पुणे – मी एकनाथ शिंदे यांच्या समवेत आलो आणि माझा मुलगा उद्धव ठाकरे यांच्याच पक्षात आहे,म्हणजे माझे घर फुटलेले नाही,आमचं घरामध्ये ठरलं आहे. आमच्या घरात वाद नाही. तो मला म्हटला की मी शिवसेना सोडणार नाही. रोज आम्ही एकत्र बसतो आणि जेवण करतो. मी त्याला ये म्हणून सांगणार नाही. त्याचा त्याला अनुभव घेऊ दे.अशी भूमिका गजानन कीर्तीकर यांनी येथे मांडली.
खासदार गजानन कीर्तीकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी हा धक्का मानला जातोय.शिवसेनेच्या ठाकरे गटात आपल्याला डावललं जात होतं.मी तिथे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होतो, असा आरोप गजानन कीर्तीकर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला.
या पत्रकार परिषदेला शिंदे गटाचे पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे, संपर्कप्रमुख अजय भोसले ,किरण साळी उपस्थित होते.
गजानन कीर्तीकर म्हणाले,मी 11 नोव्हेंबरला शिंदे गटात सामील झालो. मी शिंदे गटात जाण्याचं कारण ठाकरे गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर राजकीय प्रवास सुरू आहे तो घातक ठरणार आहे. त्यामुळे शिंदे गटाने उठाव केला. बाळासाहेब ठाकरे गटात जे खासदार गेले त्याचंही कारण आहे. मी ही गेलो त्याचंही तेच कारण आहे.असं गजानन कीर्तीकर म्हणाले.
मी नगरच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीकाँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या आदेशानुसार तहसीलदार, ठाणेदार, एम एस ईबीचे अधिकारी त्यांचं जे काम करतील त्यांच्या नेमणूका करण्यात आल्या. हा सगळा प्रकार आम्ही उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवत होतो. त्यांना आवाज देत होतो. आम्ही एकमुखी मागणी केली होती की, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जो प्रवास सुरु आहे तो थांबवा”, असं गजानन कीर्तीकरांनी सांगितलं.
मी 2004 साली जेव्हा निवडणूक लढत होतो तेव्हा उद्धव ठाकरे माझं तिकीट कापण्याचं काम करत होते. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले की तिकीट दिलं पाहिजे”. असं गजानन कीर्तीकर यांनी सांगितलं.
मी नोकरी सोडून पक्षाचं काम करत होतो. त्यांनी मला 2004 ला तिकीट दिलं. पण उद्धव ठाकरे विरोध करत होते. अखेर 2009 ला माझं तिकीट कापलं. माझ्या पीएला बोलावून तिकीट कापल्याचं सांगितलं”, असं कीर्तीकर म्हणाले.