Home Blog Page 3125

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी 10 जुलै पर्यंत अर्ज सादर करावेत

0

पुणे: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ(मर्या.) मुंबई मार्फत राबविल्या जाणाऱ्या सन 2017-19 या शैक्षणिक वर्षात मातंग समाज व तत्सम  12 पोटजातीतील इ.10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्य (60 टक्के पेक्षा जास्त) गुण मिळवून  उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे तरी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक पां.भ.गिऱ्हे यांनी केले आहे.

            विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ(मर्या.,)424, मंगळवार पेठ, पुणे येथे साध्या कागदावर फोटो लावून अर्ज (भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा), जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड (शिधापत्रिका) छायांकीत प्रत, गुणपत्रक, पुढील वर्गात प्रवेशाबाबतचा पुरावा या कागदपत्रांसह सादर करावा. तसेच मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी आपले अर्ज कागदपत्रांच्या छायांकीत प्रती स्वयंसाक्षांकित करुन जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.,)424, मंगळवार पेठ, पुणे या कार्यालयाकडे 10 जुलै 2018 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असेही आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

आत्मबळ, जिद्द व चिकाटीमुळे यश प्राप्त होते-सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले

0

पुणे  : अपयशामागे यश लपलेले असते, हे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आत्मबळ, जिद्द व चिकीटीमुळे यश प्राप्त होते, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

             डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीतर्फे संघ लोकसेवा आयोग-नागरी परीक्षा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग-राज्य सेवा परीक्षा 2017 मधील बार्टीपुरस्कृत तसेच अन्य यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार यशदा येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी सामाजिक न्याय मंत्री बोलत होते. अनुसूचित आयोगाचे सदस्य न्या.सी.एल.थूल, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, समाज कल्याण आयुक्त मिलींद शंभरकर यावेळी उपस्थित होते.

            यावेळी सामाजिक न्याय मंत्री श्री.बडोले म्हणाले, यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या सेवेकाळात शासन व प्रशासनात ताळमेळ ठेवून समाजाच्या विकासासाठी काम करावे. बार्टीतर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. स्पर्धा परीक्षेतील यशस्वी उमेदवारांचा सत्कार अन्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. नागरी सेवा स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्णाचे प्रमाण वाढावे, यासाठी बार्टीतर्फे दोनशे विद्यार्थ्यांना नवी दिल्ली येथील नामांकित खाजगी कोचींग क्लासेसला प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यशस्वी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.

            अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य न्या.सी.एल.थूल यांनी, बार्टीच्या उपक्रमांचा फायदा घेत विद्यार्थ्यांनी अन्य क्षेत्रातही यश संपादन करावे असे सांगितले.  सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात बार्टीतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांसह बार्टीपुरस्कृत विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशाची माहिती दिली.

            यशस्वी विद्यार्थ्यांपैकी नागरी सेवा परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या डॉ.गिरीश बडोले यांनी मनोगत व्यक्त्‍ केले. अपयशातून खचून न जाता, नेटाने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते असे त्यांनी सांगितले.

            नागरी सेवा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांची माहिती दर्शविणाऱ्या ‘यशोगाथा’ या पुस्तिकेचे विमोचन सामाजिक न्याय मंत्री यांच्याहस्ते करण्यात आले. त्यांच्याहस्ते, संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह स्मृतीचिन्ह, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

            कार्यक्रमाला यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक, सामाजिक न्याय विभाग व बार्टीचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

‘यंग्राड’ चित्रपट ६ जुलै २०१८ रोजी होणार प्रदर्शित

0

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने हे नेहमीच वैविध्यपूर्ण कथा आणि त्यांच्या आगळ्या हाताळणीच्या माध्यमातून चित्रपट निर्मिती करण्यासाठी ओळखले जातात. यंग्राड’ हा त्यांचा आणखी एक तसाच हट के’ चित्रपट ६ जुलै २०१८ रोजी संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. यंग्राड’ या चित्रपटाची माहिती देण्यासाठी पुणे येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिग्दर्शक मकरंद माने यांनी ही माहिती दिली. यावेळी यंग्राड’ चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा प्रदर्शित करण्यात आला.

 विठ्ठल पाटील (विठ्ठल पाटील प्रॉडक्शन्स), गौतम गुप्ता, गौरव गुप्ता (फ्युचरवर्क्स मिडिया लिमिटेड) आणि मधु मंटेना (फँटम फिल्म्स) यांनी संयुक्तरित्या या चित्रपटाची निर्मिती केली असून यंग्राडचे दिग्दर्शन मकरंद माने यांनी केले आहे. चैतन्य देवरे, सौरभ पाडवी, शिव वाघ आणि जीवन करळकर या चार युवकांच्या मध्यवर्ती भूमिका या चित्रपटात आहेत. त्याशिवाय चित्रपटात शरद केळकर, सविता प्रभुणे, शिरीन पाटील, निकिता पवार, मोनिका चौधरी, शशांक शेंडे, विठ्ठल पाटील आणि शंतनू गंगणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 चित्रपटाचे लेखन मकरंद माने यांनी केले असून त्यांनी या चित्रपटाची पटकथा शशांक शेंडे आणि अझीझ मदारी यांच्यासह लिहिली आहे. युवा संगीत दिग्दर्शक हृदय गट्टानी आणि गंधार यांनी संगीत दिले आहे. चित्रपटातील गाणी क्षितीज पटवर्धन, दत्ता पाटील आणि मघलुब पूनावाला यांनी लिहिली आहेत. यातील चार गाणी शंकर महादेवन, दिव्य कुमार, शाश तिरुपती आणि हृदय गट्टानी यांनी गायली आहेत.

