देशातील सर्वांत मोठ्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पुण्यात

Date:

तयारी युद्ध पातळीवर सुरू, अनेक मंत्री, खासदार,आमदार व नेते उपस्थित रहाणार

मुंबई– देशातल्या आत्तापर्यंतच्या सर्वांत मोठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा असलेल्या ‘सीएम चषकाचे‘ उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 1 नोव्हेंबर रोजी पुण्यात करतील. पुण्यात सुरू होणा–या ह्या खेळ व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन स्वामी विवेकानंद जयंती म्हणजे 12 जानेवारीपर्यंत चालेल. महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमधल्या लोकांच्या सक्रिय सहभागाद्वारे ह्या विशाल आयोजनामध्ये एकूण 50 लाख स्पर्धक सहभाग घेतील. पुण्यातील हडपसर येथील मगरपट्टा भागातील लक्ष्मी लॉन येथे 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता ‘सीएम चषकाचे‘ उद्घाटन ऑलिंपिक पातळीइतके भव्य प्रकारे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. ह्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा व भव्यतेची झलक बघायला मिळणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाच्या स्थळाला अटल खेल नगरी नाव दिले गेले आहे.

महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमधील क्रीडा जगतातील विशेष व्यक्ती, अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू, मोठ्या संख्येने युवा खेळाडू, पुण्यातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी– विद्यार्थिनीसुद्धा ह्या उद्घाटन कार्यक्रमाला विशेष प्रकारे उपस्थित राहणार आहेत. ह्या आयोजनाचे मुख्य उद्दीष्ट महाराष्ट्रातील अशा युवांना व लोकांना क्रीडा मैदानांसोबत जोडणे हा आहे ज्यांचा सामान्यत: खेळाशी कमी संबंध येतो. ह्या प्रकारे ‘सीएम चषक‘ महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठीसुद्धा उपयोगी ठरेल. भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र द्वारे आयोजित  करण्यात येणा–या देशातील आत्तापर्यंतच्या ह्या सर्वांत मोठ्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष, पार्टी पदाधिकारी व सर्व महत्त्वपूर्ण पदांवरील व्यक्तींना दायित्व देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एकूण 50 लाख स्पर्धक असणा–या ह्या स्पर्धेत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, स्पोर्टस क्लब व युवा मंडळांना जोडण्यात येत आहे. ‘सीएम चषकामध्ये‘ भाग घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

पुण्यात 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता होणा–या उद्घाटन समारंभामध्ये मुख्यमंत्र्यांसह प्रदेश भाजप अध्यक्ष रावसाहेब दानवे, क्रीडा मंत्री विनोद तावडे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा पूनम महाजन, युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर, अनेक खासदार, आमदार व भाजपा नेतेही उपस्थित राहतील. सुमारे अडीच महिने चालणा–या ‘सीएम चषकामध्ये‘ एकूण 50 लाखांपेक्षा जास्त स्पर्धक सहभाग घेतील. महाराष्ट्र राज्य भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी राज्यभरात ह्या आयोजनाला यशस्वी करण्यासाठी तयारीमध्ये सहभागी आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्याची गणेश विसर्जन मिरवणूक अखेर ३३ तास २७ मिनिटांनी संपली

“आता मिरवणूक संपवा”; खासदार मेधा कुलकर्णींचे मंडळांना आवाहन-पुण्यात विसर्जन...

‘बद्रीनाथला नृत्यगृह बनवू नका’; डीजे-संगीत कार्यक्रमावर मुरली मनोहर जोशींचा तीव्र आक्षेप

‘देवभूमीचे पावित्र्य आणि सांस्कृतिक मर्यादा जपाव्यात’; केंद्र व उत्तराखंड...

SIR मधून नाव वगळले तरी पुन्हा संधी; अर्जानंतर अधिकारी घरी येऊन कागदपत्रे घेणार

मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म-6चा पर्याय; देशभरातील मसुदा...

भुसावळच्या आगीच्या दुर्घटनेत ‘१०८’ची मदत ठरली मोलाची

केमिकल फॅक्टरीतील धोकादायक परिस्थितीत चालक मनोज भोईटे आणि डॉ....