Home Blog Page 3059

दिल्लीत संविधान जाळले, तरी मोदी गप्प का ?

पुणे : राजधानी दिल्लीमध्ये संविधानाची प्रत जाळण्याचे पाप काही शक्तींनी केले होते. देशाचे पंतप्रधान मोदी त्यावेळी दिल्लीत असून देखील त्यांनी त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. केंद्रातील काही मंत्री सातत्याने संविधान बदलण्याची भाषा करतात तरी ते गप्प का बसतात, असा सवाल उपस्थित करत. याचा अर्थ सत्तेत असणाऱ्यांचा संविधान बदलण्याचा विचार त्यांच्या वागण्यातून आणि कृतीतून दिसत असतो. परंतु संविधान आमच्या जगण्याचा आणि वागण्याचा विचार आहे. आम्ही ते होऊ देणार नाही, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केले.

गणेश कला क्रीडा मंच येथे ‘संविधान बचाव, देश बचाव’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजीया खान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी खासदार सुळे म्हणाल्या, बारामती लोकसभा मतदारसंघात आम्ही संविधान स्तंभ उभारले आहेत. आगामी २६ नोव्हेंबर ते २६ जानेवारी या काळात त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. समाजात अस्वस्थता आहे, तेढ वाढविण्याचे प्रयत्न होत आहेत. अशा वेळी हे संविधान स्तंभ, ‘आम्ही भारताचे नागरिक’ एक असून देशात सामाजिक सौहार्द आणि सलोखा राखण्यासाठी सदैव कटीबद्ध आहोत असा संदेश देत आहेत. येत्या 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनी सर्व शाळांमध्ये संविधान दिन साजरा केला जाणार आहे.

जेंव्हा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि स्वतः मी पद आणि गोपनियतेची शपथ घेत असतो, तेंव्हा जाणिवपूर्वक संविधानाची शपथ घेतो. कारण संविधान हा आमच्यासाठी एक मोठा विचार आहे. देशाच्या ऐक्याची दिशा आहे. त्याविरोधात कोणी काही बोलत असेल तर त्याचा विरोध झालाच पाहिजे. संविधान बदलणाऱ्यांविरोधात आम्ही लढा देत राहू, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या

महागाई आणि दुष्काळात दिवाळीच्या शुभेच्छा कशा देऊ….?

राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. पुढचे काही महिने राज्यातील जनतेला अडचणीचे आहेत. या काळात आपण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सणावार, कार्यक्रम हे बाजूला ठेवून सर्वसामान्य जनतेच्या सोबत उभे राहिले पाहिजे.सध्याच्या सत्ताधाऱ्यांना दुष्काळ दिसत नाही. त्यामुळे ही जबाबदारी आपल्यावर आलीय. तसेच महागाईमुळे दिवाळी देखील कशी करायची असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. सध्याच्या सरकारला दुष्काळ दिसत नाही. त्यामुळे एक दिवा घरी लावत असताना एक दिवा जे दिवाळी साजरा करु शकत नाहीत त्यांच्या घरी लावा, असे आवाहन देखील खासदार सुळे यांनी यावेळी केले.

‘त्यांच्या ‘ हातून राज्य हिसकावून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही – शरद पवार(व्हिडीओ)

0

पुणे-न्यायालय, राज्यघटना, स्त्री-पुरुष समानता यापैकी काहीच भाजपवाले मानत नाहीत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यांतून आणि कृतीतून हेच दिसतं. ‘आम्ही म्हणून तीच पूर्व दिशा’ असा कारभार सध्या देशात सुरू आहे,’ सीबीआयला सध्या वेठीस धरण्याचा प्रयत्न होतो आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्याला रातोरात हकालपट्टी केली जाते आणि स्वत:च्या विचाराच्या व्यक्तीला तिथे पाठवले जाते.  ज्या व्यक्तिचा न्याय व्यवस्थेवर आणि तपास यंत्रणेवर विश्वास नाही, स्त्री पुरुष समानता जे मानत नाहीत अशांच्या हाती  सत्ता आम्ही राहू देणार नाही   ,अशांच्या हातून राज्य  हिसकावून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही असे वक्तव्य येथे  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं .


राष्ट्रवादी कॉंग्रेस ने आयोजित करण्यात आलेल्या संविधान बचाव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री फौजिया खान, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार वंदना चव्हाण, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील,सुभाष जगताप ,नंदा लोणकर,अश्विनी कदम ,नितीन कदम, तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पवार यांनी केंद्र सरकारसह भाजपवरही जोरदार निशाणा साधला. ‘सीबीआयमध्ये जे काही झालं. ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या ते देशासाठी घातक होतं. आम्ही म्हणू तीच पूर्वदिशा असा इशाराच सरकारनं प्रशासनाला यातून दिला, असं पवार म्हणाले. ‘सर्वोच्च न्यायालयानं सबरीमलामध्ये महिलांना प्रवेश देण्याचे आदेश दिले. पण भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी त्या निकालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ज्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही असे निर्णय न्यायालय कसं देऊ शकतं असं शहा म्हणतात. भाजपवाल्यानं देशाची घटना, न्यायालयाचे आदेश मान्य नाहीत हेच यातून दिसतं,’ असं पवार म्हणाले.