 यंग्राड’ हा बोलीभाषेतील प्रचलित शब्द असून तो भारताची दक्षिण काशी (दक्षिण बनारस) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये उनाड मुलांसाठी वापरला जातो. एखाद्याबरोबर भांडण उकरून काढणे किंवा मित्राला त्याच्या स्वप्नपरीबरोबर सुत जुळवायला मदत करणे यासाठी हे चारही मित्र नेहमीच एकमेकांच्या मदतीला धावून येत असतात. पण या संस्कारक्षम वयात चुकीचे आयडॉल समोर असल्याने हे चार युवक नेहमीच अडचणीत सापडतात. त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतो आणि आपल्याला आयुष्याची सर्व माहिती आहे, अशा आविर्भावात वावरणारे हे चौघे एका क्षणी अशा निष्कर्षाला येतात की त्यांचे आयुष्यच विस्मरणात गेल्यासारखे होते. त्यानंतर मग ते स्वत्वःचा शोध घेऊ लागतात आणि आयुष्याच्या नवीन प्रवासाला लागतात.

 ही प्रभावित करणाऱ्या चार युवकांची कथा असून हे कुमारवयीन युवक त्या संस्कारक्षम आणि बळी पडू शकेल अशा वयातील मैत्री, निरागसता, प्रेम, कुटुंब व मुल्ये यांचे महत्व अधोरेखित करतात,” निर्माते विठ्ठल पाटील म्हणतात.

 यंग्राडच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवताना मला विशेष आनंद होत आहे. मराठी सिनेमामध्ये प्रेरणादायी अशी गोष्ट आणि दमदार कथा असतात. त्यांच्या जोडीला कसदार अभिनेत्यांची फळी असते. आम्हाला हे सर्व आमच्या प्रेक्षकांसमोर आणताना विशेष आनंद होत आहे,” असे मधु मंटेना यांनी म्हटले आहे.

 निर्मितीपश्चात आणि सेटवरील सेवा साधारण एक दशकभर पुरविल्यानंतर फ्युचरवर्क्स ही कंपनी आता पहिल्यांदाच चित्रपटनिर्मितीमध्ये उतरत असून यंग्राड’ हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. विठ्ठल पाटील प्रॉडक्शन्सच्या सहकार्यातून ही निर्मिती होत आहे, तो प्रेक्षकांना आवडेल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे,” असे उद्गार फ्युचरवर्क्स मिडियाचे गौतम गुप्ता यांनी काढले.

 दमदारपणा, ऊर्जा आणि अविस्मरणीय व्यक्तिरेखा या वैशिष्ट्यांनी चित्रपट नटला असून तो प्रेक्षकांना खिळवून ठेवेल एवढे निश्चित. ही भव्य अशी कथा ६ जुलै २०१८ रोजी पडद्यावर साकारात आहे.

रावेत जलउपसा केंद्रातील अंतर्गत बिघाडामुळेच वीजपुरवठा खंडित

0

महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत

पुणे : रावेत येथील जलउपसा केंद्रातील अंतर्गत विद्युत यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे मंगळवारी (दि. 26) पहाटे अडीच तास वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणकडून या जलउपसा केंद्राला सुरळीत वीजपुरवठा सुरु होता.

याबाबत माहिती अशी की, मंगळवारी (दि. 26) रावेत जलउपसा केंद्राचा सुमारे अडीच तास वीजपुरवठा खंडित राहिल्याने पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. परंतु या केंद्रातील लाईटींग अरेस्टर फुटल्यामुळे महावितरणकडून वीजपुरवठा करणाऱ्या 22 केव्ही वाहिनीची वीजपुरवठा दोन वेळा एकूण 9 मिनिटांसाठी खंडित राहिला होता. तथापि जलउपसा केंद्रातील वीजमीटरनंतरच्या अंतर्गत विद्युत यंत्रणेसह रोहित्रात बिघाड झाल्यामुळे अडीच तास वीजपुरवठा खंडित होता. त्याचा महावितरणशी संबंध नाही.

महावितरणकडून रावेत जल उपसा केंद्राला एक्सप्रेस वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. या वाहिनीवरुन वीज खंडित झाल्यास अन्य पर्यायी वाहिन्यांद्वारे वीजपुरवठा करण्याची सोय उपलब्ध आहे. तथापि, रावेत जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा या केंद्रातील अंतर्गत वीजयंत्रणेमधील बिघाडामुळे खंडित झाला होता.

रक्तदान ही आजच्या काळाची गरज – अतुल गोयल

0

गोयल गंगा फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन 

पुणे :-  रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे.एकाने रक्तदान केल्यास त्यातून चौघांना जीवनदान मिळते. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. समाजात रक्‍तदानाविषयी असणारे गैरसमज दूर करुन जास्‍तीत जास्‍त लोकांमध्‍ये जनजागृती करुन रक्‍तदान वाढवणे ही आजच्‍या काळाची गरज आहे.  त्यासाठी अधिकाधिक लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे असे मत अतुल गोयल यांनी यावेळी व्यक्त केले.गोयल गंगा फाऊंडेशनच्या वतीने  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

मार्केटयार्ड येथील गंगा धाम टॉवर्स आणि बावधन येथील गंगा लेजंड येथे १०० पेक्षा अधिक लोकांनी यात सहभाग घेतला. गेल्या १५ वर्षापासून गोयल गंगा फाऊंडेशन हा उपक्रम राबवते आहे. गोयल गंगा फाऊंडेशनचे विश्वस्त अतुल गोयल आणि अमित गोयल यांनी या सर्वप्रथम रक्तदान करून या उपक्रमाची सुरुवात केली.

