Home Blog Page 3085

हास्यविनोदात विरघळल्या कुरघोड्या आणि रंगला राजकीय गमजा .. (व्हिडीओ)

0

नव्या सभागृहातील पहिल्या सभेत विकासासाठी आम्ही कटिबध्द ठराव एकमताने संमत

पुणे-महापालिकेच्या नव्या सभागृहातील पहिल्या दिवशी राजकीय कुरघोड्या आणि बांधकामांवरील त्रुटी अखेर हास्यविनोदात विरघळऊन टाकीत दिसतील तशा त्रुटी दूर करून  आणि पुण्याच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार आज येथे करण्यात आला . संविधानाच्या प्रतिज्ञेच्या वाचनाने प्रारंभ झालेल्या पहिल्या खास सभेत एखादा दुसरा गंभीरते चा अपवाद वगळता राजकीय गमजा मात्र चांगला रंगला .

नव्याने उभारण्यात आलेल्या महानगरपालिकेच्या इमारतीमधील सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी छत गळण्याची घटना घडली होती. या वरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. या घटनेला तीन महिने उलटल्यानंतर आज या सभागृहात पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली. आज सभागृहात नगरसेवकांचे भाषण सुरु असताना अचानक वरुन एक लाकडी ठोकळा पडला  आणि त्यावरून हा राजकीय गमजा रंगला .  मनसेच्या वसंत मोरेंनी हा ठोकळा भिरकावला कि काय ? असा सवाल काहींनी गमतीदार पणे उपस्थित केला मात्र तो आपल्या खास शैलीत त्यांनी तो उलटवून लावला . मध्येच दोनवेळा वाजलेले हलके सायरन , सभागृह्नेत्यांचे पीए घाईने चालता चालता पडल्याने झालेला आवाज आणि ठोकला पडल्यावर अरविंद शिंदे यांनी हेल्मेट परिधान करून दिलेल्या पोझेस त्यानंतर ‘ काळी बाहुली लावून घ्या ‘ असा दिलेला हसत खेळत चा उपरोधिक सल्ला यामुळे हा गमजा निर्माण झाला . या सर्वावर मात करीत आपल्या सभागृहाचे काम  चांगले झाल्याबद्दल सर्वांनी उल्लेख केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ,पण राजकीय कुरघोड्या करताना सभागृहाची करू नका निंदा पण  विकास कामांसाठी येथे भांडा असे सांगत सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी या सार्या राजकीय गमजांचा समारोप केला .

पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाजूला नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीचे उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान सभागृहातील छत पावसाच्या पाण्याने गळत होते. त्यावरून पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपावर विरोधकांनी सभागृहाचे अर्धवट काम सुरू असताना आणि इमारतीमधील कोणत्याही मजल्यावर काम पूर्ण झाले नसताना एवढ्या लवकर उद्घाटनाची घाई का केली अशा शब्दात राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेकडून सडकून टीकाकेली होती

त्यानंतर तब्बल 3 महिन्यानंतर आज पुणे महापालिकेच्या नव्या सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकानी सभागृहात भगवे फेटे घालून प्रवेश केला. त्यानंतर सभागृहात भारतीय संविधानाचे वाचन उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी केले. त्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी नगरसेवक गोपाळ चिंतल, आदित्य माळवे, अविनाश बागवे यांची भाषणं झाली. त्यानंतर वैशाली बनकर यांचे भाषण सुरू असताना मनसेचे गटनेते वसंत मोरे यांच्या टेबल समोर अचानक वरून लाकडी ठोकळा पडण्याची घटना घडली. या घटनेमुळे अनेक नगरसेवकांनी छताकडे पाहिले.आणि चर्चा रंगू लागली .

सभागृहात वरून काही वस्तू पडण्याच्या भितीमुळे काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि नगरसेवक योगेश ससाणे हेल्मेट घालून बसले होते. पहा या राजकीय गमजेचा हा व्हिडीओ वृत्तांत …

दीपक मानकरांना मोका का लावला ? अखेर उठला आवाज (व्हिडीओ)

0

पुणे- 17 पैकी 16 गुन्ह्यात  ..निर्दोष ..मग मोका कसा लावला …? शिवसृष्टी साठी आवाज उठवला म्हणून कि आणखी काही राजकीय कारणांनी काटा काढायचा म्हणून दीपक मानकर यांचा राजकीय घात करण्यात आला ? हि शहरभर राजकीय वर्तुळात कित्येक दिवसांपासून  दबक्या आवाजात  चर्चा होते आहे .पण जाहीर बोलण्याची हिम्मत कोणी केली नाही … आज अखेर महापालिकेच्या नव्या .. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कॉंग्रेस चे गट नेते अरविंद शिंदे या वर आवाज उठविला ..वाचा फोडली …

पीवायसी हिंदू जिमखाना संघांचा सलग दुसरा विजय

0
  • व्हेरॉकच्या सौरभ नवले याची  धडाकेबाज शतकी खेळी

पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक 2018 निमंत्रित 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी, पीवायसी हिंदू जिमखाना या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला.

पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना व पूना क्लब येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत अमेय भावेच्या 97धावांसह साहिल छुरी(4-33)याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने डेक्कन जिमखाना संघाचा 15धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पीवायसी हिंदू जिमखाना संघाने  45षटकात 9बाद 212धावांचे आव्हान उभे केले. यात अमेय भावे 97(109), साहिल मदन नाबाद 16(20), अखिलेश गवळे पाटील 14(21), आर्या जाधव नाबाद 16(10), शुभंकर हार्डीकर 15, श्रेयश वालेकर 12यांनी संघाच्या डावाला आकार दिला. डेक्कनकडून प्रखर अगरवालने 39धावात 4गडी बाद केले. 212धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या डेक्कन जिमखाना संघाला 44.1षटकात 197धावावर आटोपला. डेक्कन संघ 3बाद 26 अशा अडचणीत असताना सुहेल श्रीखंडे(61धावा)व अभिषेक ताटे(43धावा) यांनी चौथ्या गडयासाठी 108चेंडूत 100धावांची भागीदार करून संघाला 3बाद 126अशा सुस्थितीत आणले. पण 27व्या षटकात पीवायसीच्या साहिल छुरी याने अफलातून गोलंदाजी करत अभिषेक ताटे व दीपक गिरी हे 2महत्वपूर्ण गडी बाद करून सामन्याला कलाटणी दिली. त्यानंतर आदेश पालवेच्या नाबाद 47धावा वगळता एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकला नाही. यामध्ये पीवायसीच्या यश माने(2-52), आदित्य लोंढे(1-26), सिद्देश वीर(1-40), आर्य जाधव 1-46)यांनी अचूक गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामन्याचा मानकरी अमेय भावे ठरला.

दुसऱ्या सामन्यात सौरभ नवले(138धावा)याने केलेल्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने  एमसीए 2 संघाचा 137धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. अन्य लढतीत राजवर्धन उंडरे(90धावा व 2-39)याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने पूना क्लब संघाचा 4गडी राखून पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: 
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 45षटकात 4बाद 247धावा(सौरभ नवले 138(120), यश जगदाळे नाबाद 33(29), किरण मोरे 25(49), ओम भोसले 24(59), रामेश्वर दौड 2-53, आदित्य कासुरखेडे 1-25, गौरव जोशी 1-36) वि.वि.एमसीए 2: 42.1षटकात सर्वबाद 110धावा(आनंद विश्वकर्मा नाबाद 59(115), वैभव पाटील 16, ओम भोसले 3-19, अॅलन रॉड्रिगेस 3-20);सामनावीर-सौरभ नवले;
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी137 धावांनी विजयी;

पीवायसी हिंदू जिमखाना: 45षटकात 9बाद 212धावा(अमेय भावे 97(109), साहिल मदन नाबाद 16(20), अखिलेश गवळे पाटील 14(21), आर्या जाधव नाबाद 16(10), शुभंकर हार्डीकर 15, श्रेयश वालेकर 12, प्रखर अगरवाल 4-39, आर्यन बांगळे 2-35, रेहान खान 1-23)वि.वि.डेक्कन जिमखाना: 44.1षटकात सर्वबाद 197धावा(सुहेल श्रीखंडे 61(81), अभिषेक ताटे 43(51), आदेश पालवे नाबाद 47(52), साहिल छुरी 4-33, यश माने 2-52, आदित्य लोंढे 1-26, सिद्देश वीर 1-40, आर्य जाधव 1-46);सामनावीर-अमेय भावे; पीवायसी 15धावांनी विजयी;

पूना क्लब: 45षटकात 9बाद 218धावा(चंद्रकांत सरोज नाबाद 42(41), संचित दास 40(61), अनिश पलेशा 38(40), ओंकार मोहोळ 32(54), ओंकार साळुंखे 19(17), मोनिश गोखले 3-26, कनय्या लड्डा 2-39, राजवर्धन उंडरे 2-39, मनोज हुमे 1-28)पराभूत वि.क्लब ऑफ महाराष्ट्र: 42.3षटकात 6बाद 219धावा(राजवर्धन उंडरे 90(115), कनय्या लड्डा 37(49), ओंकार आढवडे 26(26), विराज धारवाटकर 15, शंतनु कदम 15, सौरभ यादव 2-35, ओंकार साळुंखे 1-21, ओंकार मोहोळ 1-33, दर्शित लुंकड 1-34);सामनावीर- राजवर्धन उंडरे; क्लब ऑफ महाराष्ट्र 4गडी राखून विजयी.

‘मिसेस इंडिया – एम्प्रेस ऑफ द नेशन २०१८’ सौंदर्य स्पर्धेत पुण्याच्या डॉ. गौरांगी श्रावत यांना सम्राज्ञीपदाचा मुकूट

0

पुणे- प्रख्यात कॉस्मेटॉलॉजिस्ट डॉ. गौरांगी श्रावत यांनी गेल्या आठवड्यात हयात पुणे हॉटेलमध्ये अत्यंत दिमाखात झालेल्या ‘मिसेस इंडिया – एम्प्रेस ऑफ द नेशन २०१८’ या प्रतिष्ठेच्या सौंदर्य स्पर्धेत सम्राज्ञीपदाचा मुकूट पटकावला आहे. त्वचेची निगा हे डॉ. गौरांगी यांचे कौशल्य क्षेत्र असल्याने त्यांनी या स्पर्धेत ‘मिसेस ब्युटिफुल स्किन’ हा किताबही सहज प्राप्त केला आहे.