दुष्काळाच्या प्रश्नावरही भाजपचं सरकार गंभीर नाही. दुष्काळाच्या झळा सर्वांना बसताहेत. पण सरकार निर्णय घ्यायला तयार नाही. लोकांचे प्रश्न न सोडवणाऱ्या या सरकारची सत्ता लोकशाहीच्या मार्गानं हिसकावून घेऊ,’ असं पवार म्हणाले.

महाराष्ट्रातील एकाही महापालिकेला नको तुकाराम मुंढे ….ठराव एकमताने मंजूर

0

नाशिक – महापालिका अायुक्त तुकाराम मुंढे यांच्या एककल्ली कारभाराचे पडसाद नागपूर येथील महापाैर परिषदेतही उमटले. मुंढे यांना राज्यातील कुठल्याही महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती न देण्याचा ठराव परिषदेत एकमताने मंजूर करण्यात अाला. याबराेबरच महापौरांना आर्थिक व प्रशासकीय अधिकार असावेत, सत्तेची सर्व सूत्रे आयुक्तांच्या हाती नसावीत, अधिकारांचे विकेंद्रीकरण केले जावे, अशा मागण्याही राज्य शासनाकडे सादर करण्यात अाल्या.

राज्यातील १९ शहरांच्या महापौरांच्या या परिषदेला उपस्थित राहिलेल्या नाशिकच्या महापाैर रंजना भानसी यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, ७४ व्या घटनादुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी दिल्यानंतरही महापालिकांना अधिकार नाहीत.

नगराध्यक्षांच्या धर्तीवर महापालिकांच्या महापौरांना आर्थिक अधिकार मिळावेत. लाेकप्रतिनिधींचे नियमानुसार वैध ठरणारे अादेश डावलणाऱ्या आयुक्तांविरोधात कारवाईचे अधिकार महापौरांना असावेत, एकदा अंदाजपत्रक मंजुरीसाठी सादर केल्यानंतर पुन्हा मंजुरीसाठी महासभेवर प्रस्ताव न येणे अशा अडवणुकीबाबत परिषदेत कैफियत मांडली. विविध मागण्यांचे निवेदन महापौर भानसी यांनी परिषदेचे अध्यक्ष महाडेश्वर यांना सादर केले.
राज्यातील सर्व महापौरांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात अाले. दरम्यान, मुंढे यांची वर्तणूक, महापाैरांच्या अधिकाराचे हाेणारे हनन या पार्श्वभूमीवर त्यांना महापालिकेत नियुक्ती दिली जाऊ नये या मागणीचा ठराव अकाेल्याचे महापाैर विजय अग्रवाल यांनी मांडल्याचे भानसी यांनी सांगितले.

महापाैरांचे अधिकार वाढवणार
महापौरांचे अधिकार वाढविण्याबाबत विचार केला जाईल, असे फडणवीस यांनी परिषदेत सांगितले; मात्र त्याबराेबरच महापालिकांनी आर्थिक उत्पन्नाच्या स्त्रोतांत वाढ करावी, आर्थिक स्वावलंबनाकडे लक्ष पुरवावे अशा कानपिचक्याही दिल्या. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे मतही यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, ‘९० टक्के नगरसेवक खर्च कसा करायचा याचाच विचार करतात. मात्र, मनपाचे उत्पन्न कसे वाढेल याचा विचार हाेत नाही’, अशी खंत व्यक्त केली.

महापाैरांना हवा राज्यमंत्रिपदाचा दर्जा
लाल दिवा काढून घेतल्यामुळे महापाैरपदाचा मान कमी झाल्याचे चित्र अाहे. या पार्श्वभूमीवर सर्वच महापौरांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा द्यावा, महापौरांना आर्थिक-प्रशासकीय अधिकार द्यावे, अायुक्तांनी चुकीचे काम केले तर कारवाईचा अधिकार हवा, अंदाजपत्रकातील मंजूर विषय महासभेवर यावेत, महापौर दौऱ्यासाठी विशेष निधीची तरतूद व्हावी

लाेकप्रतिनिधींचा सन्मान महत्त्वाचा
नाशिकच्या महापाैरांची कैफियत एेकून सर्वच महापाैर संतप्त झाले अाहेत. नुसता ठराव केला नाही तर मुख्यमंत्र्यांकडे विनंती करून मुंढे यांना काेणत्याही महापालिकेत नियुक्ती देऊ नये अशी मागणी करणार अाहाेत. लाेकप्रतिनिधींचा सन्मान महत्त्वाचा असून ताे झालाच पाहिजे.

– विजय अग्रवाल, महापाैर, अकाेला

ट्रम्प यांनी मोदींचे निमंत्रण नाकारले

0

वॉशिंगटन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पीएम नरेंद्र मोदी यांचे निमंत्रण धुडकावून लावले आहे. मोदींनी त्यांना भारतात प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित केले होते. परंतु, मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी प्रजासत्ताक कार्यक्रमात उपस्थिती नोंदवण्यास स्पष्ट नकार दिला. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील एक पत्र राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना पाठवल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. तरीही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या दौऱ्यासंदर्भात अधिकृत माहिती व्हाइट मधूनच येईल असे अमेरिकेतील भारतीय दूतावासाने म्हटले आहे.

