Home Blog Page 3122

भाग्य प्राप्तीसाठी वारकर्‍यांनी गुरू भक्ती करावी- ह.भ.प.श्री. गणपत महाराज

पुणे : “गुरू भक्ती केली तर देव वारकर्‍यांना सर्व सुखे प्राप्त करून देते. भक्तीचे फळ व भाग्य त्याला मिळणारच. त्यामुळे पंढरपुरची वारी करतांना वारकर्‍यांच्या मुखात सदैव पांडुरंगाचे नामस्मरण असावे.” अशा प्रकारे गुरू किती महत्वाचा आहे हे आळंदी देवाची येथील ह.भ.प. श्री. गणपत महाराज जगताप यांनी आपल्या प्रवचणात वारकर्‍यांना समजावून सांगत होते.

विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्‍वर-तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्‍वरूप दर्शन मंच, श्री क्षेत्र आळंदी येथे पालखी सोहळा प्रस्थानाच्या निमित्ताने युनेस्को अध्यासन अंतर्गत लोकशाही, मानवाधिकार, शांती व सहिष्णुतेसाठीचा लोकशिक्षणाचा अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रथम पुष्प गुंफतांना ते बोलत होते.

यावेळी सौ. उर्मिला विश्‍वनाथ कराड, ह.भ.प.डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर, पं.उध्दवबापू आपेगांवकर, श्रीमती उषाताई जोगळेकर, महेश महाराज नलावडे, व श्री. शालीकराम खंदारे हे उपस्थित होते.

ह.भ.प.श्री.गणपत महाराज जगताप म्हणाले, गुरूचा महिमा अपरंपार आहे. अंतःकरण शुध्द असेल, तर भक्ती ही सरळ व मधुर होते. खरे म्हणजे देवापेक्षाही गुरू श्रेष्ठ आहे कारण देव प्रसन्न झाला तर धन दौलत मिळेल. पण गुरू प्रसन्न झाला, तर प्रत्यक्ष देवच प्राप्त करून देईल. गुरू आपल्या हदयात असेल, तर या संसाराच्या चक्रातून तो आपली सुटका करेल. त्यासाठी विविकाने त्याच्या बद्दल विशेष आदराने वागावे. तो आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतो त्यामुळे आपल्या दृष्टीला चांगली दिशा मिळते. त्यातून जमीनीत दडलेल्या ज्ञानरूपी द्रव्याचा ठेवा दिसू लागतो. त्याच्या कृपेने आपले सर्व हेतू पूर्ण होतात.

तसेच, पर्यावरणाविषयी सुद्धा संतांनी जागृती केली आहे. त्यांना झाडे झुडपे व पशू पक्षी आपले नातेवाईक आहेत असेच वाटते. जणू काय आकाशाचा मंडप व पृथ्वीचे आसन यामध्ये आपले मन रमुन जाते. वार आपल्याला सुखवितो. आपले मन आपोआपच स्वतःशी संवाद करून देवाच्या भक्तीकडे वळते.

ह.भ.प.श्री.ज्ञानेश्‍वर माऊली वाबळे गुरूजी म्हणाले,“एकदाका भाविक भक्त वारीत सामील झाला, की त्याला व्यसनांचा सुद्धा विसर पडतो. टाळ मृदुगाच्या साथीत तो जेव्हा भजन करीत पाऊले टाकतो, तेव्हा आपल्या शेजारी कोण आहे याच्या जातीची तो अजिबात चौकशी करीत नाही. कारण विठ्ठलाचा भक्त एवढी एकच जात त्याला माहित असते.”

या नंतर संगीत अलंकार ह.भ.प.श्री. राधाकृष्ण गरड गुरूजी यांचा भक्ती स्वरगंध हा अभंगवाणीचा कार्यक्रम झाला.

वरील कार्यक्रमाचा इंद्रायणीच्या दोन्ही तीरावरील लाखों वारकर्‍यांनी अध्यात्मिक अनुभतीचा लाभ घेतला.

एफसी पुणे सिटी संघात मार्को स्टॅंकोवीक, दिएगो कार्लोस यांचे पुनरागमन

पुणे: राजेश वाधवान समूह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने ऑस्ट्रीयन मध्यरक्षक मार्को स्टॅंकोवीक व ब्राझीलचा फॉरवर्ड दिएगो कार्लोस यांना 2018-19 या मौसमासाठी संघात कायम राखण्याची घोषणा केली.

एफसी पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल म्हणाले कि, मार्को हा उत्तम मध्य फळीतील खेळाडू आहे. त्याच्यामध्ये फळीतील नियंत्रण व निर्णय घेण्याची क्षमता वाखानण्याजोगी आहे. मागील मौसमात मार्कोने मौसमाच्या मध्यात संघात प्रवेश केला होता. या वेळी संपुर्ण मौसमात स्वतःला सिध्द करण्याची संधी मिळाली आहे. दिएगोने गेल्या मौसमात जवळपास सर्व सामन्यांमध्ये आपले कौशल्य दाखवले. त्याचा अल्फारो व मार्सेलीन्हो यांच्या बरोबरचा ताळमेळ उत्तम आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या आघाडीच्या फळीवर दबाव निर्माण करण्याचा त्याच्याकडे हातखंडा आहे.

मार्कोने आपल्या कारकीर्दीची सुरूवात 1991 साली डीएसव्ही लिओबेन बॅक संघातून केली. यू.एस. ट्रीस्टिना कॅलसियो, एसके स्टर्म ग्राझ आणि ऑस्ट्रिया या संघांकडून खेळताना मार्कोने एक लीग स्पर्धा जिंकली. यानंतर त्याने युरोप लीग, युईएफए चॅम्पियंस् लीग स्पर्धा जिंकल्या. मार्कोने ऑस्ट्रियन ज्युनियर व सिनियर राष्ट्रीय संघाचेही प्रतिनिधित्व केले. गतवर्षी मार्कोने स्टॅलीयनस् साठी 10 सामने खेळला.

दिएगोने आपल्या कारकिर्दीची सुरूवात फ्यामेंगो संघासोबत केली. ब्राझीलमध्ये दोन वर्षे खेळल्यानंतर दिएगो रशियन नॉशनल लीगमध्ये निझनी नोगोरोड संघासाठी 10 गोल केले. गेल्या मौसमात दिएगोने एफसी पुणे सिटी संघासाठी 18 सामन्यात 2 गोल केले.