डॉ. गौरांगी या एम.डी. असून पुण्यातील सॅलिस्बरी पार्कमधील ‘स्किनवर्क्स’ या त्वचा, केस व लेझर क्लिनिकच्या संस्थापक आहेत. पुण्यातील बीव्हीपीएमसी महाविद्यालयातून वर्ष २०१० मध्ये पदवी संपादन केल्यानंतर त्यांना विशेष ज्ञानशाखेत विस्तार करायचा होता. यासंदर्भात त्यांनी सांगितले, की “मी त्वचारोगशास्त्र (डरमॅटॉलॉजी) हा विषय निवडला, कारण मला हे क्षेत्र अद्भुत, प्रचंड सुप्त संधी असणारे वाटलेच, पण आणखीही एक प्रेरणादायी घटक त्यामागे होता. माझ्या रुपवान आईचे तिच्या तरुण वयात मीरत शहरात स्वतःचे भरभराटीला आलेले सलून होते, जेथे ती महिलांना सौंदर्यवर्धनाचे मार्गदर्शन करत असे. मी गेली ३ वर्षे सुपर-स्पेशॅलिस्ट म्हणून माझ्या कौशल्याला पैलू पाडत होते. मास्टर्स डिग्री घेतल्यानंतर मी कॉस्मेटॉलॉजी या क्षेत्रात पदार्पण केले.”

सौंदर्य स्पर्धेत घवघवीत यश संपादन करुन सम्राज्ञीपदाचा मुकूट जिंकण्याच्या कामगिरीबद्दल बोलताना हा प्रसंग आपले जीवन बदलून टाकणाऱ्या क्षणांपैकी एक असल्याचे आणि त्याने बाह्य जगाकडे बघण्याच्या आपल्या दृष्टीकोनात परिवर्तन घडवल्याचे डॉ. गौरांगी यांनी मान्य केले. त्या म्हणाल्या, “मी केवळ माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित केले असतानाच्या काळातच मिसेस इंडिया सौंदर्य स्पर्धेची संधी समोर चालून आली. या स्पर्धेने मला तत्काळ नाव आणि प्रसिद्धी मिळवून दिलीच, पण आघाडीच्या कॉस्मेटॉलॉजिस्ट असा गौरवही प्राप्त करुन दिला. मी मेराकी सलूनच्या सह-संस्थापक नलिनी धीर यांचेही खूप आभार मानते, ज्यांनी मला स्पर्धेत भाग घेण्यासाठी उत्तेजन दिले.”

त्या पुढे म्हणाल्या, “या सौंदर्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत देशभरातील आणि विविध क्षेत्रांतील ३२ लावण्यवती महिलांनी आपल्यातील सौंदर्य, आरोग्य व बुद्धिमत्तेच्या पैलूंचा आविष्कार घडवला. त्या केवळ एकमेकींशीच स्पर्धा करत नव्हत्या तर आपल्यातील चैतन्याचाही शोध घेत होत्या. मी ज्यात भाग घेत होते त्या उपक्रमाचा आवाका लक्षात आल्यावर मलाही त्या चैतन्य किरणांचा स्पर्श झाला,” असे डॉ. गौरांगी म्हणाल्या.

“पण मी माझ्या यशाचे श्रेय निःसंशय माझ्या २ गुरूंना देते. या दोन व्यक्ती, ज्यांनी आम्हाला त्यांच्या प्रेमळ पंखाखाली घेऊन मार्गदर्शन केले, त्या आमच्यातील प्रत्येक स्पर्धकाच्या आयुष्यभर आठवणीत राहतील. हे दोन गुरू म्हणजे अंजना (आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा प्रशिक्षक) आणि डिवा सौंदर्य स्पर्धेचे कार्ल मस्कारेन्हास. या महान व्यक्तींनी आम्हाला केवळ आपल्यातील सर्वोत्तम गुणांचे मंचावर व जीवनात प्रदर्शन करायला शिकवले नसून आम्ही जीवनात जोडीदारासमवेत कोणती ध्येये आखून घ्यायची, याचेही मार्गदर्शन केले. खरंतर हा दुसरा टप्पा त्यांच्या योजनेचा भाग नव्हता. म्हणूनच माझ्यासाठी ते नेहमीच गुरु-संगोपनकर्ते-मार्गदर्शक राहतील.” या शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

मुख्य कार्यक्रमाआधीचे चार दिवस मिळालेल्या या प्रशिक्षणातूनच डॉ. गौरांगी यांना त्यांच्यातील सुप्त सामर्थ्याची जाणीव झाली. ही खरोखर यंदाची सर्वांत मोठी सौंदर्य स्पर्धा होती. पुण्यातील नामवंत व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. परीक्षक मंडळात मिस वर्ल्ड १९९९ स्पर्धा विजेत्या युक्ता मुखी, मिसेस वर्ल्ड २००१ स्पर्धा विजेत्या अदिती गोवित्रीकर, प्रख्यात गायिका शिबानी कश्यप, मिसेस टुरिझम २००५ विजेत्या सोनल चौहान आणि प्रसिद्ध अभिनेता शरहान सिंग यांचा समावेश होता, तर विजय अरान्हा, सुमित कुमार (हयात पुणेचे सरव्यवस्थापक), सौ. सपना आनंद छाजेड, डॉ. अक्षया जैन व कार्ल मस्कारेन्हास या मान्यवरांचीही त्यांना साथ लाभली. लोकप्रिय दूरचित्रवाणी अभिनेता अमन वर्मा याने त्याच्या दिमाखदार आणि उत्कृष्ट शैलीत सूत्रसंचालन करुन आमंत्रित प्रेक्षकवर्गाला मंत्रमुग्ध केले.