ही असू शकतात कारणे…
– काही दिवसांपूर्वीच मोदींनी ट्रम्प यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त निमंत्रण पाठवल्याची चर्चा होती. त्यावेळी अमेरिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ट्रम्प जानेवारी महिन्यात भारत दौरा करतील याची शक्यता कमी आहे असे वर्तवले होते. ट्रम्प जानेवारी महिन्यात ‘स्टेट ऑफ द युनियन’ मध्ये देशाला संबोधित करणार आहेत. प्रत्येक नवीन वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या नागरिकांना हे संबोधन करण्याची परमपरा आहे.
– परंतु, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या कार्यकाळात दोनदा स्टेट ऑफ द युनियनच्या तयारी दरम्यान भारत दौरा केला होता. 2015 मध्ये त्यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती लावली होती. अशात ट्रम्प यांनी स्टेट ऑफ द युनियनच्या नावे भारताचे निमंत्रण नकारण्यात संबंधांमध्ये दुरावा दिसून येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी वेळोवेळी आपला चांगला मित्र असे म्हटले आहे. तरीही, रशियासोबत झालेल्या क्षेपणास्त्ररोधी यंत्रणा करारावरून ट्रम्प नाराज आहेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे

0

यवतमाळ – 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे यांची निवड करण्यात आली आहे. अ.भा.म. साहित्य महामंडळाच्या कार्यकारिणीची सभा महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेत आज सुरू झाली होती. या सभेत या वर्षी यवतमाळ येथे होणाऱ्या 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष यांची निवड करण्यात आली. महामंडळाची ही 18 सदस्यीय कार्यकारणी 26 ऑक्टोबरपासून यवतमाळमध्ये दाखल झालेली आहे. या कार्यकारिणीच्या माध्यमातून संमेलनाचे पूर्वनियोजन, संमेलनाची तारीख ठरविणे, अध्यक्ष निवड करणे, ग्रंथप्रदर्शन, बैठक व्यवस्था, तसेच संमेलनासाठी नियोजनपूर्ण विषय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येत आली.

बंदद्वार चर्चेत झाली अध्यक्ष निवड
बैठकीत सर्वात महत्त्वाचा विषय होता अध्यक्ष निवडीचा. या कार्यकारिणीच्या सभेमध्ये बंदद्वार चर्चा होऊन अध्यक्षपदावर एकमत झाले. संमेलनाच्या कार्यालयात महामंडळाच्या घटक संस्था असलेल्या मुंबई, पुणे, मराठवाडा, छत्तीसगड, इंदूर, कर्नाटक, गोवा, औरंगाबाद, बडोदा, नागपूर येथील 15 सदस्य व यवतमाळ येथील आयोजन समितीचे 3 सदस्य असे एकूण 18 सदस्य या बैठकीला उपस्थित होते. यातील प्रत्येक घटक संस्थांनी 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आपली नावे सुचवली होती. यात अध्यक्षपदासाठी ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त डॉ. भालचंद्र नेमाडे, प्रसिद्ध कवी ना. धों. महानोर, नाटककार प्रेमानंद गज्वी, ज्येष्ठ साहित्यिका प्रभा गणोरकर, अरुणा ढेरे यांच्यासह अन्य दोन ते तीन नावे अध्यक्षपदाच्या निवडीसाठी चर्चेत होती. हे साहित्य संमेलन पोस्टर ग्राउंडवर जानेवारी महिन्याच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात होणार असल्याचे नियोजन महामंडळाने केले होते. त्यानुसार 11 ते 13 जानेवारी 2019 यादरम्यान साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचे ठरले आहे. समितीचे अध्यक्ष डॉक्टर रमाकांत कोलते आहेत; मात्र त्यांनाही या कार्यकारिणीच्या बैठकीत दुपारपर्यंत दूर ठेवण्यात आले होते.

45 वर्षांनंतर यवतमाळात साहित्य संमेलन
यवतमाळमध्ये 1973 मध्ये ग. दि. माडगूळकर यांच्या अध्यक्षतेत गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष तत्कालीन जि. प. अध्यक्ष सुधाकरराव नाईक होते, तर राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनीही या संमेलनाला हजेरी लावली होती. या संमेलनामध्ये प्रसिद्ध गायिका शोभा गुर्तू यांची संगीत मैफल अविस्मरणीय ठरली होती. या घटनेला आज 45 वर्षे पूर्ण झाली आहेत. तथापि, या वर्षी यवतमाळात होणाऱ्या 92 व्या मराठी साहित्य संमेलनाची जबाबदारी आयोजन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

देशातील सर्वांत मोठ्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पुण्यात

0

तयारी युद्ध पातळीवर सुरूअनेक मंत्रीखासदार,आमदार व नेते उपस्थित रहाणार

मुंबईदेशातल्या आत्तापर्यंतच्या सर्वांत मोठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा असलेल्या सीएम चषकाचे‘ उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नोव्हेंबर रोजी पुण्यात करतीलपुण्यात सुरू होणाया ह्या खेळ व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन स्वामी विवेकानंद जयंती म्हणजे 12 जानेवारीपर्यंत चालेलमहाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमधल्या लोकांच्या सक्रिय सहभागाद्वारे ह्या विशाल आयोजनामध्ये एकूण 50 लाख स्पर्धक सहभाग घेतीलपुण्यातील हडपसर येथील मगरपट्टा भागातील लक्ष्मी लॉन येथे नोव्हेंबर रोजी संध्याकाळी वाजता सीएम चषकाचे‘ उद्घाटन ऑलिंपिक पातळीइतके भव्य प्रकारे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहेह्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा व भव्यतेची झलक बघायला मिळणार आहेउद्घाटन कार्यक्रमाच्या स्थळाला अटल खेल नगरी नाव दिले गेले आहे.

महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमधील क्रीडा जगतातील विशेष व्यक्तीअर्जुन पुरस्कार विजेते खेळाडूमोठ्या संख्येने युवा खेळाडूपुण्यातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी– विद्यार्थिनीसुद्धा ह्या उद्घाटन कार्यक्रमाला विशेष प्रकारे उपस्थित राहणार आहेतह्या आयोजनाचे मुख्य उद्दीष्ट महाराष्ट्रातील अशा युवांना व लोकांना क्रीडा मैदानांसोबत जोडणे हा आहे ज्यांचा सामान्यतखेळाशी कमी संबंध येतोह्या प्रकारे सीएम चषक‘ महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठीसुद्धा उपयोगी ठरेलभारतीय जनता युवा मोर्चामहाराष्ट्र द्वारे आयोजित  करण्यात येणाया देशातील आत्तापर्यंतच्या ह्या सर्वांत मोठ्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी खासदारआमदारजिल्हाध्यक्षजिल्हा परिषद अध्यक्षनगराध्यक्षपार्टी पदाधिकारी व सर्व महत्त्वपूर्ण पदांवरील व्यक्तींना दायित्व देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहेएकूण 50 लाख स्पर्धक असणाया ह्या स्पर्धेत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थास्पोर्टस क्लब व युवा मंडळांना जोडण्यात येत आहे. ‘सीएम चषकामध्ये‘ भाग घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

पुण्यात नोव्हेंबर रोजी संध्याकाळी वाजता होणाया उद्घाटन समारंभामध्ये मुख्यमंत्र्यांसह प्रदेश भाजप अध्यक्ष रावसाहेब दानवेक्रीडा मंत्री विनोद तावडेपुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटभारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा पूनम महाजनयुवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकरअनेक खासदारआमदार व भाजपा नेतेही उपस्थित राहतीलसुमारे अडीच महिने चालणाया सीएम चषकामध्ये‘ एकूण 50 लाखांपेक्षा जास्त स्पर्धक सहभाग घेतीलमहाराष्ट्र राज्य भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी राज्यभरात ह्या आयोजनाला यशस्वी करण्यासाठी तयारीमध्ये सहभागी आहेत.

कालवा फुटीतील १०० बाधित कुटुंबाना गृहपयोगी साहित्याचे वाटप

0

पुणे : दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज प्रांत ३२३४ डी २ आणि लायन्स क्लब्ज इंटरनॅशलन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दांडेकर पूल येथील कालवा फुटीतील बाधित १०० कुटुंबियांना गृहपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये भांडी, अन्नधान्य, कपडे, दिवाळी फराळाच्या वस्तू, तेल, साबण, गणपतीची मूर्ती आदी वस्तूंचा समावेश आहे. एकूण १० लाख रुपयांच्या खर्चातून हे संसाराला अत्यंत उपयुक्त साहित्य देण्यात आले आहे.

महर्षीनगर येथील महावीर प्रतिष्ठानच्या सभागृहात या गृहपयोगी साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला. यासाठी लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २चे प्रांतपाल लायन रमेश शहा, स्मिता शहा, माजी आंतरराष्ट्रीय संचालक लायन प्रेमचंद बाफना, लायन आनंद आंबेकर, नगरसेवक श्रीनाथ भीमाले, दांडेकर पूल प्रभागातील नगरसेवक धीरज घाटे, लायन नीतीन शहा, लायन प्रवीण खुळे, लायन सुनील सेठिया, लायन उत्तम बाठीया, लायन दिपा जवळेकर, लायन वीरेंद्र पटेल, लायन शरद पवार, लायन राजेंद्र गोयल, लायन तुषार मेहता, लायन शाम खंडेलवाल, लायन कांतीलाल ओसवाल, लायन भरत जैन, लायन दिपक सेठीया यांच्यासह लायन्सचे पदाधिकारी व पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रांतपाल रमेश शहा म्हणाले, “एक महिन्यापूर्वी दांडेकर पूल येथील कालवा फुटल्याने जनता वसाहत भागात राहणाऱ्या अनेकांची घरे, संसार वाहून गेली. हातावर पोट असलेल्या या बांधवाना, माताभगिनींना पाठबळ देण्यासाठी लायन्स क्लबचे सदस्य सरसावले. तात्काळ मदत केली. परंतु तेवढ्यावरच न थांबता एक टीम तयार करून या भागातील बाधित कुटुंबांची संपूर्ण माहिती संकलित करून गरजुंना संसाराला लागणारे सर्व साहित्य देण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. फाउंडेशनकडून निधी आल्यानंतर घरासाठी लागणारे साहित्य, कपडे,भांङी महिलांसाठी साड्या, फराळाच्या वस्तू, ब्लॅंकेट आदी वस्तू यामध्ये आहेत. भविषयातही लागेल ती मदत केली जाईल.”