यावेळी मार्को म्हणाला की, गेल्या मौसमात मी मध्यातून संघात सामिल झालो होतो. या मौसमात सुरुवातीपासूनच संघात सामिल झाल्याने संघात स्थिरावण्यासाठी मला अधिक वेळ मिळाला आहे. एक बचावात्मक आणि सर्जनशील मिडफिल्डर असल्याने मला खात्री आहे की प्रत्येक पासचा मी योग्य उपयोग करेल व मी ऑरेंज आणि पर्पल जर्सी परिधान करण्यासाठी उत्सुक आहे.

संघात पुन्हा सामिल झाल्याबद्दल उत्साही दिएगो म्हणाला की, गेला मौसम अतिशय उत्कृष्ट होता. गेल्या मौसमात संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. मी त्या एक भाग असल्याचा मला अभिमान वाटतो. या नवीन मौसमासाठी मी उत्सुक आहे. या नवीन मौसमात संघ व चाहत्यांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करेल.

कल्याण ज्वेलर्सचा वार्षिक सेल ७ जुलैपासून

घडणावळीवर २५ टक्के सवलत, सोन्याचे नाणे मोफत, स्क्रॅच करा आणि जिंका कूपन, आणि जुन्या सोन्याचे १०० टक्के मूल्य

 पुणे- : जडजवाहीर आणि दागदागिन्यांमधील सर्वात विश्वासार्ह आणि आघाडीचा ब्रॅण्ड असलेल्या कल्याण ज्वेलर्सने बहुप्रतिक्षित `कल्याण वार्षिक सेल`च्या निमित्ताने आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. ७ ते १७ जुलै या कालावधित कल्याण ज्वेलर्सच्या भारतातील कोणत्याही आऊटलेटमध्ये जाऊन ग्राहक या ब्रॅण्डने खास तयार केलेल्या ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.

विश्वासार्हता आणि पारदर्शकता अशी कल्याण ज्वेलर्स या ब्रॅण्डची ओळख असून दागिन्यांची पारख असलेल्यांच्या गरजा जाणून उच्च प्रतीची शुद्धता, डिझाईन आणि दर्जाला प्राधान्य देतो. म्हणूनच, ११ दिवसांच्या वार्षिक सेलदरम्यान कल्याण ज्वेलर्सने आपल्या सर्व ग्राहकांसाठी जुन्या सोन्याला १०० टक्के मूल्य देण्याची ऑफर्स आणली आहे.

लग्नसराईचा मोसमही जवळ येऊन ठेपला आहे. आपण सुंदर दिसावे, असे प्रत्येक वधूला वाटत असते, हे कल्याण ज्वेलर्सला जाणून आहे. साखरपुडा आणि विवाहसोहळ्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी कल्याण ज्वेलर्सने ५० ग्रॅमहून अधिक सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मूल्यवर्धित शुल्कात (किंवा घडणावळीत) २५ टक्के सवलत देऊ केली आहे.

भारतामध्ये सोन्याची खरेदी शुभ मानली जाते. म्हणूनच २५,००० रुपयांच्या रत्नजडित दागिन्यांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सोन्याचे नाणे मोफत दिले जाईल. याशिवाय, ५०,००० रुपयांपेक्षा जास्त खरेदी करणारे ग्राहक `स्क्रॅच करा आणि जिंका` स्पर्धेत सहभागी होऊन इलेक्ट्रॉनिक्स, गृहोपयोगी यापासून वेअरेबल टेक्नॉलॉजीपर्यंतची आकर्षक बक्षिसे जिंकता येतील.

कल्याण ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक टीएस कल्याणरामन यांनी या सेलबद्दल सांगितले की, `कल्याण ज्वेलर्समध्ये आम्ही जे काही करतो, त्याच्या केंद्रस्थानी आमचे ग्राहकच असतात आणि त्यांची जी काही निकड आहे ती, पूर्ण करण्यासाठी आम्हाला जे-जे शक्य आहे, ते आम्ही निश्चितच करतो. त्यांना अत्यंत वाजवी किमतीत उत्कृष्ट उत्पादन देऊ करतो. हेच ध्यानी घेऊन, आम्ही `कल्याण वार्षिक सेल`ची घोषणा करीत आहोत. या सेलच्या निमित्ताने ग्राहकांना आपल्या मनपसंत दागिन्यांच्या खरेदीवर काही आकर्षक सवलती मिळतील. जुन्या सोन्याला १०० टक्के भाव, मूल्यवर्धित शुल्कावर २५ टक्के सवलत, सोन्याचे नाणे मोफत, स्क्रॅच करा आणि जिंका स्पर्धा यांचा त्यात समावेश आहे. प्रत्येक महिलेकडे आपले स्वत:चे असे सवोत्तम दागिने असावेत आणि या ऑफरच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांना कल्याण ब्रॅण्डचे कलाकुसरीचे आणि उत्कृष्ट दागिने करण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत.`

कल्याण ज्वेलर्सच्या देशभरातील सर्वच शोरूममध्ये ७ जुलै रोजी सुरू होणारा हा वार्षिक सेल १७ जुलै २०१८ पर्यंत असेल. मुहूर्त हे लोकप्रिय वेडिंग कलेक्शन तसेच कल्याणचे वैशिष्ट असलेले तेजस्वी, निमाह, मुद्रा, झिया, रंग, अनोखी, ग्लो वगैरे ब्रॅण्ड्स देखील या सेलच्या काळात उपलब्ध आहेत.

