Home Blog Page 1393

रोटरी क्लब आणि पुणे शहर बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महिला खेळाडू दत्तक योजनेस प्रारंभ

पुणे-रोटरी क्लब पुणे सेंट्रल आणि पुणे शहर बॉक्सिग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शी कॅन बैंड श्री विल असा उपक्रम सुरू करण्यात येत आहे या उपक्रमात पुणे शहरातील गुणवत्ता प्राप्त महिला खेळाडू यांना दर्जेदार क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे खेळाडूना त्यांच्या डायट प्लान बाबतीत मार्गदर्शन केले जाणार आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर नावाजलेले प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर आयोजित केले जाणार आहे.या उपक्रमामुळे पुणे शहरातील खेळाडू यांच्या गुणवत्तेत भर पडून त्याचा उपयोग पुढील स्पर्धा मधील कामगिरी सुधारण्यास नक्कीच होईल त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या प्रशिक्षकांसोबत शिबिरात काम करण्याच संधी पुणे शहरातील इतर प्रशिक्षकांना मिळणार असल्याने पुणे शहरातील सर्वच खेळाडू यांना भविष्यात लाभ होईल असा विश्वास पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश बागवे यांनी सांगितले

सुररुवातीला पुणे शहरातील राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी बजावली असणाऱ्या 1 जीनत शेख, 2 भूमिका खिलारे, 3 हर्षदा लोहाट, 4 रिया कुटे, 5 सोनिया सूर्यवंशी, 6 सृष्टी चोरगे, 7 वैष्णवी कदमठ समीक्षा सूर्यवंशी याआठ महिला खेळाडूंची निवड या उपक्रमासाठी करण्यात आली आहे या शिबिरात पुणे शहरातील इतर बॉक्सिग प्रशिक्षकांना सामावून घेतले जाणार आहे.त्याचप्रमाणे पुणेशहरातील खेळ संस्कृतीच्या वाढीसाठी अश्या प्रकारच्या उपक्रमांची गरज संघटनांनीपुढे यावे असे आवाहन बागवे यांनी केले आणि रोटरी क्लब पुणे सेंट्रल चे ब्रि.मुरलीधरन राजा आणि त्यांच्या सर्व सहकार्याचे आभार व्यक्त केले ह्या चांगल्या उप्रमास यशस्वी होण्यासाठी जी काही मदत लागेल ती संघटनेच्या माध्यमातून दिली जाईल याची ग्वाही दिली

सात दिवस झाले,उत्तरकाशीच्या बोगद्यात अडलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरुच  

0

हा बोगदा चारधाम प्रकल्पाचा भाग

चार धाम रोड प्रकल्पांतर्गत हा बोगदा बांधला जात आहे. 853.79 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेला हा बोगदा सर्व हंगामात खुला राहणार आहे. म्हणजे बर्फवृष्टी होत असतानाही लोक यातून ये-जा करू शकतील. त्याच्या बांधकामानंतर, उत्तरकाशी ते यमुनोत्री धाममधील अंतर 26 किमीने कमी होईल.हिवाळ्यात हिमवर्षाव होत असताना राडी टॉप परिसरात यमुनोत्री महामार्ग बंद असतो. त्यामुळे यमुना खोऱ्यातील तीन तहसील मुख्यालये, बरकोट, पुरोला आणि मोरी, जिल्हा मुख्यालय उत्तरकाशीपासून तुटले आहेत. चारधाम यात्रेच्या सोयीसाठी आणि राडी टॉपमधील बर्फवृष्टीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, ऑल वेदर रोड प्रकल्पांतर्गत येथे दुहेरी मार्गाचा बोगदा बांधण्याची योजना आखण्यात आली होती.

उत्तरकाशी, उत्तराखंड येथे दिवाळीच्या दिवशी (12 नोव्हेंबर) पहाटे 4 वाजता बांधकामाधीन बोगद्याचा 60 मीटरचा भाग खचला. यामध्ये 41 मजूर अडकले. सहा दिवस आत अडकलेल्यांची संख्या 40 असल्याचे सांगितले जात होते, मात्र शनिवारी सकाळी ही संख्या एका मजुराने वाढली. आणखी कामगार आत अडकले असण्याची शक्यता आहे.NHAIDCL चे संचालक अंशू मनीष यांनी सांगितले की, आतल्या लोकांची संख्या 41 आहे. दुर्घटनेचा आज सातवा दिवस असून बचावकार्य पूर्ण झालेले नाही. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना ऑक्सिजन, अन्न, पाणी आणि औषधे पाईपद्वारे पुरवली जात आहेत.

गेल्या सहा दिवसांत बोगद्यातील मलबा उत्खनन यंत्राद्वारे काढण्याचा पहिला प्रयत्न करण्यात आला. यानंतर तीन वेगवेगळ्या ऑगर्स मशिनच्या सहाय्याने ड्रिलिंग करून आणि ढिगाऱ्याच्या आत स्टीलचे पाइप पाठवून कामगारांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आजपर्यंत सर्व योजना फोल ठरल्या आहेत.

तज्ज्ञांनी शुक्रवारी बचावासाठी प्लॅन-बीवर तातडीची बैठक घेतली. आता बोगदा वरून कापून आत अडकलेल्या लोकांना एअरलिफ्ट काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ठरले. त्यासाठी ड्रिलिंग आणि तज्ज्ञांच्या पथकांनी शुक्रवारी रात्री सर्वेक्षणही केले आहे. आज रेल्वे आणि नॉर्वेच्या इंजिनिअर्सची तज्ज्ञ टीम यावर काम करणार आहे.

PMO उपसचिव मंगेश घिलडियाल आणि PMO सल्लागार भास्कर खुल्वे शनिवारी सकाळी घटनास्थळी पोहोचले आणि NHAI, रेल्वे आणि नॉर्वे मधील अभियंते आणि तज्ञांची बैठक घेतली. नवीन ऑगर मशीनही सकाळी 11 वाजता उत्तरकाशीला पोहोचले, मात्र दुपारी 3 वाजेपर्यंत बचावकार्य सुरू होऊ शकले नाही.