प्रेमचंद बाफना म्हणाले, “प्रत्येक आपत्तीजन्य परिस्थितीत लायन्स क्लबने उल्लेखनीय काम केले आहे. आज या कुटुंबाना या गृहपोयोगी वस्तू मिळाल्याने मोठा आधार झाला आहे. यांची दिवाळी सगळ्यांसारखी आनंदात जाईल. वस्तीत राहणाऱ्या लोकांनी तरुणांच्या साथीने मदत गट तयार करावेत. त्यामुळे वस्तीतील समस्या सोडविण्यास मदत होऊ शकेल.”

श्रीनाथ भिमाले म्हणाले, “कालवा फुटल्यानंतर पालिकेसह सगळ्यांनीच तातडीने मदतीचे हात पुढे केले. या कुटुंबाना धीर देण्याचा प्रयत्न केला. लायन्स क्लबने या कुटुंबाना केलेली मदत म्हणजे दिवाळीची भेट आहे.”

धीरज घाटे म्हणाले, “लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या भागात फिरून पाहणी केली. योग्य गरजवंतांपर्यंत ती मदत पोहोचविण्यासाठी परिश्रम घेतले. दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती लायन्स क्लबच्या सभासदांमध्ये पाहायला मिळाली.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद आंबेकर यांनी केले.

14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अर्णव कोकणे, अर्णव पापरकर, सिध्दार्थ मराठे, श्रावणी खवले, श्रिवल्ली मेदिशेट्टी यांचा मुख्य फेरीत प्रवेश

0
  • आयुष भट, वैष्णवी अडकर  यांना अव्वल मानांकन 
औरंगाबाद-  एड्युरन्स्‌ मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर(इएमएमटीसी)यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए – योनेक्स्‌ सनराईज्‌ 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अर्णव पापरकर, केशव गोयल, सिध्दार्थ मराठे, अर्णव कोकणे, श्रावणी खवले,  श्रिवल्ली मेदिशेट्टी , नियाती ककरेती, धान्वी कवड  यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला.
इएमएमटीसी टेनिस कोर्ट,डिव्हिजनल स्पोर्टस्‌ कॉम्पलेक्स्‌ येथे  सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत मुलांच्या गटात सिध्दार्थ मराठेने सुहृद किलीवोतीचा  6-0, 6-1 असा तर अर्णव कोकणेने हर्ष ठक्करचा 6-1, 6-3 असा सहज पराभव करत स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला.
केशव गोयलने सार्थक पोतदोरचा 6-1, 6-0 असा पराभव करत आगेकुच केली तर अर्णव पापरकरने सुमर ओमरचा 7-5, 3-6, 6-4 असा पराभव करत मुख्य फेरी गाठली.
मुलींच्या गटात श्रावणी खवलेने इकाराजू कनिमुरीचा 7-6(4), 6-1 असा टायब्रेकमध्ये पराभव करत स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. संघर्षपुर्ण लढतीत श्रिहीता जालीगमने सानिका भोगाडेचा 5-7, 6-0, 7-6(5) असा टायब्रेकमध्ये पराभव करत मुख्य फेरी गाठली. श्रिवल्ली मेदिशेट्टीने रिधी पोकाचा 6-2, 6-0 असा तर तनिष्का पतारने शिवानी जी हीचा 6-1, 6-0 असा सहज पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम पात्रता फेरी- मुले
केशव गोयल वि.वि सार्थक पोतदोर 6-1, 6-0
जगदिश त्रिशुल वि.वि आर्यन सुतार   6-0, 6-3
सिध्दार्थ मराठे वि.वि सुहृद किलीवोती 6-0, 6-1
अधिरीत अवल वि.वि अनमोल नागपुरे 6-0, 4-6, 6-0
वंश कर्मा वि.वि ईशान देगमवार 7-5, 6-1
कंधावेल महालिंगम वि.वि अयान तेझाबवाला 6-3, 4-6, 6-1
अर्णव कोकणे वि.वि हर्ष ठक्कर 6-1, 6-3
 
मुली- 
श्रिवल्ली मेदिशेट्टी वि.वि रिधी पोका 6-2, 6-0
वैष्णवी वाकीती वि.वि रिया सचदेव 6-3, 0-6, 6-1
श्रिहीता जालीगम वि.वि सानिका भोगाडे 5-7, 6-0, 7-6(5)
नियाती ककरेती वि.वि निराली पदानीया 6-3, 0-6, 7-5
तनिष्का पतार वि.वि शिवानी जी 6-1, 6-0
श्रावणी खवले वि.वि इकाराजू कनिमुरी 7-6(4), 6-1
सौम्या रोंडे वि.वि अनुष्का सिंग 6-3, 7-6(2)
धान्वी कवड वि.वि शिरीन अहमद 6-3, 6-0
 
मानांकन यादी- मुले
1. आयुष भट, 2. आयुषमान अर्जेरीया, 3. दिप मुनिम, 4. अर्जुन गोहड, 5. अजय सिंग, 6. अदित्य राठी, 7. सुखप्रित झोजे, 8. युवान नांदल
मुली- 1. वैष्णवी अडकर, 2. राधिका महाजन, 3. परी सिंग, 4. वेदा प्रापुर्णा, 5. श्रृती अहलावत, 6. ईशीता जाधव, 7. स्वेता समंता, 8. लक्ष्मी गोवडा 

