Home Blog Page 1532

माझे घर फुटलेले नाही,मुलगा व मी एकत्रच पण त्याला मी माझ्या समवेत शिंदेंच्या पक्षात ये म्हणणार नाही- गजानन किर्तीकर

पुणे – मी एकनाथ शिंदे यांच्या समवेत आलो आणि माझा मुलगा उद्धव ठाकरे यांच्याच पक्षात आहे,म्हणजे माझे घर फुटलेले नाही,आमचं घरामध्ये ठरलं आहे. आमच्या घरात वाद नाही. तो मला म्हटला की मी शिवसेना सोडणार नाही. रोज आम्ही एकत्र बसतो आणि जेवण करतो. मी त्याला ये म्हणून सांगणार नाही. त्याचा त्याला अनुभव घेऊ दे.अशी भूमिका गजानन कीर्तीकर यांनी येथे मांडली.

खासदार गजानन कीर्तीकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी हा धक्का मानला जातोय.शिवसेनेच्या ठाकरे गटात आपल्याला डावललं जात होतं.मी तिथे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होतो, असा आरोप गजानन कीर्तीकर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला.

या पत्रकार परिषदेला शिंदे गटाचे पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे, संपर्कप्रमुख अजय भोसले ,किरण साळी उपस्थित होते.
गजानन कीर्तीकर म्हणाले,मी 11 नोव्हेंबरला शिंदे गटात सामील झालो. मी शिंदे गटात जाण्याचं कारण ठाकरे गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर राजकीय प्रवास सुरू आहे तो घातक ठरणार आहे. त्यामुळे शिंदे गटाने उठाव केला. बाळासाहेब ठाकरे गटात जे खासदार गेले त्याचंही कारण आहे. मी ही गेलो त्याचंही तेच कारण आहे.असं गजानन कीर्तीकर म्हणाले.
मी नगरच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीकाँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या आदेशानुसार तहसीलदार, ठाणेदार, एम एस ईबीचे अधिकारी त्यांचं जे काम करतील त्यांच्या नेमणूका करण्यात आल्या. हा सगळा प्रकार आम्ही उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवत होतो. त्यांना आवाज देत होतो. आम्ही एकमुखी मागणी केली होती की, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जो प्रवास सुरु आहे तो थांबवा”, असं गजानन कीर्तीकरांनी सांगितलं.

मी 2004 साली जेव्हा निवडणूक लढत होतो तेव्हा उद्धव ठाकरे माझं तिकीट कापण्याचं काम करत होते. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले की तिकीट दिलं पाहिजे”. असं गजानन कीर्तीकर यांनी सांगितलं.
मी नोकरी सोडून पक्षाचं काम करत होतो. त्यांनी मला 2004 ला तिकीट दिलं. पण उद्धव ठाकरे विरोध करत होते. अखेर 2009 ला माझं तिकीट कापलं. माझ्या पीएला बोलावून तिकीट कापल्याचं सांगितलं”, असं कीर्तीकर म्हणाले.

हिवाळी अधिवेशन विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापतींकडून आढावा

0

अधिवेशन काळात खाजगी वाहतूक दर नियंत्रित करण्याची विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांची सूचना

अधिवेशन काळात अधिकाधिक प्रभावी यंत्रणा वापरणार
⚫ प्रवेशासाठी मध्यवर्ती ‘बार कोड ‘ पद्धतीचा अवलंब करणार
⚫ दोन्ही सभागृहाचे पत्रकार कक्ष अपुरे पडत असल्याने सभागृहा बाहेर स्वतंत्र मंडप मांडण्याची संकल्पना

नागपूर दि.१५ : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात आत मध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेली गर्दी, प्रत्येक मंत्री व आमदारांमार्फत दिल्या जाणाऱ्या प्रवेशिका, विधान भवन परिसरातील महिला सुरक्षा कर्मचारी यांच्यासाठीची आवश्यक प्रसाधन व्यवस्था, महिला आमदार यांची आमदार निवासातील व्यवस्था, अधिवेशनासाठी विदर्भाच्या दुर्गम भागातून येणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांसाठीच्या बसेसची व्यवस्था, या काळात खासगी बस भाड्यामध्ये वाढ होऊ न देणे,तसेच यावर परिवहन विभागाने नियंत्रण ठेवणे अशा विविधांगी मुद्द्यांवर आज विधान परिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी
प्रशासनाला सूचना केल्या. या कालावधीत सामान्य नागरिकांसाठी बाहेर उत्तम दर्जाच्या प्रसाधन व्यवस्था,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,वाहतूक व्यवस्था याबद्दलचा आढावाही त्यांनी घेतला.
सर्व प्रशासनाला दोन्ही सभागृहाप्रमाणे सभागृहाबाहेरही सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवण्याचे त्यांनी स्पष्ट केले.*
नागपूरमध्ये होऊ घातलेल्या डिसेंबर महिन्यातील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारी संदर्भात आज नागपूर विधिमंडळ परिसरात मंत्रीपरिषद सभागृहामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधान परिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी सर्व विभागाचा आढावा घेतला.

