देवस्थानच्या पूजाविधीमध्ये सहभागी होण्याची केली मागणी; डॉ. गोऱ्हे यांनी शासनाकडे दिलेल्या मागण्यांचे या सर्व महिलांनी केले स्वागत
पुणे / तुळजापूर : तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये भोपे कुटुंबातील महिलांना पूजा आणि इतर पूजा विधी करण्याचा मान मिळावा, यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी आज तुळजापूर मधील स्थानिक महिलांनी केलेल्या व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला.
महिलांनी मंदिराच्या देवीची अलंकारपुजा करण्याची पूर्वीची परंपरा शासनाने आताही सुरू ठेवावी, अशी मागणी केली. दिनांक १२ फेब्रुवारी रोजी नीलमताईंनी शासनाकडे दिलेल्या मागण्यांचे स्वागत या महिलांनी केले आहे.
या महिला त्यांच्या मागण्यांचे निवेदनही डॉ. गोऱ्हे यांच्याकडे देणार आहेत. या महिलांना यामुळे देवीच्या आराधनेचा अधिकार मिळणे शक्य होणार आहे. शासनाने यावर सकारात्मक निर्णय घेण्याची सूचना डॉ. गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा विधी व न्याय विभागाचे मंत्री यांना निवेदनाद्वारे दोन दिवसांपूर्वी केली आहे.