शायनिंग नकोय जमलच तर न्याय द्या -अतुल बेनके

0
ओतुर (संजोक काळदंते)-
पुणे जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर झाली असताना या यादीत जुन्नर तालुक्याचे नाव नसल्याने राष्ट्रवादी युवकचे राज्याचे उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी आदिवासी भागात जाऊन प्रत्यक्ष येथिल शेतक-याच्या व्यथा जाणुन घेतल्या जुन्नर तालुका  दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करण्यासाठी आदिवासी भागातून  जोरदार मागणी होतेय तालुक्यातील आदिवासी जनता आता पूर्ण  हतबल झाली आहे.
दुष्काळी परिस्थिती असताना देखील फक्त तालुक्यात धरणे असल्याचे कारण करुन जर जुन्नर तालुक्याचे नाव दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतुन वगळले जात असेल तर तालुक्यातील जनता हे खपवुन घेणार नाही.आदिवासी भागातील ६५ गावातील भोळी भाबडी जनता म्हणतेय आम्हाला निदान रोजगार तरी द्या ज्यावर आम्ही उदरनिर्वाह करु अशा संतप्त प्रतिक्रीया अतुल बेनके यांच्याजवळ आदिवासी बांधवांनी अंजनावळे येथे व्यक्त केल्या.तर अतुल बेनके यांनी शासनाकडे आदिवासींना सोसायटी कर्ज ,वीज बीले माफ करुन आदिवासी ६५ गावांना विशेष पॅकेज जाहीर करावे अशी आग्रही मागणी केली आहे.
  यापुढे ‘शायनींग नकोय’ करता आले तर जनतेसाठी काम करा , आता तालुक्यातील जनतेवर वेळ आहे तर आता जागे व्हा ! असा ईशारा त्यांनी तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला दिला.
“जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी आदिवासी भागाला भेट दिली मात्र रात्री पाऊस आला आणि आपल्या गाड्यांमधुन ही मंडळी निघुन गेली “असे आदिवासी बांधवांनी अतुल बेनके यांना सांगितले.तर या सर्व गावांना आदिवासी विभागातील योजना लवकरात लवकर मिळाव्यात या साठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.  गणेशोत्सवापासून  पावसाने  दडी मारली असल्याने  या विभागातील  जीवनमान  अवलंबून  असणारे भात पीक करपुन गेले आहे जर आमच्या धरनांचे पाणी खाली सोडले तर आम्ही आडवे जाऊ असा ईशारा आदिवासी जनतेने दिलाय तर वेळ पडल्यास  लवकरच याविषयी आंदोलन उभारु असे अतुल बेनके म्हणाले.
…..देवराम मुंढे
धरनांना जमिनी आमच्या गेल्या, त्याग आम्ही केला मग पहीला विचार आमचा व्हायला हवा यानंतरच पाणी सोडण्यासंदर्भात निर्णय घ्यावा …..

प्रकृति कथक नृत्यालयतर्फे ‘संवेदन’ मैफलीचे आयोजन

0
पुणे ता. २८: जयपूर घराण्याच्या सुविख्यात नृत्यांगना प्रेरणा श्रीमाळी यांचा नृत्याविष्कार आणि लोक गायनावर आधारित पार्वती बाऊल यांचा स्वरविन्यास एकाच मंचावर अनुभविण्याची दुर्मिळ संधी ‘संवेदन’ मैफलीतून रसिक पुणेकरांना लाभणार आहे. येत्या शुक्रवारी(दि.२) बालशिक्षण मंदिर सभागृह, येथे सायंकाळी ५.३० वाजता या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
कथक सम्राज्ञी विदुषी गुरू रोहिणीताई भाटे यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम योजिला आहे. प्रकृति कथक नृत्यालयाच्या संस्थापिका व रोहिणीताईंच्या ज्येष्ठ शिष्या नीलिमा अध्ये यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारला जात आहे.
केंद्रीय संगीत नाटक अकॅडमीसह अनेक नामवंत पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या प्रेरणा श्रीमाळी यांचा अभिजात शैलीतील नृत्याविष्कार पाहण्याची संधी प्रेक्षकांना ‘संवेदन’ मधून मिळेल. तर एका हातात एकतारा आणि कंबरेभोवती बांधलेल्या डमरूच्या साथीने पार्वती बाऊल यांचे मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण याच मैफलीत रसिकांना अनुभवता येईल.  बंगालमधील प्रसिद्ध ‘बाऊल’ लोकसंगीताची उत्कट आध्यात्मिक अनुभूती  बाऊल यांच्या स्वरविन्यासातून ऐकावयास व पहावयास मिळेल. श्रीमाळी यांच्या नृत्याची, बाउल यांच्या गायनाची ‘संवेदन’ मैफल रसिक पुणेकरांसाठी पर्वणीच ठरेल, असा विश्वास नीलिमा अध्ये यांनी व्यक्त केला आहे.

जानकर – काकडे भेटीने राजकीय चर्चेला उधान!

पुणे, दि. 28 ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्सविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आज पुण्यामध्ये आले होते. यावेळी त्यांनी खासदार संजय काकडे यांची घरी जाऊन भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधान आले आहे.

जानकर यांनी बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविली असून यावेळी ते प्रबळ दावेदार आहेत. बारामती लोकसभा मतदार संघात येणाऱ्या खडकवासला, पुरंदर व भोर विधानसभा मतदार संघात खासदार संजय काकडे यांची ताकद लक्षणीय आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा भाग म्हणूनच मंत्री जानकर यांनी खासदार काकडे यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

लोकसभा निवडणुकीबरोबरच त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भातही यावेळी दोघांमध्ये सविस्तर झाल्याचे समजते. राजकारणाबरोबरच राज्यातील दुष्काळाची परिस्थिती, शेतकऱ्यांची स्थिती, आरक्षण, विकासकामे इत्यादी संदर्भातही चर्चा झाली.