“स्पर्धेच्या अंतिम फेरीत विचारलेला प्रश्न माझ्या अंतःकरणाला भिडणारा होता. तो म्हणजे सौंदर्य स्पर्धा जिंकण्याबाबत तुम्ही गंभीर असाल तर त्यासाठी मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे, असे तुम्हाला वाटते का. यावर माझे उत्तर होते. होय. असे प्रशिक्षण हा खरोखर सौंदर्य स्पर्धेचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे, कारण डिवा सौंदर्य स्पर्धेने पुरवलेल्या प्रशिक्षणानंतर माझ्यातच झालेला बदल मी अनुभवते आहे. अर्थात हे सगळे शक्य झाले ते माझ्या पतीच्या, डॉ. भक्ती सारंगी यांच्या आणि माझ्या प्रेमळ कुटूंबाच्या पाठिंब्यामुळेच. स्पर्धेचा हा प्रवास भारावून टाकणारा होता आणि त्यानेच मला आजची ताकदवान, आत्मविश्वासू आणि चैतन्यपूर्ण महिला घडवले आहे,” या शब्दांत डॉ. गौरांगी यांनी समारोप केला.  

वीज दरवाढ रद्द केली नाही तर काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन -रमेश बागवे(व्हिडीओ)

0

पुणे-महाराष्ट्र राज्य विद्युत नियंत्रण आयोगाने दि. १ सप्टेंबर २०१८ पासून वीजदर वाढविला आहे. यादरवाढीच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आजमहाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कं. लि., रास्ता पेठ येथे काँग्रेस पक्षातर्फे धरणे आंदोलन करण्यातआले. भाजप प्रणित राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेशबागवे म्हणाले की, ‘‘भाजप प्रणित राज्य सरकारने ५% वीज दरवाढ केली आहे. पूर्वी घरगुती मीटरला २००युनिट पर्यंत वीज आकार ६ रूपये १० पैसे युनिट होते. ५% वाढीमुळे ग्राहकांना ६० रूपये अधिक मोजावेलागणार आहेत. तसेच २०० युनिट पेक्षा जास्त युनिट वापरणाऱ्या ग्राहकांना १०० रूपये अधिक द्यावेलागणार आहे. त्याचप्रमाणे व्‍यवसायासाठी वापरण्यात येणाऱ्या मीटरचे दरही दुप्पटीने वाढले आहेत.पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढलेले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकत्रस्त झाला आहे. त्यात भाजप सरकारने वीज दरवाढ करून नागरिकांची पिळवणूक केली आहे. अच्छेदिनचे स्वप्न दाखविणारे भाजप सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. भारतातील इतर राज्यांपेक्षामहाराष्ट्रातच सर्वात जास्त वीज दर आहे. या दरवाढीमुळे महाराष्ट्रातील उद्योग – धंदे दुसऱ्या राज्यातजाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढून महाराष्ट्राचे आर्थिक नुकसान होणार आहे. राज्यसरकारने त्वरीत ही दरवाढ रद्द केली नाही तर काँग्रेस पक्ष जनतेच्या हितासाठी तीव्र आंदोलन करेल.’’यावेळी माजी आमदार मोहन जोशी, सौ. कमल व्‍यवहारे, गोपाळ तिवारी आदींची भाषणे झाली.
या आंदोलनात ॲड. अभय छाजेड, नगरसेवक लता राजगुरू, चाँदबी नदाफ, अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर,अजित दरेकर, दत्ता बहिरट, शिवाजी केदारी, रमेश अय्यर, संगीता तिवारी, सोनाली मारणे, राजेंद्र शिरसाट,सचिन आडेकर, सुजित यादव, रफिक शेख, सुजाता शेट्टी, मीरा शिंदे, सुनिल घाडगे, प्रदिप परदेशी,जयकुमार ठोंबरे, सतिश पवार, रमेश सकट क्लेमंट लाजरस, साहिल राऊत, बाळासाहेब अमराळे, संगीताक्षिरसागर, रजिया बल्लारी, भगवान धुमाळ, राजेश शिंदे, वाल्मिक जगताप, सुनिल शिंदे, शेखर कपोते,एडवविन रॉबर्ट, केविन मॅन्युअल, दयानंद अडागळे, चेतन आगरवाल, संजय कवडे, अनिल अवटी, मनोहरगाडेकर, विकास टिंगरे, विनय ढेरे, राजेंद्र जगताप, राजेंद्र पेशने, अविनाश अडसुळ, राजू शेख, गणेशभंडारी, रवि पाटोळे, प्रशांत वेलणकर, राजा महाजन, राधिका मखामले, कल्पना उनवणे, प्रशांत महामुनी,
दिपक ओव्‍हाळ, नंदा ढावरे, प्रकाश आरणे आदी सहभागी झाले होते.

गणेश मंडळांना संस्कृती प्रतिष्ठानचे आवाहन (व्हिडीओ)

0

पुणे- सामाजिक आणि विधायक कामाची कास धरणाऱ्या आणि संस्कृती जपणाऱ्या गणेश मंडळांचा गौरव करण्यासाठी गणेश उत्सव  स्पर्धेचे आयोजन कोथरूडच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे . या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी या स्पर्धेत अधिकाअधिक मंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे . पहा आणि ऐका नेमके त्यांनी काय म्हटले आहे …..

