Home Blog Page 3100

धनगर आरक्षणासंदर्भात महिना अखेरपर्यंत टाटा संस्थेचा अहवाल केंद्राकडे शिफारस करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई  : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीस) कडून या महिन्याअखेरच अहवाल मागितला आहे. त्याबाबत वैधानिक कार्यवाही पूर्ण करुन केंद्र सरकारकडे आरक्षणासंदर्भात शिफारस करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

धनगर समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली, त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष खासदार डॉ.विकास महात्मे उपस्थित होते.

यावेळी श्री. फडणवीस म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सकडून याबाबतचा अभ्यासपूर्ण अहवाल ऑगस्टअखेरीसच मागविला आहे. टाटा इन्स्टिट्यूटने अनेक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात जाऊन अभ्यासपूर्ण अहवाल तयार केला आहे. तो अहवाल या महिन्याच्या अखेरीस येणार आहे. हा अहवाल प्राप्त होताच सरकार त्यावर तत्काळ कार्यवाही करेल. धनगर समाजाच्या मेंढपाळांना त्यांच्या शेळ्या मेंढ्यांना पावसाळ्यात वनक्षेत्रात चराईसाठी मान्यता देण्याचा शासन निर्णय काढण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याबाबतचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असले तरी शासन याबाबत सकारात्मक असून तशी भूमिका शासनाकडून न्यायालयात मांडण्यात येईल. समाजातील तांडा वस्ती सुधार योजनेसाठी वाढीव निधी उपलब्ध करुन देणार आहे. रोगांनी किंवा विषबाधेने शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाल्यास भरपाई मिळण्याबाबतची विमा योजना सुरु करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, आदिवासी विकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे सचिव जे.पी.गुप्ता व धनगर समाज संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.

बकरी ईद सण शांततेत साजरा करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई : राज्यात बकरी ईदचा सण शांततेत साजरा व्हावा, यासाठी प्रशासनाने योग्य दक्षता घेतली आहे. याकाळात वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी, यासाठी पोलिसांनी नियोजन करावे. हा सण शांततेने चांगल्या प्रकारे साजरा व्हावा यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

बकरी ईद सणानिमित्त राज्यातील कायदा व सुव्यवस्था संदर्भात तसेच मुंबईतील व्यवस्थेबाबतची आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, आमदार आशिष शेलार, माजी मंत्री नसीम खान, आमदार वारीस पठाण, अमीन पटेल, अस्लम शेख,  गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांच्यासह अधिकारी व शांतता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, गेल्या चार वर्षात अतिशय चांगल्या प्रकारे बकरी ईदचा सण साजरा करण्यात आला आहे. यंदाही शांततेत व चांगल्याप्रकारे हा सण साजरा करावा. सणाच्या काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी पोलीसांनी योग्य ती सावधगिरी बाळगावी.

बकरी ईदसाठी मुंबईतील देवनार पशुवधगृह येथे महापालिकेने चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत. तेथे पाणी साचून बकऱ्यांना त्रास होऊ नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात तसेच स्वच्छता, पशुवैद्यकीय चिकित्सा यासाठी पुरेसे अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यात यावेत. पशुवधगृहात येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक विभागाने दक्षता घ्यावी. तसेच तेथे सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस चौकी उभारावी. पूर्व मुक्त महामार्गावर गाड्या अडविल्यामुळे वाहतूक थांबणार नाही, याची काळजी घ्यावी.

सणाच्या काळात मदतीसाठी गेल्यावर्षीप्रमाणेच मुंबई व राज्यासाठी वेगवेगळे हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात यावे. राज्याच्या सीमा तपासणी नाक्यांवर जनावरे घेऊन येणाऱ्या वाहनांना जास्तकाळ थांबवून ठेवू नये, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी गेल्या चार वर्षात राज्य शासनाने बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सुयोग्य सोयीसुविधांबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले व यंदाही बकरी ईदचा सण शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले.

देवनार पशुवधगृहातील सुविधा

– 10 लाख लिटर पाण्याच्या  पुरवठ्याची क्षमता,

– 60 ठिकाणी पाणपोईच्या सोयी,

– 8 तात्पुरती शौचालय, महिलांसाठी स्नानगृहे,

– 88 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे,

14 ठिकाणी फूड झोन,

– 64 एकरात 55 व़ॉकीटाकीच्या सहाय्याने लक्ष ठेवणार

– पशुंची माहिती व्हावी, यासाठी परिसरात डिजिटल इंडिकेटर,

– 15 पोलीस सहायता कक्ष,

– जनावरांसाठी पशु वैद्यकीय दवाखाने

– पशुखरेदी विक्रीसाठी येणाऱ्यांच्या माहितीसाठी पत्रकांचे वाटप

सनातन संस्थेवर बंदी घाला…!

