पुणे-दत्तवाडी पोलीस स्टेशन मध्ये निरोप आणि स्वागत समारंभ अनिल पाटील वरिष्ठ पो.निरीक्षक यांची दत्तवाडी पोलीस स्टेशन वरुन पुणे शहर वाहतूक शाखा येथे बदली झाली तर .रामचंद्र गायकवाड यांची वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी दत्तवाडी पोलीस स्टेशनला नेमणूक झाली.यानिमित्त दत्तवाडी ठाण्यातून स्वागत व निरोप समारंभा साठी उपायुक्त मुंडे , दत्तवाडी पो.स्टेशनचे पो.निरीक्षक व सर्व पोलीस कर्मचारी तसेच परिसरातील नगरसेवक आजी माजी ,विविध राजकीय,सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थीत होते.सर्वांनीच आपले मनोगत व्यक्त करताना पाटील यांनी एक आदर्श अधिकारी महणून वेगळी ओळख निर्माण केली होती,त्यांचे प्रयत्नाने पोलीस चौकीसमोरील जागेत दत्तवाडी रहिवाशी संघाची छान वास्तू तयार होऊन त्याजागेत निरोप समारंभ अत्यंत दिमाखात साजरा झाला,पाटील यांनी यांनी कामातून आपला वेगळा ठसा निर्माण करून गुन्हेगारी मोट्या प्रमाणात कमी केली तसेच चोरांकडून माल शिताफीने हस्तगत करून जनतेला परत केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक अनिल डफळ तर आभार प्रदर्शन इंदलकर कृष्ण यांनी केले . यावेळी नगरसेविका सरस्वती शेडगे यांनी कापडी बॅग सर्वाना भेट म्हणून दिली.यावेळी सुभाष जगताप,नितीन कदम,रघुनाथ ढोक,गणेश घोष ,व इतर मान्यवर उपस्थित होते