दादा, आईला सांगू नको मी अडकलोय, भावाशी बोलताना मजूर ढसाढसा रडला

मजूर अडकल्याच्या घटनेला आज सात दिवस झाले आहेत. अमेरिकन ड्रिलिंग मशीनच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. दीडशे तासांहून अधिक काळ बोगद्यात अडकलेल्या कामगारांची प्रकृती आता ढासळू लागली आहे. बोगद्याबाहेर उपस्थित असलेले त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. काही मजूर त्यांच्या कुटुंबीयांशी बोलले आहेत.त्याचदरम्यान, पुष्कर नावाच्या मजुराला त्याचा भाऊ विक्रम सिंह यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. तेव्हा त्याच्या तोंडून जे पहिलं वाक्य बाहेर पडलं ते होतं – ‘भाऊ, मी इथे बोगद्यात अडकलो आहे हे आईला सांगू नकोस.’ अशक्तपणामुळे २५ वर्षीय पुष्करला नीट बोलताही येत नव्हते. कुजबुजत तो भावाला म्हणाला की, ‘मी ठीक आहे. येथे आणखी काही कामगार अडकले आहेत. माझ्याबद्दल आईला सांगितले तर तिला काळजी वाटेल’. यावेळी त्याला स्वत:ची नाही तर त्याच्या आईची काळजी होती. भावाशी बोलताना पुष्करला अश्रू अनावर झाले.बोगद्यात टाकलेल्या पाईपद्वारे विक्रम सिंह पुष्करशी बोलला. चंपावत जिल्ह्यातील छन्नी गोठ गावात राहणारा विक्रम सिंह म्हणाला- ‘गेल्या शुक्रवारी मला माझ्या भावाशी बोलण्याची संधी मिळाली. या संपूर्ण संभाषणात त्याची एकच चिंता होती की मी हे माझ्या आईला सांगू नये. मी त्याला त्याच्या तब्येतीबद्दल विचारले आणि बचाव कार्याचे अपडेट्स दिले. घरात सर्वात लहान असल्याने त्याचे आईवर सर्वात जास्त प्रेम होते. मला या घटनेची माहिती मिळताच मी माझ्या वृद्ध आई-वडिलांना अपघाताबद्दल काहीही न सांगता तात्काळ उत्तरकाशीला आलो. पण माझ्या काही शेजाऱ्यांनी घरी येऊन त्यांना अपघाताची माहिती दिली. ही बातमी ऐकून दोघांनाही खूप धक्का बसला आहे.बचाव कार्यात गुंतलेले कामगार बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी सतत बोलत आहेत आणि त्यांचे मनोबल वाढवत आहेत. ऑक्सिजन आणि ड्रायफ्रुट्ससह जीवनावश्यक वस्तू बोगद्याच्या आत ११ पाईपद्वारे पाठवल्या जात आहेत. आत अडकलेले मजूर फक्त एकच प्रश्न विचारत आहेत की त्यांना बाहेर कधी काढणार. सध्या त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

6 एजन्सी व्यतिरिक्त 3 देशांचे तज्ञ बचावकार्यात सहभागी आहेत

नॅशनल हायवे अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NHIDCL), NDRF, SDRF, ITBP, BRO, रेल विकास निगमचे 200 हून अधिक लोकांचे पथक चोवीस तास बचावकार्यात गुंतले आहे. याशिवाय थायलंड, नॉर्वे, फिनलंडसह अनेक देशांतील तज्ज्ञांकडून ऑनलाइन सल्ला घेतला जात आहे.

नवीन योजनेनुसार, ड्रिलिंग मशीन बोगद्याच्या वर नेण्यात येईल आणि तळाशी एक छिद्र केले जाईल. बोगद्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून डावीकडे जाणाऱ्या मार्गाने मशीन बोगद्याच्या वरच्या बाजूला नेण्यात येईल. येथे बोगद्याचा ‘सी पॉइंट’ आहे, म्हणजे बोगद्यात थोडासा वक्र आहे. या ठिकाणी ड्रिलिंगसाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. बोगद्याच्या मजबूत भागात हे ड्रिलिंग केले जाईल. यामुळे बोगद्याचेही काही नुकसान होणार आहे. येथे मशीनला वरपासून खालपर्यंत सुमारे 103 मीटर ड्रिल करावे लागेल.हे ड्रिलिंग मलबा पडण्याच्या ठिकाणापासून 50-60 मीटर अंतरावर आणि पुढे म्हणजे बोगद्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून किमान 280-300 मीटर आत केले जाईल. आत अडकलेल्या लोकांना येथून एअरलिफ्ट केले जाईल.

संवेदनशीलता माणसाला समाजाविषयी जबाबदारी शिकविते : पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल

 ७५  देवदासींसोबत आपुलकीची भाऊबीज व धान्य कीटची ओवाळणी भेट
पुणे : संवेदनशीलता माणसाला ख-या अर्थाने परमेश्वराच्या जवळ नते. धर्म, दया आणि संवेदनशीलता यावर आपण समाजासाठी खूप काही करु शकतो. प्रत्येकामध्ये संवेदनशीलता असते, मात्र ती जागृत करणे आवश्यक आहे. संवेदनशीलता ही माणसाला समाजाविषयी जबाबदारी शिकवून काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा देते, असे मत परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांनी व्यक्त केले.
जनता बँक स्टाफ वेल्फेअर सोसायटी, पुणे तर्फे बुधवार पेठेतील ७५ देवदासी भगिनींसोबत भाऊबीज साजरी करुन त्यांना धान्य किट ,मिठाई व साडीचोळी भेट देण्यात आले. बुधवार पेठेतील श्री नामदेव शिंपी समाज कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला जनता सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अ‍ॅड. अलका पेटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप, सोसायटीचे अध्यक्ष किशोर चव्हाण, संचालक नाना कांबळे, मिलिंद लिमये, पदमजा कुलकर्णी, रुपेश नाईक, कौस्तुभ खार्कुडीकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 
तब्बल २५ वस्तू  व धान्य तसेच मिठाई व साडीचोळी असलेले किट महिलांना भेट देण्यात आले. सोसायटीचे सचिन आंबेकर ,विजय फाटक,अभय ढमाले, अविनाश निरगुडे,विजय धोत्रे, नयन माने यांनी संयोजनात सहभाग घेतला.अ‍ॅड. अलका पेटकर म्हणाल्या, समाजाच्या प्रत्येक घटकाला सण-उत्सवामध्ये सामावून घेणे गरजेचे आहे. ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. बुधवार पेठेतील महिलांमध्ये ज्याप्रमाणे आपुलकीची भाऊबीज होत आहे, तरी सर्वत्र व्हायला हवी. जगदीश कश्यप म्हणाले, आपल्याला आर्थिक जबाबदारी सोबतच सामाजिक जबाबदारी देखील समजली पाहिजे. ती जबाबदारी आज जनता वेल्फेअर सोसायटीने घेऊन कृतीतून सत्यात उतरवून दाखविली आहे.  
किशोर चव्हाण म्हणाले, आपल्या घरात दिवाळी साजरी करताना समाजातील प्रत्येक घरात दिवा लागला पाहिजे, या भावनेने जनता बँकेतील कर्मचा-यांनी सामाजिक दायीत्वाच्या भूमिकेतून हा उपक्रम राबविला आहे. सलग ५ वर्षे हा उपक्रम आम्ही राबवित आहोत. भावाकडून बहिणीला ओवाळणी म्हणून हे धान्य व वस्तूंचे किट तसेच साडीचोळी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शरद शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

जरांगेंना विरोध करण्यासाठी भुजबळांना फडणवीसांनी उभे केले:अंजली दमानियांचा आरोप,पत्रकार परिषदेपूर्वीच पोलिसांनी घेतले ताब्यात

आता छातीत कळ नाही येत? जेलमधून बाहेर येण्यासाठी अगदी बिच्चारे बनायचे

मुंबई-मनोज जरांगेंना विरोध करण्यासाठी छगन भुजबळ यांना देवेंद्र फडणवीसांनी उभे केले असावे, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. अंजली दामनिया आज मंत्री छगन भुजबळ यांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेणार होत्या. त्यासाठी दमानिया भुजबळांच्या घराकडेही निघाल्या होत्या. मात्र पोलिसांनी अंजली दमानिया यांना रोखले. तरीही अंजली दमानिया भुजबळांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेण्यावर ठाम होत्या. त्यामुळे पत्रकार परिषद घेण्या अगोदरच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले नंतर पोलिसांनी जुहू पोलीस ठाण्यात आणले आहे.

