तन्मय मंगेश साळवेकर ची ‘चायनीज ब्रीज ‘ भाषा प्रभुत्व स्पर्धेसाठी निवड
पुणे : मिलेनियम स्कुलचा विद्यार्थी तन्मय मंगेश साळवेकर याची चीनमधील ‘चायनीज ब्रीज ‘ या भाषाप्रभुत्व स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तन्मय हा चायनीज भाषा शिकत असून चायनीज ब्रीज स्पर्धेमध्ये तो भारताचा प्रतिनिधी म्हणून निवडला गेला आहे.
त्याला ‘यीन -यांग सेंटर फॉर चायनीज लँग्वेज ‘ च्या संचालिका यशोधरा गाडगीळ व ईशानी कोतवाल यांनी मार्गदर्शन केले.