0
पुणे-सनातन संस्थेवर बंदी घालावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे .
यांसंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे कि ,सनातन संस्थेचा दहशतवादी वैभव राऊतच्या घरात देशी बॉम्ब चे साहित्य सापडले… सुधन्वा गोंधळेकर सह आज राज्यभरात त्यांचे बहुतेक सहकारी ATS ने पकडले.  हे संशयीत असलेतरी दाभोळकर, पानसारे यांचे मारेकरी असल्याची १००% शक्यता आहे. हे हिंदूत्ववादी कार्यकर्ते असून यांच्याकडून राज्याला धोका आहे. यांच्या सनातन संस्था व शिवप्रतिष्ठान सारख्या दहशतवादी समाजविघातक संघटना सतत सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यात करत असतात.
‘दहशतवादी असलातरी तो हिंदूत्ववादी कार्यकर्ता आहे… म्हणून आम्ही त्याला सर्वतोपरी मदत करू…?’ असे अॕड. पुनाळेकर यांनी जाहीर केले. हा देशद्रोही प्रकार आहे. म्हणून अॕड. पुनाळेकर यांना राज्य सरकारने अटक करावे… अशी संभाजी ब्रिगेड ची मागणी आहे. तसेच सनातन संस्था व शिवप्रतिष्ठान वर बंदी घातली पाहिजे…! यांचे मास्टरमाईंड शोधले पाहिजे.असे संतोष शिंदे यांनी म्हटले आहे .

देशद्रोहाचा गुन्हा दाखल…

0
 पुणे-जंतर मंतर, नवी दिल्ली  येथे  भारतीय संविधानाची प्रत जळणाऱ्या समाजकंटकां विरोधात डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे येथे गुन्हा दाखल(देशद्रोह १२४अ, १५३ अ, २९५, २९८ भ.द.वि, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंद) कायदा, १९८९,  प्रेव्हेंशन ऑफ इंसल्ट टु नॅशनल हॉनर्स ऍक्ट, १९७१).
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष- सतीश गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली.
त्यांच्या सोबत ऍडव्होकेसी  असोसिएशनचे अध्यक्ष- अड तोसीफ शेख, अड कुमार काळेल- पाटील, निर्भीड महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष- प्रा. संतोष खरे, रवी ओव्हाळ, प्रमोद कांबळे, सागर सपकाळ, निशिकांत कांबळे, हरीश भिंगारे, भूषण भवर, सागर चौधरी, अकबर शेख उपस्थित होते .

मराठा आंदोलनाला बदनाम करून मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा राज्यकर्त्यांचा डाव

0

मुंबई : ‘मराठा आंदोलनाला बदनाम करून मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा राज्यकर्त्यांचा डाव आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांचा हा डाव हाणून पाडतानाच हिंसा, जाळपोळीचे प्रकार थांबवून आंदोलनकर्त्यांनी शांततेला प्राधान्य द्यावे’, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीला कोणाचीच हरकत नाही. परंतु कोणताही पूर्वग्रह न ठेवता स्वच्छ मनाने तसेच राज्यघटनेने ज्यांना आरक्षण दिलेले आहे त्याला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा निर्णय झाला पाहिजे. त्याचप्रमाणे हिंसा, जाळपोळ, दंगे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचे प्रकार सक्तीने टाळले गेले पाहिजे. आतापर्यंत शांततेने पार पडलेल्या मराठा आंदोलनाला सर्वसामान्यांचा व बहुजनांचा पाठिंबा व सदिच्छा प्राप्त झाल्या, त्याला धक्का लागेल असा प्रकार होणार नाही याची खबरदारी सर्व संबंधितांनी घेतली पाहिजे, असे शरद पवार यांनी एक पत्रक काढून मराठा आंदोलकांना हे आवाहन केले आहे.

राज्यकर्ते व हितसंबंधी घटक या आंदोलनाला बदनाम करणे तसेच मराठा आणि अन्य बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव खेळत आहे. मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळे व एकाकी पाडण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांची ही योजना यशस्वी होऊ देता कामा नये याची पक्की खूणगाठ आंदोलकांनी ठेवली पाहिजे. त्यांच्या या खेळीला आंदोलकांनी बळी पडू नये. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून हे आंदोलन केले जात आहे. त्या छत्रपतींनी अठरापगड जातींना, बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन आदर्श स्वराज्य निर्माण केले होते. त्या आदर्शांना धक्का लागेल असे आचरण आपल्या हातून घडणार नाही यांची खबरदारी आंदोलनकर्त्यांनी घेतली पाहिजे. हिंसाचाराच्या ताज्या घटनांमुळे सुरुवातीला शांततामय मार्गाने आंदोलन झाल्याबद्दल निर्माण झालेली समाजातील सदिच्छा गमावणे हे चांगले लक्षण नाही, हे मी विशेषत्वाने नमूद करू इच्छितो, असेही शरद पवार यांनी आपल्या पत्रकाद्वारे केले आहे.