अंबड येथे ओबीसींच्या मेळाव्यात छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर घणाघाती टीका केली होती. त्यावर अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली होती की, भुजबळांचे भाषण ऐकून तळ पायाची आग मस्तकात गेली. कुणाच्या कष्टाचे खात आहेत भुजबळ ? ह्याचा एक छोटा खुलासा करू असे सांगत त्यांच्या सांताक्रुझच्या निवास स्थानांबाहेर आज सकाळी ११.३० वाजता. मीडियाला येण्याची विनंती त्यांनी केली होतीतसेच, अंजली दमानिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कुठेतरी मला असे वाटते की, छगन भुजबळांना देवेंद्र फडणवीसांनी जरांगेंना विरोध करण्यासाठी उभं केले आहे. आता तावा तावाने भुजबळ कसे बोलतात पाहा. जेलमधून बाहेर येण्यासाठी अगदी गरीब बिचारे बनण्याचा आव आणायचा. आता छातीत कळ नाही येत?, असे म्हणत अंजली दमानियांनी भुजबळ व फडणवीसांवर निशाणा साधला.

अशात आता अंजली दमानिया आज पत्रकार परिषद घेणार आहेत. छगन भुजबळ यांच्या कालच्या भाषणानंतर आज मी त्यांच्या घराचं समोर जाऊन पत्रकार परिषद घेणार आहे. मात्र त्यांच्या घराबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. रस्त्यावर बॅरिकेड्स लावल्याचेही दिसत आहे. तरीही मी जाऊन पत्रकार परिषद घेईन, पोलिसांनी मला जिथे अडवले तिथे मी पत्रकार परिषद घेणार आहे. छगन भुजबळ यांच्याबाबत अनेक खुलासे मी करणार आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या होत्या. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. सुटका झाल्यानंतर अंजली दमानिया काय बोलणार, याकडे आता सर्वांचे लक्ष असेल.

मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकच्या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ओबीसी मेळाव्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस खबरदारी घेत आहेत. भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिस गस्त घालत आहेत. त्याचप्रमाणे ताफ्यातील पोलीस वाहनांच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे.

मुकुंद किर्दत यांची आम आदमी राज्य प्रवक्ते पदी नेमणूक!

पुणे-

गुजरातचे नेते गोपाल इटालिया यांनी आप महाराष्ट्राचे सह प्रभारी पद घेतल्यावर पक्ष संघटनेमध्ये अनेक बदल केले आहेत. आज पुण्याचे मुकुंद किर्दत यांची आम आदमी पार्टीच्या राज्य प्रवक्ते पदी नेमणूक जाहीर करण्यात आली.

उच्च शिक्षित अभियंते व व्यावसायिक असलेले मुकुंद किर्दत अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळींबरोबर जोडलेले आहेत. स्त्री पुरुष समानता हा त्यांचा विशेष जिव्हाळ्याचा विषय आहे. गेली नऊ वर्षे आप बरोबर कार्यरत असून शिक्षण क्षेत्रात त्यांचे विशेष काम आहे. पुणे महानगरपालिका संबंधित मुख्यत्वे ॲमिनिटी स्पेस, अग्निशमन वाहन घोटाळा, टोल प्रश्न, कंत्राटी भरती आदी प्रश्नांवरती आंदोलने केली आहेत. तसेच २०१९ मध्ये आप तर्फे शिवाजीनगर विधानसभा निवडणुक लढवली आहे. यापूर्वी त्यांनी पुणे शहर व पुणे विभागाची तसेच आप राज्य मीडिया टीमची जबाबदारी सांभाळली आहे.

ट्राफिक जाममध्ये अमृता फडणवीसांचा ‘झुमका गिरा रे .. एन्जॉय…

Some entertainment in #traffic jam …..jhumkas

महाराष्ट्राचे भाजपचे नंबर १ चे नेते , महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर चांगल्याच धमाल करत असतात. त्या आपल्या विविध रिल्स, व्हिडिओ, फोटो व गाण्यांसह सामाजिक विषयांवरील मतेही बेधडकपणे मांडतात. आता त्यांचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसह विरोधका आणि टीकाकारांना देखील खुणावतो आहे. या व्हिडिओत त्या ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर आपल्या गाडीतच डान्स करताना दिसून येत आहेत.

अमृता फडणवीस यांनी शुक्रवारी एक व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. त्यात त्या ‘व्हॉट झुमका’ गाण्यावर गाडीत बसून डान्स करताना दिसून येत आहेत. ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर थोडेसे मनोजरंजन,Some entertainment in #traffic jam …..jhumkas असे कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिले आहे.

या व्हिडिओत ड्रायव्हरच्या बाजूला बसलेल्या अमृता फडणवीस यांनी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. त्यांच्या कानात मोठे गोलाकार रिंग्ज आहेत. त्यांच्या या व्हिडिओला हजारोने लाईक्स केले आहे. तसेच लाखात व्ह्यूजही मिळाले आहेत.

दुसरीकडे, हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्याही मनोरंजक मानल्या जाऊ शकतात .

गॅलरीच्या ग्रीलच्या जाळीत अडकला १ वर्षाचा मुलगा,अग्निशमन दलाचे जवान ठरले देवदूत

अग्निशमन दलाच्या जवानांकडून लोखंडी जाळीत अडकलेल्या त्या चिमुकल्याचे सुखरुप सुटका

पुणे – दिनांक १७•११•२०२३ रोजी सिहंगड कॉलेज रस्यावर हिंगणे खुर्द, राजश्री सोसायटीत इमारतीच्या दुसरया मजल्यावर एक लहान बाळ अडकल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच सिहंगड अग्निशमन केंद्र येथून तातडीने अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले.