कल्याण ज्वेलर्सविषयी माहिती –

केरळच्या थ्रिशूर येथे मुख्यालय असलेले कल्याण ज्वेलर्स हे दागिनेनिर्मिती आणि वितरणाच्या बाबतीत भारतातील मोठे नाव आहे. गेल्या सुमारे शंभर वर्षांपासूनच्या वस्त्रोद्योग व्यापार, वितरण आणि घाऊक विक्री याद्वारे कंपनीने आपली पाळेमुळे घट्ट रुजवली आहेत. १९९३मध्ये आपले पहिले सराफाचे दुकान सुरू करणाऱ्या कल्याण ज्वेलर्सने दोन दशकांहून अधिक काळात भारतीय बाजारपेठेत स्वत:चे वेगळे अस्तित्व सिद्ध केले आहे. दर्जा, पारदर्शकता, किंमत आणि नाविन्यता याबाबतीत कल्याण ज्वेलर्स हे या उद्योगात मापदंड ठरले आहे. सोने, हीरे आणि किमती खड्यांच्या दागिन्यांचे पारंपरिक आणि सध्याची नानाविध डिझाईन्स उपलब्ध करून कल्याण ज्वेलर्सने ग्राहकांना समाधान दिले आहे. पश्चिम आशिया आणि भारतात कल्याण ज्वेलर्सची १२२ शोरूम्स आहेत.

लोकशाही रुजविण्यासाठी तरुणांनी व्यवस्थेमध्ये सहभागी व्हावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

नागपूर : देशाची लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक घटकाला चेक अँड बॅलन्स असणारी देशाची लोकशाहीची रचना सुंदर आहे. प्रशासकीय व्यवस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून ही व्यवस्था सुरू असून ती रुजविण्यासाठी लोकशाहीचे सेवक म्हणून तरुणांनी या व्यवस्थेमध्ये सहभागी व्हावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

48 व्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या अभ्यास वर्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, संसदीय मंडळाचे खजिनदार आमदार आशिष शेलार आदी उपस्थित होते.

नागपुरात होणारे हे 4 थे पावसाळी अधिवेशन असून याची नोंद इतिहासात होणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जगातील इतर देशांपेक्षा आपल्या देशाची लोकशाही व्यवस्था ही वेगळी आहे. संसदीय प्रणाली, प्रशासकीय प्रणाली व न्याय व्यवस्था या लोकशाहीच्या तीनही स्तंभांवर नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था यामध्ये केली आहे. लोकशाही व्यवस्थेत या सर्व घटकांना अमर्याद अधिकार दिले असले, तरी प्रत्येक अमर्याद अधिकाराची मर्यादा संविधानाने ठरवली आहे. असे हे आगळे वेगळे संविधान दिल्याबद्दल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार मानले पाहिजेत. अशा या समृद्ध लोकशाहीसाठी ती जाणणारे, त्यामध्ये रुची असणारे व त्याची दिशा ठरविणाऱ्या तरुणांचा सहभाग आवश्यक आहे.

समाजातील शेवटच्या माणसाचा आवाज पोचविण्यासाठी विधिमंडळाच्या सभागृहात प्रत्येक घटकाचा प्रतिनिधी असतो. सामान्य माणसांच्या प्रश्नासंदर्भात लोकप्रतिनिधीला संवेदनशील रहावे लागते. अन्यथा विधिमंडळात त्याला उत्तर द्यावे लागते. विविध संसदीय आयुधांचा वापर करून सभागृहात सामान्यांच्या प्रश्नांवर वाचा फोडली जाते. महाराष्ट्राच्या विधिमंडळाने देशात आपला दर्जा, वेगळेपण राखले आहे, असे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.

सभापती श्री. नाईक निंबाळकर म्हणाले, भारतीय लोकशाही व्यवस्थेची माहिती 21 व्या शतकातील तरुणांना व्हावी, यासाठी संसदीय राष्ट्रकुल मंडळाच्या अभ्यासवर्गाची आवश्यकता आहे. लोकशाही व्यवस्थेत तरुणांच्या विचारांची माहिती या संसदीय मंडळाच्या अभ्यासवर्गातून पुढे आली पाहिजे.

विधान सभा अध्यक्ष श्री. बागडे म्हणाले, राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास करत असतानाच ग्रामीण भागाला वगळता येणार नाही. ग्रामीण जनजीवन सुधारण्यासाठी, या भागातील नागरिकांना आर्थिक सुबत्ता येण्यासाठी संशोधन, विचार होणे गरजेचे आहे.

आमदार श्री. शेलार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे उपस्थित होते. या अभ्यासवर्गात राज्यातील अकरा विद्यापीठातील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयाचा अभ्यास करणारे 72 विद्यार्थी-विद्यार्थिनी व प्राध्यापक सहभागी झाले आहेत. आठवडाभर चालणाऱ्या या अभ्यासवर्गात विविध विभागाचे मंत्री यांच्यासह विविध विषयावरील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विधिमंडळाचे कामकाजही या विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

आमदार टिळेकरांनी,विरोधकांच्या टीकेचा घेतला खरपूस समाचार -कात्रज कोंढवा रस्ता प्रकरण (व्हिडीओ)

पुणे- रखडलेल्या कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामा प्रकरणी कामापेक्षा टक्केवारीतच भाजपच्या पदाधिकाऱ्यांना रस आहे असा आरोप काल महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी केल्यानंतर आज या टीकेचा खरपूस समाचार भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांनी घेतला आहे . राष्ट्रवादीच्या सत्ता काळात यांनी काय केले ? असा सवाल करत आता कात्रज कोंढवा  रस्ता  आमच्या काळात होतो आहे असे दिसल्यावर यांचे पोट दुखते आहे असे ते म्हणाले ..नेमके आमदार योगेश टिळेकर यांनी काय म्हटले आहे ते पहा आणि ऐका ….

कोयना प्रकल्पग्रस्तांना नवी मुंबईत वाटप केलेल्या जमीन प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करणार- मुख्यमंत्र्यांची विधान सभेत घोषणा

0

नागपूर : राज्यातील प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करण्याबाबत समग्र धोरण तयार करण्यात येणार असून कोयना प्रकल्पग्रस्तांना नवी मुंबईत वाटप करण्यात आलेल्या जमिनीच्या प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान सभेत केली. या प्रकरणी विरोधी पक्षाने केलेले आरोप चुकीचे आहेत. प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटपाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. त्यासंदर्भातील कुठलीही फाईल मुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्याकडे येत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

विधान सभेत नियम 97 अन्वये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यासंदर्भात चर्चा उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री म्हणाले, कोयना प्रकल्पग्रस्तांना रायगड जिल्ह्यात पाच ठिकाणी 751 प्रकल्पग्रस्त आहेत. रायगड जिल्ह्यात 311 प्रकल्पग्रस्तांना पूर्णत: व 316 प्रकल्पग्रस्तांना अंशत: अशा 627 कोयना प्रकल्पग्रस्तांना जमीन देण्यात आली आहे. हे जमीन वाटपाचे अधिकार अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना असून 2001 च्या अधिनियमानुसार प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करण्यात आली आहे.