गोखले अर्थ-राज्यशास्त्र संस्थेच्या शेतकरी आत्महत्येच्या संदर्भातील अहवालाचा हवालाही दिला आहे. जमिनीचे लहान लहान तुकडे पडत गेल्याने मराठा समाजाची स्थिती हालाखीची बनली आहे. 28 टक्के मराठा भूमिहीन आहेत. तर त्यांच्या आत्महत्येचं प्रमाण 46 टक्के आहे. त्यामुळेच वर्षानुवर्षांच्या या वंचनेमुळे मराठा समाजात व विशेषत: युवकांच्या मनात राग साठणे नैसर्गिक असले तरी जाळपोळ दगडफेक करणे किंवा आत्महत्या करणे हा मार्ग नक्कीच नाही, असेही शरद पवार यांनी सांगितले आहे.

बापमाणूस २०० नाबाद

0

झी युवा या वाहिनीने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. या मालिकेने नुकताच २०० भागांचा यशस्वी टप्पा पार गाठला आहे. २०० भागांचा माईलस्टोन पार केल्या नंतर सेलिब्रेशन तर जोरातच होणार पण हा आनंदाचा क्षण त्यांनी वेगळ्या पद्धतीने साजराकेला. १०० भाग पूर्ण केल्यावर त्यांनी त्यांचा आनंद अंडरप्रिव्हिलेज मुलांसोबत साजरा केला. यावेळी २०१ व्या भागाचं काम चालू करायच्या आधी त्यांनी संपूर्ण टीम जिच्यामुळे हि मालिका यशस्वीरित्या२०० भाग पूर्ण करू शकली त्यांचे आभार मानले. हा आभार प्रदर्शनानंतर त्यांनी सेटवर केक कापून साजरा केला आणि या यशाच्या मागे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो भरवला. कार्यक्रमावर प्रेक्षकांचेनिस्सीम प्रेम आहे आणि ते त्याला पाठिंबा देत आहेत यात काही शंका नाही. कलाकारांनी सांगीतले की कार्यक्रमाविषयी आणि त्यातील लाडक्या पात्रांसाठी चाहत्यांकडून त्यांना नेहमीच सकारात्मकआणि चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या मोठ्या दिवसा विषयी बोलताना, सुयश टिळक म्हणाला,२०० भागांचा यशस्वी टप्पा गाठणे हा आम्हा सर्वांसाठीच खूप आनंदाची गोष्ट आहे. बापमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेमदिलंआणि त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो आणि म्हणूनच हा आनंद आम्ही बापमाणूसच्या संपूर्ण टीमसोबत साजरा केला ज्यांच्यामुळे हि मालिका २०० भागांचा यशस्वी प्रवास पूर्ण करू शकलीआणि अर्थातच या आनंदाच्या क्षणी मी रसिक प्रेक्षकांचे आभार मनू इच्छितो ज्यांनी आमच्यावर इतकं प्रेम केलं आणि ती पुढेही आमची अशीच साथ देतील अशी अशा करतो.

भारताच्या स्वातंत्रदिनादिनी महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखर-कळसुबाईवर सर्वात लांब तिरंगा फडकविणार

0

लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, युनिक वर्ल्ड रेकॉर्डसाठी सर्वाना सहभागी होण्याचे आवाहन

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोरर ग्रुपद्वारे कळसुबाईवर सर्वात लांब तिरंगा नेहून होणार विश्वविक्रम 

    पुणे-  360 एक्सप्लोरर व एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे सोबत भारताच्या स्वातंत्रदिनादिनी एक आगळी वेगळी मोहीम आखली असून कळसुबाई शिखरावर भारताचा सर्वात लांब तिरंगा नेहून महाराष्ट्रातील शेकडो लोक जागतिक विश्वविक्रम करणार आहेत. या तिरंग्याची लांबी ६२ फुट असणार असून आतापर्यंत कळसुबाईवर जाणारा सर्वात लांब तिरंगा ठरणार आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, लातूर, नागपूर, बुलढाणा पासून संपूर्ण महाराष्ट्रातून यात शेकडो लोक सामील होणार असून हा प्रत्येकासाठी अभिमानाचा क्षण असणार आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांची “360 एक्स्प्लोरर” च्या या उपक्रमात “ट्रेक डायरीज” ही संस्थाही  सहभागी होणार आहे.

