Home Blog Page 1554

फिलिपिन्सच्या धर्तीवर भारतात स्कायबस सुरू करण्याचा गडकरींचा प्लॅन

मुंबई: हवेतल्या चालणाऱ्या बसचे स्वप्न दाखवणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई आयआयटीमध्ये हवेतील डबल डेकर बसची संकल्पना मांडली आहे.

“ज्या शहरात रस्ते मोठे करता येत नाहीत. जमीन अधिग्रहणाबाबत समस्या निर्माण होतात, अशा शहरांमध्ये स्कायबसचा पर्याय उपयुक्त आहे”, असे नितीन गडकरी काही दिवसांपूर्वीच म्हणाले होते. दोन टेकड्यांमध्ये धावणारी 200 प्रवासी क्षमता असणारी स्कायबस फिलिपिन्समध्ये सुरू आहे. याच धर्तीवर भारतात स्कायबस सुरू करण्याचा गडकरींचा प्लॅन आहे.

गडकरींनी मुंबईकरांना दाखवले स्वप्न

मुंबईत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी हवेतली डबल डेकर बस हवी, असे स्वप्न गडकरींनी मुंबईकरांना दाखवले आहे. देशात ई-हायवे बनवण्याचा आपला प्लॅन आहे, असेही त्यांनी सांगितले.गडकरी म्हणाले की, “हवेत चालणारी डबल डेकर बस मुंबईत हवी आहे, त्यासाठी आम्ही अभ्यास करत आहोत.” पवई ते नरिमन पॉईंट हवेतून प्रवास करण्याचे स्वप्नरंजन गडकरींनी मुंबईकरांसाठी केले. आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांसमोर नितीन गडकरी यांनी जबरदस्त भाषण केले.

मास रॅपिड ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रिसिटीचा वापर व्हावा. बंगळुरुत इतका ट्रॅफिक जाम आहे, इतकं प्रदूषण आहे की, मी तिथल्या मुख्यमंत्र्यांना सांगितले, आमच्याकडे एक प्रेझेंटेशन झाले, हवेत चालणारी डबल डेकर बस, मुंबईत अशीच हवी आहे, ती बनवण्यासाठी आम्ही अभ्यास करत आहोत. दोनशे लोक वरच्या वर हवेतून जाणार, अशी माहिती गडकरींनी दिली.

पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, “पवईतून डोंगराच्या वरून निघून नरीमन पॉईंटला वरच्या वर जाणार, तुमचा प्रवास सुलभ होईल आणि वेळही वाचेल, वाहतूक व्यवस्थेत नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर व्हायला हवा”

दरम्यान, याआधी गडकरी यांनी पुण्यातल्या वाहतूक कोंडीवरवरही भाष्य केले होते. याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी नितीन गडकरी यांनी उडत्या बसचा पर्याय काही महिन्यांपूर्वी दिला होता. केंद्र सरकार निधी द्यायला तयार आहे, महापालिकेने तसा प्रस्ताव द्यावा, असे गडकरी म्हणाले होते.

शांताबाई’ फेम संजय लोंढे यांच्या मदतीला धावला ‘विघ्नहर्ता’ सेवा मित्र मंडळ कृत विघ्नहर्ता वाद्य पथकाचा पुढाकार

परिमंडळ १ पोलीस उपायुक्त डॉ.प्रियांका नारनवरे यांची उपस्थिती
पुणे : गणेशोत्सवासह विविध कार्यक्रमात शांताबाई या गाण्यावर लाखो नागरिक थिरकतात. मात्र, हे गाणे साकारलेल्या संजय लोंढे यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर आज काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने देखील या लोककलाकाराकडे पाठ फिरविली आहे. आपले कुटुंब चालविण्याची भ्रांत असतानाच लोंढे यांच्या मदतीला पुण्यातील गणेशोत्सव मंडळ व ढोल-ताशा पथकाचे कार्यकर्ते धावून गेले. त्यावेळी लोंढे कुटुंबियांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. 
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ कृत विघ्नहर्ता वाद्य पथकाने नाना पेठेतील राजेवाडी परिसरात राहणा-या शांताबाई फेम संजय लोंढे यांच्या कुटुंबाला धान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत दिली. यावेळी परिमंडळ १ पोलीस उपायुक्त डॉ.प्रियांका नारनवरे, निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, मंडळाचे शिरीष मोहिते, अध्यक्ष सागर कुलकर्णी, विराज मोहिते, प्रज्वल निगडे, माऊली विधाते, सिद्धार्थ पडवळ, सुजित पवार, विद्या मोहिते, शुभंकर काकडे, प्रथमेश विलासागर, मयंक ठक्कर, वैष्णवी चव्हाण, तेजश्री सुमंत, कनिष्का गायकवाड, साहिल खंडागळे, अंकुश गुप्ता, विघ्नेश दळवी, अथर्व लोंढे, गौरव दिवेकर आदी उपस्थित होते. यावेळी ढोल-ताशा वादन करुन घरासमोर रंगावली काढत आकाशकंदील व दिवे देखील कार्यकर्त्यांनी लावले. 
डॉ.प्रियंका नारनवरे म्हणाल्या, लोककलाकार आणि खेळाडू यांचे देशासाठी मोठे योगदान असते. त्यांच्यामध्ये खूप कलात्मकता असते. त्यांना ही परमेश्वराची मिळालेली देणगीच म्हणावी लागेल. आज दुर्देवाने अनेक कलाकार उपेक्षित आहेत. त्यांचे कार्य व आजची परिस्थिती ही लोकांपर्यंत पोहोचायला हवी, असेही त्यांनी सांगितले. गणेश मंडळे व ढोल-ताशा पथकातर्फे असे लोकाभिमुख कार्य व्हायला हवे, असे चंद्रशेखर दैठणकर यांनी सांगितले. 
संजय लोंढे म्हणाले, अनेक महिन्यांपासून रेकॉर्डिंग किंवा स्टेश शो चे काम आलेले नाही. त्यामुळे माझ्यासारख्या अनेक कलाकारांवर व कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. कलाकार काम करण्यास तयार असले तरी देखील काम मिळत नाही. त्यामुळे जगावे कसे आणि कुटुंबाला कसे जगवावे, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. शासनाने देखील आमच्याकडे त्वरीत लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

डीपीसी’साठी निधीवाटपाचे भाजप-बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सूत्र निश्चित ?

पुणे : चालू आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) कामांतील फेरबदल अंतिम टप्प्यात आले आहेत. पुढील आठवड्यात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून कामे अंतिम करून ती जाहीर केली जाणार आहेत. कामे अंतिम करताना भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांनी आपापसात विकासकामांसाठी निधी वाटपाचे सूत्र निश्चित केले आहे. त्यानुसार भाजपचे प्रभुत्त्व असलेल्या परिसरात ६० टक्के आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या भागात ४० टक्के विकासनिधी देण्याचे ठरविण्यात आले आहे.