प्रकल्पग्रस्तांना वर्ग 1 च्या जमिनी देण्याचा निर्णय 2012 मध्येच घेण्यात आला असून त्याचे वाटपाचे अधिकार अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. कोयना प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेली जमीन ही राज्य शासनाची असून सिडको त्याचे नियोजन प्राधिकरण आहे. या जमीन वाटप प्रकरणाशी महसूल, नगरविकास विभागाचा संबंध नाही. या प्रकरणांची फाईल मंत्रालयात येत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोयना प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या जमीन प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल. त्याचप्रमाणे यापूर्वी केलेल्या जमीन वाटपाच्या 200 प्रकरणांची देखील चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गतच्या अनुदानासाठी 14 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

0

 

पुणे : डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत सन 2018-19 या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरसांनी अल्पसंख्यांक विकास विभागाकडील  दि. 11 ऑक्टोबर 2013 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमुद केल्याप्रमाणे प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकारी कार्यालय, विशेष कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, पुणे शहर, अ इमारत, 2 रा मजला, पुणे स्टेशन, येथे दिनांक 14 ऑगस्ट 2018 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत. त्यानंतर प्राप्त झालेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे विशेष कार्यकारी दंडाधिकारी हेमंत निकम यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

महिंद्रा इलेक्ट्रिक आणि झूमकार यांच्यातर्फे ‘सेल्फ ड्राइव्ह’ आणि ‘झॅप सबस्क्रिप्शन’साठी पुण्यात ‘इटूओ-प्लस’ची ऑफर

  • पुण्यातील ‘झूमकार’च्या प्रकल्पासाठी ‘महिंद्रा’तर्फे ‘इटूओ-प्लस’ या मॉडेलच्या 50 गाड्यांचा प्रस्ताव
  • ‘झूमकार’च्या ‘झॅप’ सेवेसाठी आणि ‘सेल्फ-ड्राईव्ह’ सुविधेसाठी ‘महिंद्रा इटूओ-प्लस’ उपलब्ध
  • म्हैसूर, हैदराबाद, जयपूर, नवी दिल्ली, मुंबई आणि कोलकातानंतर पुणे येथेही या सेवेचे नियोजन

पुणे : महिंद्रा उद्योगसमुहातील महिंद्रा इलेक्ट्रिक आणि शेअरिंग मोबिलिटी क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी कंपनी झूमकार यांनी विद्युत वाहनांच्या माध्यमातून आपल्या सेवा विस्तारित करण्याची घोषणा संयुक्तपणे केली आहे. या कंपन्या ‘इटूओ-प्लस’ मॉडेलची 50 वाहने पुणेकरांसाठी उपलब्ध करणार आहेत. ‘सेल्फ ड्राईव्ह’ व ‘झॅप’ योजना या दोन्ही पध्दतीने ही वाहने नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.  कोणतेही डाऊन पेमेंट, विमा व इतर सेवा यांच्यासाठी पैसे न मोजता महिन्याकाठी केवळ 9,999 रुपये भरून ग्राहकांना ‘इटूओ-प्लस’ ही कार ‘झॅप सबस्क्राईब’ पध्दतीने वापरावयास मिळते.

पुण्याच्या महापौर श्रीमती मुक्ता टिळक आणि पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत या मोटारींना हिरवा झेंडा दाखविण्यात आला. केंद्र सरकारच्या नीती आयोगाने 2030 या वर्षीपर्यंत देशात सर्वत्र विद्युत वाहनांच्या प्रसाराचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्या धोरणाच्या अनुषंगाने महिंद्रा व झूमकार यांनी हा उपक्रम राबविला आहे. पुणे हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असल्याने, तसेच आयटी क्षेत्रातील मोठे केंद्र बनले असल्याने या शहरात योजनेचा शुभारंभ करण्याचे महिंद्रा व झूमकार यांनी ठरविले.

या प्रसंगी बोलताना’ महिंद्रा इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू म्हणाले, “अधिकाधिक नागरिकांना विद्युत मोटारींची सेवा मिळावी, या उद्देशाला महिंद्रा इलेक्ट्रीक आणि झूमकार या दोन्ही कंपन्या एकत्रितपणे हातभार लावीत आहेत. पुण्यात ‘झूमकार’च्या ‘शेअर्ड मोबिलिटी’साठी आमच्या विद्युत मोटारी उपलब्ध करून देऊन आम्ही त्या प्रथमच सादर करीत आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्रात विद्युत मोटारींच्या धोरणाची घोषणा झाल्यानंतरचा हा पहिलाच उपक्रम आहे. विद्युत वाहनांचा जलद गतीने प्रसार व्हावा, या महाराष्ट्र राज्याच्या ध्येयात आम्ही सहभागी आहोत.

झूमकारचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग मोरन या प्रसंगी म्हणाले, की ‘महिंद्रा इलेक्ट्रिक’बरोबर पुन्हा एकदा सहभागी होण्यात आणि पुणेकरांना नावीन्यपूर्ण योजनेद्वारे पर्यावरणपूरक अशी सेवा देण्यात आम्हाला आनंद वाटतो. प्रथम आमची पीईडीएल सायकल सेवा आणि आता आमचे विद्युत वाहन स्वीकारून पुणे शहराने मोबिलीटी क्षेत्रातील नव्या योजना राबविण्यात आपण अग्रेसर असल्याचे दाखवून दिले आहे.

झूमकार व लीजप्लॅन या दोन कंपन्यांच्या अर्थसाह्यातून हा पुण्यातील उपक्रम उभा राहात आहे. महिंद्रा फायनान्स या कंपनीद्वारे या उपक्रमाला इतर शहरांमध्ये अर्थसाह्य देण्यात येईल.

