पुणे-शनिवार दिनांक ११.०८.२०१८ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत दीप अमावस्या साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध प्रकारच्या दिव्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्या डॉ.नयना कासखेडीकर, शाळा समिती अध्यक्ष डॉक्टर सुनील भंडगे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कल्पना वाघ यांच्या हस्ते दिव्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी ‘शुभंकरोती म्हणा…. , ज्योतसे ज्योत..’ अशी दिव्यांची गाणी ऐकवण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दिव्यांचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापिका सौ.कल्पना वाघ यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविकात ‘दिव्याप्रमाणे स्वतः त्रास सहन करून इतरांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करा’, असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले .पत्रकारितेत डॉक्टरेट मिळवलेल्या व मुक्त पत्रकार तसेच माध्यम अभ्यासक म्हणून काम करणाऱ्या,या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर नयना कासखेडीकर यांचा परिचय सौ. रूपाली सावंत यांनी करून दिला. दीप अमावस्येची कहाणी सौ अर्चना देव यांनी विद्यार्थ्यांना सांगितली.
शाला समिती अध्यक्ष डॉक्टर श्री सुनील भंडगे यांनी विद्यार्थ्यांना ‘ अग्नि कर्पूराच्या मेळी ‘ या अभंगाचे महत्त्व सांगून ‘ज्योती कलश छलके…..’ हे गाणे गायले. त्यानंतर प्रमुख पाहुण्या डॉ. नयना कासखेडीकर यांनी विद्यार्थ्यांना दिवटी पासून आधुनिक दिव्यां पर्यंत दिव्यांमध्ये झालेले परिवर्तनची माहिती सांगितली, तसेच दिव्या प्रमाणे १% प्रेरणा व ९९% मेहनत व परिश्रम करून शाळेचे नाव उज्ज्वल करा असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक सौ.तनुजा तिकोने ,सौ.जयश्री खाडे व श्री धनंजय तळपे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.प्रिया इंदुलकर व आभार प्रदर्शन सौ योगिता भावकर यांनी केले.