घटनास्थळी पोहोचताच जवानांना समजले की, दुसरया मजल्यावर एका सदनिकेच्या गॅलरीमध्ये असणारया लोखंडी जाळीमध्ये एक वर्षाचे बाळ अडकले असून दरवाजा देखील बंद झाला आहे. जवानांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच धाव घेतली असता बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि प्रथम अग्निशमन वाहनातील कॉम्बी टुल किटमधील हायड्रोलिक स्प्रेडर व जॅकचा वापर करुन दरवाजाची कडी तोडून पाहिले असता बाळाचे डोके त्या लोखंडी जाळीमध्ये अडकले असून बाळ तळमळत असल्याचे पाहताच बाळाच्या आईला त्याच्याजवळ बसवत अगदी कुशलतेने अग्निशमन उपकरण वापरुन त्या बाळाची पाचच मिनिटात सुखरुप सुटका केली. बाळाच्या आई वडिलांनी दलाच्या जवानांनी केलेल्या कामगिरीबद्दल आभार मानले.

या कामगिरीत सिंहगड अग्निशमन केंद्र येथील वाहनचालक अशोक कडू व जवान तुषार करे, संभाजी आटोळे, आदिनाथ पवार यांनी सहभाग घेतला.

‘टार्गेट ठाकरे’ उद्धव ठाकरेंना मुंब्र्यात धक्का दिल्यानंतर आता आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल

मुंबईत पुलाचे बेकायदा उद्घाटन केल्याप्रकरणी गुन्हा; जीवितास धोका होईल असे कृत्य केल्याचा ठपका

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवानेते आमदार आदित्य ठाकरे यांनी लोवर परळ येथील डिलाई रोड ब्रिज लेनचे उद्घाटन केल्याप्रकरणी त्यांच्यावर मुंबई महापालिकेने गुन्हा दाखल केला आहे. आदित्य ठाकरे, सुनील शिंदे आणि सचिन अहिर,मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार मुंबई महापालिकेने दाखल केली आहे. एन. एम. जोशी पोलिस स्टेशन येथे मुंबई महापालिकेच्या रस्ते डिपार्टमेंटकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. रात्री उशिरा आदित्य ठाकरेंच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वास्तविक या पूलाचे काम पूर्ण झालेले नसताना लेनचे उद्घाटन करण्यात आले असल्याचा आरोप मनपाच्या वतीने करण्यात आला आहे. काही दिवसानंतर ही लेन सुरु करण्याचे पालिकेचे नियोजन होते. त्याआधीच आदित्य ठाकरे यांच्याकडून लेनचे उद्धाटन करण्यात आले आणि वाहतूक सुरु करण्यात आली. त्यामुळे वाहन चालकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याचा दावा देखील मनपाने तक्रारीत केला आहे.

या प्रकरणात आदित्य ठाकरेंकडून डिलाई ब्रिज रोडच्या दुसऱ्या लेनचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले होते. या प्रकरणात बेकायदेशीर आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने तक्रार दाखल केली आहे. यामध्ये शुक्रवारी रात्री त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आदित्य ठाकरे यांच्या व्यतिरीक्त सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्या विरोधातही हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक 16 रोजी रात्री 9.30 वाजता सुमारास वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानपरिषद आमदार सुनील शिंदे, विधानपरिषद आमदार सचिन अहिर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह 15 ते 20 अनोळखी कार्यकर्त्यांच्या बेकायदेशीर जमाव जमूऊन त्यांनी महानगरपालिका आयुक्त बृहन्मुंबई यांचे पूर्वपरवानगी शिवाय काम अपूर्ण असलेल्या लोअर परेल ब्रिजच्या सुरुवातीला एसीक भवन समोर लावलेले बॅरिगेट काढून ब्रिजवर अतिक्रमण करून ते त्यांचे सहकारी व कार्यकर्ते समवेत ब्रिजचे मध्यापर्यंत पायी चालत जाऊन त्यांनी वाहतुकीस तयार नसलेला दक्षिण वाहिनी पूल हा वाहतुकीस अनधिकृत रीत्या खुला केल्याने ब्रिजवरून वाहतूक सुरू झाली त्यावरून काही वाहन जाऊन वाहन चालकांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केले म्हणून माझी त्यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार आहे. ही तक्रार पुरुषोत्तम प्रल्हाद इंगळे यांनी दाखल केली आहे.

आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्सतर्फे मोफत आरोग्य तपासणी आणि विमा जनजागृती शिबिराचे आयोजन

पुणे, १८नोव्हेंबर २०२३ : आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने (“ABSLI/ कंपनी”), आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड (“ABCL”) ने जीवन विमा उपकंपनी, लाइफ इन्शुरन्सबाबत जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने एक विशेष उपक्रम जाहीर केला. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) द्वारे वाटप केलेल्या, महाराष्ट्रातील राज्य विमा जागरूकता योजनेंतर्गत प्रमुख जीवन विमा कंपनी म्हणून कंपनीने पुणे, महाराष्ट्र येथे मोफत आरोग्य तपासणी आणि विमा जागरूकता शिबिराचे आयोजन केले. हा कार्यक्रम २५ दिवसांचा होता. आंबेगाव, राजगुरुनगर, शिरूर, चाकण, वाघोली, मांजीर, उरुळी कांचन, फुरसुंगी आणि सासवड यासह पुण्यातील विविध ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते.

जीवन विम्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश आहे. या शिबिरामुळे सहभागींना विविध शासकीय आणि अशासकीय वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारे मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेता आला. ABSLI ने जीवन विम्याचे विविध फायदे आणि योग्य विमा पर्यायांद्वारे एखाद्याचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याचे मार्ग अधोरेखित करणारी माहितीपूर्ण सामग्री देखील वितरित केली. पुण्यातील विमा जागृती शिबिरात 2,000 हून अधिक लोक उपस्थित होते.

जीवन विम्याचे शिक्षण हे समर्पक आणि आकर्षक असले पाहिजे, असा आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्सचा विश्वास आहे. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, कंपनीने शहराच्या अनेक भागात पथनाट्याचे सादरीकरण केले. याला लोकांचा प्रतिसाद मिळाला. ही पथनाट्ये विचारपूर्वक एखाद्याच्या दैनंदिन जीवनाशी समर्पक अशी आहेत. यात जीवन विम्याचे महत्त्व आणि एखाद्याचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यात त्याची भूमिका प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.

IRDAI च्या राज्य विमा योजनेचा एक भाग म्हणून संपूर्ण देशात विमा जागरूकता, सहज उपलब्धता आणि सर्वसमावेशकत्व यासाठी ABSLI अशा विमा जागरूकता मोहिमेचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करत राहील. लोकांना जीवन विम्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी पुरेसे मार्गदर्शन करण्यात येईल. एखाद्याच्या आर्थिक भवितव्याचे रक्षण आणि संरक्षण करण्यात त्याची भूमिका.ABSLI ने नुकतेच कोल्हापुरात यशस्वी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते, आणि तसाच उपक्रम सातारा आणि सांगलीसाठी पाइपलाइनमध्ये आहेत.