नागपूर विधिमंडळ परिसराचे विस्तारीकरण करण्याबाबत प्रयत्नशील असून याबाबतच्या शक्यता पडताळून पाहण्याचे स्थानिक प्रशासनाला निर्देशित करण्यात आले आहे. तसेच अधिवेशन काळात मर्यादित प्रवेश व सुरक्षा व्यवस्थेला लक्षात घेऊन संसदेच्याप्रमाणे मध्यवर्ती ‘बारकोड ‘ पद्धतीचा अवलंब करणार असल्याची माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज येथे दिली.
डॉ. गोऱ्हे यांनी तान्हे बाळ असलेल्या महिला लोकप्रतिनिधी यांच्यासाठी विधान भवन परिसरात अधिवेशन काळात पाळणाघर सुविधा असावी अशी महत्वाची सूचना केली. त्यावर लवकरच कार्यवाही होईल असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
या बैठकीला नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी,जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संजय दशपुते, यांच्यासह विधिमंडळाच्या आयोजनातील विविध आवश्यक विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. तर मुंबई येथून विधानसभा अध्यक्ष यांचे सचिव म.मू.काज, विधान मंडळाचे उपसचिव राजेश तारवी,अव्वर सचिव रवींद्र जगदळे, उपसभापती यांचे खाजगी सचिव रवींद्र खेबुडकर, सुनील झोरे, विधानभवनाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, अध्यक्षांचे विशेष कार्य अधिकारी डॉ.अनिल महाजन, संगणक प्रणालीचे प्रमुख अजय सरवणकर, ग्रंथपाल निलेश वडनेरकर आदी उपस्थित होते.
नागपूरचे आयुक्त अमितेश कुमार यांनी सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील माहिती दिली. नागपुरातील विधिमंडळाचा संपूर्ण परिसर तसेच लोकप्रतिनिधींच्या वास्तव्याची सर्व ठिकाणे सीसीटीव्हीच्या निगराणीत असतील. मोर्चे, त्यांचे नियंत्रण ,भेटीचे ठिकाण, शिष्टमंडळाच्या भेटी याबाबतही त्यांनी माहिती दिली. महिला आमदारांच्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात कडेकोट बंदोबस्त आमदार निवासात ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रामुख्याने सभागृहातील आतील सुविधा, सुरक्षा व्यवस्था लोकप्रतिनिधींना सोयी सुविधा व सभागृहाच्या कामकाजाच्या वहनासाठी नागपूरहून येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या राहणे, खानपान, वाहतूक, 24 तास अखंड वीज पुरवठा, संपर्क साधण्यांची मुबलक उपलब्धता, टेलिफोनची उपलब्धता, गरम पाण्याची व्यवस्था, रेल्वे आरक्षण, पार्किंगची सुविधा, याशिवाय बाहेरून येणारे व्हिजिटर्स व मोर्चे यांची सुरक्षा व त्यांच्या मागण्या जनप्रतिनिधींपर्यंत सुलभ पद्धतीने पोहोचविण्याची रचना यावरही चर्चा करण्यात आली.
लवकरच मुंबई येथे कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल व त्यामध्ये अधिवेशनाच्या संदर्भातील कालावधी व अन्य महत्त्वपूर्ण घोषणा होतील असेही यावेळी निश्चीत करण्यात आले.

भारतीय हवाई दलाने टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक वाहनांचा  ताफ्यात केला समावेश

0

नवी दिल्‍ली, 15 नोव्‍हेंबर 2022

कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी आणि  हरित गतिशीलता म्हणजेच पर्यावरणस्नेही इंधनावरील वाहनांच्या वापरामध्ये वाढ करण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या पुढाकाराच्या धर्तीवर  भारतीय हवाई दलाने टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक वाहनांचा  ताफ्यात समावेश केला आहे. 15 नोव्हेंबर 2022 रोजी हवाई दलाचे मुख्यालय, वायु भवन येथे झालेल्या सोहळ्यात या वाहनांचा ताफ्यात समावेश करण्यात आला. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी  यांनी अन्य  वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत 12 इलेक्ट्रिक वाहनांच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला.

जुन्या झालेल्या  पारंपरिक वाहनांऐवजी  ई-वाहने खरेदी करून टप्प्याटप्प्याने  इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचा भारतीय हवाई दलाचा विचार आहे. हवाई दलाच्या विविध तळांवर चार्जिंग संबंधी पायाभूत सुविधांच्या उभारणीसह ई-वाहनांची परिसंस्था मजबूत करण्याचे नियोजित आहे. आज समावेश  करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक कारच्या पहिल्या तुकडीमधील गाड्यांच्या कामगिरीचे  निरीक्षण आणि विश्लेषणासाठी त्या दिल्ली एनसीआर  स्थित कारखान्यांमध्ये पाठवण्यात येतील.

वाहनांचा प्रमाणित साठा निर्माण  करण्यासाठी, भारतीय हवाई दलाने इलेक्ट्रिक बसेस आणि इलेक्ट्रिक कार्सच्या सध्या सुरु असलेल्या खरेदीसाठी  भारतीय सैन्याचे सहकार्य घेतले आहे.  हे सक्रिय उपाय पर्यावरण -स्नेही गतिशीलतेच्या दिशेने परिवर्तन घडवण्याच्या  राष्ट्रीय उद्दिष्टाप्रति भारतीय हवाई दलाची वचनबद्धता दर्शवतात.

खडकी येथील लष्करी रुग्णालयातील पॅराप्लेजिक रुग्णांची राष्ट्रीय दिव्यांग जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी

पुणे, 15 नोव्‍हेंबर 2022

गुवाहाटी येथे 11-13 नोव्हेंबर 2022 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 22 व्या राष्ट्रीय पॅरा (दिव्यांग) जलतरण अजिंक्यपद, 2022 स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीचं प्रदर्शन करून खडकी येथील लष्करी रुग्णालयात मणक्याच्या दुखापतीच्या केंद्रात दाखल असलेले सैनिक खऱ्या अर्थाने धैर्य आणि दृढनिश्चयाचे प्रतीक ठरले.  शिपाई दीपक बर्मन, याला  पोस्ट ट्रॉमेटिक पॅराप्लेजिया आहे आणि यापूर्वी त्याच्या पाठीच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्याने 100 मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात सुवर्णपदक जिंकले. 100 मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेतही त्याने आपले सर्वोत्तम प्रयत्न दाखवले, पण त्याचे सुवर्णपदक हुकले आणि त्याने  या स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. त्याशिवाय त्याने 50 मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात रौप्य पदक जिंकले. शिपाई अखिल टी, याने आपल्या गंभीर स्वरूपाच्या अपंगत्वावर मात करत सर्व अडचणींचा सामना केला आणि स्पर्धेच्या या प्रकारात उत्तम कामगिरीचे प्रदर्शन करून पाचवे स्थान निश्चित केले.