तन्मय मंगेश साळवेकर ची ‘चायनीज ब्रीज ‘ भाषा प्रभुत्व स्पर्धेसाठी निवड

0
पुणे : मिलेनियम स्कुलचा विद्यार्थी तन्मय मंगेश साळवेकर याची चीनमधील ‘चायनीज ब्रीज ‘ या भाषाप्रभुत्व  स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तन्मय हा  चायनीज भाषा शिकत असून चायनीज ब्रीज स्पर्धेमध्ये तो भारताचा प्रतिनिधी म्हणून निवडला गेला आहे.
त्याला ‘यीन -यांग सेंटर फॉर चायनीज लँग्वेज ‘ च्या संचालिका    यशोधरा गाडगीळ व ईशानी कोतवाल यांनी मार्गदर्शन केले.
चायनीज ब्रीज स्पर्धा ७ ते २२ ऑक्टोबर दरम्यान  खुन्मिंग ( युन्नान ) येथे होणार आहेत.

आमदार टिळेकर यांच्याविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार

0

पुणे : मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी हडपसरमधील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. येवलेवाडी येथील विकास आराखड्यात टिळेकर यांनी बांधकाम व्यावसायिकांना फायदा करून देण्यासाठी एक कोटी सात लाख रूपयांची मर्सिडीस फाॅरमॅटिक कार ही भेट स्वरूपात स्वीकारली असल्याच्या आरोपाचा या तक्रारीत पुनरूच्चार करण्यात आला आहे.

मोरे यांच्या आरोपाविरुद्ध टिळेकर यांनी दहा कोटी रूपयांच्या बदनामीच्या दाव्याचा नोटीस या आधीच दिली आहे. त्यानंतर मोरे यांनी एसीबीकडे आता याबाबत दाद मागण्याचे ठरविले आहे. त्यामुळे टिळेकर व मोरे या दोघांतील वाद थांबण्याची लगेच शक्यता दिसत नाही. भेट स्वीकारून टिळेकर यांनी लोकप्रतिनिधी कायद्याचा भंग केला असून, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यात करण्यात आली आहे.

हिल टाॅप व हिल स्लोपचे आरक्षण बदलून संबंधित व्यावासायिकाचा तब्बल ५० कोटी रूपयांचा फायदा टिळेकर यांनी करून दिल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. तसेच प्राप्तिकर व इतर करांचा भरणा करावा लागू नये यासाठी ही गाडी संबंधित व्यावसायिकाच्या नावावर आहे. मात्र तिचा वापर हे टिळेकर करत असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. मनसेचे दुसरे नगरसेवक साईनाथ बाबर यांची तक्रार अर्जावर स्वाक्षरी आहे.

टिळेकर यांनी हे आरोप वेळोवेळी फेटाळून लावले आहेत. तसेच मित्राची गाडी वापरायला घेतली तर काय चुकले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. मोरे हे व्यक्तिद्वेषातून आरोप करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्यांना दहा कोटी रूपयांची नोटीस पाठविल्याचे त्यांनी नमूद केले.

सुमित राघवन आणि मृणाल कुलकर्णी पहिल्यांदाच एकत्र

0

अभिनेता सुमित राघवन आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी मालिका, चित्रपट आणि नाटक अशा विविध माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याचा अमीट ठसा उमटवला आहे. मात्र आज पर्यंत कधीही एकत्रित काम केले नव्हते, फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी प्रा. लि. निर्मित आणि प्रोऍक्टिव्ह प्रस्तुत ‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने सुमित राघवन आणि मृणाल कुलकर्णी हे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीत मृणाल कुलकर्णी यांची प्रदीर्घ कारकीर्द आहे, छोट्या पडद्यावरही त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, तर हिंदी आणि मराठी रंगभूमीवर सुमित राघवन यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. हिंदी मालिकांमध्ये त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. ‘होम स्वीट होम’ या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोन मोठे कलाकार एकत्र आल्याने त्यांची केमेस्ट्री बघणे प्रेक्षकांसाठी निश्चितच औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच मोहन जोशी आणि सुमित राघवन सुद्धा मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत, ऐंशीच्या दशकात एका मालिकेत त्यांनी एकत्र काम केले होते. घर आणि घरातील माणसांच्या नातेसंबंधावर भाष्य करणारा ‘होम स्वीट होम’ चित्रपट घराविषयीच्या अनेक रंजक कल्पना आणि भावनाप्रधान घटनांचा साक्षीदार आहे.

‘होम स्वीट होम’ मध्ये सुमित राघवन आणि मृणाल कुलकर्णीसह रीमा, मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषीकेश जोशी, विभावरी देशपांडे, क्षिती जोग, प्रसाद ओक आदी कलाकार आहेत. शिवाय या चित्रपटातून सुप्रसिद्ध अभिनेते हृषीकेश जोशी यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. चित्रपटाची कथा वैभव जोशी, हृषीकेश जोशी आणि मुग्ध गोडबोले यांची आहे, तर संगीतकार  नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर आहेत. हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर हे चित्रपटाचे निर्माते असून आकाश पेंढारकर आणि विनोद सातव हे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘होम स्वीट होम’ हा चित्रपट येत्या २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