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी २०१२ मध्ये जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करून त्यांनतर अतापर्यंत जगातील ४ खंडातील ४ सर्वोच्च शिखरे सर केली आहे. एव्हरेस्टनंतर 360 एक्सप्लोरर या संस्थेद्वारे जगभरात अनेक मोहिमा आयोजित करत आहेत. सोलापुरात साहसी खेळांना प्राधान्य मिळावे तसेच अनेक गिर्यारोहक तयार व्हावेत यासाठी 360 एक्स्प्लोरर काम करत राहणार आहे. यासाठी १५ ऑगस्ट रोजी कळसुबाई शिखरावर जावून एका आगळावेगळा इतिहास निर्माण करण्याची संधी सर्वाना उपलब्ध होणार आहे. सोलापूरमधील अनेक उद्योजक, डॉक्टर्स, कॉलेजचे विद्यार्थी, गृहणी या रेकॉर्ड मोहिमेत सहभागी होणार आहेत असे एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी सांगितले.

“360 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” चे अनावरण-

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी आत्तापर्यत १४ पेक्षा जास्त विक्रम केले आहे. यांच्याच प्रयत्नातून या १५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात “360 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” या रेकॉर्ड बुकची सुरवात होणार आहे. सर्वाना या बुक मध्ये रेकॉर्ड करता येणार आहे. गेल्या ६ वर्षात आपल्या नावे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये अनेक विश्वविक्रम नोंदवल्यानंतर स्वतचे “360 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड”  बुक काढून अनेकांना विक्रमवीर बनवण्याचा आनंद बनसोडे यांचा मानस आहे. १५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर या रेकॉर्ड बुकची सुरवात होणार आहे. कोणी काही विक्रम केला असेल तर याची नोंद होण्यासाठी प्रस्ताव पाठवू शकता असे एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी सांगितले आहे.

 असा आहे कळसुबाई चा प्रवास-

१४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी आपआपल्या शहरातून निघून १५ ऑगस्ट रोजी पहाटे अकोले (अहमदनगर) तालुक्यातील “बारी” या कळसुबाई शिखराच्या पायथ्याच्या गावात पोहचायचे आहे. सकाळी ७ वाजता चढाई सुरवात करून १० वाजता सर्वोच्च शिखरावर सर्वात लांब तिरंगा फडकवण्याचा या टीमचा उद्देश आहे. वर जेवण करून परतीचा प्रवास सुरु होणार असून १५ ऑगस्टच्या रात्रीपर्यंत आपआपल्या शहरात पोहोचणार आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी व विश्वविक्रमात स्वतचे नाव नोंदण्यासाठी 7276041985/ 7276641985/ 9067045500/ 9067035500 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

डंपरची दुचाकीला धडक एक ठार एक गंभीर जखमी

0
ओतूर- दि.११
ओतुर – धोलवड मार्गावर शुक्रवारी दुपारी झालेल्या डंपर व दुचाकी यांच्या धडकेत एक जण ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे यांनी दिली.
ओतूर धोलवड रस्त्यावर भैरवनाथ मंदिरानजीक हा अपघात झाला ओतुरकडून धोलवडकडे जाणारा डंपर क्रमांक एम एच २६  बी ४६७९ ने ओतुर कडे येणाऱ्या दुचाकीला क्र. एम. एच.१४ बी.क्यु. ३५२४  हीस जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील अक्षय गुळवे(वय २४, रा. धोलावड ता. जुन्नर)हा युवक जागीच ठार झाला तर प्रकाश विकास नलावडे  (वय  २५ ,रा.धोलवड ) हा युवक गंभीर जखमी झाला घटनास्थळी ओतुर पोलीस पथक तात्काळ पोहोचले असता पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी अपघातात जख्मी झालेला प्रकाश नलावडे याला उपचारासाठी रुग्णालयात हलवले व अक्षय गुळवे चा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

