पुणे- संविधान जाळणाऱ्या व आंबेडकर यांचा अवमान होईल अशा घोषणा देणाऱ्यांवर कडक शासन करण्याची मागणी रिपब्लिकन मजदूर संघाच्यावतीने मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक प्रमिला ढवण यांना निवेदन देण्यात आले . यावेळी रिपब्लिकन मजदूर संघाचे अध्यक्ष सुहास बनसोडे , कायदेशीर सल्लागार ऍड. सूर्यकांत जाधव , लोकतांत्रिक जनता दलाचे पुणे शहर अध्यक्ष शतायू भगळे , कपिल शिवशरण , सचिन शिवशरण , अक्षय हादीमनी ,भीमराव अष्टगे , रिजवान शेख आदी मान्यवर उपस्थित होते .
दिल्लीमधील जंतरमंतर येथे सुवर्ण समजणाऱ्या समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळली आहे . तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी जातीय आकस मनात असल्यामुळे आंबेडकरयांचा अवमान करणाऱ्या अशा घोषणा दिल्या . या कृत्याच्या क्लिप्स सोशल मीडियावर टाकल्या . या समाज कटंकाविरुध्द भारतीय संविधान जाळले म्हणून prevention insult to national honour act , 1971 & 124 of IPC , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अवमानास्पद घोषणा देण्यात देउन अपमानित केल्यामुळे sec 3(1)(v)of prevention of sc st atrocity act व सदर व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर प्रसिध्द केल्याबद्दल I. T. Act नुसार गुन्हा दाखल करून कडक शासन करण्याची मागणी करण्यात आली .