चिकन दिनानिमित्त देशभर जनजागृती अभियान संपन्न

पद्मश्री डॉ. बी. व्ही. राव यांच्या जयंतीनिमित्त पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशनचा पुढाकार
पुणे : राष्ट्रीय चिकन दिनानिमित्त पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशनच्या वतीने १६ व १७ नोव्हेंबर २०२३ या दोन दिवशी देशभर जनजागृती अभियान राबविण्यातआले . पुण्यासह नाशिक, रायगड, पालघर व इतर जिल्ह्यांतील अनेक दुकानांतून सवलतीच्या दरात ग्राहकांना चिकन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
भारतीय कुक्कुटपालनाचे जनक पद्मश्री डाॅ. बी. व्ही. राव यांच्या जन्मदिनानिमित्त १६ नोव्हेंबर राष्ट्रीय चिकन दिवस (नॅशनल चिकन डे) साजरा करण्यात येतो. फर्ग्युसन रस्त्यावरील वेंकीज एक्प्रेसमध्ये चिकनच्या खास डिशेशचे सादरीकरण करण्यात आले. तसेच सवलतीच्या दरात चिकन विक्री व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्यदायी चिकनविषयीची माहिती दिली.
अखिल भारतीय ब्रॉयलर समन्वय समितीचे संयोजक व पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष वसंतकुमार शेट्टी, पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष संजय नाळगिरकर, सचिव डॉ. अजय देशपांडे, विश्वस्त कृष्णचरण यांनी दिवसाचे महत्व सांगितले. असोसिएशनचे संकल्प कुलकर्णी, संजय थोपटे, वेंकीजचे ऑपरेशन मॅनेजर किरण गुंजाळ आदी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रसह कर्नाटक, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेश राज्यातदेखील साजरा होत आहे.
वसंतकुमार म्हणाले, “सामान्य नागरिकांमध्ये चिकनबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येत आहे. पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशन महाराष्ट्र, कर्नाटक पोल्ट्री फार्मर्स ब्रीडर्स असोसिएशन, पश्चिम बंगाल पोल्ट्री फेडरेशन तसेच इतर अनेक राज्य पोल्ट्री असोसिएशनतर्फे देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वस्त दरात चिकन विक्री, जागृतीपर कार्यक्रम, व्याख्यान, प्रात्यक्षिके, प्रशिक्षण अशा विविध उपक्रमांचे आयोजन या जागृती अभियानात करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील विविध भागात साधारण १५० दुकानात सवलतीच्या दरात चिकन विक्री सुरू आहे.”

पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशन अर्थात कुक्कुट पालक-शेतकरी आणि उत्पादक संघ महाराष्ट्र, ही संस्था गेल्या दोन दशकांपासून कुक्कुट पालक-शेतकरी आणि उत्पादकांच्या हितासाठी कार्यरत आहे. जवळपास १०० हून अधिक कुक्कुट पालक-शेतकरी आणि उत्पादक संस्थेचे सभासद आहेत. संस्थेच्या सभासदांकडुन एकत्रितपणे महिन्याला साडेचार कोटी ब्राॅयलर प्लेसमेंट केली जातात. जवळपास गेली दोन दशके संस्था, अव्याहतपणे कुक्कुट पालक शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे काम करत आहे. राज्य तसेच केंद्र सरकारपुढे सभासदांचे प्रतिनिधित्व संस्था करते, असे संकल्प कुलकर्णी यांनी नमूद केले.

फेडएक्समुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर 80 अब्ज डॉलरहून अधिक थेट प्रभाव

~ डन आणि ब्रॅडस्ट्रीट यांच्याशी सल्लामसलत करून तयार केला अहवाल

~ पायाभूत सुविधा, शाश्वतता आणि नाविण्यता यात गुंतवणूक केल्याने भारतातील नेटवर्क झाले मजबूत

मुंबई १८ नोव्हेंबर २०२३ – फेडएक्स कॉर्प (NYSE:FDX) ने २०२३ या आर्थिक वर्षात कंपनीच्या जगभरातील नेटवर्कचे आणि नाविन्यपूर्ण उपक्रम वाढवण्याच्या भूमिकेचे विश्लेषण करून वार्षिक आर्थिक प्रभाव अहवाल जारी केला. डन अँड ब्रॅडस्ट्रीट (NYSE: DNB) यांच्याशी सल्लामसलत करून अभ्यास करत फेडएक्समुळे जगभरातील सर्वसामान्यांवर आणि समाजावर काय परिणाम झाला याचा अहवाल सादर केला असून, त्याल फेडएक्स इफेक्ट असे संबोधले जाते.

“फेडएक्सने ग्राहकांच्या सतत विकसित होत असलेल्या गरजा लक्षात घेत व्यवसायांच्या वस्तू, सेवा आणि कल्पनांची देवाणघेवाण करण्याच्या पद्धतीमध्ये परिवर्तन करून पाच दशकांमध्ये जागतिक पुरवठा साखळी आणि ई-कॉमर्स क्रांती घडवून आणण्यास मदत केली आहे,” असे फेडएक्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि सीईओ  राज सुब्रमण्यम म्हणाले. “हा अहवाल अर्थव्यवस्थेतील आमचे महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित करतो आणि आम्ही जिथे काम करतो त्या ठिकाणी सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी समर्पण करतो, हेही या अहवालातून स्पष्ट होते”

अहवालात असे दिसून आले आहे की, जगभरात आर्थिक परिस्थिती कठिण असतानाही फेडएक्सने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम करणारे ८० अब्ज डॉलरपेक्षा जास्त योगदान दिले. यातून हेच दिसून येते की फेडएक्सने उत्तम नेटवर्क तयार केले आहे आणि नाविण्यपूर्ण प्रयत्नांमुळे व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांपर्यंत जलद गतीने सेवा पोहोचवता येत आहेत. या अहवालात भारतावर झालेल्या परिणामांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. भारतात कंपनीने २९०० पेक्षा अधिक लोकांना रोजगार दिला आहे आणि कंपनी तीन आंतरराष्ट्रीय गेटवे चालवते.

फेडएक्सने १७ एप्रिल २०२३ रोजी ऑपरेशनची ५० वर्षे साजरी केली. कंपनीकडे जगातील सर्वात विस्तृत वाहतूक नेटवर्क आहे, ज्याद्वारे २२० पेक्षा जास्त देश आणि प्रदेशांमध्ये सेवा पुरविली जाते. याव्यतिरिक्त, फेडएक्स ५,००० पेक्षा जास्त प्रकल्पांमध्ये ५,००,००० लोकांना रोजगार देते आणि दररोज अंदाजे १४.५ दशलक्ष पॅकेजेस इकडून तिकडे पाठवते. 