 महिंद्रा इलेक्ट्रिकविषयी:

20.7 अब्ज डॉलची उलाढाल असणाऱ्या महिंद्रा उद्योगसमुहातील महिंद्रा इलेक्ट्रिक ही कंपनी आहे. विद्युत वाहने विकसीत करून त्यांचे उत्पादन करण्यात सध्या जगात आघाडीवर असलेली महिंद्रा इलेक्ट्रिक ही देशातील अशा स्वरुपाची एकमेव कंपनी आहे. जागतिक दर्जा असलेली विद्युत वाहने या कंपनीद्वारे भारतातच बनविण्यात येतात. ‘इटूओ-प्लस हॅच’, ‘इ-व्हरिटो सेदान’ आणि ‘इ-सुप्रो मिनी व्हॅन’ व ‘पॅनेल व्हॅन’ या श्रेणी सादर करून महिंद्रा समुहाने आपली विद्युत वाहनांप्रती असलेली कटिबध्दता दर्शविली आहे.

तंत्रज्ञान व नावीन्यपूर्ण कल्पना यांचा एकत्रित उपयोग करून महिंद्राने मोबिलिटी क्षेत्रात प्रत्येक टप्प्यावर क्रांती केली आहे. सकारात्मक बदलाच्या इच्छेचा दृष्टीकोन बाळगत, शाश्वत स्वरुपाच्या कल्पनांचे द्रष्टेपण असणाऱ्या महिंद्रा समुहाने पर्यायी तंत्रज्ञानाचीही कास धरली आहे व स्वच्छ, हरीत व स्मार्ट भवितव्याकडे दमदार वाटचाल सुरू केली आहे.

महिंद्रा विषयी:

महिंद्रा उद्योगसमुहाची एकूण उलाढाल 20.7 अब्ज डॉलर इतकी आहे. नावीन्यपूर्ण मोटारी व एसयूव्ही बनविणे, ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून ग्रामीण प्रगतीला चालना देणे, नवीन व्यवसायांची जोपासना करणे, हे या समुहाचा उद्दीष्ट आहे. तसेच युटिलिटी मोटारी, माहिती तंत्रज्ञान, अर्थसेवा आणि पर्यटनविषयक सेवा आदी उद्योगांमध्ये हा समूह कार्यरत आहे. महिंद्रा समुहातर्फे जगात सर्वाधिक संख्येने ट्रॅक्टर बनविले जातात. कृषी उद्योग, हवाई उद्योग, व्यावसायिक वाहनांची निर्मिती, सुट्या भागांचे उत्पादन, संरक्षणविषयक उत्पादने, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, अपारंपारीक ऊर्जा, स्पीडबोट, पोलाद उत्पादन अशा इतरही अनेक क्षेत्रांमध्ये महिंद्र उद्योगसमूह आपले पाय रोवून आहे. शंभर देशांमध्ये या समुहाच्या विविध कंपन्या आहेत व त्यांमध्ये दोन लाखाहून अधिक कर्मचारी काम करतात.

आषाढी वारीत अन्न सुरक्षा व स्वछता अभियान राबविणार-पालकमंत्री गिरीश बापट

पुणे :-  आषाढी वारीत अन्न  सुरक्षा व स्वछता अभियान राबवणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज येथे केले. श्री क्षेत्र देहू येथे पालखी अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या, श्री क्षेत्र देहू व आळंदी येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारीच्या मार्गावरील अन्न विक्रेते व अन्न छत्र चालवणाऱ्यांच्या प्रबोधनासाठी ” परिवर्तन अन्न सुरक्षा व स्वच्छता अभियान” सुरु करण्यात आले आहे. या्अभियानाद्वारे दोन चित्ररथांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. या चित्ररथाचा शुभारंभ पालकमंत्री यांच्याहस्ते  करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

देहू, आळंदी येथून निघणाऱ्या पालख्यांमध्ये महाराष्ट्रासह विविध प्रांतातून मोठया प्रमाणावर भाविक सहभागी होत असतात. या पालखीसोहळा कालावधीत पालखी मार्गावर हॉटेल, रेस्टॉरंट, फिरते विक्रेते हे अन्न पदार्थांची विक्री करत असतात. तसेच या कालावधीत सेवा भावी संस्था, सेवाभावी व्यक्ती, भाविकांना अन्न पदार्थ मोफत देत असतात. या अभियानाच्या माध्यमातून अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने अन्नछत्राच्या तपासण्या करून वारकरी व भाविकांना सुरक्षित  व स्वच्छ अन्न उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचबरोबर अन्न व्यावसायिकांची सुरक्षा व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.  देहू ते पंढरपूर व आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मार्गावर अन्न प्रशासन, कोकाकोला इं. लि. आणि नेस्ले इं. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सुरक्षित अन्न पदार्थ तयार करण्याबाबत तसेच अन्न सुरक्षेबाबत तज्ञ प्रशिक्षक व अन्न सुरक्षा अधिकारी प्रशिक्षण देणार आहेत. या अन्न व्यावसायिकांना  हातमोजे, टोपी,अॅप्रन,आदींचा समावेश असलेले हायजिन किटचे मोफत वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यास प्रारंभ

पुणे: श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाचा शुभारंभ पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री.गिरीश बापट यांनी सपत्निक महापुजा करुन, आज श्री क्षेत्र देहू येथे केला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमर साबळे, आ.संजय भेगडे, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब ऊर्फ पंढरीनाथ मोरे, पालखी सोहळा प्रमुख सर्वश्री सुनिल मोरे, विठ्ठल मोरे, अशोक मोरे, अभिजीत बाळकृष्ण मोरे, जालिंदर मोरे, बबनराव पाचपुते,उपविभागीय अधिकारी ज्योती कदम उपस्थित होते.

मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात श्री क्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थान येथील मंदिरात माऊलींच्या पादुकांची पालकमंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते विधीवत पाद्यपूजा करण्यात आली. शिस्तबध्द पध्दतीने वारकऱ्यांनी केलेल्या टाळ-मृदुंगाच्या गजराने यावेळी सभोवतालचा परिसर दुमदुमला होता. पालखी प्रस्थानापूर्वी करावी लागणारी नैमेत्तिक कामांची तयारी मंदिर प्रशासनाच्यावतीने पूर्ण करण्यात आली होती.

