डंपरची दुचाकीला धडक एक ठार एक गंभीर जखमी
ओतूर- दि.११
ओतुर – धोलवड मार्गावर शुक्रवारी दुपारी झालेल्या डंपर व दुचाकी यांच्या धडकेत एक जण ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे यांनी दिली.
ओतूर धोलवड रस्त्यावर भैरवनाथ मंदिरानजीक हा अपघात झाला ओतुरकडून धोलवडकडे जाणारा डंपर क्रमांक एम एच २६ बी ४६७९ ने ओतुर कडे येणाऱ्या दुचाकीला क्र. एम. एच.१४ बी.क्यु. ३५२४ हीस जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील अक्षय गुळवे(वय २४, रा. धोलावड ता. जुन्नर)हा युवक जागीच ठार झाला तर प्रकाश विकास नलावडे (वय २५ ,रा.धोलवड ) हा युवक गंभीर जखमी झाला घटनास्थळी ओतुर पोलीस पथक तात्काळ पोहोचले असता पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी अपघातात जख्मी झालेला प्रकाश नलावडे याला उपचारासाठी रुग्णालयात हलवले व अक्षय गुळवे चा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.