हास्यविनोदात विरघळल्या कुरघोड्या आणि रंगला राजकीय गमजा .. (व्हिडीओ)

Date:

नव्या सभागृहातील पहिल्या सभेत विकासासाठी आम्ही कटिबध्द ठराव एकमताने संमत

पुणे-महापालिकेच्या नव्या सभागृहातील पहिल्या दिवशी राजकीय कुरघोड्या आणि बांधकामांवरील त्रुटी अखेर हास्यविनोदात विरघळऊन टाकीत दिसतील तशा त्रुटी दूर करून  आणि पुण्याच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार आज येथे करण्यात आला . संविधानाच्या प्रतिज्ञेच्या वाचनाने प्रारंभ झालेल्या पहिल्या खास सभेत एखादा दुसरा गंभीरते चा अपवाद वगळता राजकीय गमजा मात्र चांगला रंगला .

नव्याने उभारण्यात आलेल्या महानगरपालिकेच्या इमारतीमधील सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी छत गळण्याची घटना घडली होती. या वरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. या घटनेला तीन महिने उलटल्यानंतर आज या सभागृहात पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली. आज सभागृहात नगरसेवकांचे भाषण सुरु असताना अचानक वरुन एक लाकडी ठोकळा पडला  आणि त्यावरून हा राजकीय गमजा रंगला .  मनसेच्या वसंत मोरेंनी हा ठोकळा भिरकावला कि काय ? असा सवाल काहींनी गमतीदार पणे उपस्थित केला मात्र तो आपल्या खास शैलीत त्यांनी तो उलटवून लावला . मध्येच दोनवेळा वाजलेले हलके सायरन , सभागृह्नेत्यांचे पीए घाईने चालता चालता पडल्याने झालेला आवाज आणि ठोकला पडल्यावर अरविंद शिंदे यांनी हेल्मेट परिधान करून दिलेल्या पोझेस त्यानंतर ‘ काळी बाहुली लावून घ्या ‘ असा दिलेला हसत खेळत चा उपरोधिक सल्ला यामुळे हा गमजा निर्माण झाला . या सर्वावर मात करीत आपल्या सभागृहाचे काम  चांगले झाल्याबद्दल सर्वांनी उल्लेख केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ,पण राजकीय कुरघोड्या करताना सभागृहाची करू नका निंदा पण  विकास कामांसाठी येथे भांडा असे सांगत सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी या सार्या राजकीय गमजांचा समारोप केला .

पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाजूला नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीचे उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान सभागृहातील छत पावसाच्या पाण्याने गळत होते. त्यावरून पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपावर विरोधकांनी सभागृहाचे अर्धवट काम सुरू असताना आणि इमारतीमधील कोणत्याही मजल्यावर काम पूर्ण झाले नसताना एवढ्या लवकर उद्घाटनाची घाई का केली अशा शब्दात राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेकडून सडकून टीकाकेली होती

त्यानंतर तब्बल 3 महिन्यानंतर आज पुणे महापालिकेच्या नव्या सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकानी सभागृहात भगवे फेटे घालून प्रवेश केला. त्यानंतर सभागृहात भारतीय संविधानाचे वाचन उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी केले. त्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी नगरसेवक गोपाळ चिंतल, आदित्य माळवे, अविनाश बागवे यांची भाषणं झाली. त्यानंतर वैशाली बनकर यांचे भाषण सुरू असताना मनसेचे गटनेते वसंत मोरे यांच्या टेबल समोर अचानक वरून लाकडी ठोकळा पडण्याची घटना घडली. या घटनेमुळे अनेक नगरसेवकांनी छताकडे पाहिले.आणि चर्चा रंगू लागली .

सभागृहात वरून काही वस्तू पडण्याच्या भितीमुळे काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि नगरसेवक योगेश ससाणे हेल्मेट घालून बसले होते. पहा या राजकीय गमजेचा हा व्हिडीओ वृत्तांत …

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“रंग रूप” भारतीय नाट्यशास्त्रावर होणार मंथन!

तीन दिवस राष्ट्रीय परिसंवाद: पुणे: सांस्कृतिक कार्य विभाग परिषद, महाराष्ट्र राज्य...

पुणेकर अनुभवणार शास्त्रीय नृत्यकलेचा अद्भभूत आविष्कार

नृत्यगुरु पंडिता रोहिणी भाटेंना ५०० पेक्षा जास्त नृत्यांगनांची आदरांजली २२-...

जिल्हा ग्राहक संरक्षण समिती बैठकीत केलेल्या सूचनांची प्रशासनाच्यावतीने दखल

प्रकरणे वेळेत निकाली काढण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देश पुणे,...

डॉ. विश्वनाथ कराड हे लाल मातीतील कुस्ती जगविण्यासाठी प्रयत्नशील- हिंदकेसरी दीनानाथ सिंग

राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धेचे उद्धाटन पुणे, दि.२१ मार्च: "आधुनिक...