नुकत्याच झालेल्या डीपीडीसी बैठकीनंतर यापूर्वीच्या मंजूर केलेल्या १०५८ कोटी रुपयांच्या आराखड्यातील कामांची फेरतपासणी करण्याचे स्पष्ट करून पालकमंत्री पाटील यांनी कामांत फेरबदल करण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार कामे अंतिम करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्या कार्यालयात लगबग सुरू आहे. कामांत फेरबदल करताना भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांना अनुक्रमे ६० टक्के आणि ४० टक्के असे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या पदाधिकाऱ्यांनी सुचवलेल्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात पालकमंत्री पाटील कामे अंतिम करून ती जाहीर केली जाणार आहेत.

दरम्यान, जिल्ह्याचा चालू आर्थिक वर्षाचा तब्बल १०५८ कोटींचा आराखडा आहे. त्यापैकी केवळ २० टक्के निधी आतापर्यंत खर्च झाला आहे. उर्वरित निधी खर्च करण्यासाठी तातडीने कामे मंजूर करणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यास आचारसंहितेमुळे डीपीसीमधील कामे थांबण्याची शक्यता असल्याने ही कामे तातडीने अंतिम करणे आवश्यक आहे. त्यामुळे अंतिम केलेली कामे जाहीर करून तातडीने कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.

आधुनिकीकरण म्हणजे पाश्चिमात्यीकरण नव्हे – डॉ. संजय उपाध्ये

पुणे : मनासारखी माणसे न मिळणे, पैसा कमी असणे अशी अनेक अप्रसन्नतेची कारणे आहेत. आज श्रद्धधेचे विवरण आणि भक्तीचे निरुपण बदलले आहे. पैसा हे साध्य नाही, तर साधन आहे. पैसा माणसाला स्थिर नाही, तर अस्थिर करतो. आपल्या शिक्षणात माती व आत्मा याचे नाते शिकविले जात नाही. त्यामुळे आधुनिकीकरण म्हणजे पाश्चिमात्यीकरण नाही, हे भारतीयांना कळत नाही, असे मत डॉ.संजय उपाध्ये यांनी व्यक्त केले. 
आनंदवन बहुउद्देशीय संस्था आणि एनजीओ आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी निमित्त डॉ. संजय उपाध्ये यांचे ‘मन करा रे प्रसन्न’ या कार्यक्रमाचे आयोजन घोले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले होते. यावेळी रा. स्व. संघ पुणे महानगराचे कार्यवाह महेश करपे, आनंदवन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे, दत्तात्रय सोनार ,विवेक राजगुरू, अनिरुद्ध हळंदे , जयंत हिरे, संतोष पटवर्धन, प्रमोद शेळके, विशाल शिंदे आदी उपस्थित होते. 
डॉ.संजय उपाध्ये म्हणाले, युरोपियन अभ्यासक व इतर देशांमधील विद्वानांना तत्वज्ञ समजले जाते. मात्र, भारतातील संतांना तत्वज्ञ समजले जात आही. संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांनी जे सांगितले, तेच आज पाश्चात्यांकडून सांगितले जाते आणि त्याचेच आपल्याला अप्रूप वाटते, हे दुर्देव आहे. 
ते पुढे म्हणाले, मन याविषयावर अनेक पुस्तके व कविता आपल्या मराठी साहित्यात आहेत. केवळ मनोरंजन ही पाश्चात्यांची संस्कृती असून मनोरंजनासोबत ज्ञान व प्रबोधन ही आपली संकल्पना आहे, असे सांगत आयुष्य कसे जगावे, मन कसे प्रसन्न ठेवावे, हे देखील त्यांनी उपस्थितांना सांगितले. संजय हिरवे यांनी सूत्रसंचालन केले.

एसबीआय लाइफ इन्शुरन्सने केली १३,०८८ कोटींच्या नवीन व्यवसाय प्रीमियमची नोंदणी

एसबीआय लाइफ इन्शुरन्स, देशातील अग्रगण्य जीवन विमा कंपन्यांपैकी एक ने ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या कालावधीसाठी १३,०८८ कोटींच्या नवीन व्यवसाय प्रीमियमची नोंदणी केली तर ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपलेल्या कालावधीसाठी १०,२८८ कोटींची नोंदणी होती. ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपलेल्या संबंधित कालावधीपेक्षा सिंगल प्रीमियममध्ये ३३% ने वाढ झाली आहे.

संरक्षणावर स्पष्ट लक्ष केंद्रित करून एसबीआय लाइफचे संरक्षण नवीन व्यवसाय प्रीमियम ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या कालावधीसाठी ‘१,५९८ कोटी’ इतका झाला असून ३२% वाढ झाली आहे. संरक्षण वैयक्तिक नवीन व्यवसाय प्रीमियम ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या कालावधीत १७%ची वाढ नोंदवत ४३४ कोटी झाले आहे. वैयक्तिक नवीन व्यवसाय प्रीमियम ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपलेल्या याच कालावधीत ३१% वाढीसह ८,४६१ कोटी आहे.

एसबीआय लाइफचा करानंतरचा नफा ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या कालावधीत ६४० कोटी इतका आहे.

३० सप्टेंबर २०२२ रोजी कंपनीचे सॉल्व्हेंसी गुणोत्तर १.५० च्या नियामक आवश्‍यकतेच्या तुलनेत २.१९ वर मजबूत राहिले आहे.

एसबीआय लाइफचे एयूएम देखील ७१:२९ च्या डेट-इक्विटी मिक्ससह  ३० सप्टेंबर २०२१ रोजी २,४४,१७८ कोटींवरून ३० सप्टेंबर २०२२ रोजी १६% दराने वाढून २,८२,६३२ कोटी झाले. ९६% पेक्षा जास्त कर्ज गुंतवणूक एएए आणि स्वतंत्र साधनांमध्ये आहे.

कंपनीकडे २,३९,४५६ प्रशिक्षित विमा व्यावसायिकांचे वैविध्यपूर्ण वितरण नेटवर्क आहे आणि देशभरात ९९० कार्यालयांसह विस्तृत स्थान आहे. त्यामध्ये मजबूत बँकासुरन्स चॅनल, एजन्सी चॅनल आणि कॉर्पोरेट एजंट, ब्रोकर्स, पॉइंट ऑफ सेल पर्सन (POS), विमा विपणन कंपन्या, वेब अॅग्रीगेटर्स आणि थेट व्यवसाय यांचा समावेश आहे.