अमित गोयल म्हणाले कि  ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ आहे. रक्‍तदान हे जीवनदान देण्‍यासाठी आवश्‍यक आहे. रक्तदानामुळे काहीही त्रास होत नाही. सुदृढ, सशक्त माणूस रक्तदान करू शकतो. आज धकाधकीच्या बर्‍याच ठिकाणी छोट्या मोठ्या अपघातात ऑपरेशनच्या वेळी रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज असते. त्यावर रक्तदान हाच एक उपाय आहे आणि तो आपण समाजातील एक सूज्ञ म्हणून करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

प्रशासकीय सेवेत लोकसमुदायाची गरज जाणून घ्या- कमलेश शर्मा

0
पुणे-“ प्रशासकीय सेवेत कार्य करतांना प्रत्येकाने प्रामाणिकपणा, धाडस, इच्छाशक्ती आणि न्यायी वृत्ती या चतुःसूत्रीने कार्य करावे. सदैव जागृत राहून आजू बाजूच्या परिस्थितीच भान ठेवावे,”असा सल्ला द कॉमन वेल्थ ऑफ नेशन्सचे माजी महासचिव कमलेश शर्मा यांनी यूपीएससी परिक्षेतील यशस्विताना दिला.
डॉ.विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) तर्फे गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) स्पर्धा परीक्षा-२०१७ मधील यशस्वितांच्या १०व्या राष्ट्रीय सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे होते. सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अ‍ॅकॅडमीच्या माजी संचालिका श्रीमती अरूणा एम.बहुगुणा व भूतपूर्व एयर चीफ मार्शल ए.वाय. टिपणीस हे सन्मानीय अतिथी म्हणून उपस्थित होते. 
यावेळी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, उपकुलगुरू प्रा.डॉ.एम.मुरूगानंत, कुलसचिव प्रा.डी.पी. आपटे, प्रा.डॉ. सायली गणकर, प्रा.डॉ.शैलश्री हरिदास व प्रा. डॉ.आर.एम. चिटणीस हे उपस्थित होते.
 या सोहळ्यात देशातून प्रथम आलेला अनुदीप धुरीशेट्टी, द्वितिय आलेली अनु कुमारी आणि तिसरा आलेला सचिन गुप्ता या तिघांना अनुक्रमे ५१०००/- , ३१०००/- व २१०००/- अशी रोख पारितोषिकेही देण्यात आली. त्याचबरोबर इतर यशस्वितांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शाल, मानपत्र व पुष्पगुच्छ असे सत्काराचे स्वरुप होते.
कमलेश शर्मा म्हणाले,“ समाजामध्ये सेवाकार्य करतांना ज्ञानच तुम्हाला वाचवू शकते. अशा वेळेस सदैव प्रत्येक गोष्टीतून नव-नवीन शिकत राहावे. अज्ञान आणि विस्मृतीमुळेच मानवाची सदैव पिछेहाट झाली आहे. प्रशासकीय सेवेत क्षणा-क्षणाला मागे ओढण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात चालते. त्यामुळे आत्मविश्‍वासाने सर्व समाजाला जोडण्याचे कार्य करावे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये महत्वकांक्षा जागृत करण्याचे कार्य विविध प्रकारचे मार्गदर्शक करीत असतात. त्यापासून प्रेरणा घेऊन उंच उडी मारावयाची असते.”
ए.वाय.टिपणीस म्हणाले,“ कार्य संस्कृती, वक्तशीरपणा व सदैव नवीन शिकण्याच्या गुणांमुळे तुम्ही एक आदर्श प्रशासकीय अधिकारी बनू शकता. या सृष्टीवर हास्य टिकून राहण्यासाठी तुम्ही सदैव चेहर्‍यावर हास्य ठेऊन कार्य करावे. जनतेचे सेवक असल्याची भावना ठेवावी. तुम्ही कुठल्या पदावर किंवा कोणत्या क्षेत्रात काम करीत आहात, हे महत्वाचे नाही. तर ते कार्य तुम्ही किती मन लावून करता, यालाच खरे महत्व आहे. ”
श्रीमती अरूणा एम. बहुगुणा म्हणाल्या,“आत्मविश्‍वासाच्या जोरावर तुम्ही समाजात परिवर्तनाची ज्योत पेटवू शकता. प्रशासकीय कार्य करतांना सर्वप्रथम स्वतःला प्रश्‍न विचारा, की हे बरोबर आहे का चूक. तुमच्या आतल्या आवाजाचा कानोसा घ्या. त्यानंतर निर्णय घ्या. तुमच्या चांगल्या निर्णयाला सर्वांचा विरोध असला तरी चालेल. पण तुम्ही त्या मार्गावरच एकटेच चालत रहा. हळू हळू सर्व लोग तुमच्या पाऊलावर पाऊल ठेवतील. महापुरूष असेच वागत आले.”
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“प्रशासनात काम करताना आपली मूल्ये जपली पाहिजेत.आपले चारित्र्य जपतांना प्रत्येक कार्यात शिस्त असावयास हवी. भारतीय संस्कृती, परंपरेला अनुसरुन काम केल्यास चांगल्या समाजाची निर्मिती होऊ शकते. समाजाचे सर्व प्रश्‍न सोडविण्याचे व कठीण परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य तुमच्या अंगी बाणल्यास प्रत्येक कार्य यशस्वी होईल. सदैव असे कार्य करा की तुमच्या कार्याचा आदर्श नवी पिढी घेईल.”
सत्काराला उत्तर देताना अनुदीप धुरीशेट्टी म्हणाला,“ पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल, असे नाही. त्यामुळे अयशस्वी झाल्यावर निराश न होता त्याचा स्वीकार करून पुढची लढाई जिंकण्याची तयारी करा. त्यासाठी ५-६ वर्षापासून सचोटीने अभ्यास करून स्वतःला परिपूर्ण करा. कठोर परिश्रम हीच यशाची गुरूकुल्ली होऊ शकते त्यासाठी भरपूर अभ्यास करून स्वतःला विकसित करीत रहा.”
अनुकुमारी म्हणाली,“ आपण पाहिलेले स्वप्न अखंड परिश्रमाच्या जोरावर साकार करू शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना तुमच्या सामोर अनेक विचित्र प्रसंगसुद्धा येतील. त्या परिस्थितीला घाबरून न जाता  आपली वाटचाल चालू ठेऊन सर्व काही भविष्य काळावर सोपवा.”
सचिन गुप्ता म्हणाला,“ चेंजमेकर या भूमिकेतून आम्ही प्रशसकीय सेवेत कार्य करणार आहोत. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. वडिलांच्या प्रेरणेमुळेच मी येथपर्यंत पोहचू शकलो. एमआयटी डब्ल्यूपीयूचा हा उपक्रम खूपच चांगला आहे. येथे उपस्थित विद्यार्थ्यांनी सदैव निर्धाराने वाटचाल करावी. त्याचे फळ आपोआपच तुमच्या पदरात पडेल.”
प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड यांनी या राष्ट्रीय सत्कार सोहळ्याची पार्श्‍वभूमी स्पष्ट केली. ते म्हणाले आम्ही भारतीय छात्र संसद, इतकेच नव्हे, तर नॅशनल टीचर्स काँग्रेस व विमेन्स पार्लमेंटच्या द्वारा सर्व समाजात जागृती घडवून आणण्यचा प्रयत्न करीत आहोत. शासक व प्रशासक  यांनी हातात हात घालून काम केल्यास विकास योजना वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल.
 प्रा.डी.पी. आपटे यांनी आपले विचार मांडले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.  उपकुलगुरू प्रा.डॉ.मुरूगानंत यांनी आभार मानले.