पालखी सोहळयात सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, इंधन इत्यादी व्यवस्था पालखी सोहळा व्यवस्थापनातर्फे करण्यात आल्या आहेत. पालखीमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातील दिंडयाही सहभागी झाल्या आहेत. या दिंडयाच्या माध्यमातून निर्मल वारी-स्वच्छ वारी तसेच सामाजिक जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती पालखी व्यवस्थापनाने दिली.

पालखी प्रस्थानानंतर, श्री क्षेत्र देहू येथील इनामदार वाडयात पालखीचा मुक्काम राहणार असून त्यानंतर पुढील प्रवासासाठी पालखी मार्गस्थ होणार असल्याची माहिती यावेळी विश्वस्तांनी दिली. या सोहळयास वारकरी, नागरीक, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, महाविद्यालयीन युवक-युवती, स्वयंसेवक मोठया प्रमाणावर सहभागी झाले होते.

भक्त निवासाचे उदघाटन

श्री क्षेत्र देहू येथे पालखी सोहळयासाठी, वारकरी मोठया संख्येने सहभागी होत असतात. वारकऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या भक्त निवासाचे उदघाटन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. या भक्त निवास अठरा कक्षांमध्ये भाविकांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. भक्त निवासात भोजन कक्ष, सभा मंडप, वाहनांसाठी पार्कींग इत्यादी सोयी करण्यात आल्या आहेत.

समता भूमीत अंतरजातीय सत्यशोधक विवाह संपन्न

पुणे-
सागर शिंदे (पत्रकार)आणि मोहिनी भोसले या जोडीने समतभूमी (म.फुले वाडा) येथे आंतरजातीय विवाह सत्यशोधक विवाह केंद्राच्या माध्यमातूनसंपन्न झाला .
आंतरजातीय लग्न असल्यामुळे दोन्ही कुटुंबीयांचा सुरुवातीला या विवाहास विरोध होता. पण, दोघांनीही दोन्हीकडील मंडळींच्या घरच्यांची समजूत काढत कुटुंबियांच्या उपस्थितीत विवाह २ जुलै २०१८ रोजी दुपारी १ वाजता  संपन्न झाला..
डॉ बाबा आढाव व सचिन बगाडे यांनी नव दाम्पत्यास शपथ दिली तर ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी महात्मा जोतीराव फुले यांचे सत्याचे अखंड गायनही केले हा विवाह सत्यशोधक विवाह केंद्राच्या प्रमुख प्रा प्रतिमा परदेशी यांनी लावला. सहजीवनाचे प्रतीक असणारे आपट्याची पान वराने वधूला दिले. हि आदिवासी लग्नातील पद्धती सत्यशोधक विवाहात अवलंबिली जाऊ लागल्याचे विधिकार्त्या प्रतिमा परदेशी यांनी सांगितले. मंगल ओवी, सहजीवनाची शपथ असा साधा विधीने हा विवाह पार पडला. डॉ.आढाव यांनी वधु वर यांना संविधानाचे पुस्तक, रघुनाथ ढोक यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले प्रतिमा भेट दिली.
यावेळी डॉ.बाबा आढाव, यांच्या सह किशोर ढमाले, अंकल सोनवणे, सचिन बगाडे, आकाश ढोक यांच्यासह पुरोगामी चळवळीतील मान्यवर आणि अनेक पत्रकार उपस्थित होते

दत्तवाडी ठाण्यात निरोप आणि स्वागत समारंभ

पुणे-दत्तवाडी पोलीस स्टेशन मध्ये निरोप आणि स्वागत समारंभ  अनिल पाटील वरिष्ठ पो.निरीक्षक यांची दत्तवाडी पोलीस स्टेशन वरुन पुणे शहर वाहतूक शाखा येथे बदली झाली तर .रामचंद्र गायकवाड यांची वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी दत्तवाडी पोलीस स्टेशनला नेमणूक झाली.यानिमित्त दत्तवाडी ठाण्यातून  स्वागत व निरोप समारंभा साठी उपायुक्त मुंडे  , दत्तवाडी पो.स्टेशनचे पो.निरीक्षक व सर्व पोलीस कर्मचारी तसेच परिसरातील नगरसेवक आजी माजी ,विविध राजकीय,सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी   उपस्थीत होते.सर्वांनीच आपले मनोगत व्यक्त करताना पाटील यांनी  एक आदर्श अधिकारी महणून वेगळी ओळख निर्माण केली होती,त्यांचे प्रयत्नाने पोलीस चौकीसमोरील जागेत दत्तवाडी रहिवाशी संघाची छान वास्तू तयार होऊन त्याजागेत निरोप समारंभ अत्यंत दिमाखात साजरा झाला,पाटील यांनी यांनी कामातून आपला वेगळा ठसा निर्माण करून गुन्हेगारी मोट्या प्रमाणात कमी केली तसेच चोरांकडून माल शिताफीने हस्तगत करून  जनतेला परत केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक अनिल डफळ तर आभार प्रदर्शन इंदलकर कृष्ण यांनी केले . यावेळी नगरसेविका सरस्वती शेडगे यांनी कापडी बॅग सर्वाना भेट म्हणून दिली.यावेळी सुभाष जगताप,नितीन कदम,रघुनाथ ढोक,गणेश घोष ,व इतर मान्यवर उपस्थित होते

महापौर ,उपमहापौर यांच्या पीए सह ३१ कर्मचाऱ्यांच्या नेमणुकां संशयाच्या भोवऱ्यात ; ‘ते’ १९ सफाई कामगार केले बेरोजगार…

