पुणे-‘पी ए इनामदार कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्ट, डिझाईन, आर्ट’ मध्ये पदवी प्रदान सोहळा अलीकडेच पार पडला. ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा’चे संचालक डॉ. राजेंद्र वडनेरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार होते.
या पदवी प्रदान सोहळ्यात बी. एस्सी. (मीडिया ,ग्राफिक्स ,एनिमेशन ) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे देण्यात आली .
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव प्रा . इरफान शेख , प्राचार्य ऋषी आचार्य ,विद्यार्थी ,पालक उपस्थित होते