आषाढी वारीत अन्न सुरक्षा व स्वछता अभियान राबवणार- गिरीश बापट

0

पुणे :-  आषाढी एकादशी निमित्त वारीत अन्न  सुरक्षा व स्वछता अभियान राबवणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली . देहू व आळंदी येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारीच्या मार्गावरील अन्न विक्रेते व अन्न छत्र चालवणाऱ्यांना हातमोजे, टोपी,अॅप्रन,आदींचा समावेश असलेले हायजिन किटचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान दिनांक ६ जुलै २०१८ व जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान ५ जुलै पासून पुणे जिल्ह्यातून पंढपूरकडे होणार आहे. देहू, आळंदी येथून पंढपूर पर्यंत सलग १९ दिवस चालणाऱ्या  आषाढी वारीत महाराष्ट्रासह विविध प्रांतातून सुमारे १० ते १२ लाख भाविक सहभागी होत असतात. या कालावधीत पालखी मार्गावर हॉटेल, रेस्टॉरंट , फिरते विक्रेते हे अन्न पदार्थांची विक्री करत असतात. या कालावधीत सेवा भावी संस्था, सेवाभावी व्यक्ती, भाविकांना अन्नपदार्थ मोफत देत असतात.

यंदापासून अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने अन्नछत्राच्या तपासण्या करून वारकरी व भाविकांना सुरक्षित  व स्वच्छ अन्न उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच अन्न व्यावसायिकांचे सुरक्षा व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. देहू ते पंढरपूर व आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मार्गावर अन्न प्रशासन, कोकाकोला इं. लि. आणि नेस्ले इं. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ” परिवर्तन अन्न सुरक्षा व स्वच्छता अभियान” हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असून पालखी मार्गावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सुरक्षित अन्न पदार्थ तयार करण्याबाबत तसेच अन्न सुरक्षेबाबत तज्ञ प्रशिक्षक व अन्न सुरक्षा अधिकारी प्रशिक्षण देणार आहेत . या अन्न व्यावसायिकांना  हातमोजे, टोपी,अॅप्रन,आदींचा समावेश असलेले हायजिन  किटचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.

चैन से हमको कभी ….( यादे…)

0

चैन से हमको कभी आपने जीने ना दिया
ज़हर भी चाहा अगर, पीना तो पीने ना दिया
चैन से हमको कभी

बरेच वेळा मला एखादे गाणे असे छळते की एकदा का ते कानावर पडले की पुढे दोन तीन दिवस सतत ते माझा पिछा सोडत नाही  माझ्या ओठातुन जाता येता बाहेर पडत असते .
असेच एक गित आहे ” प्राण जाये पर वचन न जाये ” या चित्रपटातील ” चैनसे हमको कभी” हे गाणे .
७३/७४ चा सुमार , ओ पी . संपले अशी हाकाटी त्यांच्या विरोधकानी सुरु केली होते पण त्यांच्या विरोधकानी ओ . पी . ना ओळ्खले नव्हते .ते ओ . पी . होते . एस . एच . बिहारी यानी लिहलेल्या , “प्राण जाये पर वचन ना जाये ” या चित्रपटातील  ” चैन से हमको कभी ” हे  मदहोश करणारे गित त्यांनी असे   स्वरबद्ध केले व आशा भोसले यानी आपल्या मदहोश करणाऱ्या आवाजात असे काही गायिल्र की त्याने त्या वर्षीचे फिल्मफेअर आवार्डच  पटकाविले .
चैन से हमको कभी आपने जीने ना दिया
ज़हर भी चाहा अगर, पीना तो पीने ना दिया
चैन से हमको कभीचांद के रथ में रात की दुल्हन जब जब आएगी
याद हमारी आपके दिल को तरसा जाएगी
आपने जो है दिया, वो तो किसीने ना दिया
ज़हर भी चाहा अगर, पीना तो पीने ना दिया
चैन से …

आपका ग़म जो इस दिल में दिन\-रात अगर होगा
सोचके ये दम घुटता है फिर कैसे गुज़र होगा
काश ना होती अपनी जुदाई मौत ही आ जाती
कोई बहाने चैन हमारी रूह तो पा जाती
इक पल हँसना कभी दिल की लगी ने ना दिया

ज़हर भी चाहा अगर, पीना तो पीने ना दिया
गीतकार :- एस . एच . बिहारी .
संगीतकार :-  ओ . पी . नय्यर .
गायिका : – आशा भोसले .
चित्रपट :- प्राण जाये पर वचन ना जाये .