बहुजन समाजील मुलांना शिक्षणापासुन वंचित ठेवण्याचा डाव – चेतन तुपे पाटील

0

पुणे-शाळा व महाविद्यालय यांना भिकारी म्हणणाऱ्या भाजप चे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांचा निषेध करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रमुख प्रवेशद्वारा बाहेर आंदोलन करण्यात आले .यावेळी बोलताना प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले जावडेकरांनी जे वक्तव्य केले आहे ते अतिशय लाजिरवाणे आहे त्यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना पुणे शहरात फिरु देणार नाही. हे मनुवादी प्रवृत्तीचे सरकार आहे यामुळेच अशी वक्त्यव्ये वारंवार या सरकारकडून होत होत आहे असे रविंद्र माळवदकर म्हणाले, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जी युनिव्हर्सिटी उपलब्ध नाही त्या जिओ युनिव्हर्सिटीला हजारो कोटी रुपये दिले आणि ज्या शिक्षण संस्था सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण देन्याचे कार्य करतात त्यांना भिक मागायला सांगतात असा देशाचा विचित्र कारभार चालु आहे. ज्या शिक्षण संस्थामध्ये बहुजन समाजातील मुले शिक्षण घेतात त्या बंद झाल्या पाहिजेत बहुजन समाजातील मुलांनी अशिक्षित च राहीले पाहिले अशी भुमिका या जातीयवादी सरकारची आहे पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो असे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील म्हणाले. यावेळी रविंद्र माळवदकर,माआ.बापु पठारे,भगवानराव साळुंखे,मा.महापौर दत्ता धनकवडे, नगरसेवक सुभाष जगताप,दिलेप बराटे, महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक अध्यक्ष राकेश कामठे,अल्पसंख्याक अध्यक्ष ईक्बाल शेख,विद्यार्थी अध्यक्ष रिशी परदेशी, युवती अध्यक्षा मनाली भिलारे,बाळासाहेब बोडके, निलेश निकम,बापु डाकले,उदय महाले ,प्रदीप देशमुख,रजनी पाचंगे,मिलिन्द वालवडकर,सुकेश पासलकर,नारायण गलांडे,भैय्यासाहेब जाधव ,ऑड. खुणे पाटील , फहिम शेख,दादासाहेब सांगळे , विपुल म्हैसुरकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिनेत्री स्पृहा जोशीचा पती वरद लघाटेचा सिनेसृष्टीत डेब्यू

0
अभिनेत्री स्पृहा जोशीचा लवकरचा ‘होम स्वीट होम’ हा सिनेमा रिलीज होत आहे. ह्या सिनेमात तिचा  पती वरद लघाटेयाने ‘इकडून तिकडे’ ह्या गाण्यातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. नुकतेच हे गाणे युट्यूबवर रिलीज झाले आहे.
ह्या गाण्याविषयी स्पृहा सांगते, “माझ्यावर चित्रीत झालेले हे गाणे, अजय गोगवले ह्यांनी गायले आहे.  अजय-अतुल ह्यांच्या संगीताची मी चाहती आहे. तसेच अजय गोगावलेंचा स्वरसाज असलेेले  एखादे गाणे आपल्या सिनेमात असावे, अशी माझी  ब-याच कालावधीपासून इच्छा होती. ही इच्छा ‘इकडून तिकडे’ गाण्यामूळे पूर्ण झाली. हे गाणे माझ्या हृदयाजवळचे असण्याचे दूसरे कारण, ह्यात वरदचा असलेला गेस्ट अपिअरन्स. जो योगायोगाने घडला आहे.”
स्पृहा आपल्या पतीच्या डेब्यूविषयी सांगते, “वरद नेहमी मला आणि माझ्या फिल्ममेकर्सना मस्करीत सांगतो, की, मला एक गेस्ट अपिअरन्स करायचा आहे. ‘इकडून तिकडे’च्या चित्रीकरणावेळी वरद मला भेटायला सेटवर आला होता. हृषिकेशने वरदला एक छोटासा अपिअरन्स करशील का, अशी विनंती केली. आणि वरदचा डेब्यू झाला.”
स्पृहा हसून म्हणते, ” टू स्टेट्स सिनेमाच्या एका सिक्वेन्सचे शुटिंग वरदच्या ऑफिसमध्ये झाले होते. त्यावेळी तो एका सिक्वेन्समध्ये पाठमोरा उभा होता. म्हणूनच वरद नेहमी मस्करीत म्हणतो, की, मी जी फिल्म करतो ती, २०० करोडचे बॉक्स ऑफिस कलेक्शन करते. त्यामूळे आता तूही ह्या फिल्मने २०० करोड क्लबचा हिस्सा होणार.”

देशाच्या प्रगतीमध्ये अभियंत्यांचा मोठा वाटा

0

अभियंता दिवसानिमित्त व्यक्त केल्या भावना

पुणे :-  माहिती तंत्रज्ञानापासून ते शेतीपर्यंत आणि मोटारीपासून ते निवाऱ्यापर्यंत प्रत्येक क्षेत्राच्या प्रगती अभियंत्यांवर अवलंबून असते. म्हणूनच देशाच्या प्रगतीमध्ये अभियंत्यांचा मोठा वाटा आहे असे मत अमित गोयल यांनी मांडले.

अभियांत्रिकी क्षेत्राचे जनक भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा जन्मदिनानिमित्त अभियंता दिवस साजरा करण्यात आला. गोयल गंगा डेव्हलपर्सच्या बावधन मधील गंगा लेजंड साईट वर अभियंत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जी. ए. भिलारे कन्सल्टंट प्रा.लि चे संचालक जी. ए. भिलारे , हेमंत निंबाळकर आणि गोयल गंगा डेव्हलपर्सचे संचालक अमित गोयल उपस्थित होते.