मुद्रण कॉलेज चे रूपांतर विश्वविद्यालयात व्हावे–पं. गाडगीळ

0
पुणे-मुद्रण महर्षी डॉ. प.भ.कुलकर्णी प्रतिष्ठान आणि पुणे विद्यार्थी गृह यांचे तर्फे मुद्रण क्षेत्रात भरीव योगदान दिल्या बद्दल माजी प्राचार्य ऋषीकुमार उनियाल यांना पंडित वसंतराव गाडगीळ यांच्या  हस्ते मुद्रणमहर्षी डॉ प.भ कुलकर्णी जीवन गौरव पुरस्कार,पुणेरी पगडी,शाल, मानपत्र,स्मृतिचिन्ह  देऊन करण्यात आला.या वेळी दि.पुना प्रेस असो.चे अध्यक्ष रवी जोशी , पुणे विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष सुभाष जिर्गे ,कार्यवाह प्रा. राजेंद्र कांबळे,कुलसचिव सुनील रेडेकर, विश्वस्त राजेंद्र कडूस्कर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रिंट विक मासिकातील 100 उद्योजकां मध्ये नाव आलेले कॉलेज चे माजी विद्यार्थी बुर्डा, इंडिया चे  बी.ए. शेष,विक्रम प्रिंटर्स चे मंदार उगार, अमोल असो.चे अमोल देशपांडे यांचे आणि  प्रिंटिंग डिप्लोमा मध्ये प्रथम आलेले विद्यार्थी कु.ढोरे चैताली,सत्यमकुमार राय तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मध्ये प्रथम आलेले विद्यार्थी घुमरे अविनाश ,दर्फे शुभांगी या सर्वांचे स्मृतिचिन्ह ,श्यामची आई गौरव ग्रंथ व प्रमाणपत्र मान्यवरांचे हस्ते देण्यात आले.त्याचप्रमाणे प्रिंटींग डिप्लोमा चे विद्यार्थी कु.दौंडकर प्रांजल, राऊत प्रशांत ,गायकवाड गणेश प्रिंटींग इंजि.कॉलेज चे कु.कटारिया प्रणाली,चव्हाण युवराज,हरणमारे शिवम,ठोंबरे प्रताप यांना प्रत्येकी 5000रु.शिष्यवृत्ती  आणि प्रमाणपत्र यावेळी दिले.
यावेळी पंडित गाडगीळ म्हणाले की आधुनिक काळाची गरज असल्याने संस्थेने भारतातील पहिले मुद्रण महाविद्यालय  म्हणून न पहाता आता  त्याचे रूपांतर मुद्रण विश्वविद्यालया कडे नेऊन  वाटचाल करावी म्हणजे कै. डॉ प.भ.कुलकर्णी आणि आम्हा मुद्रक परिवाराला समाधान मिळेल तर शेष,उगार आणि देशपांडे यांनी मुद्रण क्षेत्रातील चालू घडामोडी तसेच उद्योजक म्हणून वाटचाल कशी केली याची सविस्तर माहिती दिली तसेच प्रश्न उत्तर या चर्चेत देखील मुलांना प्रिंटींग मध्ये मोठे करिअर असल्याचे सांगितले.
रवी जोशी यांनी देखील प्रिंटिंग क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामामुळे आपली मोठी आर्थिक प्रगती होते तसेच या मध्ये महिलांनी अजून पुढे आले पाहिजे असे सांगून त्यांनी प्रतिष्ठान ला त्यांचे संस्थेतर्फे शताब्दी निमित्ताने 1लाख रु.देणगी जाहीर केली तर रवींद्र जोशी यांना ऑल इंडिया मास्टर्स प्रिंटर्स असोसिएशन,दिल्ली चे अध्यक्ष पदाचे निवडणूक साठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.कॉलेज चे मीना हडप यांनी 10हजार,मंदार उगार 21हजार,अमोल देशपांडे यांनी 3वर्षात एकूण 33हजार,तर भोसले सर यांनी दरवर्षी 5000रु एका विद्यार्थ्यासाठी  शिष्यवृत्ती देण्याचे कबूल केले.या प्रसंगी जीवन गौरव पुरस्कारास उत्तर देताना उनियाल सर म्हणाले की प.भ.कुलकर्णी यांच्या  शिस्तबद्ध कामकाजामुळे आम्ही घडलो, त्यांचे मार्गदर्शनाखाली कॉलेज उभारणीत तसेच मुलांना शिक्षण देण्यात मदत केली यामुळेच आजचा सन्मान मिळाला असे वाटते.  कार्यक्रमाचे स्वागत नितीन वाणी, सूत्रसंचालन सुधन्वा रानडे , आभार प्रदर्शन प्रा. राजेंद्र कांबळे यांनी केले ,तर स्वागत गीत मुक्तांगण स्कुलच्या विद्यार्थ्यांनी म्हटले.आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाची मदत प्रकाश घोडके,सचिन कुलकर्णी,दत्ता मुजुमदार ,ममता कुलकर्णी ,मधुरा महाजन,प्राचार्य डॉ.नेरकर ,प्राचार्य शिंदेआणि रघुनाथ ढोक यांनी केली.यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थीवर्ग , आजी माजी प्राचार्य ,कर्मचारी उपस्थित होते.

रियाझ वस्तादांच्या आठवणी स्मरणात राहतील -बाळासाहेब शिवरकर

0

पुणे-रियाझ वस्ताद हे देशासाठी व काँग्रेस पक्षासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढले , सर्व धर्मीयांमध्ये त्याचा वावर असायचा , त्यांची कामाची छबी लोकांच्या मनात घर करून गेली . चंदुभाई वस्तादांची तालीमला जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी केले . त्यांच्या कामाचा वारसा आपण चालवू , अशा शब्दात राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी श्रद्धांजली वाहिली .