पुणे ; मायमराठी ने दिलेल्या वृत्तानुसार नगरसचिव कार्यालयात काम करणाऱ्या आणि 5 महिने पगार प्रलंबित ठेवलेल्या 19 सफाई कामगाराना अखेर डच्चू देवून त्यांना पुन्हा बेरोजगारीच्या खाईत ढकलल्या नंतर महापौर ;उपमहापौरांचे पीए यांच्यासह नगरसचिव कार्यालयातील आणखी 31जागांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नेमणुकांबद्दल देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचे स्पष्ट झाले आहे . हे 31 कामगार खरोखर महापालिकेचे अधिकृत कर्मचारी असतील तर त्यांच्या नेमणुका प्रत्यक्षात कागदोपत्री आहेत कुठे ? जिथे आहेत तिथे ते काम का करत नाहीत ?   ते ज्या जागांवर काम करतात तिथे अधिकृतपणे काम करतात काय ? या प्रश्नांची उत्तरे अद्याप कोणी दिलेली नाहीत .
गेल्यावर्षी मिळकतकर विभागात अनधिकृत पणे काम करणारा एक कर्मचारी ‘मायमराठी’ ने कॉंग्रेसचे गट नेते अरविंद शिंदे आणि नगरसेवक अविनाश बागवे यांच्या मदतीने रंगेहाथ पकडल्यानंतर   तत्कालीन मिळकतकर प्रमुख सुहास मापारी यांनी  त्यावर पोलीस कारवाई केली . मात्र भूमी जिंदगी विभागात  दुसरा अनधिकृतपणे काम करणारा कर्मचारी ‘माय मराठी’ ने नगरसेवक महेश वाबळे यांच्या मदतीने रंगेहाथ पकडून दिल्यानंतर तत्कालीन विभाग प्रमुख सतीश कुलकर्णी यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती .यानंतर महापालिकेच्या मुख्य भवनात विविध खात्यात ज्यांना अपाॅईंटमेंट लेटर नाही , अधिकृत पगार नाही अशा 72 कर्मचाऱ्यांची यादी ‘माय मराठी’ ने जाहीर केली होती . त्यामुळे या सर्वांना  आयत्याच कुठल्या तरी ठेकेदराच्या माथी मारून त्यांना कामावर दाखविण्याचे प्रयत्न त्यानंतर  झाले . म्हणजे तरुणाईला  अगोदर अनधिकृतपणे बिनपगारी कर्मचारी म्हणून राबवून घ्यायचे आणि नंतर उघड झाल्यावर त्यांना कंत्राटी कामगार  बनविण्यासाठी टेंडर ,ठेकेदार पद्धती अवलंबण्याचा प्रयत्न करायचा असा प्रकार सुरु असताना आता नगरसचिव कार्यालयातला आणखी मोठा कर्मचारी घोटाळा ‘माय मराठी ‘ पर्यंत पोहोचला आहे.
जानेवारी २०१८ पासून बिनपगारी १९ सफाई कर्मचारी नगरसचिव कार्यालयात काम करत असल्याचा प्रकार चव्हाट्यावर आणल्यानंतर त्यांचे प्रत्येकी ८ हजार रुपये महिना प्रमाणे पगार देण्या च्या हालचाली 2 दिवसांपूर्वी करण्यात आल्या .पण अखेरीस त्यांना बेरोजगार बनवून काढून टाकण्यात आले . स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालया पासून ते महापौर बंगल्यापर्यंत सफाईचे काम करणाऱ्यांची हि दुरावस्था खरोखर दयनीय होती .या सर्वांच्या जागांवर आता अन्य खात्यात काम करणारे 17 कर्मचारी पाचारण करण्यात आले आहेत.
त्यानंतर अधिक माहिती घेता …नगरसचिव कार्यालयातील हि सेवा ज्येष्ठता यादी आमच्या हाथी आली आहे .

पहा हि यादी .. आणि पहा यात स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे ,कोण कोणत्या जागा रिक्त आहेत ते …

 

 

…महापौर ,उपमहापौर यांच्या स्वीय सहायकाच्या म्हणजे पी ए च्या जागा देखील रिक्त असल्याचे त्यात स्पष्ट म्हटले आहे . अशा एकूण ३१ जागा रिक्त आहेत . परंतु प्रत्यक्षात या जागांवर विविध लोक काम करताना तर दिसत आहेत .हे गौड बंगाल काय आहे हे स्थायी समिती अध्यक्षांनी हि कायम झाकली मुठ आता उघडून सत्य बाहेर आणावे  अशी मागणी होते आहे . कामगार कायदे पाळले जातात काय / रिक्त जागांवर योग्य पद्धतीने नेमणुका/ भरती  केली जाते काय / या प्रश्नांकडे  लक्ष देवून  स्थायी समिती अध्यक्ष यांनी कामगारांच्या प्रश्नांवर आणि कामगार कायद्यातील तरतुदींबाबत योग्य ती तातडीने दक्षता घेवून कर्मचारी भरती विषयातला अंधार दूर करावा अशी मागणी होते आहे .

झी टॉकीज प्रस्तुत गजर कीर्तनाचा या खास कार्यक्रमाची ५०० भागांची पूर्ती

मराठी संस्कृती आणि मूल्य झी टॉकीजनी आपल्या प्रेक्षकांसाठी नेहमीच त्यांच्या सादरीकरणातून जपली आहे. झी टॉकीज प्रस्तुत ‘गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा’ म्हणजे भक्तजन आणि प्रेक्षक यांच्यासाठी भक्तिमय कीर्तनाची पर्वणीच. या सप्ताहापासून ते आषाढी एकादशीपर्यंत या कार्यक्रमात वारी विशेष भाग सादर करण्यात येणार आहेत आणि त्यानिमित्त प्रेक्षक विशेष कीर्तनाचा आनंद शकतील.

या कार्यक्रमाने नुकताच ५०० भागांचा टप्पा गाठला आणि योगयायोग असा आहे कि हा ५०० वा भाग आषाढी वारीसुरु होण्याचा आदल्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. झी टॉकीज प्रस्तुत ‘गजर कीर्तनाचा’ हा खास कार्यक्रम म्हणजे पांडुरंगाच्या नामस्मरणात व भजन-कीर्तनात दंग असलेली एक प्रकारची वारीचं आहे आणि या वारीने गेल्या वर्षभराहूनही अधिक काळात मजल-दरमजल करीत ५०० भागांचा टप्पा गाठला आहे.

या सप्ताहात या कार्यक्रमात ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज वाबळे कीर्तन सादर करणार आहेत. ते महाराष्ट्रातील एक जेष्ठ आणि समाजविमुख कीर्तनकार म्हणून ते ओळखले जातात. गेली ३५ वर्षे महाराष्ट्रभर व राज्याबाहेरही त्यांची कीर्तनसेवा अखंड सुरु आहे. ते या कीर्तनातून प्रेक्षकांशी सेवेची वारी या विषयावर संवाद साधणार आहेत.

 गजर कीर्तनाचा दररोज सकाळी ७.३० वाजता फक्त झी टॉकीज वर!!