महर्षी अण्णासाहेब शिंदे प्राथमिक शाळेस संगणक भेट

0

पुणे-जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरराव यादव यांच्या स्मरणार्थ पुणे लष्कर भागातील नवा मोदीखाना भागातील पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या महर्षी अण्णासाहेब शिंदे प्राथमिक शाळेस दोन संगणक भेट देण्यात आले . यावेळी महर्षी अण्णासाहेब शिंदे यांच्या म्युरल्सचे उदघाटन  पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रियांका श्रीगिरी यांच्याहस्ते करण्यात आले .  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रियांका श्रीगिरी , कार्यक्रमाचे संयोजक व स्थानिक नगरसेवक अतुल गायकवाड , ऍड. प्रशांत यादव , सचिन यादव , नगरसेवक दिलीप गिरमकर , माजी नगरसेवक डॉ. भरत वैरागे ,शाळेच्या मुख्याध्यापिका विमल धुमाळ , शशिधर पुरम , विनायक काटकर ,  मनीष साळुंके , विकास भांबुरे , दिलीप भिकुले , सीमा गायकवाड , झाकीर कुरेशी , अशोक चेटपेल्ली निलेश कणसे , विक्रम मोरे आदी मान्यवर उपस्थित होते .  या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक शाळेच्या मुख्याध्यापिका विमल धुमाळ यांनी केले तर सूत्रसंचालन मनिष खंडागळे यांनी केले तर आभार नगरसेवक अतुल गायकवाड यांनी मानले

वृक्ष लागवड संदर्भात विभागीय आयुक्तांशी खासदार शिरोळेंची चर्चा

0
पुणे-महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष  लागवडीच्या महत्वाकांशी योजनेत पुणे जिल्ह्यात तसेच राज्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जल आणि मृद संधारण कामांतर्गत बांबूची लागवड करावी अशी विनंती खासदार अनिल शिरोळे ह्यांनी मध्यंतरी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन ह्यांना केली होती. बांबू तसेच तत्सम प्रजातींची लागवड केल्यास अतिवृष्टीमुळे वाहून येणाऱ्या मृदेस अटकाव होऊन धूप थोपविता येते. प्रस्तावित बांबू लागवडीमुळे मान्सून पश्चात पाण्याचा प्रवाह (post mansoon flow) वाढून शहराची भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. तसेच पाणवहाळ क्षेत्रात नदी किनारी वसलेल्या गावांना पुरापासून संरक्षण देखील करत येते. यावर तातडीने कार्यवाही होण्यासाठी वरिष्ठ पातळीवर सर्व संबंधित सचिव यांची बैठक आयोजित करून शासन निर्णय निर्गमित करण्याच्या शिरोळे ह्यांच्या  मागणीची दखल घेऊन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन ह्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.
त्याचाच पाठपुरावा म्हणून शिरोळे ह्यांनी जल संधारण विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. ह्या वेळी अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, प्रवीण कोल्हे, पांडुरंग शेलार, श्री राणे, रंगनाथ नाईकडे असे अन्य अधिकारी उपस्थित होते. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ह्या संबंधी पुढील बैठक २जुलै रोजी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर ह्यांच्या उपस्थितीत करण्याचे निश्चित करण्यात आल्याचे शिरोळे ह्यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले.

युएन वुमन्सच्या सशक्त भारतीय महिलांच्या व्हिडीयोमध्ये सई ताम्हणकर !

0

स्त्री-पुरूष समानतेसाठी कार्यरत असलेल्या ‘युएन वुमन इंडिया’व्दारे मुली आणि महिलांना प्रेरणा देण्यासाठी मुझे हक है हा म्युझिक व्हिडीयो लाँच झाला आहे. ह्या व्हिडीयोमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सशक्त महिलांना चित्रीत करण्यात आले आहे. ऐश्वर्या राय बच्चन, मिताली राज, सानिया मिर्झा, आशा भोसले, गौरी सावंत, डॉ. सईदा हमिद ह्या सशक्त महिलांसोबतच ह्या व्हिडीयोमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकरलाही स्थान मिळालंय.

फिल्म इंडस्ट्रीतल्या सूत्रांनूसार, युएन वुमन्स ही आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी संस्था आहे. संस्थेच्या भारतीय शाखेतून भारतीय महिलांना आणि मुलींना प्रेरीत करणा-या व्हिडीयोमध्ये समाजातील वेगवेगळ्या स्तरातल्या नक्की कोणत्या महिलांना स्थान मिळावे, ह्यावर रिसर्च करण्यात आला. आणि त्यात सई ताम्हणकरची निवड करण्यात आली. ही नक्कीच एक महत्वाची गोष्ट आहे.

सूत्रांनूसार, सईने आपल्या करीयरच्या पंधरा वर्षांमध्ये फक्त मराठीच नाही तर भारतीय फिल्म इंडस्ट्रीवरही आपला ठसा उमटवलाय, हेच ह्यावरून सिध्द होते आहे.