पुणे कॅम्प भागात बाबाजान चौकात लेडी हवाबाई शाळेच्या सभागृहात सीरत कमिटीच्यावतीने उस्ताद रियाज अहमद खान यांना श्रध्दांजली सभेत ते बोलत होते . यावेळी बाळासाहेब शिवरकर यांनी रियाझ वस्ताद यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले कि , रियाझ वस्ताद यांनी आम्हाला त्यागाची शिकवण दिली . त्यांना अमीनुद्दीन पेनवाले यांच्या जागी भवानी पेठ विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षातुन तिकीट मिळत होते परंतु आपण आपले राजकीय  गुरुस्थानी असलेले अमीनुद्दीन पेनवाले यांच्या विरोधात आपण निवडणूक लढविणार नाही . तसेच , अली सोमजी यांना महापौर करण्यात यावे आपल्या पेक्षा अलीभाई महापौरपदाची कारकीर्द निभावतील . त्यावेळी रियाझ वस्ताद  याना महापौर तसेच उपमहापौर करा असा काँग्रेस पक्षातून आग्रह होता परंतु त्यावेळी देखील रियाझ वस्ताद याना महापौर व उपमहापौर करा असा आग्रह असताना त्यांनी या पदांचा त्याग केला . तसेच मी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होतो व खासदार सुरेश कलमाडी खासदार असताना त्यावेळी संदीप लडकतच्या ऐवजी रशीद शेख यांना काँग्रेस पक्षाने तिकीट देण्याचा आग्रह त्यांनी लावून धरला .  अखेरीस रियाझ वस्तादांनी रशीद शेख यांना तिकीट मिळावे असा आग्रह लावून धरल्यामुळे संदीप लडकतचे तिकीट कापून रशीद शेख याना तिकीट द्यावे लागले . श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरास जागा मिळवून देण्याकरिता रियाझ वस्तादांचा वाटा असल्याचे सांगितले . रियाझ वस्ताद हे महापालिकेत  स्थायी समिती सदस्य असताना त्यांनी सभागृहात सार्वजनिक पाण्याचा हौद व अग्निशमन दलाची जागा हि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरास  देण्यात यावी असा ठराव मांडला आणि त्या ठरावास तत्कालीन नगरसेवक उल्हास काळोखे यांनी अनुमोदन दिले . अशा पद्धतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरास जागा मिळवून देण्यास रियाझ वस्तादांचा महत्वाचा वाटा आहे . रियाझ वस्ताद हे भारतीय नौदलात असताना भारत पाकिस्तान युद्धात त्यांनी पाकिस्तानची पाणबुडीवर हल्ला चढवून ती बुडविली . भारत बांगलादेश देश युध्दात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली . इंदिरा गांधी यांना अटक झाली असताना रियाझ वस्ताद यांनी स्वतःला अटक करून घेतली . वस्ताद हे सेक्युलर विचाराचे होते . अडचणीच्या काळात ते काँग्रेस पक्षाबरोबर प्रामाणिक व निष्ठावंत राहिले . त्यांच्या निधनाच्या दिवशी ते कोंढवा येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात उपस्थित होते .

या श्रध्दांजली सभेस सीरत कमिटीचे सचिव रफीउद्दीन शेख ,उस्मान हिरोली , अमीन शेख , अतिक शेख , सलीम शेख , हाजी पठाण   विजय जाधव , वीरेंद्र किराड , इसाक जाफर , ऍड. अय्युब शेख , मौलाना निजामुद्दीन , नगरसेवक गफूर पठाण , अभय छाजेड , भारत कांबळे , हसन कुरेशी , इकबाल शेख , अजीज खान , मुश्ताक अलबुशरा , सुलतान खान , राजू शेख , प्रविण जाधव , गुलाम दस्तगीर , करीम अत्तार आदी मान्यवर उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीरत कमिटीचे सचिव रफीउद्दीन शेख यांनी केले .

रस्ते खचण्याच्या प्रमाणात वाढ,सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी….