अशा शानदार कामगिरीमधून त्यांच्या व्यक्तिमत्वाची ताकद दिसून येते. आपले कर्तव्य बजावताना मणक्याची दुखापत झाल्यामुळे त्यांचे आयुष्य बदलून गेले. त्यांना दुर्दैवाचा सामना करावा लागला. पण, खडकी येथील लष्करी रुग्णालयातल्या मणक्याची दुखापत विभागातील पथकाच्या मदतीने आणि कुटुंब आणि मित्रांच्या पाठींब्याने त्यांनी अलौकिक कामगिरी केली, जी करायला सक्षम शरीराच्या व्यक्तींना देखील संघर्ष करावा लागेल.    

22 वी राष्ट्रीय दिव्यांग जलतरण अजिंक्यपद स्पर्धा, भारतीय पॅरालिम्पिक समितीने गुवाहाटी येथे 11 ते 13 नोव्हेंबर 2022 या कालावधीत आयोजित केली होती. या स्पर्धेत खडकी येथील  मणक्याची दुखापत केंद्रातील दिव्यांग रुग्णांनी सर्व्हिसेस पॅरा स्विमिंग संघाचे    प्रतिनिधित्व केले. भारतीय सशस्त्र दल युद्धातही आणि शांततेच्या काळातही आपल्या सैनिकांची काळजी घेते. पाठीच्या कण्याला दुखापत झालेल्या सैनिकांच्या प्रकृतीत उपचारा द्वारे सुधारणा केली जाते आणि पुण्यामध्ये खडकी येथील  लष्करी रुग्णालयातील  मणक्याची दुखापत केंद्रात त्यांचे पुनर्वसन केले जाते. ही प्रक्रिया जखमी व्यक्ती आणि त्याची काळजी घेणारं पथक दोघांसाठीही आव्हानात्मक  आहे. पण, चिकाटी हळूहळू का होईना, यश देते. या अत्याधुनिक केंद्रामधील समर्पित चिकित्सक, नर्सिंग कर्मचारी आणि  पुनर्वसन तज्ञ ट्रॉमा पॅराप्लेजिक रुग्णांच्या जीवनात आशा आणि नवीन अर्थ आणण्यासाठी चोवीस तास काम करतात. खडकी येथील लष्करी रुग्णालयातील हे केंद्र अशा रूग्णांसाठी अत्यंत आवश्यक असलेले पुनर्वसन आणि सामाजिक पुनर्मिलन प्रदान करण्यासाठी प्रयत्नशील आहे. बीईजी (BEG) खडकी येथील लष्कराच्या अपंग पुनर्वसन केंद्राने या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतील यशाचा मार्ग मोकळा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

बालकामगार प्रथेविरोधी जन जागृती अभियानाची अमंलबजावणी

पुणे, दि. १५: कामगार विभागाच्यावतीने १४ ते २० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत बालकामगार प्रथेविरोधी जन जागृती अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अनिष्ट प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे.

या कालावधीमध्ये जिल्हा कृती दलामार्फत विविध ठिकाणी धाडसत्राचे आयोजन करणे, बालकामगार प्रथा विरोधी फलक प्रदर्शित करणे, फेरीचे आयोजन करणे तसेच विविध व्यवसायिक, मालक व संघटना आदी कडून बालकामगार कामावर ठेवणार नाही अशा स्वरुपाची हमीपत्रे भरुन घेण्यात येत आहे. बालमजूरी विरोधी शपथ घेणेआदी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.

बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध आणि नियमन कायद्यातील नवीन तरतुदीनुसार १४ वर्षाखालील मुलांना मजूरी करण्यास भाग पाडणे कायद्याने गुन्हा आहे. याबाबत सजगता बाळगावी तसेच १४ ते १८ वर्षापर्यंतच्या मुलांना धोकादायक काम करण्यास भाग पाडणे, अशा गुन्ह्यांपासून सर्वानी दूर रहावे. मुलांना शाळेत पाठविणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. सर्वानी मिळून बालमजुरी या अनिष्ट प्रथेचे समुळ उच्चटन करुया, असे आवाहन अपर कामगार आयुक्त शैलेद्र पोळ यांनी केले आहे.

‘महाराष्ट्रात अमित शहांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन घडले’- देवेंद्र फडणवीस

आचार्य पवन त्रिपाठी यांच्या ‘विचार पुष्प’ या पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई:

‘केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या विचार पुष्पामध्ये कोणाचेही आयुष्य बदलण्याची क्षमता आहे. या पुस्तकाचे कोणतेही पान उघडा, तुम्हाला नक्कीच ज्ञान मिळेल, जे तुम्हाला प्रेरणा देईल. आचार्य पवन त्रिपाठी यांच्या ‘विचार पुष्प’ या पुस्तकातील प्रत्येक वाक्य जीवनात मार्गदर्शक आहे, अशा शब्दात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विचार पुष्प’ पुस्तिकेच्या प्रकाशन समारंभात त्याचे कौतुक केले.