३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या कालावधीसाठीची कामगिरी

  • ३१% वाढ आणि २५.३% बाजारपेठ हिस्सा यांसह ८,४६१ कोटींच्या वैयक्तिक एनबीपी मध्ये खाजगी बाजार नेतृत्व
  • एपीई मध्ये २२% वाढ ६,८२८ कोटी.
  • व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस (VONB) मध्ये ५३% वाढ होऊन २,११७ कोटी.
  • VONB मार्जिन ६३० बीपीएसने वाढून ३१.०% झाले.
  • संरक्षण NBP मध्ये ३२% ची मजबूत वाढ होत ते १,५९८ कोटी झाले.
  • PAT मध्ये ३६% ची वाढ होत ते ६४० कोटी वर 
  • २.१९ चा मजबूत सॉल्व्हेंसी रेशो.
  • भारतीय एम्बेडेड व्हॅल्यू (IEV) ४२,४०९ कोटी.

महा एनजीओ फेडरेशनने केली पुण्यातील ५ हजार भिक्षेक-यांची दिवाळी गोड 

पुणे : महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने आत्मनिर्भर दिवाळी उपक्रमात क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या सीएसआर अंतर्गत ५ हजार भिक्षेकरी आणि समाजातील दुर्लक्षित घटकांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फराळाचे वाटप झाले. 
महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून उपक्रम पार पडला. शनिवारवाडा परिसरातून सुरु झालेल्या उपक्रमाचे डॉ. अभिजीत सोनवणे यांनी संयोजन केले. कृष्णकुमार बुब यांचे विशेष सहकार्य उपक्रमाला मिळाले. यावेळी महा एनजीओ फेडरेशनचे कार्यकारी संचालक अक्षय महाराज भोसले, संचालक समिती सदस्य मुकुंद शिंदे, गणेश बाकले, अमोल उंबरजे, प्रणिता जगताप, योगेश बजाज, महेश सोनी, अपूर्वा करवा व सोहम ट्रस्टच्या डॉ. मनीषा सोनवणे डॉ. पूनम राऊत व सहकारी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, सकारात्मकरित्या विचार करत येत्या काळात महा एनजीओ फेडरेशन सोबत एकत्र येऊन भिक्षेकरी यांचे पुनर्वसन या विषयावर काम करू. समाजातील दुर्लक्षित घटकांकडे सर्वांनी आग्रहाने पहावे, या भावनेतून केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे सांगत त्यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
शेखर मुंदडा म्हणाले, समाजातील दुर्लक्षित घटकांना देखील दिवाळीचा आनंद देण्यासाठी त्यांना दिवाळी फराळ देण्यात आला. भिक्षेक-यांनी त्यांच्या पायावर उभे रहावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फ्यूजन मायक्रो फायनान्स लिमिटेड – इनिशिअल पब्लिक ऑफर २ नोव्हेंबर २०२२ रोजी सुरू होणार

         फ्यूजन मायक्रो फायनान्स लिमिटेडच्या प्रत्येक १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या समभागासाठी रु.३५० ते रु.३६८ किंमत निश्चित.

·         ४ नोव्हेंबर २०२२ रोजी ऑफर बंद होणार

·         किमान ४० आणि त्यानंतर ४०च्या पटीत समभागांसाठी बोली लावता येणार.

राष्ट्रीय२८ नोव्हेंबर २०२२: फ्यूजन मायक्रेा फायनान्स लिमिटेडने (‘‘एफएमएल’’ किंवा ‘‘कंपनी’’) दिनांक २ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांच्या प्रत्येकी १० रुपये (‘‘समभाग’’) दर्शनी मूल्य असेल्या समभागांची इनिशिअल पब्लिक ऑफरिंग सुरू करण्याचे प्रस्तावित केलेले आहे, ज्यात ६,००० दशलक्ष नव्या समभागांचा (‘‘फ्रेश इश्यू’’) आणि १३,६९५,४६६ पर्यंत समभागांच्या विक्रीचा (‘ऑफर’’) समावेश आहे. यासाठीची अँकर इन्व्हेस्टर बिडिंग डेट ही मंगळवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२२ अशी असेल. ही ऑफर ४ नोव्हेंबर २०२२ रोजी संपेल.

या ऑफरच्या किमतीची मर्यादा प्रति समभाग रु.३५० ते रु.३६८ अशी निश्चित करण्यात आलेली आहे. बोली किमान ४० आणि त्यानंतर ४०च्या पटीत असलेल्या समभागांसाठी लावली जाऊ शकते.

या ऑफरमध्ये देवेश सचदेव यांच्याद्वारे ६५०,००० पर्यंत समभाग; मिनी सचदेव यांच्याद्वारे १००,००० पर्यंत समभाग; हनी रोझ इन्व्हेस्टमेंट लि. यांच्याद्वारे १,४००,००० पर्यंत समभाग; क्रिएशन इन्व्हेस्टमेंट्‌स फ्यूजन एलएलसी यांच्याद्वारे १,४००,००० पर्यंत समभाग; ऑयकोक्रेडिट एक्यूमेनिकल डेव्हलपमेंट कॉऑपरेटिव्ह सोसायटी यू.ए यांच्याद्वारे ६,६०६,३७५ पर्यंत समभाग; आणि ग्लोबल इम्पॅक्ट फंड्‌स, एस.सी.ए., एसआयसीएआर यांच्याद्वारे ३,५३९,०९१ पर्यंत समभाग यांच्या विक्रीचा समावेश आहे.

ह्या समभागांची ऑफर, नवी दिल्ली येथील कंपनी निबंधक दिल्ली आणि हरियाणा (‘‘आरएचपी’’) यांच्याकडे फाईल करण्यात आलेल्या कंपनीच्या दिनांक २५ ऑक्टोबर २०२२च्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या माध्यमातून दिली जात आहे आणि ते बीएसई लिमिटेड (‘‘बीएसई’’) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (‘‘एनएसई’’) यांच्याकडेत सूचीकृत करण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. या प्रस्तावित ऑफरसाठी नियुक्त स्टॉक एक्सचेंज हे बीएसई असेल.