0
पुणे-शहरातील रस्ते खचण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने पुण्यातील रस्त्यांचे सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी भाजपचे उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे .
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि ,आज सकाळी राजाराम पुलाजवळील डी पी रस्त्यावर (हॉटेल गिरीजा समोर,मॅजेंटा लॉन्स समोर) मुख्य रस्त्यावरील ड्रेनेज चेंबर खचल्याचा प्रकार घडला.या ठिकाणी पाण्याची मोठी पाईपलाईन,ड्रेनेज लाईन,एम एन जी एल गॅस लाईन अश्या विविध वाहिन्या असून येथील रस्ताच खचल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले,येथे ५ फुटांचा मोठा खड्डा पडला असून सुदैवाने तेथून त्यावेळी वाहने जात नसल्याने अपघात टळला.मात्र शहरात अश्या घटना वारंवार घडत असल्याचे दिसून येते ,( पौड रस्ता,सातारा रस्ता,संचेती चौक अश्या विविध ठिकाणी )भुसभुशीत माती व विविध कारणांसाठी सातत्याने रस्ते खोदाई मुळे इन्फ्रास्टक्चर वर अतिरिक्त ताण पडत असल्याचे निदर्शनास येते.तसेच प्रचंड प्रमाणात वाढलेली वाहतूक,हवामानातील बदल,पावसाचे साठणारे पाणी या सर्वांचा संयुक्त परिणाम होत आहेच.त्यातून मी वारंवार मागणी करून ही खोदाई नंतर रस्ता पूर्ववत करण्याची मनपा ची यंत्रणा कुचकामी असून बहुतांश ठिकाणी रस्त्याची दुरावस्था दिसून येते.
तरी संभाव्य अपघात टाळण्यासाठी व नागरिकांचे हितरक्षण व सुरळीत वाहतुकीच्या दृष्टीने अशी स्थळे जेथे मोठ्या प्रमाणात पाईप लाईन वा तत्सम कामे झाली आहेत तेथे सेफ्टी ऑडिट करावे व आवश्यक ती उपाययोजना करावी अशी आग्रही मागणी करत आहे.

आंबेडकरांचा अवमान करणाऱ्यांना कडक शासन करण्याची मागणी

0

पुणे- संविधान जाळणाऱ्या व आंबेडकर यांचा अवमान होईल अशा घोषणा देणाऱ्यांवर कडक शासन करण्याची मागणी रिपब्लिकन मजदूर संघाच्यावतीने मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक प्रमिला ढवण यांना निवेदन देण्यात आले . यावेळी  रिपब्लिकन मजदूर संघाचे अध्यक्ष सुहास बनसोडे , कायदेशीर सल्लागार ऍड. सूर्यकांत जाधव , लोकतांत्रिक जनता दलाचे पुणे शहर अध्यक्ष शतायू भगळे , कपिल शिवशरण , सचिन शिवशरण , अक्षय हादीमनी ,भीमराव अष्टगे , रिजवान शेख आदी मान्यवर उपस्थित होते .

दिल्लीमधील जंतरमंतर येथे सुवर्ण समजणाऱ्या समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळली आहे . तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी जातीय आकस मनात असल्यामुळे आंबेडकरयांचा अवमान करणाऱ्या  अशा घोषणा दिल्या . या कृत्याच्या क्लिप्स सोशल मीडियावर टाकल्या . या समाज कटंकाविरुध्द भारतीय संविधान जाळले म्हणून prevention  insult to national honour act , 1971 & 124 of IPC , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अवमानास्पद  घोषणा देण्यात देउन अपमानित केल्यामुळे sec 3(1)(v)of  prevention of sc st atrocity act व सदर व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर प्रसिध्द केल्याबद्दल I. T. Act नुसार गुन्हा दाखल करून कडक शासन करण्याची मागणी करण्यात आली .

प्रविण द्वारकाप्रसाद बन्सल यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण व जेष्ठ नागरिकांचा सन्मान

0

पुणे-वडगाव शेरी येथील सत्यम सेरेनेटीजवळ स्व. प्रविण द्वारकाप्रसाद बन्सल यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण  कार्यक्रम संपन्न झाला . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार जगदीश तुकाराम मुळीक , वीरांगना फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुमन बाबर पाटील , नगरसेवक संदीप गराड , नगरसेविका सुनीता गलांडे , नगरसेविका शीतल ज्ञानेश्वर शिंदे , माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे , लायन्स क्लब पुणे अग्रसेन अध्यक्ष राजेश सुरेंद्र अग्रवाल, सत्यम ग्रुपचे अध्यक्ष द्वारकाप्रसाद बन्सल , सत्यम सेरेनेटी सोसायटीचे अध्यक्ष  व लायन्स क्लब पुणे अग्रसेनचे सचिव राजेश द्वारकाप्रसाद बन्सल , कोकण रहिवाशी संघ वडगाव शेरी अध्यक्ष दीपक यरपली , सत्यम सेरेनेटी सोसायटीचे सर्व सभासद , सत्यम ग्रुपचे सदस्य व बन्सल परिवार आदी मान्यवर उपस्थित होते .

बदाम , मोघनी , ऍस्टोनिया , जांभूळ , पाम आदी जातींचे  वृक्षांचे  वृक्षारोपण करण्यात आले  . जेष्ठ नागरिकांचा एक वृक्ष , श्रीफळ , पुष्पगुछ देऊन सन्मान  करण्यात आला .