फेडएक्स इकॉनॉमिक इम्पॅक्ट रिपोर्टच्या प्रमुख जागतिक हायलाइट्समध्ये या गोष्टींचा समावेश :

●     अप्रत्यक्ष प्रभाव: फेडएक्सने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये जागतिक निव्वळ आर्थिक उत्पादनात अप्रत्यक्षपणे ३५ बिलियन डॉलरचे योगदान दिले.

●     पुरवठा साखळी :  फेडएक्सने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये अंदाजे १,००,००० पुरवठादारांशी करार केला – त्यापैकी ९०% छोटे व्यवसायिक होते. २०२२ मध्ये अंदाजे ७३,००० युनिक पुरवठादारांसह केलेल्या खर्चाच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की कंपनीने या पुरवठादारांसोबत केलेल्या खर्चामुळे ११ लाख नोकऱ्यांना आधार मिळाला.

●     व्यापार: आपल्या ग्राहकांना अधिक बाजारपेठेतील प्रवेश आणि कार्यक्षमता प्रदान करणार्‍या व्यापार धोरणांचे फेडएक्सने कायम समर्थन केले आहे. डी मिनिमिस अलाउंसेस सारख्या तरतुदींचा अंगीकार केल्याने सर्व आकारांच्या व्यक्ती आणि व्यवसायांना शुल्क आणि करांशिवाय कमी-मूल्याच्या वस्तू आयात करणे शक्य होते. 

भारताचा प्रभाव

एक्सप्रेसने भारतात १९८४ मध्ये कार्य सुरू केले आणि देशाने आशिया पॅसिफिक, मध्य पूर्व आणि आफ्रिका (AMEA) प्रदेशाशी कनेक्टिव्हिटी सक्षम करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अभ्यासात असे आढळून आले की, फेडएक्स एक्सप्रेसने वित्त वर्ष २३ मध्ये भारतासह AMEA मध्ये विस्तृत नेटवर्कसह वाहतूक, स्टोरेज आणि कम्युनिकेशन्स क्षेत्रातील निव्वळ आर्थिक उत्पादनात ०.३% योगदान दिले आहे. AMEA अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांमध्ये, फेडएक्स एक्सप्रेसने एकूण निव्वळ आर्थिक उत्पादनात ०.०२% योगदान दिले, जे वित्त वर्ष २०२३ मध्ये अंदाजे ६% वाढून ४४ ट्रिलियन डॉलर झाले.

फेडएक्स एक्सप्रेस मिडल ईस्ट, भारतीय उपखंड आणि आफ्रिकाचे अध्यक्ष कामी विश्वनाथन म्हणाले की, “जगातील सर्वात विस्तृत वाहतूक नेटवर्कसह, आम्ही जागतिक आर्थिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या स्मार्ट आणि शाश्वत उपायांद्वारे मूल्य पोहोचवण्यासाठी समर्पित आहोत. भारतातील नाविन्यता आणि वाढीस चालना देण्यासाठी स्थानिक प्रतिभांचे पालनपोषण करणे आणि प्रगत क्षमतांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी विस्तार करणे ही आमची वचनबद्धता आहे. असे केल्याने, आम्ही केवळ जगभरातील व्यवसायांना जोडले जात नाही तर भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी आणि विकासात योगदान देतो.”

फेडएक्स एक्सप्रेस त्यांच्या भारतीय ताफ्यात अलीकडेच ३० हून अधिक इलेक्ट्रिक वाहने (EVs) दाखल केली आहेत. नवी दिल्ली कार्गो कॉम्प्लेक्समधील कंपनीच्या गेटवेला त्यामुळे पूरक सुविधा मिळाली आहे. या सुविधेमध्ये सौर ऊर्जा आणि प्रगत व्हेरिएबल रेफ्रिजरंट व्हॉल्यूम कूलिंग सिस्टीम यासारख्या टिकाऊ वैशिष्ट्यांचा समावेश आहे. यामुळे विजेचा वापर अंदाजे १५% कमी होतो.

याव्यतिरिक्त, भारताच्या नवकल्पना अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध फेडएक्स एक्सप्रेस आहे. मार्च २०२३ मध्ये, कंपनीने हैदराबादमध्ये आपली पहिली अॅडव्हान्स्ड कॅपॅबिलिटी कम्युनिटी (ACC) उघडण्याची सुरू करण्याची जाहीर केली. फेडएक्स ACC मध्ये तांत्रिक आणि डिजिटल नवकल्पनांच्या विकासास समर्थन देण्यासाठी पूर्ण-वेळ कर्मचारी नियुक्त केले जातील, जे फेडएक्सला जागतिक पुरवठा साखळी इकोसिस्टममध्ये आणखी मोठे मूल्य प्रदान करण्यास सक्षम करतील. भारतातील तसेच विस्तीर्ण प्रदेशात सुरुवातीच्या टप्प्यातील डिजिटल स्टार्ट-अप्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी कंपनीने मे 2023 मध्ये फेडएक्स इनोव्हेशन लॅब (FIL) लाँच केली.

 स्टार हेल्थचे पूर्णपणे डिजिटल, ग्राहकांना अनुकूल बदल करण्यायोग्य आरोग्य विमा !

⮚     ५ लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत कव्हरेज

⮚     पॉलिसीधारकांना अतिरिक्त संरक्षणासाठी ५ पर्यायी कव्हर्स

⮚      वैयक्तिक कव्हर आणि फ्लोटर कव्हर असे दोन्ही पर्याय उपलब्ध

पुणे , 18 नोव्हेंबर २०२३स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स, भारतातील आघाडीच्या हेल्थ इन्शुरन्सने स्मार्ट हेल्थ प्रो ही डिजिटल-ओन्ली हेल्थ पॉलिसी लॉन्च केली आहे. ही पॉलिसी ग्राहकांना पाच पर्यायी अॅड-ऑन कव्हरमधून त्यांचे कव्हरेज निवडण्याचे पर्याय उपलब्ध करून देते. भारतातील डिजिटलवर असलेल्या लोकांच्या आधुनिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने ही पॉलिसी सुरू करण्यात आली असून, ही पॉलिसी व्यक्तींना त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार ५ लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतच्या विविध विम्याची रक्कम निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देते.

हे नाविन्यपूर्ण उत्पादन आरोग्य विम्याने स्वतःला सुरक्षित करण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणणार आहे. पॉलिसी ग्राहकांना त्यांचे विमा कवच त्यांना अनुकूल असलेल्या आणि त्यांच्या गरजेनुसार पाच पर्यायी कव्हर निवडण्याची सुविधाही देते. त्यामुळे ग्राहकांचे त्यांच्या पॉलिसींवर अधिक नियंत्रण राहाते.