ही ऑफर, वेळोवेळी सुधारित करण्यात आलेल्या सेक्युरिटिज काँट्रॅक्ट्‌स (रेग्युलेशन) रुल्स, १९५७ (“एससीआरआर”) मधील नियम १९(२)(बी) अनुसार व त्यासोबत वेळोवेळी सुधारित करण्यात आलेल्या सेक्युरिटिज्‌ अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्‌स) रेग्युलेशन्स, २०१८ (‘सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स’’) मधील रेग्युलेशन ३१च्या सहवाचनांतर्गत दिली जात आहे. ही ऑफर सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ६(१) अनुसार दिली जात आहे, ज्यात पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (‘‘क्यूआयबी पोर्शन’’) ॲलोकेशनसाठी त्या प्रमाणात ५०% पेक्षा अधिक ऑफर उपलब्ध नसेल, मात्र आमची कंपनी तिच्या आयपीओ कमिटीच्या माध्यमातून, बीआरएलएमएसच्या सल्ल्याने क्यूआयबी पोर्शनपैकी ६०% आफर अँकर इन्व्हेस्टर्सना, तिच्या स्वत:च्या विवेकाधिकारात देऊ शकेल. देशांतर्गत म्युच्युअल फंडांकडून अँकर इन्वहेस्टमेंट ॲलोकेशन प्राईसपेक्षा अधिक किमतीची वैध बोली प्राप्त झाल्यास अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी एक तृतीयांश भाग म्युच्युअल फंडांसाठी राखीव ठेवण्यात येईल. जर अँकर इन्व्हेस्टमेंट पोर्शनमध्ये सबस्क्रिप्शन कमी गोळा झाले किंवा सबस्क्रिप्शन गोळा झालेच नाही, तर शिल्लक समभाग नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये जोडले जातील. त्यानंतर, नेट क्यूआयबी पोर्शनपैकी ५% हिस्सा फक्त म्युच्युअल फंडांसाठी प्रपोर्शनेट बेसिसवर ॲलोकेशनसाठी उपलब्ध असेल आणि क्यूआयबी पोर्शनपैकी उर्वरित हिस्सा सर्व क्यूआयबी बिडर्ससाठी प्रपोर्शनेट बेसिसवर ॲलोकेशनसाठी उपलब्ध असेल, ज्यात म्युच्युअल फंडांनी ऑफर प्राईसपेक्षा जास्तीची वैध बोली लावल्यास त्यांचाही समावेश असेल. परंतु म्युच्युअल फंडांकडून आलेली एकत्रित मागणी क्यूआयबी पोर्शच्या ५% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड पोर्शनमध्ये ॲलोकेशनसाठी उपलब्ध असलेले शिल्लक समभाग क्यूआयबीज्‌ना प्रपोर्शनेट ॲलोकेशन करण्यासाठी क्यूआयबी पोर्शनमध्ये जोडले जातील.

त्यानंतर, ऑफरपैकी किमान १५% किंवा त्यापेक्षा अधिक हिस्सा हा नॉन-इन्स्टिट्यूशनल बिडर्ससाठी (‘‘नॉनइन्स्टिट्यूशनल पोर्शन’’) उपलब्ध असेल

‘असा बदलला भारत’मधून उलगडणार भारताचे अंतरंग

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित होऊ घातलेल्या महाग्रंथातून भारताचे अंतरंग उलगणार आहेत. ‘असा बदलला भारत : पारतंत्र्यातून महासत्तेकडे’ हा दोन खंडाचा, बाराशे पानांचा महाग्रंथ जानेवारी २०२३ मध्ये वाचकांच्या भेटीला येणार आहे, अशी माहिती प्रकाशक अरविंद पाटकर, महाग्रंथाचे संपादक दत्ता देसाई व मनोविकास प्रकाशनचे संपादक विलास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. अरविंद पाटकर, आशिष पाटकर व दत्ता देसाई यांच्या एकत्रित प्रयत्नातून हा महाग्रंथ साकारत आहे.
दत्ता देसाई म्हणाले, “भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाचा आणि आत्ताचा भारत घडत गेला आहे. घडण्याची ही प्रक्रिया आजही सुरूच आहे. प्रत्येकाला आस्था आणि कुतूहल वाटावे, असा हा प्रवास आहे. या प्रवासातील चढउतार, यासह भारताचा सर्वसमावेशक, सर्वांगीण इतिहास, लेखाजोखा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारा हा ग्रंथ असणार आहे. दोन खंडातील या ग्रंथात आठ विभाग असून, त्यात साठ नामवंत लेखकांनी लिहिले आहे. आधुनिक राष्ट्राची जडणघडण : वाटा आणि वळणे, राजकीय इतिहास : प्रवाह आणि वाटचाल, साहित्य कला : भारतीय दर्शन, लोकशाही : राज्यघटना आणि संरक्षण, धर्म आणि संस्कृती, विज्ञान -शिक्षण-आरोग्य-क्रीडा माध्यमे, उद्योग विकास अर्थकारण पर्यावरण, जात-स्त्री-कामगार-परिजन (आदिवासी /भटके विमुक्त) असे आठ विभाग आहेत.”
“हा शतक-दीड शतकाचा संग्राम नेमका काय होता? त्याचे नायक कोण? विविध प्रवाह, प्रक्रिया व त्यामागील शक्ती, जनतेच्या भूमिका काय होत्या? स्वतंत्र भारत ‘रेडिमेड’ मिळाला की आजही घडतो आहे? गेल्या ७५ वर्षांत स्वातंत्र्याची कमाई काय? आजचा ताणतणाव, वसाहतीकडून महासत्तेकडे जातोय का? पुढील २५ वर्षांत भारत कसा बदलेल? अशा अनेक प्रश्नांची उकल या ग्रंथातून होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक, समीक्षक, लेखक, राजकीय विश्लेषक, अभ्यासू पत्रकार यांनी चिंतनशील लेख लिहिले आहेत,” असे दत्ता देसाई यांनी नमूद केले.
अरविंद पाटकर म्हणाले, “महाग्रंथाची निर्मिती, वाचन संस्कृती लोकांपर्यत पोहोचावी याकरीता एक चळवळ म्हणून याकडे पाहत आहोत. संयोगिता ढमढेरे व विलास पाटील यांचे सहकार्य लाभले आहे. प्रत्येक जिज्ञासू नागरिकाने, अस्वस्थ देशप्रेमाने, स्वातंत्र्य व लोकशाही प्रेमीने, अध्यापक-अभ्यासकाने, विद्यार्थी-तरुणांनी, कार्यकर्ता-पत्रकाराने हा ग्रंथ वाचावा, असा असणार आहे.