मंत्री जानकर यांना सोडण्यासाठी खासदार काकडे घराबाहेर त्यांच्यासोबत गेले. त्यावेळी गाडीत बसण्यापूर्वी मंत्री जानकर हे खासदार काकडे यांची गळाभेट घ्यायला विसरले नाहीत. जानकरांनी काकडे यांची घेतलेली गळाभेट उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चेची ठरली आहे.

मातोश्री ची किंमत संजय राऊतांनी घालविली – चेतन तुपे पाटील- ‘सामना ‘ कार्यालयासमोर राष्ट्रवादीची निदर्शने

पुणे–राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अभिनव चौक येथे ‘सामना’ मध्ये विकृत मनोवृत्तीने  असंस्कृत व गलिच्छ लेखण केल्याचा आरोप करत त्या  निषेधार्थ  शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्या अध्यक्षतेखाली निदर्शने  करण्यात आली.
या प्रसंगी बोलताना चेतन तुपे म्हणाले,ज्यांचे राजीनामे खिशात ठेवून ठेवून फाटले. त्यांची लायकी काय हे संपूर्ण महाराष्ट्र ओळखत आहे.राज्यात दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षितता, शेतकरी अश्या अनेक प्रश्नांवर अपयश आल्याने आता दिशाभूल करून शिवसेना राममंदिर बांधण्याचा मुद्दा पुढे आणत आहे. या लबाडांना राज्यातील जनता कंटाळली आहे. राजीनामे देऊ असे म्हणुन सत्तेला चिकटलेले हे मुंगळे महाराष्ट्राचे काय कल्याण करणार आहे.आमचे  नेते अजितदादा पवार हे बोलले ते खरे आहे. त्यांना  पाच वर्षात दिवंगत नेते मा. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकही बांधता आले नाही आणि हे चालले राममंदिर बांधायला, यांना तिकडे कोण ओळखतोय यांची तिकडे किंमत ती काय, स्वतःचा नाकर्तेपणा लपविण्यासाठी दुसर्‍यावर दोषारोप करणे त्यांनी थांबवावे.
यावेळी नगरसेवक सुभाष जगताप,वनराज आंदेकर, निलेश निकम, बाळासाहेब बोडके, श्रीकांत पाटील, राकेश कामठे, विजय डाकले, संतोष नांगरे,विपुल म्हैसुरकर, अजय दराडे, अच्युत लांडगे, अमोल ननावरे, संजय गायकवाड, नितीन कदम, दिलीप अरुंदेकर, शंतनु जगदाळे,मिलिंद वालवडकर,अर्जुन गांजे, संतोष बेंद्रे. संतोष डोख,युसुफ शेख विक्रम जाधव,मृणालिनी वाणी,धीरज आरगडे, रूपेश आखाडे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

‘ठाकरे’ चित्रपटाच्या प्रमोशनल सॉंग रेकॉर्डिंगला शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीने रंगत !

0

मुंबई-सुरवातीपासून चालत आलेला बाळासाहेब ठाकरेंचा जीवन प्रवास सामान्य लोकांचा असामान्य आवाज बनून जगभरात गरजला. बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास संजय राऊत यांनी जवळून अनुभवला आहे. म्हणूनच संजय राऊत लिखित आणि निर्मित ‘ठाकरे’ चित्रपटाचे प्रमोशनल सॉंग रेकॉर्डिंग सध्या चर्चेचा विषय ठरलेला असून माननीय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः रेकॉर्डिंग साठी उपस्थिती दर्शविली. संजय राऊत प्रस्तुत, राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी, वायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि कार्निवल मोशन पिक्चर्स निर्मित ‘ठाकरे’ या आगामी चित्रपटाचे प्रमोशनल सॉंग रेकॉर्डिंग नुकतेच यशराज स्टुडिओ, अंधेरी येथे पार पडले. ठाकरे चित्रपटाच्या प्रमोशनल सॉंगचे संगीत दिग्दर्शन मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या संगीत दिग्दर्शनाने राज्य गाजवणारी गोडजोळी रोहन- रोहन यांनी केले असून, पद्मश्री सुनील जोगी लिखित हे गाणे नकाश अझीझ यांच्या आवाजात संगीतबद्ध केले गेले आहे.

उद्धव ठाकरे म्हणतात की, “या गाण्यातून एक प्रकारची ऊर्जा मिळते. रोहन-रोहन यांनी इतकं उत्साहवर्धक गाणं बनविले आहे की, हे गाणं ऐकल्यावर  कोणीही त्याच्या चालीवर ताल धरल्याशिवाय राहणार नाही. पद्मश्री सुनील जोगी यांनी हे गाणं अतिशय प्रखर आणि अर्थपूर्ण लिहिले आहे. संजय राऊत यांनी या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली असून चित्रपटाला अप्रतिम रूप दिलेले आहे. पूर्वशी राऊत आणि विधिता राऊत या दोघींना मी माझ्या डोळ्यासमोर लहानाचं मोठं होत असताना पाहिले आहे आणि आता त्यांना खंबीर निर्मात्यांच्या भूमिकेत पाहताना मला फार आनंद होत आहे.”