यावेळी बोलताना अमित गोयल म्हणाले, अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. शेतकरी जरी अन्न पिकवत असले तरी शेतीच्या मशागतीसाठी लागणारी उपकरणे तयार करण्याचे काम अभियंता करतो. तसेच शेतीसाठी लागणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी अभियंता जलाशयावर धरण बांधण्याचे देखील  काम करतो. घर बांधणीपासून पायाभूत सुविधा तयार करण्यापर्यंतची कामे अभियंता करत असतो. त्याच प्रमाणे आपल्याला दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अनेक वस्तू तयार करून आपल आयुष्य सुखकर करण्याचे काम ही अभियंता करत असतो.

याचबरोबर निंबाळकर यांनी उंच इमारतींच्या संकल्पना,साइटवर काम करताना अपघात कसे टाळता येतील, येथील सुरक्षिततेसंदर्भात सावधानता कशी बाळगावी तसेच स्ट्रक्चरल डिझाइनची प्रक्रिया आणि डिझाइनमध्ये वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअर्सविषयी देखील चर्चा केली. त्यानंतर इतर अनेक अभियंत्यांच्या शंकांचे निरसन करत त्यांना मार्गदर्शनही केले.

पहिल्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक 2018 निमंत्रित 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी, एमसीए 1 संघांची विजयी सलामी

0

पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक 2018 निमंत्रित 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी, एमसीए 1 या संघांनी अनुक्रमे कॅडेन्स व एमसीए 2 या संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

डेक्कन जिमखाना व पूना क्लब येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीच्या पहिल्या सामन्यात सौरभ नवलेच्या 49धावांसह विकी ओस्तवाल(4-30)याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने कॅडेन्स संघाचा 49धावांनी पराभव केला. कॅडेन्स संघाच्या गौरव कोमकर(4-3, अभिजित सावळे( 3-40), हर्षल काटे(1-21), ह्रितेक सुरेका(1-30)यांनी केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीला 43.2षटकात 195धावापर्यंतच मजल मारता आली. यामध्ये सौरभ नवले 49, अद्वैत मुळे 30, ओम भोसले 24, हर्षवर्धन पाटील 14, राहुल वारे 14, यश जगदाळे 12यांनी संघाच्या डावाला आकार दिला. 195 धावांचा पाठलाग करताना कॅडेन्स संघ 39षटकात 146धावाच करू शकला. कौशल तांबे 63, हर्षल काटे 23, प्रद्युम्न चव्हाण 19, अभिजित सावळे नाबाद 17यांनी दिलेली लढत अपूरी ठरली. व्हेरॉककडून विकी ओस्तवालने 30धावात 4गडी बाद केले. विकीला हर्षवर्धन पाटील(2-16) व  साईगणेश विडप(2-27)यांनी प्रत्येकी दोन गडी, तर अॅलन रॉड्रिगेसने(1-33)एक गडी बाद करून सुरेख साथ दिली. सामन्याचा मानकरी सौरभ नवले ठरला.

दुसऱ्या सामन्यात तनिश जैन(नाबाद 54धावा)याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर  एमसीए 1 संघाने एमसीए 2 संघाचा 8गडी राखून पराभव करत शानदार सुरुवात केली. पहिल्यांदा खेळताना एमसीए 2 संघाचा डाव 40.3षटकात 112धावांवर संपुष्टात आला. यात योगेश डोंगरेने सर्वाधिक 44धावा केल्या. एमसीए 1 संघाकडून हार्दिक अदक(2-18), वेंकटेश काने(2-5), सत्यजीत नाईक(2-24), ओंकार मोहिते(2-27)यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. 112धावांचे आव्हान एमसीए 1: 28.4षटकात 2 गड्यांच्या बदल्यात 116धावा करून पूर्ण केले. यात तनिश जैनने 72चेंडूत नाबाद 54धावा, यश यादवने 60चेंडूत नाबाद 34धावा करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामनावीर हा ‘किताब तनिश जैनला देण्यात आला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: 
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 43.2षटकात सर्वबाद 195धावा(सौरभ नवले 49(40), अद्वैत मुळे 30(97), ओम भोसले 24(27), हर्षवर्धन पाटील 14(14), राहुल वारे 14(12), यश जगदाळे 12, गौरव कोमकर 4-35, अभिजित सावळे 3-40, हर्षल काटे 1-21, ह्रितेक सुरेका 1-30)वि.वि.कॅडेन्स: 39षटकात सर्वबाद 146धावा(कौशल तांबे 63(93), हर्षल काटे 23(44), प्रद्युम्न चव्हाण 19(40), अभिजित सावळे नाबाद 17, विकी ओस्तवाल 4-30, हर्षवर्धन पाटील 2-16, साईगणेश विडप 2-27, अॅलन रॉड्रिगेस 1-33);सामनावीर- सौरभ नवले;

एमसीए 2: 40.3षटकात सर्वबाद 112(योगेश डोंगरे 44(63), प्रशांत ढोले 12(28), प्रद्युम्न महाजन 12(24), हार्दिक अदक 2-18, वेंकटेश काने 2-5, सत्यजीत नाईक 2-24, ओंकार मोहिते 2-27)पराभूत वि.एमसीए 1: 28.4षटकात 2बाद 116धावा(तनिश जैन नाबाद 54(72), यश यादव नाबाद 34(60), ओंकार गावडे 14(19), योगेश डोंगरे 1-17, रामेश्वर दौड 1-25);सामनावीर-तनिश जैन.