अनधिकृत बांधकामे पाडण्यात अडसर ,पीएमआरडीएने केले ३५ जणांवर गुन्हे दाखल

0

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्यावतीने अनधिकृत बांधकाम पाडण्यात अडसर निर्माण केल्याप्रकरणी हडपसर व हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हदीत्तील ३५ जणांवर दि.२२ पर्यंत जून २०१८ पर्यंत एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबधित सर्व बांधकामाचा व्यवसाईक व रहिवाशी जागेसाठी वापर केला जात होता.
महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम (MRTP) १९६६च्या कलम ५२,५३,५४,५५ व १८ अन्वये भारतीय दंडसाहिंता कलम ३४ प्रमाणे बांधकाम नियमितीकरणाचे कागदपत्रे हजार न केल्यामुळे संबधित अनधिकृत
बांधकाम धारकांवर कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकाम धारकांना बांधकाम सुरु अवस्थेत असताना थांबविण्यासाठी वारंवार नोटीसा व तोंडीसूचना बजविण्यात आल्या होत्या, तरी देखील अनधिकृत बांधकामधारकाने बांधकाम सुरु ठेवले होते.
सदरील अनधिकृत बांधकाम कारवाई नऱ्हे, मारुंजी, मांजरी या भागात करण्यात आली आहे. ही कारवाई वास्तूविशारद, अभियंता, स्ट्रक्चरल अभियंता, मालक व विकसक यांच्यावर करण्यात आली आहे. सदरील गुन्हा हा अजामीनपात्र आहे. या गुन्ह्यामध्ये ५ हजार रुपये पर्यत दंड व ३ वर्षापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते.
अनधिकृत बांधकाम पथक १ व २ मार्फत सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. सदर प्रक्रिया पोलीस अधीक्षक सारंग आवाड व अतिरिक्त जिल्हाधिकारी अनधिकृत बांधकाम विभागचे मिलिंद पाठक तसेच उपजिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पाच महिन्यात ०१ लाख ०५ हजार चौरसफूट अनधिकृत बांधकामांवर कार्यवाही
जानेवारी २०१८ पासून ०१ लाख ०५ हजार चौरसफूट बांधकाम पाडण्यात आले आहे. तर २२ लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच नोंदणी महानिरीक्षक व महावितरण कार्यालयाना अनधिकृत बांधकाम नोंदणी केली जाऊ नये यासाठी विनंती करण्यात आली आहे.
पीएमआरडीए हद्दीतील ३१/१२/२०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकाम नियमितीकरणासाठी जानेवारी २०१८ पासून ७५ अर्ज प्राप्त झाले आहेत. सदरची मुदत चार महिने २१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत वाढून देण्यात आली होती.
आयुक्त किरण गित्ते यांनी अनधिकृत बांधकाम कारवाई सुरु राहणार असल्याचे सांगितले. अनधिकृत बांधकाम खरेदी करताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. अनधिकृत सदनिका खोटी माहिती देऊन स्वस्त
दराचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. नागरिकांचे आर्थिक नुकसान टळावे याकरिता नागरिकांनी जागरूक राहावे. नागरिकांनी शहानिशा करूनच सदनिका खरेदी कराव्यात असे आवाहन पीएमआरडीएच्यावतीने करण्यात आले आहे.

मॉन्सुन चॅलेंज जेतेपद राखण्याचा संजयचा निर्धार

0
पुणे- आठव्या महिंद्रा अॅडव्हेंचर मॉन्सुन चॅलेंज रॅलीसाठी गतविजेता संजय टकले जेतेपद राखण्याच्या निर्धाराने सहभागी झाला आहे. टीएसडी स्वरुपाची ही रॅली शनिवारी-रविवारी होत आहे.
 
मंगळुरला शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता रॅलीचे समारंभपूर्वक उद्घाटन झाले. शनिवारी मंगळुर ते मुर्डेश्वर आणि रविवारी मुर्डेश्वर ते दक्षिण गोवा असा रॅलीचा मार्ग आहे. टीएसटी (टाईम-स्पीड-डिस्टन्स) स्वरुपाची ही रॅली आहे. संजय महिंद्रा एसयुव्ही चालवेल. इरोडचा महंमद मुस्तफा त्याचा नॅव्हीगेटर असेल.
 
संजयने सांगितले की, टीएसडी रॅलीत संयम आणि सातत्याला महत्त्व असते. त्यात एकाग्रता कमालीची लागते, कारण तुम्हाला टाईम कंट्रोल माहित नसतात. स्टेजच्या आधी पाच मिनिटे ट्युलिप दिले जाते. ते घेऊन कार सुरु करावी लागते. मुस्तफाबरोबर माझा समन्वय फार चांगला आहे. तो अत्यंत मेहनती आहे.
 
संजय-मुस्तफा खुल्या व्यावसायिक गटात भाग घेतील. यात 28 स्पर्धक जोड्या सहभागी झाल्या आहेत. संजयसाठी मॉन्सुन चॅलेंज रॅली महत्त्वाची ठरली आहे. हिमालयन रॅली, डेझर्ट स्टॉर्म अशा विविध रॅली जिंकल्यानंतर त्याला केवळ मॉन्सुन चॅलेंज जेतेपदाने हुलकावणी दिली होती. संजयला 2012 मध्ये दुसरा, तर 2016 मध्ये पाचवा क्रमांक मिळाला होता. गेल्या वर्षी त्याने ही प्रतिक्षा संपुष्टात आणली. तेव्हा तो केवळ दहा सेकंदांच्या पेनल्टीसह खुल्या गटासह सर्वसाधारण क्रमवारीतही पहिला आला होता.
 
या रॅलीचा मार्ग रमणीय अशा पश्चिम घाट परिसरातून जातो. सध्या या परिसरात मुसळधार 
पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे स्पर्धकांसमोर खडतर आव्हान असेल. पावसाचा लपंडाव सुरु असल्यावर काही वेळा जेमतेम शंभर मीटर पुढचा रस्ता दिसतो.टीएसडी रॅलीत ठराविक वेग राखणे अनिवार्य असते. त्यामुळे तुम्हाला निसर्गाचा आनंद लुटता येतो.
 
संजयने यंदा जागतिक रॅली मालिकेच्या (डब्ल्यूआरसी) तयारीवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्याचे वेळापत्रक भरगच्च आहे. त्याने सरावासाठी तसेच मायदेशातील रॅलीत मित्रमंडळी भेटत असल्यामुळे मॉन्सुन चॅलेंजची निवड केली आहे.

‘जेट एअर’वेजच्या ताफ्यात अधिक चांगल्या हवाई अनुभवासाठी ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ विमानाची भर

0

पुढील दशकात वापरल्या जाणाऱ्या २२५ मॅक्स विमानांपैकीचे जेट एअरवेजचे हे पहिले विमान

मुंबई : भारतामधील एक आघाडीची आंतरराष्ट्रीय हवाईसेवा पुरविणाऱ्या कंपनीने आज आपल्या ताफ्यात ‘बोईंग ७३७ मॅक्स’ हे नवीन विमान दाखल झाल्याची घोषणा केली. या विमानामुळे हवाई प्रवाशांना उत्तम आणि वेगळ्या प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ हे नवीन विमान म्हणजे ‘आयल ७३७’ विमानांचे ‘अपग्रेडेशन’ आहे. जगभरातील सर्व व्यावसायिक विमाने याच पद्धतीची आहेत. ‘जेट एअरवेज’कडील ७३७-३०० या गटातील विमाने १९९४ पासून हवाई वाहतुकीमध्ये कार्यरत आहेत.