फडणवीस म्हणाले की, अमित शहा हे पक्षासाठी समर्पित नेतृत्व आहे. भाजप अध्यक्ष म्हणून त्यांचे कार्य आपण पाहिले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून यूपीमध्ये त्यांचे कार्य आपण सर्वांनी पाहिले, जिथे भाजपला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या. याचे श्रेय कोणाला जात असेल तर ते मोदीजींच्या नेतृत्वाला आणि अमित भाईंच्या कार्याला जाते. पक्ष मजबूत करण्यासाठी ते जवळपास देशभर फिरले. प्रत्येक राज्यात त्यांनी अनेक दिवस मुक्काम केला. अमित भाई एका दिवसात ४०-४० बैठका घेऊन कार्यकर्त्यांपासून समाजातील प्रत्येक घटक आणि व्यक्तीपर्यंत पोहोचले. तसेच दोन-अडीच महिने महाराष्ट्रात राहून त्यांनी या कार्यालयातून निवडणूक प्रक्रिया हाताळली आणि भाजपचे सरकार आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार आणि अमित शहा यांच्या आत्मविश्वासामुळेच काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात यश आले, असेही फडणवीस म्हणाले. त्याचाच परिणाम म्हणून आज काश्मीर प्रगतीकडे वाटचाल करत आहे. फडणवीस म्हणाले की, अमित भाईंच्या विचारात प्रगल्भता आहे.छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर आणि चाणक्य यांना मानणारे ते नेते आहेत. त्यांच्याकडे नेतृत्व क्षमता तर आहेच, पण निर्णय घेण्याची क्षमताही प्रचंड आहे. महाराष्ट्रात झालेला बदल तुम्ही पाहिला आहे. शिवसेनेने आमच्यासोबत जी बेईमानी केली, त्या बेईमानांना त्यांची जागा दाखवण्यात आली. अमित शहा यांच्या मार्गदर्शनामुळेच आज महाराष्ट्रात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे सरकार सत्तेवर आहे.

महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष आ. ॲड.आशिष शेलार, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार राजहंस सिंह आणि माधवी नाईक व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आचार्य पवन त्रिपाठी म्हणाले की, अमित शहा यांनी संसदेत, कार्यक्रमात आणि माध्यमांमध्ये व्यक्त केलेल्या विचारांमधून काही प्रेरणादायी आणि मार्गदर्शक वाक्ये निवडून मी हे ‘विचार पुष्प’ तयार केले आहे. जे वाचणाऱ्याला त्याचा नक्कीच फायदा होईल. यावेळी आचार्य पवन त्रिपाठी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी ही श्वेता परुळकर यांनी सांभाळली.

गोवर संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ करण्याचे मुख्यमंत्र्यांचे पालिकेला निर्देश

0

मुंबई, दि. १५ : गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गोवर संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वूमीवर मुख्यमंत्र्यांनी मनपा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याशी दूरध्वनीवरून बोलून सूचना दिल्या. तसेच पालिकेचा आरोग्य विभाग कोणती खबरदारी घेत आहे ते जाणून घेतले.

ज्या मुलांना लागण झाली असून रुग्णालयांत उपचार सुरू आहेत तिथे सर्व आवश्यक औषधे उपलब्ध ठेवावीत. संसर्ग फैलावणार नाही याची काळजी घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लसीकरणाचा वेगही वाढविणे आवश्यक आहे तसेच बाधितांचे सर्व्हेक्षण मोठ्या प्रमाणावर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांशीही चर्चा करून संसर्गावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाला सतर्क करून उपाययोजना करण्यास सांगितले.

भारत-अमेरिका संयुक्त प्रशिक्षण सराव “युद्ध अभ्यास 2022” उत्तराखंडमध्ये सुरु होणार

0

नवी दिल्‍ली, 15 नोव्‍हेंबर 2022

भारत-अमेरिका दरम्यान 18 वा संयुक्त प्रशिक्षण सराव “युद्ध अभ्यास 22” या महिन्यात उत्तराखंडमध्ये आयोजित केला जाणार आहे.  दोन्ही देशांच्या लष्करामध्ये सर्वोत्तम पद्धती , रणनीती, तंत्रे आणि प्रक्रिया  यांची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी भारत आणि अमेरिका  दरम्यान युद्ध अभ्यास आयोजित केला जातो. गेल्या वर्षी  ऑक्टोबर 2021 मध्ये जॉइंट बेस एल्मेंडॉर्फ रिचर्डसन, अलास्का (यूएसए) येथे सरावाचे आयोजन  करण्यात आले होते.

या  वर्षीच्या सरावामध्ये अमेरिकेच्या  लष्कराच्या 11व्या एअरबोर्न डिव्हिजनच्या 2 ऱ्या ब्रिगेडचे सैनिक आणि भारतीय लष्कराच्या आसाम रेजिमेंटचे सैनिक सहभागी होणार आहेत.प्रशिक्षण कार्यक्रमात संयुक्त राष्ट्रांच्या आदेशातील VII व्या खंडा अंतर्गत एकात्मिक युद्ध गटाच्या तैनातीवर  लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सराव कार्यक्रमात शांतता राखणे आणि शांतता प्रस्थापित करणे याच्याशी संबंधित सर्व कारवायांचा समावेश असेल. दोन्ही देशाचं सैन्य समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्र काम करतील. या संयुक्त सरावात मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (एचएडीआर) कार्यावरही लक्ष केंद्रित केले जाईल.

दोन्ही देशाचं सैन्य कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी जलद आणि समन्वयीत मदतकार्य सुरु करण्याचा सराव करेल.  दोन्ही लष्करांच्या व्यावसायिक कौशल्याचा आणि अनुभवाचा लाभ मिळवण्यासाठी कमांड पोस्ट सराव आणि निवडक विषयांवर  तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक चर्चा (ईएडी) आयोजित केली जाईल.

या सरावामध्ये लढाऊ अभियांत्रिकी, यूएएस/ यूएएस विरोधी  तंत्रांचा वापर आणि माहिती कार्यक्रम यासह लढाऊ कौशल्यांच्या विस्तृत परिप्रेक्ष्यामधील देवाणघेवाण आणि सराव याचा समावेश असेल.

या सरावामुळे दोन्ही लष्करांना त्यांचा व्यापक अनुभव, कौशल्य एकमेकांबरोबर सामायिक  करायला आणि माहितीच्या आदान-प्रदानातून तांत्रिक सुधारणा करायला मदत होईल.  