आरेने सुरू केले आरे भूषण, ड जीवनसत्ताने युक्त असे सिंगल टोन्ड दूध

  • ड जीवनसत्व प्रौढांचे ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओमॅलाशिया, मधुमेह या विकारांपासून व लहान मुलांचे मुडदूस आजारापासून संरक्षण करते
  • गेल्या १० वर्षांत मुंबईभरात अस्थींशी निगडित आजारांच्या प्रमाणात वाढ

मुंबई:  वरळी येथील आरे डेअरीने  आरे भूषण हे ड जीवनसत्वाने समृद्ध असे सिंगल टोन्ड दूध बाजारात आणले आहे. मुंबईतील अनेकविध आरोग्यविषयक समस्यांचे कारण ठरलेल्या जीवनसत्व बी-१२ या सुक्ष्मपोषकाच्या कमतरतेवर उपाय म्हणून आरेने हे दूध आणले आहे. मुंबईतील एकूण लोकसंख्येपैकी ८७ टक्क्यांमध्ये ड जीवनसत्वाची कमतरता दिसून आली आहे.

सार्वजनिक आरोग्यापुढील या आव्हानाचा सामना करण्यासाठी वरळी येथील आरे डेअरीने आरे भूषण हे डीटू जीवनसत्वयुक्त दूध बाजारात आणले आहे. या सिंगल फोर्टिफाइड दुधाच्या प्रत्येक १०० मिलींमध्ये डीटूची किमान ५५ आंतरराष्ट्रीय एकके (आययू-इंटरनॅशनल युनिट) असणे अपेक्षित आहे.

आरे भूषणची स्पर्धात्मक किंमत प्रति लिटर ४० रुपये ठेवण्यात आली आहे. सिंगल टोन्ड फॉर्टीफाइड दुधांची दरश्रेणी ४२ ते ४३ रुपये लिटर असून, त्या तुलनेत आरे भूषण परवडण्याजोग्या किमतीत उपलब्ध करण्यात आले आहे. आरे भूषण ५०० मिलीच्या, २० रुपये किमतीच्या पॅकमधून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्र सरकारचे दुग्धविकास आयुक्त श्री. आर. आर. जाधव म्हणाले, “टाटा ्रस्ट्सच्या सहयोगाने मुंबईतील जनतेला पोषण सुरक्षा पुरवण्यास आम्ही उत्सुक आहोत. दूध हे सर्वाधिक सेवन केल्या जाणाऱ्या उत्पादनांपैकी एक असल्याने ते जीवनसत्वाने समृद्ध केल्यास या प्रदेशातील आहारामधील कमतरतांची समस्या हाताळण्यात लक्षणीय मदत मिळेल. अधिक निरोगी मुंबई हा अधिक निरोगी भारताचा कणा ठरेल.

टाटा ट्रस्टच्या पोषण विभागाचे कार्यक्रम संचालक डॉ. राजन संकर म्हणाले, “आपल्या राष्ट्राचे आणि सार्वजनिक आरोग्याचे सामूहिक भवितव्य सुधारण्यासाठी पोषणात गुंतवणूक हे एक पाऊल आहे. दूध पोषणसमृद्ध करणे (फॉर्टिफिकेशन) हे भारतातील सुक्ष्मपोषकांचे कुपोषण दूर करण्यासाठी अवलंबलेले धोरण आहे. भारतातील ड जीवनसत्वाच्या अभावाची राष्ट्रीय सरासरी चिंताजनक स्तरावर पोहोचली आहे. ग्राहकांच्या आरोग्य आणि पोषणासाठी दीर्घकालीन लाभ मिळवून देणारे शाश्वत उपाय पुरवण्यात टाटा ट्रस्ट आरे डेअरीला मदत करत आहे.    सिंगल टोन्ड दूध पोषणसमृद्ध करण्यासाठी आवश्यक जीवनसत्व डीटूच्या कोरड्या स्वरूपातील (प्री-मिक्स) पुरवठ्याचा खर्च टाटा ट्रस्ट दोन वर्षांसाठी उचलणार आहे.”

सुक्ष्मपोषकांच्या अभावाची समस्या हाताळण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून टाटा ट्रस्ट आरे भूषणच्या पोषणसमृद्धीसाठी (फोर्टिफिकेशन) पाठबळ देत आहे. नागरी भागातील सर्व शहरांत आढळणारी ड जीवनसत्वाची कमतरता दूर करण्याचा समावेशही यात होतो.

आरे भूषणचा वापर किती आहे याचा अंदाज घेण्यासाठी आणि त्यानुसार त्याच्या उत्पादनासाठी नियोजन करण्यासाठी, हे पोषणसमृद्ध दूध सुरुवातीचा महिनाभर मुंबई महानगर परिसरातील निवडक आरे सरिता स्टॉल्वर उपलब्ध होईल.

आरे भूषणविषयी

आरे भूषण आरे डेअरीचा हा सिंगल टोन्ड पोषणसमृद्ध दुधाचा नवीन ब्रॅण्ड असून हे दूध ड जीवनसत्वाने परिपूर्ण आहे. आरे भूषण मुंबई महानगर परिसरात केवळ आरे सरिताच्या रिटेल दुकानांमध्ये उपलब्ध आहे.

टाटा ट्रस्ट्सविषयी

१८९२ साली स्थापना झालेली टाटा ट्रस्ट्स ही भारतातील सर्वात जुनी सामाजिक संस्था असून लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी स्थापनेपासूनच ही कंपनी प्रयत्नशील आहे. संस्थापक जमशेटजी टाटा यांच्या सामाजिक दृष्टिकोन व तत्‍वांवर बेतलेली ही संघटना असून आरोग्य व पोषण, पाणी आणि स्‍वच्छता, शिक्षण, ऊर्जा, ग्रामीण विकास, शहरी गरिबीचे उच्चाटन, कला, हस्तकला आणि संस्कृती या क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणणे हे या कंपनीचे ध्येय आहे. टाटा ट्रस्ट्सचे सर्व उपक्रम थेट अमलबजावणी, भागीदारी आणि ग्रॅण्ट यातून यशस्‍वी झाले असून या उपक्रमांतून देशासाठी खास संशोधन साध्य केले जाते.