पर्यावरण जनजागृती करून परिसर स्वछ ठेवण्यासाठी या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . जसे  जेष्ठ नागरिकांचा आधार प्रत्येक कुटुंबीयास असतो तसेच  , पर्यावरण स्वछ ठेवून आपणास ऑक्सिजन देण्याचे काम वृक्ष करतात व आपणास आधार  देतात. अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सत्यम सेरेनेटी सोसायटीचे अध्यक्ष  व लायन्स क्लब पुणे अग्रसेनचे सचिव राजेश द्वारकाप्रसाद बन्सल यांनी दिली .

रमणबागेत ‘जाणता राजा-छत्रपती शिवराय’ संपन्न

0

पुणे-न्यू इंग्लिश स्कूल- रमणबाग प्रशालेत बहुआयामी तासिकेत जाणता राजा या महानाट्यातील निवड नाट्यप्रसंग प्रशालेतील शिक्षक-सेवक व विद्यार्थी यांनी सादर केले.

महाराजांच्या आयुष्यात अनेक पहाडासारखी महाकाय संकटे आली परंतु ते डगमगले नाहीत. कधी शक्तीने तर कधी युक्तीने, गनिमी काव्याने त्यांनी संकटांना व शत्रूला परास्त्र केले. शिवरायांनी असे मावळे घडवले ‘जो रुकते नही, थकते नही और बिकते भी नही’ स्त्री ही मराठ्यांच्या देव्हार्‍यातील देवता आहे. पैसे खाणार्‍यांचं नांत असतं गिधांडांशी, माणसांशी नव्हे अशा अनेक भाव गर्भित संवादातून ह्या महानाट्याने मनोरंजनाबरोबर विद्यार्थ्यांना शिवसंस्काराचा वारसाचा दिला.

श् राजेंद्र पवार,  सुनिता खरात, गणपत लांघी, दिगंबर सावरमाळे, अतुलदळवी,  चंद्रशेखर कोष्टी यांनी प्रभावी अभिनयाने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. सदर कार्यक‘माची संकल्पना रविंद्र सातपुते यांची होती.

कार्यक‘मास प्रशालेच्या मु‘याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी, उपमु‘याध्यापिका जयश्री रणखांबे, पर्यवेक्षक कोलते रजनी व जगन्नाथ जाधव यांचे मार्गदर्शन लाभले सर्व शिक्षक-शिक्षकेतर व विद्यार्थी वृंद उपस्थित होता.

नवीन मराठी शाळेत दिव्याच्या प्रदर्शनाने दीप अमावस्या साजरी

0

पुणे-शनिवार दिनांक ११.०८.२०१८ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत दीप अमावस्या साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध प्रकारच्या दिव्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्या डॉ.नयना कासखेडीकर, शाळा समिती अध्यक्ष डॉक्टर सुनील भंडगे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कल्पना वाघ यांच्या हस्ते दिव्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी ‘शुभंकरोती म्हणा…. , ज्योतसे ज्योत..’ अशी दिव्यांची गाणी ऐकवण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दिव्यांचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापिका सौ.कल्पना वाघ यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविकात ‘दिव्याप्रमाणे स्वतः त्रास सहन करून इतरांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करा’, असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले .पत्रकारितेत डॉक्टरेट मिळवलेल्या व मुक्त पत्रकार तसेच माध्यम अभ्यासक म्हणून काम करणाऱ्या,या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर नयना कासखेडीकर यांचा परिचय सौ. रूपाली सावंत यांनी करून दिला. दीप अमावस्येची कहाणी सौ अर्चना देव यांनी विद्यार्थ्यांना सांगितली.

शाला समिती अध्यक्ष  डॉक्टर श्री सुनील भंडगे यांनी विद्यार्थ्यांना ‘ अग्नि कर्पूराच्या मेळी ‘ या अभंगाचे महत्त्व सांगून ‘ज्योती कलश छलके…..’ हे गाणे गायले. त्यानंतर प्रमुख पाहुण्या डॉ. नयना कासखेडीकर यांनी विद्यार्थ्यांना दिवटी पासून आधुनिक दिव्यां पर्यंत दिव्यांमध्ये झालेले परिवर्तनची माहिती सांगितली, तसेच दिव्या प्रमाणे १% प्रेरणा व ९९% मेहनत व परिश्रम करून शाळेचे नाव उज्ज्वल करा असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक सौ.तनुजा तिकोने ,सौ.जयश्री खाडे व श्री धनंजय तळपे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.प्रिया इंदुलकर व आभार प्रदर्शन सौ योगिता भावकर यांनी केले.