६ गोठे चालकांना पोलिसांनी केली अटक -गाई ,म्हशींना ड्रग्ज चे इंजेक्शन

पुणे- मानवी जीवनास अपायकारक होईल अशा पद्धतीच्या दुधाची निर्मिती होईल याचा विचार न करता नफेखोरी , आणि जास्त दुध ,जास्त पैसे मिळविण्याच्या आशेने गाई म्हशींना अवैधरीत्या ऑक्सीटोसिन नावाचे इंजेक्श देणाऱ्या ६ गोठे चालकांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी अंमली पदार्थ विरोधी पथकाने ऑक्सिटोसीन चा मोठा साठ पकडला होता आणि परप्रांतीय टोळीला पुण्यात अटक केली होती नंतर हा साठा पुरविणाऱ्या सूत्रधाराला मुंबईत पकडले होते. त्यानंतर आता पुण्यातील ६ गोठे चालक पकडून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. जादा दुध जनावरांनी द्यावे यासाठी त्यांना हे इंजेक्शन दिले जात पण अन्न आणि औषध प्रशासनाने असे दुध मुलांपासून , गरोदर स्त्री आणि मानवी जीवनास अपायकारक ठरू शकते असा अहवाल दिला होता . यानुसार पोलसांनी तातडीने जोरदार कारवाईला प्रारंभ केला आहे.

विठ्ठल भिवाजी झिंजुर्डे (वय 48, झिंजुर्डे मळा, पिंपळे सौदागर), सागर कैलास सस्ते (वय 35 , रा. सस्ते मळा, आळंदी रस्ता, मोशी), विलास महादेव मुरकुटे (वय 57, रा. मारुंजी,मुळशी), सुनील खंडप्पा मलकुनाईक (वय 51, रा. टिंगरेनगर, धानोरी रस्ता), गणेश शंकर पैलवान (वय 50, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी), महादू नामदेव परांडे (वय 51, रा. दिघी, आळंदी रस्ता) अशी अटक केलेल्या गोठे मालकांची नावे आहेत.

गाई, म्हशींचे दूध वाढविण्यासाठी बेकायदा ऑक्‍सिटोसीन औषधांची विक्री करणाऱ्या पश्‍चिम बंगालमधील टोळीतील सहा जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने काही दिवसांपुर्वी अटक केली होती. त्यांच्या चौकशीमध्ये संबंधित व्यक्तींकडून पुणे व पिंपरीतील काही गोठे मालक गाई, म्हशींचे दूध वाढीसाठी ऑक्‍सिटोसीन औषधांचा वापर करत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली होती. त्यानुसार, गोठे मालक झिंजुर्डे, सस्ते मुरकुटे, मलकुनाईक, पैलवान, परांडे यांना पोलिसांनी अटक केली. सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, सुजीत वाडेकर, पांडुरंग पवार, मारुती फारधी, प्रवीण उत्तेकर, मारुती पारधी यांच्या पथकाने हि कारवाई केली.

दिल्ली हायकोर्टाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली

दिल्ली- हायकोर्टाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली असून आणखी एक धक्का दिला आहे. ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पक्षनाव व निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेत आव्हान दिलं होतं. मात्र दिल्ली हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. तसंच निवडणूक आयोगाला यासंबंधी तातडीने निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा निर्णय निवडणूक आयोगाच्या अधिकारकक्षेत असल्याचंही कोर्टाने स्पष्ट केलं.

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर, एकनाथ शिंदे गट व उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटांनी शिवसेना या पक्षनावावर व धनुष्य-बाण या निवडणूक चिन्हावर दावा केला होता. दोन्ही गटांनी सादर केलेल्या लेखी निवेदन व पुराव्याच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोगाने ८ ऑक्टोबर रोजी पक्षनाव व निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी निर्णय घेतला. या हंगामी निर्णयाविरोधात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलं होतं. त्यावर कोर्टाने आज निर्णय दिला.

“दूरसंचार, प्रसारण आणि सायबर क्षेत्रातील तंटा निवारण यंत्रणा- समस्या, दृष्टीकोन आणि पुढील मार्ग” या विषयावर 19 नोव्हेंबरला पुण्यामध्ये परिसंवाद

पुणे-दूरसंचार क्षेत्रातील परवाना प्रदाते , परवाना धारक आणि ग्राहक गटांमधील विवादांचे निराकरण करण्यासाठी, केंद्र सरकारने वर्ष 2000 मध्ये अधिसूचनेद्वारे ट्राय (TRAI) कायदा 1997 (सुधारित) च्या कलम 14 अंतर्गत   दूरसंचार विवाद निपटारा आणि अपील न्यायाधिकरण (टीडीएसएटी) स्थापन केले आहे.  

वर्ष 2004 मध्ये टीडीएसएटीच्या अधिकार क्षेत्राचा विस्तार करून त्यामध्ये प्रसारण विषयक बाबींचा समावेश करण्यात आला. वित्त कायदा 2017 अंतर्गत, टीडीएसएटीच्या अधिकार क्षेत्राचा आणखी विस्तार करून, त्यामध्ये विमानतळ भाडे  आणि सायबर विषयक बाबींचा समावेश करण्यात आला. टीडीएसएटीकडे ‘आधार (आर्थिक आणि इतर अनुदानाचा लाभ आणि सेवांचे लक्ष्यित वितरण) अधिनियम, 2016 च्या कलम-33सी  अंतर्गत आधार संबंधी बाबींसाठी अपिलीय अधिकार क्षेत्रठी देखील देण्यात आले आहे.  

