ओतुर (संजोक काळदंते)-
पुणे जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर झाली असताना या यादीत जुन्नर तालुक्याचे नाव नसल्याने राष्ट्रवादी युवकचे राज्याचे उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी आदिवासी भागात जाऊन प्रत्यक्ष येथिल शेतक-याच्या व्यथा जाणुन घेतल्या जुन्नर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करण्यासाठी आदिवासी भागातून जोरदार मागणी होतेय तालुक्यातील आदिवासी जनता आता पूर्ण हतबल झाली आहे.
दुष्काळी परिस्थिती असताना देखील फक्त तालुक्यात धरणे असल्याचे कारण करुन जर जुन्नर तालुक्याचे नाव दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतुन वगळले जात असेल तर तालुक्यातील जनता हे खपवुन घेणार नाही.आदिवासी भागातील ६५ गावातील भोळी भाबडी जनता म्हणतेय आम्हाला निदान रोजगार तरी द्या ज्यावर आम्ही उदरनिर्वाह करु अशा संतप्त प्रतिक्रीया अतुल बेनके यांच्याजवळ आदिवासी बांधवांनी अंजनावळे येथे व्यक्त केल्या.तर अतुल बेनके यांनी शासनाकडे आदिवासींना सोसायटी कर्ज ,वीज बीले माफ करुन आदिवासी ६५ गावांना विशेष पॅकेज जाहीर करावे अशी आग्रही मागणी केली आहे.
यापुढे ‘शायनींग नकोय’ करता आले तर जनतेसाठी काम करा , आता तालुक्यातील जनतेवर वेळ आहे तर आता जागे व्हा ! असा ईशारा त्यांनी तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला दिला.
“जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी आदिवासी भागाला भेट दिली मात्र रात्री पाऊस आला आणि आपल्या गाड्यांमधुन ही मंडळी निघुन गेली “असे आदिवासी बांधवांनी अतुल बेनके यांना सांगितले.तर या सर्व गावांना आदिवासी विभागातील योजना लवकरात लवकर मिळाव्यात या साठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवापासून पावसाने दडी मारली असल्याने या विभागातील जीवनमान अवलंबून असणारे भात पीक करपुन गेले आहे जर आमच्या धरनांचे पाणी खाली सोडले तर आम्ही आडवे जाऊ असा ईशारा आदिवासी जनतेने दिलाय तर वेळ पडल्यास लवकरच याविषयी आंदोलन उभारु असे अतुल बेनके म्हणाले.
…..देवराम मुंढे
धरनांना जमिनी आमच्या गेल्या, त्याग आम्ही केला मग पहीला विचार आमचा व्हायला हवा यानंतरच पाणी सोडण्यासंदर्भात निर्णय घ्यावा …..