या लेखकांनी दिले आहे योगदान

या ग्रंथात जुन्या व नव्या पिढीतील अभ्यासू लेखकांनी लेखन केले आहे. डॉ. गणेश देवी, सुहास पळशीकर, प्रताप आसबे, रावसाहेब कसबे, शांता गोखले, गजानन खातू, तारा भवाळकर, डॉ. अनंत फडके, किशोर बेडकिहाळ, अजित अभ्यंकर, दत्तप्रसाद दाभोळकर, प्रदीप पुरंदरे, अनंत बागाईतकर, गोपाळ गुरु, विजय खरे, इरफान इंजिनिअर, प्राची देशपांडे, श्रध्दा कुंभोजकर, अशोक राणे, नीला भागवत, नुपूर देसाई, श्रीरंजन आवटे, अभिषेक भोसले, रणधीर शिंदे यांच्यासह इतर मान्यवर

महाग्रंथाच्या नोंदणीसाठी

या महाग्रंथाची प्रत १२ नोव्हेंबर २०२२ पासून महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्री केंद्रात आगाऊ स्वरूपात नोंदवता येईल. मनोविकास प्रकाशन, फ्लॅट न. ३, ए/४ शक्ती टॉवर्स, ६७२ नारायण पेठ, पुणे-३० किंवा मनोविकास बुक सेंटर, आकाशवाणी, आमदार निवास आवार, चर्चगेट, मुंबई या पत्त्यावर, तसेच ०२०-२९८०६६६५, ८८८८५५०८३७ किंवा ९५९४७३८११० या दूरध्वनीवर आपली प्रत नोंदवता येईल, असे पाटकर यांनी सांगितले.

“मराठी प्रकाशन व्यवसाय हा पुस्तकाच्या विक्रीवर उभा आहे. त्याला शासनाचे सहकार्य असावे. सध्याच्या डिजिटल प्रवाहाचा वाचन संस्कृतीवर फारसा परिणाम झालेला नाही. वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचवण्यात आम्ही कमी पडतो. ललित साहित्याच्या दुकानाची वानवा आहे. त्यामुळे मराठी प्रकाशन व्यवसाय आक्रसत चालला आहे. महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यापैकी २० जिल्ह्यात एकही ललित साहित्याचे दुकान नाही, ही शोकांतिका आहे. जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी आणि एसटी स्टॅन्ड येथे अल्प भाडे तत्वावर दुकान उभारण्यासाठी शासनाने सहकार्य करावे.”-

अरविंद पाटकर, प्रकाशक, मनोविकास प्रकाशन

रेम्बो सर्कसचे संस्थापक पी. टी. दिलीप यांचे निधन

पुणे : देशातील सर्कस उद्योगाला उर्जीत अवस्था यावी यासाठी झटणारे आणि पुण्यातील जगप्रसिद्ध रॅम्बो सर्कसचे संस्थापक पी. टी. दिलीप (वय-74) यांचे काल अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पाश्‍चात पत्नी, विवाहित मुलगा, सुन, विवाहित मुलगी, एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे.उद्या शनिवारी हडपसर येथील सेपल्कर  दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती पी. टी. दिलीप यांचे सुपुत्र सुजीत दिलीप यांनी दिली.पी. टी. दिलीप हे मुळचे केरळ येथील आहे. त्यांचे महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील लोके हायस्कूलमध्ये झाले. मोबाईल अ‍ॅम्युझमेंटमध्ये ते मॅनेजन म्हणून  त्यांनी काम केले. नव्वदच्या दशकात त्यांनी तीन लहान सर्कस एकत्र केल्या. त्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले. 26 जानेवारीच्या मूहुर्तावर त्यांनी रॅम्बो सर्कस उभी केली. या रॅम्बो सर्कसनी संपूर्ण आशियाचा दौरा केला. सर्कसच्या माध्यमातून पुण्याचे नाव जगप्रसिद्ध केल्याबद्दल पुणे महानगरपालिकेतर्फे 1992 मध्ये पी. टी. दिलीप यांचा विशेष गौरव करण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून सर्कसमध्ये प्राण्यांच्या खेळांवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे उताराला लागलेल्या सर्कसला उर्जीत अवस्था यावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न करीत केले.सर्कसला मध्यवर्ती ठिकाणी कमी दरात मैदान मिळावे, यासाठी प्रत्येक शहरामध्ये त्यांनी खुप प्रयत्न केले. तसेच राज्य सरकारनेदेखील सर्कसस उद्योगाला आर्थिक पाठबळ द्यावे, यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटात सर्कसला राज्य सरकारकडून मदत मिळावी, म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न करुन मदत मिळवून दिली. त्यांच्या कारर्किदीत त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सर्कस मित्रमंडळ पुणेचे अध्यक्ष प्रविण वाळिंबे, उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सरचिटणीस प्रवणि तरवडे, नंदकुमार बानगुडे आणि आनंद धोत्रे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. भारतीय सर्कसचा आधारस्तंभ हरपला, अशा भावना व्यक्‍त केल्या.

देश बलवान करायचा असेल, तर सेना बलवान व्हायला हवी:ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र खरे 

पुणे : आजच्या युवकांना सैन्याचे धडे द्यायला हवे. आपल्याला मागील ७५ वर्षांमध्ये अहिंसेचे डोस पाजले गेले. ज्याच्याकडे शक्ती आहे, त्याला शांततेबद्दल बोलण्याचा अधिकार आहे. भारताला बलवान करायचे असेल, तर आपली सेना अधिकाधिक बलवान व्हायला हवी, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र खरे यांनी व्यक्त केले. 
विधायक पुणे, सैनिक मित्र परिवार व सहयोगी संस्थांतर्फे देशासाठी प्राणांची आहुती देणाºया शहीद व बेपत्ता सैनिकांच्या वीरपत्नींसमवेत सदाशिव पेठेतील नारद मंदिर येथे भाऊबीज साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय वायुदलातील निवृत्त ग्रुप कॅप्टन सुहास फाटक, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे समन्वयक भालचंद्र कुंटे, अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर, नारद मंदिराच्या विश्वस्त जयश्री देशपांडे, आनंद सराफ आदी उपस्थित होते.  
तिरंगी उपरणे, मिठाई, दिवाळीच्या भेटवस्तू देऊन वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला. सन १९६२, १९६५, १९७१ आणि कारगिल च्या युद्धात बेपत्ता व शहीद झालेल्या सैनिकांच्या वीरपत्नी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. पुण्यातील गणेशोत्सव मंडळे आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग होता. किरण पाटोळे, गिरीश पोटफोडे, अमोल काळे, शिरीष राणे, शाहीर हेमंत मावळे, कल्याणी सराफ, मंदार रांजेकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.
रवींद्र खरे म्हणाले, अनेक सैनिकांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले आहेत. त्यांच्या प्राणात ख-या अर्थाने भारत सामावला आहे. जगातील अनेक देश आपल्या पुढे आहेत. आपण मागे आहोत, याचे कारण आपल्या सैन्यातील काम आपल्याला माहित नाही. त्यामुळे सैन्यदलातील कार्य सामान्यांपर्यंत पोहोचायला हवे. 
भालचंद्र कुंंटे म्हणाले, सैनिकांचे कार्य तर अतुलनीय आहेच, मात्र त्यांच्या वीरपत्नी या त्यागमूर्ती आहेत. त्या सैनिकांच्या पाठिमागे संपूर्ण कुटुंब सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून समाजाला खरी स्फूर्ती मिळेल. 
आनंद सराफ म्हणाले, देशाच्या रक्षण करणा-या सैनिकांच्या वीरपत्नी त्यांच्या मागे प्रपंचाची दुसरी लढाई लढत आहेत. त्यामुळे सैनिक मित्र परिवारसह इतर अनेक संस्थांच्या माध्यमातून आम्ही २००० सालापासून त्यांच्या सोबत आहोत, असेही त्यांनी सांगितले. सुहास फाटक, शकुंतला खटावकर व वीरपत्नी, वीरकन्यांनी मनोगत व्यक्त केले. गिरीष पोटफोडे यांनी सूत्रसंचालन केले. नितीन पंडित यांनी आभार मानले.