टीडीएसएटी, दूरसंचार आणि प्रसारण विषयक बाबींसाठी मूळ तसेच अपीलीय अधिकार क्षेत्राचा वापर करते. दूरसंचार क्षेत्रातील टीडीएसएटी पुढील प्रमुख समस्यांमध्ये परवाना विवाद, स्पेक्ट्रमचे वाटप, सीएएफ, एजीआर, इंटरकनेक्शन, सेवेची गुणवत्ता वगैरेचा समावेश आहे. प्रसारक क्षेत्रा पुढील विवादांमध्ये सिग्नलची तरतूद, चॅनेलचे समुह आणि त्याची किंमत, सदस्यत्व शुल्काची वसुली, एसटीबी, सिग्नल तोडणे/नकारणे वगैरेचा समावेश आहे.

 माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम-48 अंतर्गत न्यायाधिकरण सायबर प्रकरणांवर अपीलीय अधिकार क्षेत्राचा वापर करते. या कायद्यानुसार मूळ अधिकार क्षेत्र केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या निर्णय अधिकाऱ्यांकडे आहे. हे निर्णय अधिकारी, ज्या प्रकरणांमध्ये दुखापत किंवा नुकसानीचा दावा  5 कोटी रुपयांपर्यंत पर्यंत आहे अशा प्रकरणांचा न्यायनिवाडा करण्यासाठी आपल्या अधिकार क्षेत्राचा वापर करतात. निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशांनुसार, टीडीएसएटी, अपीलीय अधिकार क्षेत्राचा वापर करते.

स्थापना झाल्यापासून टीडीएसएटीतर्फे देशाच्या विविध भागांमध्ये या क्षेत्राशी संबंधित आणि नव्याने उदभवणाऱ्या  समस्यांच्या निवारणार्थ चर्चा घडवून आणण्यासाठी तसेच ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण कायद्याच्या अखत्यारीत असलेली तक्रार निवारण  यंत्रणा आणि उपाययोजना यांच्या बाबतीत सामान्य लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी परिसंवादाचे  आयोजन करण्यात येत आहे. टीडीएसएटीचा आगामी परिसंवाद 19 नोव्हेंबर 2022 रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आला असून त्यात “दूरसंचार, प्रसारण आणि सायबर या क्षेत्रांतील तंटा निवारण  यंत्रणा – समस्या, दृष्टीकोन आणि पुढील मार्ग ” या विषयावर चर्चा होणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अभय श्रीनिवास ओक या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असून मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश, न्यायमूर्ती दीपांकर दत्त सन्माननीय अतिथी  म्हणून उपस्थित राहणार आहेत. हे मान्यवर या चर्चासत्राला उपस्थित असलेले सर्व सन्माननीय न्यायमूर्ती, वकील, दूरसंचार आणि प्रसारण सेवा पुरवठादारांचे प्रतिनिधी, संबंधित सरकारी अधिकारी, माध्यम प्रतिनिधी, कायद्याचे शिक्षण घेणारे विद्यार्थी इत्यादींच्या समुदायाला संबोधित करतील. तत्पूर्वी, टीडीएसएटीचे अध्यक्ष न्यायमूर्ती डी.एन.पटेल यांचे स्वागतपर भाषण होईल.

व्यवसाय संबंधी चर्चासत्रात , माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे मुख्य सचिव तसेच भारत सरकारचे निर्णय अधिकारी असीम कुमार गुप्ता, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहसंचालक संपत मीना , ज्येष्ठ कायदे सल्लागार मीत मल्होत्रा, तसेच सायबर गुन्हे, दूरसंचार आणि प्रसारण क्षेत्रातील वाद आणि नियामकीय न्यायनिवाडा इत्यादी विषयांतील तज्ञ कायदेशीर सल्लागार कुणाल टंडन आणि विभव श्रीवास्तव यांच्यातर्फे सादरीकरण केले जाणार आहे.

राज्याच्या प्रगतीमध्ये भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे महत्वाचे योगदान- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

पुणे, दि. १५: गेल्या पन्नास वर्षात भूजल व्यवस्थापनात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने उल्लेखनीय काम केले आहे. गाव पातळीवर भूजलाचा अभ्यास आणि त्यावर काम करणारी ही यंत्रणा आहे. राज्याच्या प्रगतीमध्ये विभागाचे महत्वाचे योगदान आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त यशदा येथे आयोजित परिसंवाद कार्यक्रमासाठी ध्वनीचित्रफित संदेशाच्या माध्यमातून संवाद साधताना श्री. पाटील बोलत होते. कार्यक्रमास पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, साखर आयुक्त शेखर गायकवाड, जलजीवन मिशनचे अभियान संचालक ऋषिकेश यशोद, यंत्रणेचे आयुक्त चिंतामनी जोशी, यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, युनिसेफचे वॉश स्पेशालिस्ट युसूफ कबीर, महाराष्ट्र सुदूर संवेदन व उपयोगिता केंद्राचे संचालक डॉ. सी. के. जोशी आदी उपस्थित होते. यावेळी विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

पाणीपुरवठा विभागाने हाती घेतलेल्या जलजीवन मिशनच्या कामात जीएसडीएचे महत्वाची भूमिका आहे असे सांगून श्री. पाटील आपल्या संदेशात म्हणाले, मिशनचे प्रति माणसी ५५ लिटर शुद्ध पाणी देणे हे मुख्य उद्दीष्ट आहे. त्यासाठी पाण्याची शुद्धता तपासणाऱ्या १७८ प्रयोगशाळांचे राज्यातील सर्वात मोठे जाळे तयार करणारा हा विभाग आहे. या विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी लवकरच भरतीप्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

प्रधान सचिव श्री. जयस्वाल म्हणाले, पाण्याचे काम करताना जीएसडीएची मदत घेणे खूप गरजेचे आहे. भूजलपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी, भूजल स्त्रोत बळकटीकरणाच्या उपाययोजना करताना जीएसडीए विभागाचे काम कौतुकास्पद आहे. जलजीवन मिशनच्या कामात कार्यान्वयन यंत्रणा म्हणून जीएसडीएला महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळाली आहे. असे असताना विभागाचे प्रश्न सोडवण्यासाठीही शासन प्रयत्नशील असून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे प्रश्न मार्गी लावले आहेत. आकृतीबंधही मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.

