Home Blog Page 1407

भवानीपेठेतील पदयात्रेत धंगेकरांना चांगला प्रतिसाद

पुणे-राजकीय दृष्ट्या जागरूक असणाऱ्या प्रभाग क्र.१७, भवानी पेठ मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची बुधवार दि.१५ फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजल्यापासून भव्य पदयात्रा सुरु झाली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्रपक्षांचे असंख्य कार्यकर्ते, व्यापारी व नागरिक या पदयात्रेत सहभागी झाले होते. चेतन अगरवाल घरापासून हिंदबाल समाज ते बनकर तलीम रामोशी गेट अशा मार्गाने पुढे जाणाऱ्या या पदयात्रेत तिन्ही पक्षांचे झेंडे फडकत होते.  फटाक्यांचा दणदणाट, धंगेकरांचे पोस्टर्स व घोषणांचा कल्लोळ यामुळे वातावरण निवडणूकमय झाले होते.

या पदयात्रेत उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासोबत कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री रमेश बागवे, अविनाश बागवे, अरुण गायकवाड, सुनील घाडगे, चेतन अग्रवाल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गणेश नलावडे, हरीश लडकत, संजय गायकवाड, प्रदीप गायकवाड, शुभम शिंदे, प्रकाश फुलावरे, फईम शेख आणि  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विशाल धनवडे, भाऊ शिंदे, निलेश राऊत, निलेश ढवळे, युवराज पारिख, राजेंद्र शिंदे, अनिल ठोंबरे, शुभम दुगाने, राजेश राऊत, योगेश खेंगरे हे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत शेकडो नागरिकही सहभागी झाले होते.

रामोशी गेट येथून पुढे भवानी माता मंदिर येथे धंगेकरांनी श्री भवानीमातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. तेथे काढण्यात आलेली भव्य रांगोळी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. मार्गात ठिकठिकाणी गणेश मंडळानी त्यांचे स्वागत केले. धंगेकरांनी गणेशाची प्रत्येक ठिकाणी आरतीही केली. दुतर्फा जमलेल्या नागरिकांमध्ये जाऊन त्यांनी संवाद साधला. अनेक नागरिक व व्यापारी आपल्या अडचणीदेखील सांगत होते. जागोजागी पाणी, सरबत, चहा दिले जात होते. पुढे दादापीर दर्गा सरळ मार्गे भारत टॉकीज समोर एडी कॅम्प चौक येथे ही पदयात्रा संपली. महाविकास आघाडीच्या झिंदाबादच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेल्यानंतर या पदयात्रेचा समारोप करण्यात आला.

 सुमारे 200 दिव्यांगजन उद्योजकांनी बनवलेली वैशिष्ठ्यपूर्ण उत्पादने प्रदर्शित करणाऱ्या मेळ्याचे आजपासून मुंबईत आयोजन

0

मुंबई, 16 फेब्रुवारी  2023  –

दिव्य कला मेळा 2023- देशभरातील दिव्यांग उद्योजक/कारागीर यांची उत्पादने आणि कलाकुसरीचे प्रदर्शन करणारा एक आगळा कार्यक्रम आजपासून मुंबईत सुरू होत आहे. मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या एमएमआरडीए मैदान- क्रमांक 1, इथे  16 ते 25 फेब्रुवारी 2023  दरम्यान दिव्यांगजन (अपंग व्यक्ती) सक्षमीकरण विभागाने हा दहा दिवसांचा मेळा आयोजित केला आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, आज मुंबईत दिव्य कला मेळा-2023 चे उद्घाटन करणार आहेत.

या मेळ्यामध्ये देशातील जवळजवळ 24 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधले सुमारे 200 दिव्यांग कारागीर/कलाकार आणि उद्योजक त्यांची उत्पादने आणि कौशल्ये प्रदर्शित करतील. जम्मू आणि काश्मीर, ईशान्येकडील राज्यांसह देशाच्या विविध भागांमधील, हस्तकला, हातमाग उत्पादने, भरतकाम आणि पॅकेज्ड फूड (वेष्टना मधील अन्नपदार्थ) इत्यादींसारखी आकर्षक उत्पादने या प्रदर्शनात एकाच ठिकाणी प्रदर्शित केली जातील, त्यामुळे इथे भेट देणाऱ्यांना हा कार्यक्रम एक विलोभनीय अनुभव देईल.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्वांना ‘व्होकल फॉर लोकल’ चा आग्रह धरण्याची आणि दिव्यांगजन कारागीरांनी आपल्या असामान्य दृढनिश्चयाने बनवलेली उत्पादने बघण्याची/विकत घेण्याची संधी मिळेल. या ठिकाणी प्रदर्शित केल्या जाणाऱ्या उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीमध्ये, घरगुती सजावट आणि जीवनशैलीची उत्पादने, कपडे, स्टेशनरी आणि पर्यावरणपूरक उत्पादने, पॅकेज केलेले अन्न आणि सेंद्रिय उत्पादने, खेळणी आणि भेटवस्तू, दागिने, क्लच बॅग यांसारख्या वैयक्तिक वापराच्या वस्तू, या आणि अन्य वस्तूंचा समावेश असेल.

दिव्य कला मेळा, सर्व दहा दिवस, सकाळी 11 ते रात्री 9 या वेळात सर्वांसाठी खुला राहील. याशिवाय, दिव्यांग कलाकार आणि सुप्रसिद्ध व्यावसायिक कलाकारांच्या सादरीकरणासह सांस्कृतिक उपक्रमांची मालिकाही मेळ्याच्या मैदानात रोज सादर केली जाईल. कार्यक्रमाला भेट देणाऱ्यांना देशाच्या विविध प्रांतांमधील त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेता येईल.

भारत सरकारच्या सामाजिक न्याय  आणि सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत  येणारा  दिव्यांग सक्षमीकरण विभाग  देशातील दिव्यांग व्यक्तींना सक्षम बनवण्यासाठी विविध योजना कार्यान्वित करत असतो.दिव्यांगजनांच्या  आर्थिक सक्षमीकरणाच्या उद्देशाने  NHFDC म्हणजेच राष्ट्रीय अपंग वित्त व  विकास महामंडळ, कर्ज पुरवठ्याच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवते. दिव्यांगांना बाजारपेठ मिळवून देण्यात साहाय्य करण्यासाठी  त्यांना देशभरात भरणाऱ्या मेळावे किंवा प्रदर्शनामध्ये विक्रीसाठी विनामूल्य जागा म्हणजे स्टॉल्स दिले जातात. दिव्यांग जनांची  उत्पादने, ब्रॅण्डिंग, उत्पादनाचा विकास आणि बाजारपेठेचे इतर फायदे मिळवून देण्याच्या दृष्टीने अशा प्रकारचे मेळावे महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा प्रसिद्ध मेळाव्यांना भरपूर लोक भेट देतात.  त्यामुळे दिव्यांग समाजामधील कौशल्य लोकांपर्यंत पोहोचण्यास  मदत होते. गेल्या काही वर्षांपासून दिव्यांगजन  सक्षमीकरण विभाग  NHFDC च्या सहाय्याने फक्त दिव्यांग जनासाठी असलेले मेळावे आयोजित करत आहे. दिव्य कला मेळा असे या मेळाव्यांचे नामकरण केले आहे

दिव्यांग सक्षमीकरण विभागाने  डिसेंबर 2022 मध्ये नवी दिल्लीतील ऐतिहासिक कर्तव्य पथावर दिव्य कला मेळा  आयोजित केला होता. त्यामध्ये दिव्यांगांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू तसेच उत्पादने यांची लाखो लोकांनी प्रशंसा केली होती.  अशा प्रकारचे मेळावे दिव्यांग बंधू भगिनींसाठी दरवर्षी आयोजित करून ते फक्त दिल्ली मुंबई सारख्या मोठ्या शहरांपुरते मर्यादित न  ठेवता भविष्यात सर्व देशभरात घेण्याचे विभागाचे नियोजन आहे. मुंबईनंतर भोपाळ येथे  मार्च 2023 मध्ये  दिव्य कला मेळा आयोजित करण्यात आला आहे.

मुंबईत 346 ठिकाणी शिवजयंती उत्सव-मुंबई भाजपा अध्यक्ष आ.ॲड आशिष शेलार

0

मुंबई, दि 16 फेब्रुवारी 2023
हिंदवी स्वराजाचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंती निमित्त 19 फेब्रुवारीला मुंबईत भाजपा तर्फे 227 वॉर्डमध्ये शिवजयंती कार्यक्रम होत असून आघाडी व मोर्चे मिळून 346 ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील आरतीचा महा जयघोष करण्यात येणार आहे. अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यानी आज येथे दिली
मुंबई भाजपातर्फे मुंबईत साजरी करण्यात येणाऱ्या शिवजयंती कार्यक्रमाची माहिती आज मुंबई भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आमदार ॲड आशिष शेलार यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मान सोहळयात आमच्या राजकीय विरोधकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार ॲड आशिष शेलार यांनी केले
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर भाजपातर्फे दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र,‍ दिवाळी उत्सव जोरदार साजरे करण्यात आले त्याचप्रमाणे आता ‍ छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीही मोठया उत्साहात मुंबईत साजरी करण्यात येणार आहे. या निमित्त मुंबईत प्रत्येक वॉर्डमध्ये नाक्यानाक्यावर जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून प्रत्येक ‍ठिकाणी जय जय शिवराया… या वि.दा. सावरकर यांनी लिहिलेल्या आरतीचा जयघोष करुन सावरकरांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
मुंबईत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उलघडून दाखवणारे देखावे, चित्रप्रदर्शन, शिवव्याख्याने, गरिबांना विविध स्वरुपात मदत, महाराष्ट्राच्या लोकधारेतील सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी कार्यक्रम, विविध स्पर्धा, मिरवणुका, भव्य देखावे, किल्ले दर्शन, शस्त्र प्रदर्शन, अशा विविध कार्यक्रमांनी मुंबई दुमदुमून जाणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातून प्रेरणा घेऊन
भारतीय नौदलाचे नवे बोधचिन्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आले असून त्याची माहिती ही आम्ही जनतेपर्यंत पोहचवणार आहोत, अशी माहिती आमदार अँड शेलार यांनी दिली.

उत्तर पश्चिम जिल्हात 58, उत्तर पूर्व 50, उत्तर मध्य 63, उत्तर मुंबई 69, दक्षिण मध्य 44, दक्षिण मुंबई 62 असे एकुण 346 ठिकाणी शिवजयंती कार्यक्रम साजरा होणार आहे. यातील 36 ठिकाणी भव्य स्वरुपात कार्यक्रम होणार आहे. यामध्ये वरळी नाका, माटूंगा स्टेशन, शिवाजी पार्क, राम नगर-मालाड (प), भायखळा, चेंबूर, अणुशक्ती नगर, सायन कोळीवाडा, दहिसर, आनंद नगर, शहाजीराजे क्रीडांगण-मालाड, लोखंडवाला-कांदिवली, खार (प) या ठिकाणांचा समावेश आहे. अशी माहिती आमदार ॲड आशिष शेलार यांनी दिली.

आग्रा किल्ल्यात शिवजयंती उत्सव
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांचे अभिनंदन

मराठेशाहीच्या इतिहासात मोठे महत्व असलेल्या आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती उत्सव साजरा करण्यास परवानगी दिल्याबद्दल आमदार ॲड आशिष शेलार यांनी केंद्रातील मोदी सरकारचे अभिनंदन केले.
मराठेशाहीच्या इतिहासात आग्रा येथील किल्ल्याला मोठे महत्व आहे. शिवछत्रपतींनी याच किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये औरंगजेबासमोर बाणेदारपणाचे दर्शन घडवले होते. या ‘दिवाण-ए- आम’ मध्ये यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने निनादणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची 393वी जयंती यावर्षी साजरी होत आहे. या निमित्ताने हा मोठा योग महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे जुळून आला आहे. हिंदवी स्वराज्याचे मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांचा जयंती उत्सव आग्रा किल्ल्यात साजरा होणे हा समस्त मराठी जनतेच्या दृष्टीने अभिमानाचा क्षण आहे.
तसेच शिवजयंती उत्सवानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रातील कार्यक्रमांस उपस्थित राहणार आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या पुणे येथील शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

पोटनिवडणूक मतदानादिवशी अधिकारी, कामगारांना भरपगारी सुट्टी द्यावी, औद्योगिक आस्थापनांना उद्योग विभागाचे निर्देश

पुणे, दि.१६: २१५-कसबा पेठ व २०५- चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीअंतर्गत रविवार २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. निवडणूकीमध्ये उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनामध्ये काम करणारे कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क् बजावता यावा यासाठी रविवार २६ फेब्रुवारी २०२३ रोजी भरपगारी सुट्टी अथवा २ तासाची सवलत देण्याबाबत परिपत्रक शासनाने जारी केले आहे.

लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५(ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणूकांमध्ये संस्था/आस्थापना भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नसल्याचे आढळून आले असून अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित रहावे लागते, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने हे परिपत्रक जारी केले आहे.

कामानिमित्त मतदान क्षेत्राबाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी
निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/ कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.

मतदान क्षेत्रातील कामगारांना सुट्टी किंवा कमीत कमी दोन तासांची सवलत
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहिल.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी या सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खवरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
00000

शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे, दि. १६: शिवनेरी किल्ला जुन्नर येथे १९ फेब्रुवारी रोजी आयोजित शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर १८ फेब्रुवारी सकाळी ८ वाजल्यापासून ते १९ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रीच्या १२ वाजेपर्यंत शिवनेरी किल्ला व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त व त्यांच्या वाहनांची होणारी गर्दी पाहता तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जुन्नर शहर व परिसरामध्ये वाहतुकीत बदल करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहे.

नारायणगाव येथून जुन्नर येथे येणारी वाहतूक ही घोडेगाव फाटा, खानापूर महाविद्यालय मार्गे धामनखेल रोडने शिवनेरी किल्ल्याकडे ताथेड पार्किंग या ठिकाणी जातील. ताथेड पार्किंग ठिकाणी लावण्यात आलेली वाहने पुन्हा माघारी जाताना वडज, सावरगाव, वारुळवाडी, नारायणगांव, घोडेगाव मार्गे जातील.

गणेशखिंड, बनकफाटा ओतूर या मार्गे शिवनेरीकडे येणारी वाहने ही मुंढे हायस्कूल व आसपासचे परिसरात असलेले पार्किंग ठिकाणी लावतील व पुन्हा त्या मार्गे कल्याण, नगर, नाशिक मार्गे जातील. आपटाळे, सोमतवाडी ता. जुन्नर कडून येणारी वाहने ही प्रदक्षिणा मार्गाने हॉटेल शिवबा समोरुन ताथेड पार्किंग येथे जातील व पुन्हा वडज मार्गे जातील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

शिवसेनेच्या ठाकरे – शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण, सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला; निकालाची उत्कंठा शिगेला

0

नवी दिल्ली-महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वातील 5 सदस्यीय खंडपीठाने आपला निर्णय राखून ठेवला.शिंदे गटाकडून महेश जेठमलानी, मनिंदर सिंह, पटनायक यांनी बाजू मांडली. तर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला.यावेळी सर्वोच्च न्यायालयाकडूनही महत्त्वाची टिप्पणी करण्यात आली. शिंदे गटाकडून बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे पुढची खेळी ओळखली गेली. पुढे काय होणार हे शिंदे गटाला माहित होतं, असं सरन्यायाधीश म्हणाले.

बुधवारी शिंदे गटाचे वकील हरीश साळवे आणि नीरज कौल यांनी युक्तिवाद केल्यानंतर आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी प्रतिवाद केला. यावेळी बोलताना, आमदार एखाद्या पक्षात विलीन झाले, तरी मूळ पक्ष तसाच राहतो. मुळात सुनील प्रभू यांनी जारी केलेल्या व्हीपचे आमदारांकडून उल्लंघन झाले. त्यांनी भाजपा उमेदवाराला मतदान केले, असा प्रतिवाद कपिल सिब्बल यांनी केला. तसेच दहाव्या सूचीचा वापर सरकार पाडण्यासाठी होऊ नये. हे प्रकरण केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून भविष्यातील घडामोडींच्या दृष्टीनेही महत्त्वाचं आहे. भविष्यात १०व्या अनुसूचीच्या आधारे देशातील सरकारं पाडली जाऊ शकतात. हे लोकशाहीला परवडणारे नाही, असेही ते म्हणाले.तत्पूर्वी काल शिंदे गटाच्यावतीने वरिष्ठ वकील हरीश साळवे यांनी बाजू मांडली. यावेळी बोलताना, “उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा दिला. त्यांना राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी बोलावलं होतं. २८ जून रोजी ही बहुमत चाचणी होणार होती. मात्र, त्यांनी त्यापूर्वी राजीनामा दिला. उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते, तर काही मुद्दे उपस्थित करता आले असते. उद्धव ठाकरेंचा राजीनामा अवैध ठरवला, तरच या चर्चांना अर्थ उरेल. त्यामुळे सरकार कोसळण्याला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत”, असा युक्तिवाद हरीश साळवे यांनी केला. तर “उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडल्यानंतरही त्यांनी सदस्यांना अपात्रतेची नोटीस दिली. त्यांनी घेतलेले निर्णय नियमबाह्य होते. आमदारांना २५ जूनपर्यंत अपात्रतेची नोटीस बजावली होती. मात्र, विधानसभा उपाध्यक्षांनी त्यांना उत्तरासाठी पुरेसा वेळ दिला नाही”, असंही ते म्हणाले.

कसब्यातील व्यापारी शत प्रतिशत भाजपच्या पाठीशी…मंत्री रवींद्र चव्हाण

भाजपा मंत्र्यांचा कसब्यात भेटीगाठीवर जोर …प्रचाराची वेगळी रणनीती

पुणे- कसबा विधानसभा मतदार संघातील व्यापारी वर्गाने भारतीय जनता पक्षाला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना आणि इतर घटक पक्षाच्या युतीचे उमेदवार हेमंत रासने हे कसबा विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवित आहेत. त्यांच्या उमेदवारीला कसबा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रभागांमधील व्यापारी संघटनांनी पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे अशी माहिती येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांनी दिली.

मंत्री चव्हाण यांनी आज सकाळी मध्य पेठांमधील विविध व्यापारी संघटनांसमवेत  संवाद साधला. याप्रसंगी या संघटनांच्या प्रतिनिधींनी भाजप आणि हेमंत रासने यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. मेरा परिवार, भाजप परिवार, माझे कुटुंब भाजप कुटुंब अशा आशयाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. सुलभ आणि भयमुक्त व्यापार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे हाती घेण्यात आलेल्या योजनांचे यावेळी पुन:श्च स्वागत करण्यात आले. तसेच, देशाचे प्रेरणादायी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय व्यापाराच्या होत असलेल्या भरभराटीबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. स्थानिक पातळीवर पुण्याच्या मध्यवस्तीतील व्यापारी पेठांमधील समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्ष सातत्याने कार्यरत आहे. तसेच भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींचा कायमच व्यापारी वर्गाला आधार राहिला आहे, याचाही व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी आवर्जून उल्लेख केला

पदयात्रेने ,कोपरा सभेने , सभेने प्रचार करण्याऐवजी आतापर्यंत भाजपच्या मंत्र्यांनी या २/ ३ दिवसात गटा गटा च्या वैयक्तिक भेटीगाठी घेण्यावर जोर दिल्याचे दिसते आहे. गिरीश मह्जन यांनी २ दिवसांपूर्वी काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेतल्या होत्या ,त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही काल काही लोकांच्या भेटीगाठी घेतल्या , आता मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेटी गाठी सुरु केल्या आहेत.

आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच होणार शिवजयंतीचा उत्सव

0

मुंबई, दि. १५ – आग्रा किल्ल्याचा ‘दिवाण-ए-आम’ यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या जयघोषाने  निनादणार आहे. हा योग कित्येक दशकानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे जुळून आला आहे. आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास अनुमती दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती यावर्षी साजरी होत आहे. शिवछत्रपतींनी आग्रा येथील याच किल्ल्यात बाणेदारपणाचे दर्शन घडवले होते. अशा ‘दिवाण-ए- आम’ मध्ये शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने त्यांचे स्मरण करण्याची संधी मिळाल्याने आग्रा किल्ल्याच्या आसमंतात शिवछत्रपतींचा जयजयकार घुमणार आहे. त्यादृष्टीने यंदाची शिवजयंती विशेष ठरणार आहे.

आग्रा किल्ल्याच्या ‘दिवाण-ए-आम’ सभागृहात ही जयंती साजरी करण्याची मागणी काही सामाजिक संस्थांनी केंद्र शासनाकडे केली होती, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने या संस्थांना परवानगी नाकारल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. त्यावर शिवजयंती सोहळा साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासन सहआयोजक असल्यास या किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्याचे निर्देश न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला दिले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि पुरातत्व सर्वेक्षण विभागाला पत्र लिहून महाराष्ट्र शासन काही सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी करणार असल्याचे कळविले, त्यानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने महाराष्ट्र शासनाला आग्रा किल्ल्याच्या ‘दिवाण-ए-आम’ सभागृहात यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची अनुमती दिली आहे.

या सोहळ्यामुळे मराठी जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आग्रा येथील ऐतिहासिक ठिकाणी साजरी करण्याची पर्वणी मिळणार आहे, याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महाराष्ट्रातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय तसेच भारतीय पुरातत्व खात्याचेही आभार मानले आहेत.

कसबा पेठ मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज

पुणे दि.१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूकी निमित्ताने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येत असून निवडणूकीसाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. विविध पथकांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आवश्यक पूर्वतयारी करण्यात येत आहे.निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदारसंघात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने पोलीस विभागामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली असून पथकांमार्फत आतापर्यंत २४ फलक, ३८९ पोस्टर्स व ६६ झेंडे काढण्यात आले आहेत. पोलिसांमार्फत विविध ९ तपासणी नाक्यांवर दररोज ३ पाळ्यांमध्ये बंदोबस्त ठेवण्यात येत असून आजपर्यंत ९ हजार ८२५ रुपये किमतीची सुमारे १८३ लिटर दारू हस्तगत करण्यात आली.

उमेदवारांच्या सुविधेसाठी कसबा पेठ मतदारसंघाच्या गणेश कला क्रीडा रंगमंच येथील निवडणूक कार्यालयात एक खिडकी कक्षाची स्थापना केली आहे. विविध पक्षाचे तसेच अपक्ष उमेदवार यांनी केलेल्या मागणीनुसार या कार्यालयामार्फत आजपावेतो ५ सभा, ६६ पदयात्रा, १० वाहन परवाने, ७ तात्पुरती पक्ष कार्यालये/स्टेज इत्यादीसाठी परवाना पत्र देण्यात आले आहेत. कार्यालयातील तक्रार निवारण कक्षाकडे ९ आणि सीव्हीजील ॲपवर एकूण ४८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्वच तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.

उमेदवारांचे प्रचार खर्चाबाबतदेखील स्वतंत्र कक्षाची स्थापना केली असून याबाबत दररोज उमेदवारांच्या खर्चाचा तपशील या कार्यालयाकडे प्राप्त होत असून त्याचा लेखाजोखा घेण्यात येत आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण यंत्रणा दक्षता घेत असून मतदानाची पूर्वतयारी करण्यात येत आहे. संपूर्ण प्रक्रीयेत निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल, निवडणूक पोलीस निरीक्षक अश्विनीकुमार सिन्हा, ‍निवडणूक खर्च निरीक्षक मंझरूल हसन यांचे मार्गदर्शन होत आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनीदेखील आढावा बैठका घेऊन निवडणूक प्रक्रीयेविषयी मार्गदर्शन केले आहे, अशी माहिती २१५-कसबा पेठ मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली आहे.

पहाटेच्या शपथविधीबाबत माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न पण ….

पुणेमी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न झाले. काही काळ ते यशस्वी झाले. माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न झाला असला तरी आज आधुनिक युग आहे. अभिमन्यू कडून आपण बऱ्याच गोष्टी शिकलो आहोत. आपल्या थोर पुरुषांकडून आपल्याला बरंच काही शिकता येतं. त्यामुळे चक्रव्यूह भेदून बाहेर कसे यायचे हे माहीत असल्यामुळे आम्ही तो चक्रव्यूह भेदला. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि आम्ही सरकार स्थापन केलं.

देवेंद्र फडणवीस यांनी आज असलेले खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.पहाटेच्या शपथविधी बाबत मी जे बोललो ते सर्व सत्य आहे. पण जे काही बोललो ते अर्धे बोललो आहे.योग्य वेळ आल्यानंतर उर्वरित अर्धे बोलणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले

अर्धसत्य च सांगितले..पूर्ण सत्य सांगितल्यावर …?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पहाटेच्या शपथविधी बाबत मी जे काही बोललो ते सत्य बोललो. त्याचे वेगवेगळे अर्थ माध्यमांनी काढले. त्यामुळे मी काय बोललो ते शांतपणे बसून ऐका. त्याची एक एक कडी तुम्हाला जोडता येईल. त्यावेळेसच्या माझ्या पत्रकार परिषदा बघा, मी काय बोललो ते बघा, या सर्व गोष्टी तुम्ही पाहिल्या तर दुसऱ्या पुराव्याची तुम्हाला गरज भासणार नाही. पण मी अजून अर्धचं बोललो आहे. योग्य वेळ आली की उरलेलं अर्ध देखील मी बोलणार आहे.

गिरीश बापट आमचे नेते आहेत. कसबा विधानसभा निवडणुकीची त्यांनाही काळजी आहे.

या निवडणुकीवर त्यांचे अतिशय बारकाईने लक्ष आहेत. त्यांनी या निवडणुकीसंदर्भात मला काही टिप्स दिल्या आहेत असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले .देवेंद्र फडणवीस म्हणाले, गिरीश बापट आमचे नेते आहेत. त्यांना भेटण्यासाठी यापूर्वी अनेकदा मी आलो होतो. आजही त्यांची भेट घेतली आहे. मागील वेळेस पेक्षा यावेळेस त्यांची प्रकृती चांगली आहे आणि याचा मला जास्त आनंद आहे. कसबा विधानसभा निवडणुकीची त्यांनाही काळजी आहे. या निवडणुकीत संदर्भात त्यांनी मला आज काही सूचना दिल्या आहेत.भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि गिरीश बापट यांचे कुटुंबीय या निवडणुकीच्या कामासाठी लागले आहेत. प्रकृती बरी नसतानाही कसबा निवडणूकीकडे त्यांचे बारकाईने लक्ष आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्हीही ठिकाणी भारतीय जनता पार्टी नीटपणे निवडून येईल असा आत्मविश्वास देखील फडणवीस यांनी बोलून दाखवला.

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांची स्ट्राँग रूमला भेट

पुणे दि.१५: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्र ठेवण्याच्या स्ट्राँग रूमला भेट दिली आणि तेथील सुरक्षा व्यवस्थेची तसेच मतदान प्रक्रियेसाठी मतदान यंत्रे तयार करण्याची (कमिशनिंग) प्रक्रियेची पाहणी केली. निवडणूक प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व्हावी यादृष्टीने खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीच्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी मतदान यंत्रे तयार करण्याची (कमिशनिंग) प्रक्रिया आज सुरु झाली. पोटनिवडणूकीसाठी थेरगाव येथील स्व. शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये सर्व मतदान यंत्रे आणण्यात आली आहेत. याठिकाणी निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांच्या विशेष उपस्थितीत आज सकाळी कमिशनिंग प्रक्रियेला सुरुवात झाली. उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मतदान यंत्राच्या कमिशनिंग प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधिताना सूचना दिल्या. तसेच मतदान केंद्र क्रमांक ६१ च्या सर्व कमिशनिंग प्रक्रियेची तपासणी आणि खात्री करून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्वतः या केंद्राची मतदान यंत्रे सीलबंद (ईव्हीएम सिलिंग) केली.

यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, निवडणूक सहायक तथा तहसीलदार नागेश गायकवाड, प्रशांत शिंपी, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी बापू गायकवाड तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कसबा पेठ मतदारसंघात भेट
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी एफसीआय गोदाम येथील स्ट्राँगरूमचीदेखील पाहणी केली. त्यांनी ईव्हीएम यंत्र जोडणी (पेअरींग) प्रक्रीयेची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. कसबा पेठ मतदारसंघात मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ पूर्ण झाल्यानंतर बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचे पेअरींग सुरू करण्यात आले आहे. ही प्रक्रिया करताना विशेष खबरदारी घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. त्यांनी निवडणूक संदर्भातील इतर व्यवस्थेचाही आढावा घेतला.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, समन्वयक अधिकारी सिद्धार्थ भंडारे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राधिका हावळ-बारटक्के आदी उपस्थित होते.

खासदार बापटांच्या प्रकृतीची फडणवीसांकडून प्रत्यक्ष भेटून विचारपूस

गिरीश महाजनांनी ही घेतली प्रत्यक्ष भेट

पुणे- कसबा विधानसभा पोटनिवडणूकित २६ तारखेला मतदान होणार आहे, कसब्याचा प्रचार देखील सुरु आहे. कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या सभा झाल्यात ..जोरदार पदयात्रा सुरु आहेत या पार्श्वभूमीवर भाजपा उमेदवार रासने यांच्या केवळ पदयात्रा सुरु आहेत , मोठे नेते कोणी सहभागी होताना अगर सभा घेताना आजवर दिसले नाहीत ,त्यातच गेले ३ महिने प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी खूप काम कमी केले असून मला सध्या आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावा लागत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे पोटनिवणुकीसाठी मी वैयक्तिक रित्या मतदारसंघात फिरून प्रचार करू शकणार नाही. असे खासदार गिरीश बापट यांनी जाहीर केल्यानंतर कालच संध्याकाळी गिरीश महाजन यांनी गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि आज पुण्यात आल्यावर भाजपा नेते ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्षात खासदार बापट यांना भेटून त्यांची चौकशी आणि विचारपूस केली यावेळी त्यांच्या समवेत भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुलीक ,पुष्कर तुळजापूरकर आणि बापटांचे चिरंजीव गौरव होते.

यावेळी सभा ,पत्रकार परिषदा , पदयात्रा यांना जेवढ्या जास्तीतजास्त वेळा उपस्थिती लावता येईल तेवढी लावा असा सल्ला फडणवीस यांनी बापटांचे चिरंजीव गौरव बापट यांना दिल्याचे समजते.

फडणवीस यांच्यानंतर ग्रामिविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही प्रत्यक्षात भेटून बापट यांच्या प्रकृतीची माहिती घेऊन विचारपूस केली .

दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन

0

मुंबई, दि. 15 : फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षांसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे विभागीय सचिव डॉ.सुभाष बोरसे यांनी दिली आहे.

दहावी व बारावीच्या परीक्षांसंदर्भात विद्यार्थी, पालक व संबंधित घटकांना येणाऱ्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी व आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी या नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामार्फत तसेच मंडळामार्फत नियुक्त समुपदेशक / शिक्षक समुपदेशक यांच्यामार्फत विद्यार्थ्यांच्या परीक्षेशी संबंधित बाबींच्या अनुषंगाने समुपदेशन करण्यासाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही सुविधा 15 फेब्रुवारी पासून सकाळी 9 ते रात्री 7 या वेळेत सुरू राहील.

हेल्पलाईन क्रमांक 022-27893756 आणि 022-27881075 हे आहेत. कार्यालयातील हेल्पलाईनसाठी डॉ.ज्योती परिहार, सहसचिव (7757089087), श्रीमती गीता तोरस्कर, वरिष्ठ अधीक्षक तथा सहा.सचिव (प्र.) (7021325879), श्रीमती सुप्रिया मोरे, वरिष्ठ अधीक्षक (9819136199) आणि श्रीमती सुवर्णा तारी, वरिष्ठ अधीक्षक (9987174227) या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर, समुपदेशक म्हणून श्रीकांत शिनगारे – 9869634765, मुरलीधर मोरे- 7977919850 / 9322105618, 022-27893756/ 022-27881075. हयाळीज बी.के.- 9423947266, अनिलकुमार गाढे – 9969038020, जाधव विकास नारायण – 9867874623, विनोद पन्हाळकर – 9527587789, संजय जाधव – 9422594844, चंद्रकांत ज.मुंढे – 8169699204, अशोक देवराम सरोदे – 9322527076/ 8888830139, श्रीमती शैलजा मुळ्ये – 9820646115, शेख अखलाक अहमद अ.रज्जाक – 9967329370, श्रीमती स्नेहा अजित चव्हाण – 8369015013 आणि श्रीमती उज्ज्वला क.झरे – 9920125827 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तुळजापूरच्या महिलांनी साधला डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद

देवस्थानच्या पूजाविधीमध्ये सहभागी होण्याची केली मागणी; डॉ. गोऱ्हे यांनी शासनाकडे दिलेल्या मागण्यांचे या सर्व महिलांनी केले स्वागत

पुणे / तुळजापूर : तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये भोपे कुटुंबातील महिलांना पूजा आणि इतर पूजा विधी करण्याचा मान मिळावा, यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी आज तुळजापूर मधील स्थानिक महिलांनी केलेल्या व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला.

महिलांनी मंदिराच्या देवीची अलंकारपुजा करण्याची पूर्वीची परंपरा शासनाने आताही सुरू ठेवावी, अशी मागणी केली. दिनांक १२ फेब्रुवारी रोजी नीलमताईंनी शासनाकडे दिलेल्या मागण्यांचे स्वागत या महिलांनी केले आहे.

या महिला त्यांच्या मागण्यांचे निवेदनही डॉ. गोऱ्हे यांच्याकडे देणार आहेत. या महिलांना यामुळे देवीच्या आराधनेचा अधिकार मिळणे शक्य होणार आहे. शासनाने यावर सकारात्मक निर्णय घेण्याची सूचना डॉ. गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा विधी व न्याय विभागाचे मंत्री यांना निवेदनाद्वारे दोन दिवसांपूर्वी केली आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या पदयात्रेस मोठी गर्दी

पुणे-महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या दि.१४ सायंकाळी झालेल्या प्रभाग  क्र.१६ मधील पदयात्रेस कार्यकर्ते व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी 4:३० वाजता सुरु झालेल्या या पदयात्रेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांचे झेंडे डौलाने फडकत होते. तिन्ही पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते, धंगेकर यांची पोस्टर्स, त्यांनी केलेल्या विकास कामांचे फलक, आदींसह ही पदयात्रा फटाक्यांच्या आतषबाजीत दारूवाला पूल येथून सुरु झाली.

उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासमवेत कॉंग्रेसचे सुजाता शेट्टी, भगवान धुमाळ, बुवा नलावडे, सुनील दैठणकर, अरुण कोरळकर, वाल्मिकी जगताप, दिलीप पवार, संगीता तिवारी, मुक्तार शेख, मयूर भोकरे, परवेझ तांबोळी, गीता तारू, संदीप लचके, राहुल सुपेकर, नितीन परतानी, नरेश नलावडे, गोपाळ पायगुडे, योगेश भोकरे, शैलेश भोकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदानंद शेट्टी, गणेश नलावडे, प्रवीण तरवडे, वनिता जगताप, सुप्रिया कांबळे, सारिका पारीख, अभिजित घाडगे, अलोख सरोदे, सरिता काळे, शिवसेनेचे विशाल धनवडे, जावेद खान, युवराज पारिख, राजेंद्र शिंदे, संतोष भुतकर, मुकुंद चव्हाण,  योगेश खेंगरे, भाऊ शिंदे, पल्लवी जावळे, योगेश येनपुरे, उमेश बोर्डे आदी प्रमुख नेते व कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.

दारूवाला पूल येथून सुरु झालेली पदयात्रा नागेश्वर मंदिर येथून कामाला नेहरू मार्गे कागदीपुरा येथे पोहचली. तेथे माजी नगरसेवक मुख्तार शेख व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. तेथे महिलांची संख्याही लक्षणीय होती. धंगेकर यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेतला व मोठा जयघोष केला व सत्कार केला. कसबा पेठेतील छोट्या रस्त्यांमधून पदयात्रा जाताना दुतर्फा उभ्या असणाऱ्या नागरिकांना धंगेकर आवर्जून भेटत होते. अनेक ठिकाणी पदयात्रेतील कार्यकर्ते व नागरिकांना चहा व सरबत दिले जात होते.

कसबा पेठमध्ये अनेक सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. मार्गांवर गणेश मंडळांतर्फे धंगेकारांचा सत्कार केला गेला. धंगेकरांनी सर्व मंडळांमधील गणेशाची आरती केली. साततोटी चौक, भोई आळी, कुंभार वाडा, त्वष्ठा कासार अशा असंख्य ठिकाणी धंगेकरांचे सत्कार होत राहिले. नागरिकांची प्रत्येक ठिकाणी अलौट गर्दी उसळत होती. मार्गावरील अनेक मंदिरांमध्ये धंगेकरांनी दर्शन घेतले. सुमारे चार तास चाललेली ही पदयात्रा रात्री आठच्या सुमारास गावकोस मारुती परिसर येथे समाप्त झाली.