संजय राऊत सांगतात की, “आज मी जे काही आहे ते बाळासाहेब ठाकरेंमुळे आहे. ‘ठाकरे’ हा चित्रपट म्हणजे जे जगातील सर्वात महान नेत्यांपैकी एक आहेत, त्यांच्यासाठी माझ्याकडून ही एक प्रकारची गुरुदक्षिणा आहे.”

??????????????????

आशा भोसले आणि झनाई भोसले यांच्या हस्ते iPhone XR लाँच!

0

मुंबई-बांद्रा पश्चिम येथील ‘‘आयअज्युर’’ या अॅपल अधिकृत दुकानात नुकतंच प्रख्यात गायिका आशा भोसले व त्यांची नातं झनाई भोसले यांच्या हस्ते iPhoneXR लॉंच करण्यात आला आहे. प्रसंगी बॅण्ड ऑफ बॉईजने आशा भोसले यांच्या सदाबहार व मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजात स्वरबद्ध केलेलं ‘दिल सरफिरा’ हे गाणे लाँच करून बॅण्ड ऑफ बॉईज पुन्हा एकदा नव्याने आपल्यासमोर आले आहेत. सोहोळ्यास बॅण्ड ऑफ बॉईज या लोकप्रिय बँडचे करण ओबेरॉय, चिंटू भोसले, शेरिन वर्गीस आणि डॅनी फर्नांडिस तसेच अनुजा भोसले आणि आनंद भोसले देखील उपस्थितीत होते.

आपली नातं घेत असलेला पुढाकार पाहून आशा भोसलेंचा आनंद द्विगुणित झाला होता. अशावेळी त्या सांगतात की, ” मला आणि माझ्या परिवाराला झनाईचा अभिमान वाटतो.” बॅण्ड ऑफ बॉईज बद्दल सांगताना त्या म्हणतात की, “ते खरोखर चांगले गातात. मी त्यांना २००१ मध्ये त्यांच्या पहिल्या शोमध्ये मी त्यांना नाचत नाचत गाताना पाहिले होते आणि आज देखील ते पूर्वीप्रमाणेच नाचले व तितकेच सुंदर गायले.”

झनाई भोसले सांगते की, “मी स्वतःला खूप नशीबवान समजते की, मी भोसले कुटूंबाचा एक भाग आहे. परंतु ज्यावेळी मी खडतर आयुष्य असणाऱ्या मुलींकडे पाहते त्यावेळी मला आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावे असे सतत वाटत असते. म्हणूनच मी ‘आयअज्युर’ ही नवीन कल्पना अस्तित्वात आणली. माझ्या ‘आयअज्युर’ या अॅपल अधिकृत दुकानातील विक्रेतीचा एक भाग ‘नन्ही कली’ या लहान मुलींसाठी काम करणाऱ्या एनजीओ ला जाणार आहे.”

आशा भोसले व अनुजा भोसले यांच्या ‘आयअज्युर’ स्टोरमध्ये iPhone XR पांढरा, काळा, निळा, पिवळा, कोरल आणि लाल अशा सहा रंगांमध्ये उपलब्ध आहेत . ‘‘आयअज्युर’’ हे अॅपल स्टोर शहरातील इतर अॅपल स्टोर्सपेक्षा वेगळा आहे कारण येथे काम करणारे सर्व लोकं अॅपल आणि त्याच्या उत्पादनांबद्दल पॅशनेट असलेले, त्या विषयी अधिकाधिक माहिती असेलेले व ग्राहकांना सर्वोत्तम संभाव्य अनुभव प्रदान करणारे आहेत. त्यांचा हेतू विक्री-उन्मुख नसून सेवाप्रधान करणे आहे.

सध्या जोरदार सुरु असणाऱ्या पर्यावर संरक्षणाच्या चळवळीचा एक भाग म्हणून आशा भोसले व झनाई भोसले या आजी-नातीच्या जोडीने #PlantATree ही नवीन चळवळ सुरु केलेली आहे. संगीताच्या वारश्या बरोबरचं समाजप्रतीच्या आपल्या कर्तव्याचे संस्कार देखील एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जात असल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आशा भोसले व झनाई भोसले ही आजी-नातीची आहे यात काही शंकाचं नाही.

राष्ट्रवादीचे माजी नेते तारिक अन्वर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0

नवी दिल्ली -राष्ट्रवादीचे माजी नेते आणि खासदार तारिक अन्वर यांनी आज (ता.27) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रसचे राष्ट्रीय महासचिव आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत हेही उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राफेल डील प्रकरणावरुन पाठराखण केल्याच्या प्रकरणानंतर तारिक अन्वर नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला होता. अन्वर हे बिहारचे रहिवासी असून येथूनच ते राष्ट्रवादीचे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर अन्वर यांच्यासमोर दोन प्रमुख पर्याय होते त्यांपैकी एक लालू प्रसाद यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि दुसरा पर्याय काँग्रेस. यांपैकी अन्वर यांनी राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसचा पर्याय निवडल्याचे बोलले जात आहे. अन्वर हे मुळचे काँग्रेसचेच असून राजीव गांधी यांच्यासोबत त्यांनी मंत्रीमंडळात काम केले आहे. या काळात त्यांनी काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले आहे.