विम्याची रकमेत अमर्यादित वेळा रिस्टोअर होईल. निवडलेली विमा रक्कम प्रत्येक वेळी जास्तीत जास्त 100% पर्यंत रिस्टोअर होईल. त्यासाठी कितीही वेळा ऑटोमॅटिक रिस्टोअर होऊ शकेल.  ही पुनर्संचयित विम्याची रक्कम नंतरच्या हॉस्पिटलायझेशनसाठी वापरली जाऊ शकते. कव्हरच्या मर्यादेचा आंशिक किंवा पूर्ण वापर केल्यावर पुनर्संचयित वैशिष्ट्य ट्रिगर केले जाते. अशी पुनर्संचयित विम्याची रक्कम नंतरच्या हॉस्पिटलायझेशनसह सर्व दाव्यांसाठी वापरली जाऊ शकते.

एकत्रित बोनस बूस्टर : प्रत्येक क्लेम फ्री वर्षासाठी विम्याच्या रकमेच्या ५०%  आणि 600% पर्यंत विम्याची कमाल रक्कम असू शकते.

श्रेणीतील बदलाला वाव : विमाधारक व्यक्ती खाजगी सिंगल ए/सी रूममधून कोणत्याही खोलीत/सामायिक खोलीत श्रेणी वाढवू अथवा कमी करू शकते.

पूर्वअस्तित्वात असलेल्या रोगांचा प्रतीक्षा कालावधी कमी करणे : विमाधारक व्यक्ती पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या रोगांचा प्रतीक्षा कालावधी ४८ महिन्यांवरून ३६/२४/१२ महिन्यांपर्यंत कमी करू शकते.

गैरवैद्यकीय वस्तूंसाठी कव्हरेज : गैर-वैद्यकीय वस्तू म्हणून सूचीबद्ध केलेल्या वस्तू उपभोग्य वस्तूंच्या अंतर्गत येतात आणि सामान्यतः विमा संरक्षणातून वगळल्या जातात. या नवीन पर्यायी कव्हरसह, इनपेशंट किंवा डे-केअर ट्रीटमेंटसाठी पॉलिसी अंतर्गत स्वीकार्हाह हक्क असल्यास गैर-वैद्यकीय वस्तू म्हणून सूचीबद्ध केलेल्या वस्तूवर विमा कवच राहील.

स्मार्ट हेल्थ प्रो २ प्रौढ आणि ३ मुलांपर्यंतच्या कुटुंबांसाठी वैयक्तिक आणि फ्लोटर असे दोन्ही कव्हर ऑफर करते. आयुष उपचार, आधुनिक उपचार आणि घरगुती उपचारांसह आजार किंवा अपघातांमुळे कराव्या लागणाऱ्या हॉस्पिटलायझेशनसाठी हे उत्पादन अखंड कव्हरेज सुनिश्चित करते. पॉलिसीमध्ये नवविवाहित, नवजात आणि दत्तक घेतलेल्या मुलांसाठी मध्यावधीत समावेशाचा पर्यायही आहे. पॉलिसीधारकांना स्टार हेल्थच्या २४x७ मोफत टेलिमेडिसिन सल्लामसलतीचाही लाभ मिळेल आणि अनुभवी वैद्यकीय तज्ञांद्वारे वेलनेस प्रोग्राममध्ये सहभागी होऊ शकतात.

स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ श्री आनंद रॉय म्हणाले की“स्मार्ट हेल्थ प्रोमध्ये नवकल्पना, वैयक्तिकरण आणि प्रवेशयोग्यतेची स्टार हेल्थची बांधिलकी आहे. आरोग्य विम्याने वैयक्तिक गरजांशी जुळवून घेतले पाहिजे, ही सध्याची गरज आहे. हा डिजिटल-प्रथम उपक्रम केवळ सर्वसमावेशक कव्हरेजच देत नाही तर कुटुंबांना त्यांना हवी तशी पॉलिसी सहजतेने तयार करण्यास सक्षम बनवतो. तरुण आणि ग्रामीण समुदायांसाठी आरोग्य विमा सर्वसमावेशक आणि युजर फ्रेंडली बनवून आम्ही अंतर भरून काढत आहोत. स्मार्ट हेल्थ प्रो सह, आम्ही फक्त विमा देत नाही; आम्ही मनःशांती प्रदान करत आहोत. जेव्हा प्रत्येकाला सर्वात जास्त गरज असते तेव्हा दर्जेदार आरोग्यसेवा मिळू शकेल, याची आम्ही खात्री करून घेतो. डिजिटल माध्यम आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या युगात, भारताच्या तंत्रज्ञानस्नेही पिढीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खास तयार केलेले उत्पादन सादर करताना आम्हाला आनंद होत आहे.”

हा उपक्रम स्टार हेल्थचे ग्राहक-प्रथम वैशिष्ट्य आहे. यामध्ये एकत्रिकरणाची आणि हवा तसा बदल करण्याची सुविधा  देण्यात आली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मचा स्वीकार करून, कंपनीने आरोग्य विम्याच्या सुलभतेतील अंतर भरून काढण्याचा प्रयत्न केला असून, याचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना होणार आहे. त्यांच्या आर्थिक कल्याणाचे रक्षण करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.

स्मार्ट हेल्थ प्रो इन्शुरन्स पॉलिसीची प्रमुख वैशिष्ट्ये :

●        १८ वर्षे ते ५० वर्षांपर्यंतच्या व्यक्तींसाठी उपलब्ध. अवलंबित मुलांसाठी विम्याची रक्कम किमान – 18 वर्षे आणि कमाल 50 वर्षांपर्यंत असेल

●        उपलब्ध विम्याचे पर्याय : रु. ५ लाख, रु. १० लाख, रु. १५ लाख, रु. २० लाख, रु. २५ लाख, रु. ५० लाख, रु. ७५ लाख, रु. १ कोटी

●        या गोष्टी होतात कव्हर – रूग्णांना रूग्णालयात दाखल करणे, डे केअर उपचार, रूग्णवाहिका, रूग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा आणि नंतरचा खर्च, डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशन, वार्षिक आरोग्य तपासणी, होमकेअर उपचार

●        अतिरिक्त फायदे : टेली-आरोग्य सेवा

●        विम्याची रक्कम संपल्यानंतर १००% ने मूळ विम्याची रक्कम स्वयंचलित पुनर्संचयित करणे आणि पॉलिसी कालावधीत क्लेम बोनस नाही

●        नूतनीकरण प्रीमियमवर सवलत – विमाधारक प्रथम खरेदी आणि त्याच्या नूतनीकरणासाठी १०% सवलत मिळते.

 टेस्लाचा कारखाना गुजरात कि महाराष्ट्रात? दरवर्षी ५ लाख ईव्ही कार तयार करणार

कारची किंमत सुमारे २० लाख रुपये

इलॉन मस्क यांनी आपली कंपनी टेस्ला भारतात लाँच करण्याचा रोडमॅप बनवला आहे. टेस्लाने पुढील वर्षी मस्क यांच्या संभाव्य भारत भेटीपूर्वी तयारीला अंतिम रूप देण्यास सुरुवात केली आहे. वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी नुकतीच टेस्लाच्या कॅलिफोर्नियातील उत्पादन प्रकल्पाला भेट दिली. सूत्रांनुसार, टेस्ला इंडियाचा कारखाना गुजरात किंवा महाराष्ट्रात सुरू होण्याची शक्यता आहे. येथून दरवर्षी ५ लाख ईव्ही कार तयार होऊ शकतात.