उत्कृष्ट कामगिरी आणि विश्वासार्हतेच्या दृष्टीने ‘७३७ मॅक्स’ या विमानांची रचना करण्यात आली आहे. ही विमाने इंधनबचतपूरक असून त्यांची  इंधन परिणामकारकता १५ टक्क्यांपर्यंत आहे. ही कामगिरी विमानाच्या बांधणीतील बदल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विंग्लेट्समुळे साधता आली आहे. या विंग्लेट्समुळे विमानाच्या ‘एअरफ्लो’मध्ये सुसूत्रता आली असून परिणामकारकता २ टक्क्यांनी वाढली आहे.

या विमानाच्या कामगिरीत भर घालण्याचे काम सीएफएम लीप-१बी या इंजिनाने केले आहे. हे इंजिन अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे बनविण्यात आले आहे. या इंजिनामध्ये ६९ इंच आकाराचा पंखा असून त्यामधील पात्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. पंख्यातील अल्ट्र-लाइट पाती ही कार्बन फायबर काम्पोझिट्सपासून तयार करण्यात आली आहेत. इंजिनमध्ये बसविण्यात आलेल्या शेवरनमुळे विमानाचे वजन आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आवाजात ४० टक्क्यांनी कपात झाली आहे. या इंजिनासाठी फारशी देखभालीचीही आवश्यकता नसते.

‘जेट’च्या ताफ्यात ‘७३७ मॅक्स’चा समावेश केल्याबद्दल ‘जेट एअरवेज’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनय दुबे म्हणाले, “७३७ मॅक्स’च्या समावेशामुळे ‘जेट एअरवेज’ आणि भारतीय हवाई क्षेत्रामध्ये एका नवीन अध्यायाला प्रारंभ होत आहे. ‘७३७ मॅक्स’ हे विमान आमच्या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तसेच हवाई प्रवाशांना ज्या पद्धतीचा अनुभव हवा आहे, तो देण्याचे काम या विमानाद्वारे केले जाईल. तसेच हे विमान इंधन बचतपूरक असल्यामुळे आमच्या संस्थेची वाढ होण्यास तसेच खर्चात कपात करण्यासही मदत करील.”

‘जेट एअरवेज’च्या या नवीन ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ या विमानामध्ये अनेक नवीन सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्यामुळे ग्राहकांना उत्तम प्रवास केल्याचा अनुभव मिळेल. प्रवाशांचे जेव्हा विमानामध्ये आगमन होईल तेव्हा ‘बोईंग स्काय इंटेरिअर’द्वारे त्यांचे स्वागत केले जाईल. विमानाची अंतर्गत रचना अत्याधुनिक पद्धतीने करण्यात आली आहे. त्यामध्ये अॅंटी ग्लेअर एलइडी लायटिंगचाही समावेश आहे. या विमानाच्या प्रवासामधील वेगवेगळ्या टप्प्यांनुसार ‘स्काय इंटिरियर’द्वारे नऊ प्रकारची अंतर्गत रचना आपोआप बदलण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. अंतर्गत सजावटीची रचना ‘जेट एअरवेज’ ब्रॅंड रंगसजावटीशी पूरक आहे. त्यामुळे विमानप्रवास करताना प्रवाशांना नेत्रसुखद अनुभव मिळेल. तसेच प्रवाशांसाठी सामान ठेवण्याच्या जागेची रचनादेखील बदलण्यात आली आहे. त्याद्वारे प्रवाशांना ‘केबिन लगेज’मध्ये अधिक सामान ठेवणे शक्य होणार आहे. त्यामुळे ‘बोर्डिंग’ प्रक्रिया वेगवान होऊन विमाने वेळेत सुटणार आहेत.

‘७३७ मॅक्स ८’ या विमानामध्ये सर्वसाधारण विमानांमध्ये आढळणारे ‘प्रीमियर’ आणि ‘इकॉनॉमी’ असे गट आढळणार आहेत. या विमानातील १२ आसने ‘प्रीमियर’ गटामधील असून १६२ आसने ‘इकॉनॉमी’ गटासाठी आहेत. या विमानामध्ये ३३० तासांचे ताजे मनोरंजनविषयक कार्यक्रम प्रवाशांना अनुभवता येतील. या कार्यक्रमांमध्ये हॉलिवुड, बॉलिवुड तसेच प्रादेशिक चित्रपट, टीव्ही कार्यक्रम, गेम शो, संगीत यांचा समावेश आहे.

‘प्रीमियर’ गटामधील आसनांसाठी वापरण्यात आलेले लेदर हे ‘वूल्सडॉर्फ’ या कंपनीचे आहे. ‘पोर्शे’, ‘मर्सिडीज’सारख्या आलिशान गाड्यांनाही ही कंपनी लेदर पुरवते. ‘प्रीमियर ट्रॅव्हलर’ गटासाठी ही आसने म्हणजे सर्वांगसुंदर अनुभव आहे. या आसनांच्या ‘लुक’पासून त्याच्या आरामदायी अनुभवासाठी खूप बारकाईने काम करण्यात आले आहे. या आसनांना युएसबी पोर्ट, लॅपटॉप चार्जर्स, पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस होल्डर्सची सुविधा आहे. ही आसने अत्यंत आरामदायी असून प्रवाशांना पाय मोकळे करण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध आहे. ही आसने ७-१०” एवढी मागेपुढे होऊ शकत असल्यामुळे प्रवाशांना हवाई प्रवासाचा थोडासुद्धा शीण जाणवणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.

‘प्रीमियर’ गटामधील आसनांची पीच ४०” असून ‘इकॉनॉमी’ गटामधील पीच २९ ते ३१” या दरम्यान आहे. ‘इकॉनॉमी’ गटामधील आसनेदेखील उत्तम दर्जा आणि आकर्षक रंगसंगतीची आहेत. या गटामधील आसनांनादेखील ‘रिक्लाइन’, युएसबी पोर्ट, पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहेत.

