पुणे-जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरराव यादव यांच्या स्मरणार्थ पुणे लष्कर भागातील नवा मोदीखाना भागातील पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या महर्षी अण्णासाहेब शिंदे प्राथमिक शाळेस दोन संगणक भेट देण्यात आले . यावेळी महर्षी अण्णासाहेब शिंदे यांच्या म्युरल्सचे उदघाटन पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रियांका श्रीगिरी यांच्याहस्ते करण्यात आले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रियांका श्रीगिरी , कार्यक्रमाचे संयोजक व स्थानिक नगरसेवक अतुल गायकवाड , ऍड. प्रशांत यादव , सचिन यादव , नगरसेवक दिलीप गिरमकर , माजी नगरसेवक डॉ. भरत वैरागे ,शाळेच्या मुख्याध्यापिका विमल धुमाळ , शशिधर पुरम , विनायक काटकर , मनीष साळुंके , विकास भांबुरे , दिलीप भिकुले , सीमा गायकवाड , झाकीर कुरेशी , अशोक चेटपेल्ली निलेश कणसे , विक्रम मोरे आदी मान्यवर उपस्थित होते . या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक शाळेच्या मुख्याध्यापिका विमल धुमाळ यांनी केले तर सूत्रसंचालन मनिष खंडागळे यांनी केले तर आभार नगरसेवक अतुल गायकवाड यांनी मानले