श्री. जयस्वाल पुढे म्हणाले, केंद्र शासनाच्या भूजल कायद्याशी सुसंगत असे राज्य शासनाचे भूजल नियम लवकरच बनविले जातील. पाण्याच्या उपलब्धतेला मर्यादा असून आहे त्या पाण्याचा कार्यक्षम वापर आणि जलपुनर्भरणासारख्या उपाययोजनांची जनजागृती करावी लागेल. हवामानात बदल होत असताना पावसामध्ये अनिश्चितता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात यंत्रणेला पाण्याकडे पाहण्याच्या परंपरागत भूमिकेत बदल करावा लागेल. पूर्वीचा केवळ पुरवठा केंद्रीत दृष्टीकोन न ठेवता आता मागणीकेंद्रीत दृष्टीकोनही लक्षात घ्यावा लागेल.

राज्यात विभागवार पावसाच्या प्रमाणात मोठी तफावत आहे असे सांगून श्री. जयस्वाल पुढे म्हणाले, बोअरवेलची संख्या वाढत असल्याने भूजल पातळी दिवसेदिवस खोल जात आहे. येत्या काळात याबाबत जीएसडीएला राज्य पुरस्कृत कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. त्यासाठी पूर्ण राज्यभर राबवता येईल असा पुढील दहा- वीस वर्षाचा कार्यक्रम तयार करावा. त्याबाबतचा आदर्श आराखडा तयार करून शासनाकडे दिल्यास त्यास मंजुरीसाठी निश्चितच सकारात्मक प्रयत्न केले जातील.

एस. चोक्कलिंगम म्हणाले, भूजल सर्वेक्षण विभागाने जमिनीतील अदृश्य टप्यातील पाणी दृश्य टप्यात आणले पाहिजे. यंत्रणेला नागरी भागातील भूजलावर काम करण्याची गरज आहे. विभागाच्या मनुष्यबळाने काळाशी सुसंगत राहून नावीन्यपूर्ण कामे हाती घ्यावी.

श्री. यशोद म्हणाले, राज्यातील ९० टक्के पाणी योजना या भूजलावर अवलंबून असलेल्या आहेत. या योजनांसाठी जीएसडीएकडून जलस्रोत प्रमाणीकरण केले जाते. त्यामुळे विभागाचे महत्त्व लक्षात येते. जलजीवन मिशनच्या कामांना वेग देण्यासाठी कमी वेळातच राज्यात २५ ते २७ हजार स्त्रोतांचे सर्टिफिकेशन केले आहे. यातील काही जलस्रोतांचे बळकटीकरण जीएसडीएच्या नियंत्रणातून करण्याचे शासनाने निश्चित केले असून या कामाला आता व्यापक स्वरुप देण्याची गरज आहे. जलस्रोत बळकटीकरण, भूजल पुनर्भरण आदींबाबतच्या तांत्रिक तज्ज्ञतेच्या अनुभवाचा वारसा विभागाने सक्षमपणे चालवून आपला प्रभाव निर्माण करावा. विभागाकडून जलस्रोतांचे मॅपींग केले जाते. तसेच भूजलाच्या सर्व प्रकारच्या माहिती संकलन व विश्लेषण यावर काम करुन आपली उपयुक्तता सिद्ध करावी.

आयुक्त चिंतामणी जोशी यांनी प्रास्तविकात विभागाच्या ५० वर्षातील वाटचालीचा आढावा घेतला.

यावेळी ‘महाराष्ट्र राज्यातील भूस्तर खडकांचा फोटो अल्बम’, ‘महाराष्ट्र राज्यातील नवीन पाणलोट नकाशाचा ॲटलास’ या पुस्तकांचे तसेच अटल भूजल योजना माहिती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त वरिष्ठ भूवैज्ञानिक डी. व्ही. चन्ने यांनी तयार केलेले जलधर चाचणीचे एक्सेल पॅकेज यंत्रणेला अर्पण केले.

लोक स्वत:हून पुढाकार घेत जलपुर्नभरणाची कामे हाती घेतील अशा पद्धतीची जनजागृती होण्याची गरज आहे असे मत परिसंवादात बोलताना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, जीएसडीएचे काम हे लोकांच्या जगण्याशी निगडीत होण्याची गरज आहे. त्यासाठी राज्यातील सर्व ३५ जिल्ह्यासाठी राबविता येईल असा सर्वव्यापी प्रकल्प हाती घेण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.

‘पेड प्रिव्ह्यू शो’ला भरभरून प्रतिसाद- ढोमे

मराठी सिनेसृष्टीत असं पहिल्यांदाच घडत आहे की, एखाद्या चित्रपटाचा शो त्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच थिएटरला लावला आहे आणि तो शो हाऊसफुल झाला आहे. नुकताच हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ या चित्रपटाचा पेड प्रिव्ह्यू शो पुण्यातील एका चित्रपटगृहात आयोजित करण्यात आला होता. या शोची तिकीटविक्री एका ॲपद्वारे प्रेक्षकांसाठी करण्यात आली होती आणि अवघ्या काही वेळातच हा शो ‘हाऊसफुल’ झाला. विशेष म्हणजे प्रेक्षकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहाता ‘सनी’च्या दुसऱ्या शोचेही यावेळी आयोजन करण्यात आले. ठाण्यातही पेड प्रिव्ह्यू शोचे आयोजन करण्यात आले असून तिथेही ‘हाऊसफुल’चा बोर्ड लागला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘सनीला मिळालेले हे प्रेक्षकांचे प्रेम पाहून, ‘सनी’ बॉक्स ऑफिसावर धमाका करणार असा दावा केला जातोय .

प्रेक्षकांकडून मिळालेल्या या प्रेमाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ”पेड प्रिव्ह्यू शोचा आम्ही एक प्रयोग करून पाहिला आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. खरंतर आम्ही एकाच शोचे आयोजन केले होते, परंतु प्रेक्षकांची इतकी गर्दी पाहून आम्ही आणखी एक शो ठेवण्याचा निर्णय घेतला. प्रेक्षकांचं हे प्रेम पाहून भारावून गेलोय. जसा सकारात्मक प्रतिसाद ‘झिम्मा’ला दिला, मला आशा आहे, ‘सनी’लाही प्रेक्षक तेवढ्याच आपुलकीनं स्वीकारतील.

‘सनी’ची भूमिका साकारणारा ललित प्रभाकर म्हणतो, ” माझ्यासाठी हा अनुभव सुखद आहे. ‘सनी’ प्रेक्षकांना आवडतोय. जसं प्रेम प्रदर्शनापूर्वी दिलं आहे, तसंच प्रेम प्रदर्शनांनंतरही द्याल, याची खात्री आहे. घरापासून दूर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची गोष्ट सांगणारा ‘सनी’ आहे, त्यामुळे प्रेक्षकांना तो कुठेतरी आपल्या जवळचा वाटतोय.

ललित प्रभाकर, चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग, अभिषेक देशमुख, अमेय बर्वे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित ‘सनी’चे अक्षय बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस, उर्फी काझमी ‘सनी’चे निर्माते आहेत. तर संतोष खेर आणि तेजस्विनी पंडित सहनिर्माते आहेत.

आव्हाडांविरोधात दाखल गुन्ह्याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करा:राज्य महिला आयोगाचे ठाणे पोलिसांना आदेश

मुंबई-

जितेंद्र आव्हाडांविरोधात दाखल विनयभंगाच्या गुन्ह्याची आता राज्य महिला आयोगानेही दखल घेतली आहे. ठाणे पोलिसांना याबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करा, असे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता यांनी राज्य महिला आयोगाकडे जितेंद्र आव्हाडांविरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याची तक्रार केली आहे. तसेच, तक्रारदार महिलेवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. याची दखल घेत रुपाली चाकणकर यांनी ठाणे पोलिसांना गुन्ह्याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.ठाणे पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे की, राज्य महिला आयोगास ऋता जितेंद्र आव्हाड यांचा अर्ज प्राप्त झाला आहे. त्यानुसार,जितेंद्र आव्हाड यांच्याविरुध्द आपल्या परिक्षेत्रातील मुंब्रा पोलीस ठाणे येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांनी दाखल केलेला गुन्हा राजकीय सुडबुध्दीने दबावतंत्र वापरुन केला असल्याने सदरील गुन्हा रद्द करण्यात यावा व फिर्यादी महिलेवर खोटा गुन्हा दाखल केला म्हणून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ऋता आव्हाड यांनी केली आहे.

आदेशात रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे की, विनयभंग प्रकरणी मुळ फिर्यादी महिलेने दाखल केलेला गुन्हा आणि परस्परविरुध्द प्राप्त झालेले तक्रार अर्ज या दोन्हींबाबीत सत्यता पडताळावी. त्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोग कार्यालयास सादर करावा. ठाणे पोलिस आता राज्य महिला आयोगासमोर नेमका काय अहवाल सादर करणार, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष आहे.

दुपारी सोबत बसायचे आणि नंतर खालच्या पातळीवर जाऊन प्लॅनिंग करायचे हे योग्य नाही- जितेंद्र आव्हाड

मुंबई- . दुपारी सोबत बसायचे आणि नंतर खालच्या पातळीवर जाऊन प्लॅनिंग करीत असाल तर हे योग्य नाही. आम्ही तुमच्याशी पुलाच्या उद्घाटनाबाबत भूमिका सुसंगत केली, चांगले वागलो तरीही काहीच वाटले नाही.जितेंद्र आव्हाड म्हणाले, विनयभंगाचा गुन्हा माझ्या हृदयात लागला. पूर्ण व्हिडीओ बघितल्यानंतर आता माझ्या लक्षात येते की, महिला समोरून चालत येते तिच्या मनात प्लॅन असावा. मी समोर आलो तेव्हा तिला मी हाताने बाजूला सरकवले. त्यांना मी स्वःत बाजूला केले नसते तर त्या अंगावरच आल्या असत्या. मला देवाने बुद्धी दिली की, मी त्यांना बाजूला सारले, अन्यथा माझ्यावर यापेक्षा मोठा आरोप लावला.

असल्या जामीनासाठी मी जामीनाची भीक मागायचे मला मान्य नव्हते. परंतु, मुलं, पत्नी आणि पक्षातील नेत्यांमुळे मी जामीन घेतला. माझी अस्वस्थता अजूनही संपली नाही. दुपारी सोबत बसायचे आणि नंतर खालच्या पातळीवर जाऊन प्लॅनिंग करीत असाल तर हे योग्य नाही. आम्ही तुमच्याशी पुलाच्या उद्घाटनाबाबत भूमिका सुसंगत केली, चांगले वागलो तरीही काहीच वाटले नाही.

आव्हाड म्हणाले, मला परवा अटक झाली. त्यावर कोर्टाने निकाल देताना अटकेची प्रक्रीया चुकली हे कोर्ट स्वःत म्हणत आहे. याची काॅपीही माझ्याकडे आहे. विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यापूर्वी पोलिसांनी स्वःत विचार करायला हवा. मी काय बोललो हे रेकार्डही झाले. त्या महिलेला मी एवढ्या गर्दीत कशाला जाता हे बोलले. वरुन दबाव आहे हे हवालदारापासून वरिष्ठ अधिकारी सांगतात.