 

‘जेट एअरवेज’चे ‘७३७ मॅक्स’ हे फ्लाइट (९ डब्ल्यू ४५७) ‘मुंबई ते हैदराबाद’ हा प्रवास १ जुलै २०१८ रोजी करणार आहे.

जेट एअरवेजबद्दल :

‘जेट एअरवेज’ही भारतामधील देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणे करणारी विमानकंपनी असून या कंपनीद्वारे ६४ ठिकाणी सेवा पुरवली जाते. ‘जेट एअरवेज’चा व्यग्र हवाईमार्ग देशाचा सर्व भाग व्यापणारा आहे. त्यामध्ये मेट्रो शहरे, विविध राज्यांच्या राजधान्या आणि नव्याने पुढे येणाऱ्या शहरांचा समावेश आहे. भारताबरोबरच ‘जेट एअरवेज’द्वारे दक्षिण-पूर्व आशिया, दक्षिण आशिया, मध्य-पूर्वेतर देश, युरोप आणि उत्तर अमेरिकेतील महत्त्वाच्या शहरांबरोबर विमानसेवा चालवली जाते.

जेट एअरवेजच्या ताफ्यात सध्या ११९ विमाने असून त्यामध्ये बोइंग ७७७-३०० इआरएस, एअरबस ए३३०-२००/३०० या विमानांचा तसेच बोइंग ७३७ आणि एटीआर ७२-५००/६०० यांचा समावेश आहे.

‘व्हीएमडी’ची उभारणी बेकायदाच -आयुक्तांचे स्पष्टीकरण (तत्पुर्वीचा पहा भोंगळ कारभार -व्हिडीओ)

0

पुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (पीएससीडीसीएल) उभारलेल्या ‘व्हेरिएबल मेसेज डिस्प्ले’बाबत (व्हीएमडी) झडलेल्या जोरदार चर्चेत या ‘व्हीएमडी’ची उभारणी बेकायदा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर या प्रकरणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या संबंधी स्मार्ट सिटी कंपनीला नोटिस बजावण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे ‘फूटपाथ किंवा रस्त्याला अडथळा ठरणारे ‘व्हीएमडी’ काढून टाकण्यात येतील,’ असेही स्पष्ट केले.

स्मार्ट सिटी कंपनीकडून शहरात सर्रास नव्या ‘व्हीएमडीं’ची उभारणी सुरू आहे. महापालिकेकडून ‘व्हीएमडी’ बसविण्यास परवानगी देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे; तर दुसरीकडे स्मार्ट सिटी कंपनीने हे ‘व्हीएमडी’ बसविण्यास दिलेल्या कंत्राटाची मुदत संपत असल्याने कंत्राटदाराने नवीन ‘व्हीएमडी’ बसविण्याचा सपाटा लावला असल्याचा आरोप . काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी वारंवार केला होता त्यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नांना  उत्तर देण्यास सर्वसाधारण सभेत महापालिका प्रशासनाने सुरुवातीला टाळाटाळ केली. अखेर, महापालिका आयुक्त राव यांनी या प्रश्नाचे उत्तर देताना या ‘व्हीएमडी’ची उभारणी करण्यात आली असली, तरी त्याला महापालिकेची परवानगी नसल्याचे सांगितले.

बागवे यांनी जाहिरात धोरणानुसार ‘एलईडी स्क्रीन किंवा व्हीएमडी कुठे उभे करता येतात,’ याची माहिती प्रशासनाकडे मागितली होती. त्यानंतर ‘फूटपाथवर अशा प्रकारचे स्क्रीन तथा ‘व्हीएमडी’ची उभारणी करता येऊ शकत नाही” असे आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख तुषार दौंडकर यांनी स्पष्ट केले. बागवे यांनी हाच धागा पकडून ‘व्हीएमडी’वर कारवाईची मागणी केली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्मार्ट सिटी कंपनीद्वारे या ‘व्हीएमडी’ची उभारणी करण्यात आली असून त्यांना तत्काळ नोटिस देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.स्मार्ट सिटी कंपनीची एक भाग असली तरी महापालिकेच्या परवानगीशिवाय त्यांना ‘व्हीएमडी’ची उभारणी करता येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

स्मार्ट सिटीने तयार केलेल्या करारनाम्यात जाहिरात करण्यात येणार असल्याचा उल्लेख असल्याचे बागवे यांनी सांगितले. आयुक्तांनी याबाबत खुलासा करताना महापालिकेच्या हिताचे पूर्णपणे संरक्षण करण्यात येईल, असे सांगितले. महापालिकेचे नियम, निकषांशी सुसंगत असेल तरच या करारनाम्याला परवानगी देण्यात येईल. वाहतूक पोलिसांशी संपर्क साधून वाहनचालकांना त्रास होत असलेले व्हीएमडी काढून टाकण्यात येतील, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

वर्षभरानंतरही निर्णय प्रलंबित

स्मार्ट सिटी कंपनीने ‘स्मार्ट मिशन’अंतर्गत शहरात १६१ ठिकाणी ‘व्हीएमडी’ बसविण्याचा निर्णय घेतला होता. सध्या ११८ ठिकाणी व्हीएमडी बसविण्यात आले आहेत. ‌उर्वरित ठिकाणी व्हीएमडी बसविण्याचा निर्णय स्मार्ट सिटीने घेतला आहे. त्यासाठीच्या जागाही महापालिका अधिकाऱ्यांच्या संमतीने अंतिम करण्यात आली होती. परंतु, हे व्हीएमडी बसविण्यासाठी महापालिका प्रशासनाने लेखी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीकडून हे ‘व्हीएमडी’ बसविण्यासाठी महापालिकेकडून परवानगी मिळावी; म्हणून वारंवार विनंती करण्यात येत आहे. महापालिकेने वर्षभरानंतरही त्यावर निर्णय घेतलेला नाही.