क्रांतिसूर्य महात्मा फुले स्मारकासमोर पतित पावन संघटनेतर्फे दीपोत्सव 

मीठगंज पोलीस चौकी शेजारील स्मारक ; कायमस्वरूपी लाईटची व्यवस्था सुरु 
पुणे : ऐन दिवाळीत मीठगंज पोलीस चौकी शेजारील अंधारात असलेल्या  क्रांतिसूर्य महात्मा फुले स्मारकासमोर पतित पावन संघटनेतर्फे दीपोत्सव साजरा आला. ज्या महात्मा फुले यांनी  संपूर्ण आयुष्य समाजातील अंधार घालविण्यासाठी महिलांच्या आयुष्यात शिक्षणाचा दिवा लावला. त्या अधांरात असलेल्या महात्मा फुले यांच्या स्मारक परिसरातील दिवे पुणे मनपा ला सांगून पुन्हा लावून घेत दिपोत्सव साजरा केला. 
त्यावेळी रा.स्व.संघाचे महात्मा फुले नगर कार्यवाह मंगेश शिंदे, पतित पावन संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे, संतोष अण्णा शेंडगे, ललित खंडाळे, गुरु कोळी,योगेश वाडेकर, राजाभाऊ रजपूत, सूरज पोटे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उमेश नाईक, अविनाश नाईक, केशव पाटिल व अभिजीत मारणे उपस्थित होते 
मंगेश जवाहिरे यांनी स्मारकाभोवती नयनरम्य रंगावली काढली. कार्यक्रमाचे आयोजन योगेश पाटील, ऋतिक कांबळे, ओंकेश काची, संदेश वाघमारे, साहिल कांबळे, सोनू ताड़े आणि स्वप्नील नाईक यांनी केले. दरवर्षी पुणे मनपा कडून महात्मा फुले स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी निविदा प्रक्रिया काढण्यात येते, तरीही मात्र ऐंन दिवाळीत महात्मा फुले यांच स्मारक अंधारात होते, हे दुर्देव असल्याचे स्वप्नील नाईक यांनी सांगितले. 

राष्ट्र बलशाली करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक एकत्र आला पाहिजे-अॅड प्रशांत यादव 

0

पुणे ः राष्ट्र बलशाली बनवायचे असेल तर समाजातील प्रत्येक घटक एकत्र आला पाहिजे. समाजासाठी काम करताना ते निरपेक्ष भावनेने केले पाहिजे. फक्त निवडणूकांच्या काळात एकत्र येण्यापेक्षा इतरवेळी देखील एकत्र आले पाहिजे. सर्व प्रथम राष्ट्र त्यानंतर समाज मग कुटुंब आणि स्वतःचा  विचार केला पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कसबा भाग संघचालक अॅड. प्रशांत यादव यांनी व्यक्त केले. 

जनता वेल्फेअर सोसायटी, पुणे व प्रभात जन प्रतिष्ठानच्यावतीने बुधवार पेठेतील नामदेव शिंपी कार्यालयात आपुलकीची भाऊबीज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जनता बॅंक पुणेचे अध्यक्ष रविंद्र हेजीब, उपाध्यक्षा अलका पेटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप, श्री नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष डाॅ. लक्ष्मण कालेकर, प्रभात जन प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर चव्हाण, रुपेश नाईक, प्रतिष्ठानचे मंगेश शिंदे, राजेंद्र भुतकर, कृष्णा परदेशी, अक्षय चौहान, राजेश नाईक, ओंकार नाईक, कुणाल जगताप, सोसायटीचे अभय ढमाले, संभाजी कातुर्डे, आनंद पाटणकर उपस्थित होते. 

यावेळी बुधवार पेठेतील देवदासी व देहविक्री करणाऱ्या महिलांना साखरेपासून साडीचोळी पर्यंत २० गोष्टींचा संच भाऊबीज ओवाळणी स्वरूपात भेट देण्यात आला. एकूण 50 महिलांना संचाचे वाटप करण्यात आले. 

किशोर चव्हाण म्हणाले, दिवाळी हा प्रत्येकाच्या घरात साजरा केला जाणारा सण आहे. या सणाला दिवाळीचा दिवा प्रत्येकाच्या घरात प्रकाशित झाला पाहिजे. या उद्देशाने देवदासी भगिनींसाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

रविंद्र हेजीब म्हणाले, समाजाप्रती असणारे कर्तव्य आपण केले पाहिजे. छोट्या स्वरूपात का असेना प्रत्येकाने गरजूंना मदत केली पाहिजे. देवदासी महिलांना दिलेले हे संच म्हणजे मदत नाही तर ही संस्थेच्यावतीने दिलेली भाऊबीज आहे.

‘अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदारसंघ परिसरात १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ नंतर जाहीर प्रचार करण्यासह विविध निर्बंध

मुंबई, दि. २९ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील ‘१६६ अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यामुळे मंगळवार १ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून जाहीर प्रचारावर निर्बंध लागू होण्यासह विविध निर्बंधदेखील लागू होत आहेत. या अनुषंगाने देण्यात येणाऱ्या सूचनांचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश अंधेरी पूर्व विधानसभा  मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिले आहेत.

येत्या ३ नोव्हेंबर रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून निवडणुकीसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार व आदर्श आचारसंहितेचा भाग म्हणून मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी ४८ तास आधीपासून जाहीर प्रचारावर निर्बंध लागू होण्यासह विविध निर्बंध लागू करण्यात येत आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदान संपण्याच्या ४८ तास अगोदर पासून प्रचार, प्रसार व जाहिरात याबाबत असणारे निर्बंध आणि घ्यावयाची दक्षता याबाबत सर्व उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना प्रशिक्षणादरम्यान माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व संबंधितांनी काटेकोरपणे काळजी घेणे नियमानुसार बंधनकारक आहे. तसेच या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधितांविरोधात संबंधित कायदा व नियमांन्वये कठोर कारवाई करण्यात येईल, असेही निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पाटील यांनी कळविले आहे.

