पुणे- मानवी जीवनास अपायकारक होईल अशा पद्धतीच्या दुधाची निर्मिती होईल याचा विचार न करता नफेखोरी , आणि जास्त दुध ,जास्त पैसे मिळविण्याच्या आशेने गाई म्हशींना अवैधरीत्या ऑक्सीटोसिन नावाचे इंजेक्श देणाऱ्या ६ गोठे चालकांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी अंमली पदार्थ विरोधी पथकाने ऑक्सिटोसीन चा मोठा साठ पकडला होता आणि परप्रांतीय टोळीला पुण्यात अटक केली होती नंतर हा साठा पुरविणाऱ्या सूत्रधाराला मुंबईत पकडले होते. त्यानंतर आता पुण्यातील ६ गोठे चालक पकडून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. जादा दुध जनावरांनी द्यावे यासाठी त्यांना हे इंजेक्शन दिले जात पण अन्न आणि औषध प्रशासनाने असे दुध मुलांपासून , गरोदर स्त्री आणि मानवी जीवनास अपायकारक ठरू शकते असा अहवाल दिला होता . यानुसार पोलसांनी तातडीने जोरदार कारवाईला प्रारंभ केला आहे.
विठ्ठल भिवाजी झिंजुर्डे (वय 48, झिंजुर्डे मळा, पिंपळे सौदागर), सागर कैलास सस्ते (वय 35 , रा. सस्ते मळा, आळंदी रस्ता, मोशी), विलास महादेव मुरकुटे (वय 57, रा. मारुंजी,मुळशी), सुनील खंडप्पा मलकुनाईक (वय 51, रा. टिंगरेनगर, धानोरी रस्ता), गणेश शंकर पैलवान (वय 50, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी), महादू नामदेव परांडे (वय 51, रा. दिघी, आळंदी रस्ता) अशी अटक केलेल्या गोठे मालकांची नावे आहेत.
गाई, म्हशींचे दूध वाढविण्यासाठी बेकायदा ऑक्सिटोसीन औषधांची विक्री करणाऱ्या पश्चिम बंगालमधील टोळीतील सहा जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने काही दिवसांपुर्वी अटक केली होती. त्यांच्या चौकशीमध्ये संबंधित व्यक्तींकडून पुणे व पिंपरीतील काही गोठे मालक गाई, म्हशींचे दूध वाढीसाठी ऑक्सिटोसीन औषधांचा वापर करत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली होती. त्यानुसार, गोठे मालक झिंजुर्डे, सस्ते मुरकुटे, मलकुनाईक, पैलवान, परांडे यांना पोलिसांनी अटक केली. सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, सुजीत वाडेकर, पांडुरंग पवार, मारुती फारधी, प्रवीण उत्तेकर, मारुती पारधी यांच्या पथकाने हि कारवाई केली.