पुणे-महाराष्ट्र राज्य विद्युत नियंत्रण आयोगाने दि. १ सप्टेंबर २०१८ पासून वीजदर वाढविला आहे. यादरवाढीच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आजमहाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कं. लि., रास्ता पेठ येथे काँग्रेस पक्षातर्फे धरणे आंदोलन करण्यातआले. भाजप प्रणित राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेशबागवे म्हणाले की, ‘‘भाजप प्रणित राज्य सरकारने ५% वीज दरवाढ केली आहे. पूर्वी घरगुती मीटरला २००युनिट पर्यंत वीज आकार ६ रूपये १० पैसे युनिट होते. ५% वाढीमुळे ग्राहकांना ६० रूपये अधिक मोजावेलागणार आहेत. तसेच २०० युनिट पेक्षा जास्त युनिट वापरणाऱ्या ग्राहकांना १०० रूपये अधिक द्यावेलागणार आहे. त्याचप्रमाणे व्यवसायासाठी वापरण्यात येणाऱ्या मीटरचे दरही दुप्पटीने वाढले आहेत.पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढलेले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकत्रस्त झाला आहे. त्यात भाजप सरकारने वीज दरवाढ करून नागरिकांची पिळवणूक केली आहे. अच्छेदिनचे स्वप्न दाखविणारे भाजप सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. भारतातील इतर राज्यांपेक्षामहाराष्ट्रातच सर्वात जास्त वीज दर आहे. या दरवाढीमुळे महाराष्ट्रातील उद्योग – धंदे दुसऱ्या राज्यातजाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढून महाराष्ट्राचे आर्थिक नुकसान होणार आहे. राज्यसरकारने त्वरीत ही दरवाढ रद्द केली नाही तर काँग्रेस पक्ष जनतेच्या हितासाठी तीव्र आंदोलन करेल.’’यावेळी माजी आमदार मोहन जोशी, सौ. कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी आदींची भाषणे झाली.
या आंदोलनात ॲड. अभय छाजेड, नगरसेवक लता राजगुरू, चाँदबी नदाफ, अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर,अजित दरेकर, दत्ता बहिरट, शिवाजी केदारी, रमेश अय्यर, संगीता तिवारी, सोनाली मारणे, राजेंद्र शिरसाट,सचिन आडेकर, सुजित यादव, रफिक शेख, सुजाता शेट्टी, मीरा शिंदे, सुनिल घाडगे, प्रदिप परदेशी,जयकुमार ठोंबरे, सतिश पवार, रमेश सकट क्लेमंट लाजरस, साहिल राऊत, बाळासाहेब अमराळे, संगीताक्षिरसागर, रजिया बल्लारी, भगवान धुमाळ, राजेश शिंदे, वाल्मिक जगताप, सुनिल शिंदे, शेखर कपोते,एडवविन रॉबर्ट, केविन मॅन्युअल, दयानंद अडागळे, चेतन आगरवाल, संजय कवडे, अनिल अवटी, मनोहरगाडेकर, विकास टिंगरे, विनय ढेरे, राजेंद्र जगताप, राजेंद्र पेशने, अविनाश अडसुळ, राजू शेख, गणेशभंडारी, रवि पाटोळे, प्रशांत वेलणकर, राजा महाजन, राधिका मखामले, कल्पना उनवणे, प्रशांत महामुनी,
दिपक ओव्हाळ, नंदा ढावरे, प्रकाश आरणे आदी सहभागी झाले होते.
वीज दरवाढ रद्द केली नाही तर काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन -रमेश बागवे(व्हिडीओ)
Date: