरत आहे. 2017 मध्ये, झूमकारने झॅप दाखल करून भारतातील पहिला पीअर2पीअर आधारित सेवा सुरू केली. फेब्रुवारी 2018 मध्ये झूमकारने झॅप अंतर्गत भारतातील पहिल्या कार सबस्क्रिप्शन कार्यक्राला सुरुवात केली.
महिंद्रा इलेक्ट्रिकविषयी
महिंद्रा इलेक्ट्रिक ही 19 अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या महिंद्रा समूहाचा भाग असलेली कंपनी इलेक्ट्रिक वाहनांचा विकास व उत्पादन यातील जागतिक स्तरावरील प्रणेती आहे. जागतिक स्तरावर गौरव मिळालेले ईव्ही तंत्रज्ञान भारतात विकसित केलेली महिंद्रा इलेक्ट्रिक ही भारतातील एकमेव ईव्ही उत्पादक आहे. महिंद्रा समूहाकडे अतिशय वैविध्यपूर्ण इलेक्ट्रिक वाहने असून त्यामध्ये ई2ओप्लस हॅच, ईव्हेरिटो सेदान, ईसुप्रो मिनी व्हॅन व पॅनल व्हॅन्स यांचा समावेश आहे.
तंत्रज्ञान व नावीन्य यांच्या कक्षा रूंदावत, महिंद्राने वाहतुकीमध्ये बदल करण्याची गरज वेळोवेळी ओळखली आहे. यातूनच परिवर्तनासाठीचे व्हिजन अस्तित्वात आले; असे व्हिजन जे अधिक टिकाऊ व अवलंबून राहण्याजोगी कल्पनाशक्ती दर्शवते. पर्यायी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे महिंद्राला स्वच्छ, हरित व अधिक स्मार्ट भविष्य घडवण्याच्या दृष्टीने मदत झाली आहे.
महिंद्राविषयी
19 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या या कंपन्यांच्या समूहाचा नेहमीच प्रयत्न असतो की, ग्रामीण भागात भरभराट झाली पाहिजे, शहरातील जीवनशैली सुधारली पाहिजे आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढली पाहिजे. त्यामुळे लोकांना चालना मिळून त्यांचा विकास होईल. समूह भारतात युटिलिटी व्हेइकल्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा व व्हेकेशन ओनरशिप यामध्ये आघाडीच्या स्थानी आहे व व्हॉल्युमच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. कृषिव्यवसाय, एअरोस्पेस, कम्पोनंट्स, सल्ला सेवा, संरक्षण, ऊर्जा, औद्योगिक उपकरणे, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, स्टील, रिटेल, व्यावसायिक वाहने व दुचाकी व्यवसायांतही अग्रेसर आहे. भारतात मुख्यालय असलेल्या महिंद्रामध्ये 100 देशांत अंदाजे 200,000 कर्मचारी आहेत.