महत्त्वाची माहिती

  • या ४८ तासांच्या कालावधी दरम्यान उमेदवारांना त्यांच्या प्रचार व प्रसार साहित्यासाठी, तसेच जाहिरातीसाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. तरी याबाबत संबंधित उमेदवारांनी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाशी किंवा माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा व विहित निर्देशांनुसार कार्यवाही करुन पूर्वपरवानगी प्राप्त करून घ्यावी.
  • आदर्श आचारसंहितेबाबतची नियमपुस्तिका (मार्च २०१९) मधील मार्गदर्शक सूचना क्रमांक ८.१ ते ८.६ अन्वये प्रचार साहित्याबाबत देण्यात आलेल्या निर्देशांनुसार; तसेच ‘लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१’ च्या कलम ‘१२७ क’ नुसार असे कोणतेही निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक मुद्रित किंवा प्रसिद्ध करू शकत नाही, ज्यावर दर्शनी बाजूस मुद्रकांची आणि प्रकाशकांची नावे आणि प्रतींची संख्या व पत्ते नसतील. त्याचबरोबर मुद्रकाने मुद्रित साहित्याच्या चार प्रती व मुद्रित प्रतींची संख्या दर्शवणारे वर्णन पत्र आणि प्रकाशकाकडून वसूल केलेला मुद्रणाचा खर्च यासह संबंधित प्रतिज्ञापत्राची एक प्रत संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविणे आवश्यक आहे.
  • वृत्तपत्रातील जाहिरातींचे पूर्वोक्त पूर्व – प्रमाणन हे मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या आदल्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या उद्देश असलेल्या अशा सर्व जाहिरातींच्या संबंधात आवश्यक.
  • राजकीय स्वरूपाच्या नभोवाणी, दूरचित्रवाणी आणि केबल टिव्हीवरील जाहिरातींचे पूर्व प्रमाणन आवश्यक.
  • निर्बंध कालावधी दरम्यान मद्यविक्री दुकाने व तत्सम बाबीं येथील व्यवहार, खरेदी-विक्री, देवाणघेवाण इत्यादींवर पूर्णतः निर्बंध.
  • शासकीय विश्रामगृहांमध्ये आणि सार्वजनिक उपक्रमांच्या विश्रामगृहांमध्ये ‘झेड’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या राजकीय व्यक्तींना संबंधित नियम व पद्धतींच्या अधीन राहून निवास करता येईल. तथापि, या ठिकाणी कोणत्याही प्रकारची राजकीय बाबी वा कार्यवाही करण्यावर निर्बंध.
  • धार्मिक स्थळांचा राजकीय वापर करण्यावर निर्बंध.
  • आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग होईल अशा प्रकारच्या कोणत्याही माहितीचे आदान-प्रदान करण्यास किंवा पाठविण्यावर निर्बंध.
  • ‘बल्क’ पद्धतीने पाठवण्यात येणाऱ्या लघु संदेशांवर (एस.एम.एस.) निर्बंध.
  • ध्वनीक्षेपकांच्या वापरावर निर्बंध.
  • कोणत्याही प्रकारची सभा, जाहीर सभा घेण्यास किंवा मिरवणूक काढण्यावर निर्बंध.
  • मतदान केंद्रापासून २०० मीटरच्या परिसरात उमेदवारांचे तात्पुरते कार्यालय, संपर्क ठिकाण उभारण्यावर निर्बंध.
  • ओपिनियन पोल, सर्वेक्षण इत्यादी बाबी करण्यावर निर्बंध.

अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मतदानाच्या दिवशी ‘अंधेरी पूर्व’ मतदारसंघातील सर्व पात्र मतदारांनी मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती चौधरी यांनी यानिमित्ताने आवर्जून केले आहे.

माध्यमे ही समाज व राज्यकर्त्यांना दिशादर्शक – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील


सातारा दि.29 : समाज व राज्यकर्ते यांना योग्य दिशा दर्शवण्याचे काम माध्यमे प्रभावीपणे करत आहेत. यापुढेही अशाच पद्धतीचे काम माध्यमांनी करावे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

सातारा जिल्ह्यातील भिलार या पुस्तकांच्या गावात आयोजित डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र पहिले राज्यस्तरीय अधिवेशन 2022  च्या उद्घाटन प्रसंगी श्री. पाटील बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीनिवास पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समिर शेख, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विकास भोसले आदी उपस्थित होते.

पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात कडक कायदे होण्यासाठी आम्ही आग्रही असल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले. निर्भीड पत्रकारितेसाठी ते गरजेचे आहे.   पत्रकारितेतील सुरुवातीच्या  काळासाठी त्यांना काही विद्यावेतन देता येईल का ? याचाही अभ्यास करु. पत्रकारांना आरोग्य, मुलांना शिक्षण तसेच राहण्यासाठी घरे याबरोबर जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील असे त्यांनी यावेळी सांगितले.

स्पर्धात्मक युगात डिजिटल मीडियाने विश्वासार्हता निर्माण करणे गरजेचे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 कोणत्याही प्रकारची बातमी लोकांपर्यंत क्षणार्धात पोहोचविण्याचे काम डिजिटल मीडिया करीत आहे. डिजिटल मीडियाशी शहरी तसेच ग्रामीण भागातील लोक जोडलेली आहेत.  तरी या माहिती पोहचविण्याच्या स्पर्धात्मक युगात डिजिटल मीडियाने आपली विश्वासार्हता निर्माण करावी. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अधिवेशनास दिलेल्या शुभेच्छा संदेशात केले.

  मुख्यमंत्री श्री. शिंदे संदेशात पुढे म्हणाले, पुस्तक व डिजिटल अशी दोन्ही माध्यम आज अधिवेशनाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. कोरोना संकटाच्या काळात डिजिटल मीडियाने चांगली कामगिरी करुन नागरिकांना जागृत करण्यासोबतच धीर देण्याचे मोठे काम केले आहे. विविध सुविधांसाठी  संघटनेने एक आदर्श नियमावली व आचार संहिता तयार करावी. सत्यता, सभ्यता व लोकाभिमुखता या त्रिसुत्रीच्या माध्यमातून मीडियाचा विस्तार करावा. लोकांपर्यंत क्षणार्धात माहिती पोहचविण्याचे हे साधन आहे. या क्षेत्रातील संपादक पत्रकारांच्या समस्या या अधिवेशनाच्या माध्यमातून शासनापर्यंत नक्की पोहोचतील. डिजिटल मीडियातील बांधवांसाठी सकारात्मक निर्णय घेण्याचा निश्चित पणे प्रयत्न करु, असेही ते यावेळी संदेशात म्हणाले.

