- ड जीवनसत्व प्रौढांचे ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओमॅलाशिया, मधुमेह या विकारांपासून व लहान मुलांचे मुडदूस आजारापासून संरक्षण करते
- गेल्या १० वर्षांत मुंबईभरात अस्थींशी निगडित आजारांच्या प्रमाणात वाढ
मुंबई: वरळी येथील आरे डेअरीने आरे भूषण हे ड जीवनसत्वाने समृद्ध असे सिंगल टोन्ड दूध बाजारात आणले आहे. मुंबईतील अनेकविध आरोग्यविषयक समस्यांचे कारण ठरलेल्या जीवनसत्व बी-१२ या सुक्ष्मपोषकाच्या कमतरतेवर उपाय म्हणून आरेने हे दूध आणले आहे. मुंबईतील एकूण लोकसंख्येपैकी ८७ टक्क्यांमध्ये ड जीवनसत्वाची कमतरता दिसून आली आहे.
सार्वजनिक आरोग्यापुढील या आव्हानाचा सामना करण्यासाठी वरळी येथील आरे डेअरीने आरे भूषण हे डीटू जीवनसत्वयुक्त दूध बाजारात आणले आहे. या सिंगल फोर्टिफाइड दुधाच्या प्रत्येक १०० मिलींमध्ये डीटूची किमान ५५ आंतरराष्ट्रीय एकके (आययू-इंटरनॅशनल युनिट) असणे अपेक्षित आहे.
आरे भूषणची स्पर्धात्मक किंमत प्रति लिटर ४० रुपये ठेवण्यात आली आहे. सिंगल टोन्ड फॉर्टीफाइड दुधांची दरश्रेणी ४२ ते ४३ रुपये लिटर असून, त्या तुलनेत आरे भूषण परवडण्याजोग्या किमतीत उपलब्ध करण्यात आले आहे. आरे भूषण ५०० मिलीच्या, २० रुपये किमतीच्या पॅकमधून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्र सरकारचे दुग्धविकास आयुक्त श्री. आर. आर. जाधव म्हणाले, “टाटा ट्रस्ट्सच्या सहयोगाने मुंबईतील जनतेला पोषण सुरक्षा पुरवण्यास आम्ही उत्सुक आहोत. दूध हे सर्वाधिक सेवन केल्या जाणाऱ्या उत्पादनांपैकी एक असल्याने ते ड जीवनसत्वाने समृद्ध केल्यास या प्रदेशातील आहारामधील कमतरतांची समस्या हाताळण्यात लक्षणीय मदत मिळेल. अधिक निरोगी मुंबई हा अधिक निरोगी भारताचा कणा ठरेल.”
टाटा ट्रस्टच्या पोषण विभागाचे कार्यक्रम संचालक डॉ. राजन संकर म्हणाले, “आपल्या राष्ट्राचे आणि सार्वजनिक आरोग्याचे सामूहिक भवितव्य सुधारण्यासाठी पोषणात गुंतवणूक हे एक पाऊल आहे. दूध पोषणसमृद्ध करणे (फॉर्टिफिकेशन) हे भारतातील सुक्ष्मपोषकांचे कुपोषण दूर करण्यासाठी अवलंबलेले धोरण आहे. भारतातील ड जीवनसत्वाच्या अभावाची राष्ट्रीय सरासरी चिंताजनक स्तरावर पोहोचली आहे. ग्राहकांच्या आरोग्य आणि पोषणासाठी दीर्घकालीन लाभ मिळवून देणारे शाश्वत उपाय पुरवण्यात टाटा ट्रस्ट आरे डेअरीला मदत करत आहे. सिंगल टोन्ड दूध पोषणसमृद्ध करण्यासाठी आवश्यक जीवनसत्व डीटूच्या कोरड्या स्वरूपातील (प्री-मिक्स) पुरवठ्याचा खर्च टाटा ट्रस्ट दोन वर्षांसाठी उचलणार आहे.”
सुक्ष्मपोषकांच्या अभावाची समस्या हाताळण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून टाटा ट्रस्ट आरे भूषणच्या पोषणसमृद्धीसाठी (फोर्टिफिकेशन) पाठबळ देत आहे. नागरी भागातील सर्व शहरांत आढळणारी ड जीवनसत्वाची कमतरता दूर करण्याचा समावेशही यात होतो.
आरे भूषणचा वापर किती आहे याचा अंदाज घेण्यासाठी आणि त्यानुसार त्याच्या उत्पादनासाठी नियोजन करण्यासाठी, हे पोषणसमृद्ध दूध सुरुवातीचा महिनाभर मुंबई महानगर परिसरातील निवडक आरे सरिता स्टॉल्वर उपलब्ध होईल.
आरे भूषणविषयी
आरे भूषण आरे डेअरीचा हा सिंगल टोन्ड पोषणसमृद्ध दुधाचा नवीन ब्रॅण्ड असून हे दूध ड जीवनसत्वाने परिपूर्ण आहे. आरे भूषण मुंबई महानगर परिसरात केवळ आरे सरिताच्या रिटेल दुकानांमध्ये उपलब्ध आहे.
टाटा ट्रस्ट्सविषयी
१८९२ साली स्थापना झालेली टाटा ट्रस्ट्स ही भारतातील सर्वात जुनी सामाजिक संस्था असून लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी स्थापनेपासूनच ही कंपनी प्रयत्नशील आहे. संस्थापक जमशेटजी टाटा यांच्या सामाजिक दृष्टिकोन व तत्वांवर बेतलेली ही संघटना असून आरोग्य व पोषण, पाणी आणि स्वच्छता, शिक्षण, ऊर्जा, ग्रामीण विकास, शहरी गरिबीचे उच्चाटन, कला, हस्तकला आणि संस्कृती या क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणणे हे या कंपनीचे ध्येय आहे. टाटा ट्रस्ट्सचे सर्व उपक्रम थेट अमलबजावणी, भागीदारी आणि ग्रॅण्ट यातून यशस्वी झाले असून या उपक्रमांतून देशासाठी खास संशोधन साध्य केले जाते.