पुणे : डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत सन 2018-19 या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरसांनी अल्पसंख्यांक विकास विभागाकडील दि. 11 ऑक्टोबर 2013 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमुद केल्याप्रमाणे प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकारी कार्यालय, विशेष कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, पुणे शहर, अ इमारत, 2 रा मजला, पुणे स्टेशन, येथे दिनांक 14 ऑगस्ट 2018 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत. त्यानंतर प्राप्त झालेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे विशेष कार्यकारी दंडाधिकारी हेमंत निकम यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.