टेंभू येथील गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मारकासाठी पाठपुरावा करु – पालकमंत्री शंभूराज देसाई

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, संघटनेने स्थानिक स्तरावर नियमावली तयार करुन द्यावी.  त्या आधारे त्यांना अधिकृत म्हणून ओळखपत्र देण्याविषयी कार्यवाही करता येईल. टेंभू ता. कराड येथील गोपाळ गणेश आगरकर यांचे स्मारक व्हावे, अशी पत्रकारांची मागणी आहे. या मागणीचा विचार करुन   ग्रामविकास विभागाशी पाठपुरावा केला जाईल. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याशी चर्चा करुन या स्मारकाविषयी असलेल्या अडचणी सोडवून ते नक्की मार्गी लावू.

डिजिटल पत्रकारितेचे सामर्थ्य विधायक परिवर्तनासाठी वापरणे गरजेचे – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल पत्रकारिता ही संकल्पना झपाट्याने विस्तारत आहेत. माध्यमाची पोहोच आणि गतिमानता ही बलस्थाने लक्षात घेऊन डिजिटल पत्रकारितेचे सामर्थ्य विधायक परिवर्तनासाठी वापरणे गरजेचे आहे. लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. आज झालेल्या अधिवेशनात ज्या मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत. त्याचा सकारात्मक विचार करुन सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

खासदार श्री. पाटील म्हणाले, पत्रकारितेला मोठा इतिहास आहे. आजची पत्रकारिता बदलली असून त्याला आधुनिकतेची जोड मिळत आहे. पत्रकारांनी सत्याला वाचा फोडून सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका बजावावी.

संघटनेचे अध्यक्ष श्री. माने यांनी आपल्या प्रास्ताविकात संघटनेची भूमिका विषद करुन डिजिटल माध्यमांचे महत्व सांगितले. तसेच त्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी आणि समस्या या विषयी माहिती दिली. तसेच डिजिटल मीडियाच्या प्रतिनिधी कोण चुकत असेल तर त्या चुकाही वेळीच निर्देशनास आणून द्याव्यात, असेही ते म्हणाले.

यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची स्मरणिका, पुस्तक व विविध दिवाळी अंकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्राधिकरणांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांवर गदा नको महामेट्रोला  प्राधिकरणाचा दर्जा तात्पुरता द्या: माजी उपमहापौर आबा बागुल 

पुणे -स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत कुणालाही कोणतेही काम करताना  परवानगी घेणे घटनेनुसार बंधनकारक आहे. त्यामुळे प्राधिकरणांची निर्मिती करताना  स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार अबाधित ठेवावेत तसेच  महामेट्रोला दिलेला  प्राधिकरणाचा दर्जा तात्पुरता ठेवावा  अशी मागणी काँग्रेसचे माजी गटनेते आबा बागुल यांनी मुख्यमंत्र्यांकडे  केली आहे. 
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना पाठवलेल्या  निवेदनात माजी उपमहापौर आबा बागुल यांनी म्हटले आहे की, पुणे शहरात मेट्रो प्रकल्प राबविणाऱ्या महाराष्ट्र मेट्रो रेल काॅर्पोरेशनला (महामेट्रो) राज्य सरकारने विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला आहे. मात्र  मेट्रोसाठी महा – मेट्रोकडे हस्तांतरित केलेल्या शासकीय आणि खासगी जागांवर बांधकाम आराखडे मंजूर करणे, बांधकाम विकसन शुल्क आकारण्याचे अधिकार  महामेट्रोला बहाल करणे म्हणजे एकप्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  अधिकारांवर गदा आणण्यासारखे आहे. वास्तविक सध्या मेट्रोचे काम वेगात सुरु आहे. मेट्रोला प्राधिकरणाचा दर्जा देण्यास विरोध नाही ;पण पुणे महानगरपालिकेच्या परवागीशिवाय बांधकाम आराखडे मंजूर करणे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार संपुष्टात आले  आहेत. एकप्रकारे घटनेची पायमल्ली होण्यासारखा हा प्रकार असून लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. याकडेही आबा  बागुल यांनी लक्ष वेधले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थापनेमागील उद्देशानुसार कोणत्याही कामाला परवानगी ही त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत घेणे बंधनकारक आहे. मात्र सध्यस्थितीत अनेक प्राधिकरणांची निर्मिती केली जात आहे ;पण ते करताना स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार कमी केले जात आहेत.यातून घटनेची पायमल्ली होत आहे. सध्या पुणे महामेट्रोकडून मेट्रोचे काम सुरु आहे. मात्र कोणते काम सुरु आहे याविषयी जर स्थानिक स्वराज्य संस्थेला माहितीच नसेल तर भविष्यात मोठ्या दुर्घटनेची जबाबदारी कुणाची ? या प्रश्नाचा विचार होणे अत्यंत गरजेचे आहे. मेट्रोचे काम पूर्ण करून महामेट्रो उद्या जाईल पण भविष्यातील दुर्घटनेची अथवा अन्य आपत्कालीन स्थितीची जबाबदारी कोण घेणार ? यासह अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार कमी करत असताना घटनेची  पायमल्ली होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. आज आपण प्राधिकरणांची निर्मिती करत असताना स्थानिक स्वराज्य  संस्थांचे अधिकार कमी केले आहेत. एसआरए असो अथवा पीएमपीएल, पीएमआरडीए, स्मार्ट सिटी यांच्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण तयार केले पण आज एसआरएमधील इमारती उभारल्यानंतर त्यांचे देखभाल खर्च असो किंवा अन्य अनेक प्रश्नांची सोडवणूक कोण करणार ? सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी सक्षम असलेल्या पीएमटी- पीसीएमटीचे एकत्रीकरण करून पीएमपीएमएल असे प्राधिकरण केले मात्र आज कोट्यवधीं रुपये तोट्यात असलेल्या पीएमपीएमएलला पुणे महागरपालिकाच अर्थसहाय्य करत आहे.अशीच अवस्था स्मार्ट सिटीची झाली आहे. पुणे महानगरपालिकेने उभारलेले काम स्मार्ट सिटी तोडत आहे आणि नव्याने उभारणी करत आहे. त्यामुळे वेगाने विकसित होणाऱ्या शहरासाठी प्राधिकरणांची निर्मिती करावी पण ती तात्पुरती असावी.  त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांवर गदा कदापि नको.    पुणे महानगरपालिका ही  १९५० साली स्थापन झालेली  स्थानिक स्वराज्य संस्था ही  स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे   महामेट्रोला प्राधिकरणाचा दर्जा हा तात्पुरता देण्यात यावा.असेही माजी उपमहापौर  आबा बागुल यांनी नमूद केले आहे.