पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्यावतीने अनधिकृत बांधकाम पाडण्यात अडसर निर्माण केल्याप्रकरणी हडपसर व हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हदीत्तील ३५ जणांवर दि.२२ पर्यंत जून २०१८ पर्यंत एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबधित सर्व बांधकामाचा व्यवसाईक व रहिवाशी जागेसाठी वापर केला जात होता.
महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम (MRTP) १९६६च्या कलम ५२,५३,५४,५५ व १८ अन्वये भारतीय दंडसाहिंता कलम ३४ प्रमाणे बांधकाम नियमितीकरणाचे कागदपत्रे हजार न केल्यामुळे संबधित अनधिकृत
बांधकाम धारकांवर कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकाम धारकांना बांधकाम सुरु अवस्थेत असताना थांबविण्यासाठी वारंवार नोटीसा व तोंडीसूचना बजविण्यात आल्या होत्या, तरी देखील अनधिकृत बांधकामधारकाने बांधकाम सुरु ठेवले होते.
सदरील अनधिकृत बांधकाम कारवाई नऱ्हे, मारुंजी, मांजरी या भागात करण्यात आली आहे. ही कारवाई वास्तूविशारद, अभियंता, स्ट्रक्चरल अभियंता, मालक व विकसक यांच्यावर करण्यात आली आहे. सदरील गुन्हा हा अजामीनपात्र आहे. या गुन्ह्यामध्ये ५ हजार रुपये पर्यत दंड व ३ वर्षापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते.
अनधिकृत बांधकाम पथक १ व २ मार्फत सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. सदर प्रक्रिया पोलीस अधीक्षक सारंग आवाड व अतिरिक्त जिल्हाधिकारी अनधिकृत बांधकाम विभागचे मिलिंद पाठक तसेच उपजिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पाच महिन्यात ०१ लाख ०५ हजार चौरसफूट अनधिकृत बांधकामांवर कार्यवाही
जानेवारी २०१८ पासून ०१ लाख ०५ हजार चौरसफूट बांधकाम पाडण्यात आले आहे. तर २२ लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच नोंदणी महानिरीक्षक व महावितरण कार्यालयाना अनधिकृत बांधकाम नोंदणी केली जाऊ नये यासाठी विनंती करण्यात आली आहे.
पीएमआरडीए हद्दीतील ३१/१२/२०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकाम नियमितीकरणासाठी जानेवारी २०१८ पासून ७५ अर्ज प्राप्त झाले आहेत. सदरची मुदत चार महिने २१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत वाढून देण्यात आली होती.
आयुक्त किरण गित्ते यांनी अनधिकृत बांधकाम कारवाई सुरु राहणार असल्याचे सांगितले. अनधिकृत बांधकाम खरेदी करताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. अनधिकृत सदनिका खोटी माहिती देऊन स्वस्त
दराचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. नागरिकांचे आर्थिक नुकसान टळावे याकरिता नागरिकांनी जागरूक राहावे. नागरिकांनी शहानिशा करूनच सदनिका खरेदी कराव्यात असे आवाहन पीएमआरडीएच्यावतीने करण्यात आले आहे.
अनधिकृत बांधकामे पाडण्यात अडसर ,पीएमआरडीएने केले ३५ जणांवर गुन्हे दाखल
Date: