गिरीश महाजनांनी ही घेतली प्रत्यक्ष भेट
पुणे- कसबा विधानसभा पोटनिवडणूकित २६ तारखेला मतदान होणार आहे, कसब्याचा प्रचार देखील सुरु आहे. कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या सभा झाल्यात ..जोरदार पदयात्रा सुरु आहेत या पार्श्वभूमीवर भाजपा उमेदवार रासने यांच्या केवळ पदयात्रा सुरु आहेत , मोठे नेते कोणी सहभागी होताना अगर सभा घेताना आजवर दिसले नाहीत ,त्यातच गेले ३ महिने प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी खूप काम कमी केले असून मला सध्या आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावा लागत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे पोटनिवणुकीसाठी मी वैयक्तिक रित्या मतदारसंघात फिरून प्रचार करू शकणार नाही. असे खासदार गिरीश बापट यांनी जाहीर केल्यानंतर कालच संध्याकाळी गिरीश महाजन यांनी गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि आज पुण्यात आल्यावर भाजपा नेते ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्षात खासदार बापट यांना भेटून त्यांची चौकशी आणि विचारपूस केली यावेळी त्यांच्या समवेत भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुलीक ,पुष्कर तुळजापूरकर आणि बापटांचे चिरंजीव गौरव होते.
यावेळी सभा ,पत्रकार परिषदा , पदयात्रा यांना जेवढ्या जास्तीतजास्त वेळा उपस्थिती लावता येईल तेवढी लावा असा सल्ला फडणवीस यांनी बापटांचे चिरंजीव गौरव बापट यांना दिल्याचे समजते.
फडणवीस यांच्यानंतर ग्रामिविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही प्रत्यक्षात भेटून बापट यांच्या प्रकृतीची माहिती घेऊन विचारपूस केली .