ऑल्विन आणि शंकर यांना एफसी पुणे सिटीकडून अनुभवाची अपेक्षा

0

पुणे: एफसी पुणे सिटीच्या गेल्या मौसमातील ऐतिहासिक कामगिरीमध्ये संघातील युवा खेळाडूंचा मोठा वाटा होता. आता ऑल्विन जॉर्ज आणि शंकर संपिंगिराज यांच्या समावेशानंतर हीच परंपरा कायम ठेवण्याची क्लबची इच्छा आहे. या मौसमात एफसी पुणे सिटी संघात समावेश झालेल्या या मध्यरक्षकांनी क्लबकडून असलेल्या अपेक्षा मोकळेपणाने व्यक्त केल्या.

मी प्रामुख्याने दुखापत मुक्त राहून येत्या मौसमात तंदरुस्तीची सर्वोच्च पातळी गाठण्याचा प्रयत्न करणार आहे, असे शंकर याने सांगितले. बंगळुरू एफसी पुणे कडून चमकदार कामगिरी केल्यावर शंकरची भारताच्या 23वर्षाखालील संघात निवड झाली होती. कर्नाटकमध्ये जन्म झालेल्या शंकरने एचएएल कडून व्यावसायिक कारकिर्दीला प्रारंभ केला आणि त्यानंतर पैलान ऍरोज, डीएसके शिवाजीयन्स संघाकडूनही तो खेळला होता.

ऑल्विन याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात टाटा फुटबॉल अकादमीकडून २००८मध्ये केली आणि चार वर्षानंतर पैलान ऍरोज संघाने त्याला करारबद्ध केले. त्यानंतर डेंपो संघाकडून मध्यरक्षकाची भूमिका बजावताना त्याने सर्वोत्कृष्ट युवा भारतीय खेळाडू म्हणून सलग दोन वर्ष पुरस्कार पटकावला. इंडियन सुपर लीगमध्ये एफसी गोवा, दिल्ली डायनामोज एफसी व बेंगळुरू एफसी संघाकडून त्याने मोलाची कामगिरी बजावली.

त्याचा सहकारी ऑल्विन याने आपला प्राधान्य क्रम स्पष्ट केला. एफसी पुणे सिटीकडून जास्तीत जास्त सामने खेळण्याची माझी इच्छा असून त्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहेत.मूळ नागपूरचा असलेला ऑल्विन हा एफसी पुणे सिटीकडून प्रथमच खेळत आहे.

एफसी पुणे सिटी संघात सामील होण्याबाबत दोघांनी सांगितले कि, माझ्या अनेक मित्रांच्या सल्यावरून हा एफसी पुणे सिटी एक दर्जेदार संघ असल्याचे तसेच गेल्या मौसमात या संघाने उत्तम कामगिरी केल्याचे आम्हाला समजले. जवळ जवळ 7 या सांगितले.प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सएवोत्कृ कामगीसाठी सजज आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली.

2013मधील सॅफ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर जानेवारी 2019मध्ये होणाऱ्या एएफसी एशियन स्पर्धेत भारतीय खेळाडूंसोबत खेळण्यास ऑल्विन उत्सुक आहे.  

रेशन दुकानातून आता मीठ विक्रीला सुरुवात -पालकमंत्री गिरीश बापट

0

पुणे,दि.17 :- रेशन दुकानातून आता मीठ विक्री सुरु करण्यात आली आहे. मिठामुळे  शरीरातील हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होऊन पुरुषाबरोबरच महिलाही अधिक सशक्त होण्यासाठी ही योजना शासनाने आणली आहे, असे  प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न  व औषध प्रशासन, संसदीय कार्य तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. यावेळी प्राथमिक स्वरुपात काही महिलांना मीठ पिशवीचे वाटपही पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

नाना पेठ, येथील क्रांती ज्योती स्वस्त धान्य दुकानात लोह आणि आयोडीन युक्त मिठाची रास्तभाव दुकानातून विक्रीचा शुभारंभ पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुरवठा विभागाच्या उपायुक्त नीलिमा धायगुडे, अन्न धान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे, पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष दिलीप गिरमकर,टाटा कंपनीचे श्री. अय्यर  आदी उपस्थित होते.

पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, राज्यात नागपूर आणि पुणे या दोन जिल्हयांत मीठ विक्रीची सुरुवात झाली आहे. त्या पाठोपाठ इतर जिल्हयांतही ती लवकरच सुरु करणार आहोत. स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून धान्य वितरणासाठी ई-पॉस मशीनचा उपयोग करण्यात येत आहे. ज्यांनी अद्यापपर्यंत आधार कार्ड काढलेले नाही त्यांनी ते लवकरात लवकर काढून घेतले पाहिजे म्हणजे त्यांना या योजनांचा लाभ मिळू शकतो. पुण्यामध्ये महिलांच्या तपासणीमधून असे लक्षात आले आहे की, 5 ते 15 वयोगटातील 98 टक्के महिलांमध्ये रक्तातील लोहाचे प्रमाण कमी आहे. मिठामध्ये हिमोग्लोबीन वाढीसाठी पोषक घटक आहेत. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरवठा विभागाच्या उपायुक्त नीलिमा धायगुडे यांनी तर उपस्थितांचे आभार अस्मिता मोरे यांनी मानले. यावेळी पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी  व परिसरातील नागरिक उपस्थित होते.