टेस्ला इंडियाच्या एंट्री लेव्हल कारची किंमत सुमारे २० लाख रुपये आहे. आयात शुल्कात कपात करण्याबाबत केंद्र सरकारने टेस्लाशी सहमती दर्शवली आहे. याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पुढील वर्षी जानेवारीमध्ये मस्क यांच्या संभाव्य भारत भेटीदरम्यान टेस्ला इंडियाबद्दल अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.

टेस्लानेही भारतात ‘पॉवरवॉल’ तयार करून विकण्याची योजना आखली आहे. ‘पॉवरवॉल’ ही बॅटरी स्टोरेज सिस्टीम आहे. जी सोलर पॅनलपासून काम करते. अंदाजे एक मीटर उंचीची ही ‘पॉवरवॉल’ यंत्रणा गॅरेजमध्ये किंवा घराबाहेर ठेवता येते. अमेरिकेतील ह्यूस्टन आणि डॅलसमध्येही लोक ‘पॉवरवॉल’ प्रणालीद्वारे अतिरिक्त वीज ग्रीडला विकत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे कौतुक केले आहे.

टेस्लाच्या कॅलिफोर्नियातील उत्पादन प्रकल्पाच्या भेटीदरम्यान वाणिज्य मंत्री पियुष गोयल म्हणाले की, टेस्ला कंपनीने भारताचाही पुरवठा साखळीत समावेश केला आहे. हे एक सकारात्मक पाऊल आहे. गेल्या वर्षीपर्यंत टेस्लाने भारताकडून सुमारे ८३०० कोटी रुपयांचे सुटे भाग मागवले होते. या वर्षाच्या अखेरीस टेस्ला आपल्या ईव्ही कारसाठी १६.६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. भारतीय विक्रेते २०२१ पासून सुटे भाग पाठवत आहेत. टेस्लाला भारतीय घटकांचा दर्जा आवडतो.

२०३० पर्यंत जगभरात २० दशलक्ष ईव्ही विकण्याचे मस्क यांचे उद्दिष्ट आहे. यासाठी त्यांना भारताला आशिया व पॅसिफिक महासागर क्षेत्रासाठी निर्यातीचा आधार बनवायचा आहे. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडसह दक्षिण पूर्व आशियातील देशांमध्ये चीन निर्मित ईव्हीशी स्पर्धेसाठी मस्क यांना भारतात ईव्ही कारखाना सुरू करायचा आहे.

छठ पुजेनिमित्त रविवारी पुण्यात भव्य गंगा आरतीचे आयोजन

पुणे दि. १७ -भक्त भाविकांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या छटपुजा उत्सवानिमित्त विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथे इंद्रायणी नदीच्या तीरावर रविवारी (दि.१९)सायंकाळी पाच वाजता ‘भव्य काशी गंगा आरती’चे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय एकतेतून राष्ट्र विकास हे ध्येय ठेवून विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवणाऱ्या विश्व श्रीराम सेना या संस्थेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास पालघर हिंदूशक्ती पीठ येथील स्वामी श्री भारतानंद सरस्वती महाराज, विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री शंकर गायकर, समस्त हिंदू आघाडीचे संस्थापक मिलिंद एकबोटे,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य राजेश पांडे, आमदार महेश लांडगे, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक अर्जुन गुप्ता आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती भारतीय खाद्य महामंडळ महाराष्ट्र सल्लागार समिती सदस्य व विश्व श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संयोजक डॉ. लालबाबू अंबीकलाल गुप्ता यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
या महोत्सवाची सांगता सोमवारी पहाटे पाच वाजता सूर्योदय झाल्यानंतर सूर्याला अर्ध्य देऊन होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त इंद्रायणी घाट परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. सुर्यषष्टी महाव्रत महापूजा, छोटकी छट, भव्य गंगा आरती सह विविध, धार्मिक, सामाजिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सूर्याची उपासना करण्यासाठी छटपूजेचे व्रत केले जाते. सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत असल्याचे प्राचीन काळापासूनची सामाजिक धारणा आहे. निसर्गात आणि समाजात एकरूपता साधणार्‍या या व्रतात, आस्था, प्रेम, विश्वास, त्याग आणि पर्यावरण प्रति समर्पणाची भावना आहे. गतवर्षीप्रमाणे या वर्षी देखील इंद्रायणी घाटावर भव्य गंगा आरती आणि पूजा, भजन, छट लोकगीत सादर करण्यात येणार आहेत. या धार्मिक उत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन लालबाबु गुप्ता यांनी केले आहे.

‘आयुष्यमान भारत’ मोफत नोंदणी, केवायसी सुविधा उपलब्ध; नागरिकांनी लाभ घ्यावा – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

0

छत्रपती संभाजीनगर, दि.१७ :- केंद्राच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकसित भारत यात्रा’ सुरु करण्यात आली आहे. लवकरच ही यात्रा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही सुरु होईल. यानिमित्ताने विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावयाचे आहेत. जिल्ह्यात आयुष्यमान भारत ही आरोग्य सुविधा पुरविणारी योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोफत नोंदणी, केवायसी सुविधा उपोलब्ध आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहनही केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने विविध योजनांचा आढावा आज डॉ. कराड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडलेल्या बैठकीस अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायळ, जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी ओमप्रकाश रामावत, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, मनपा उपायुक्त अपर्णा थेटे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, जिल्हा शिक्षण अधिकारी एम.के.देशमुख, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी, तहसिलदार यांच्यासह जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अदिवासी विभाग, नगरपालिका महिला बालकल्याण मुख्यअधिकारी, खादी ग्रामोद्योग महामंडळ यांच्यासह संबधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

आयुष्यमान भारत योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा

डॉ. कराड म्हणाले की,आयुष्यमान भारत योजनेची नोंदणी करण्यासाठी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी (सेवा केंद्र),  येथे मोफत नोंदणी करावी. तसेच केवायसी करावयाची असल्यास ती ही मोफत करावी. त्यानंतर हे कार्ड मोफत घरपोच पोहोचवले जाईल. तरी नागरिकांनी लाभ घ्यावा. या योजनेद्वारे लोकांना आरोग्य विम्याचा लाभ मिळतो, असेही डॉ. कराड यांनी सांगितले. त्यासाठी ग्राम पातळीपासून ते शहरी भागातही आशा स्वयंसेविका, स्वस्तधान्य दुकाने यांच्यामार्फत लोकांपर्यंत माहिती पोहोचवून अधिकाधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे त्यांनी निर्देशित केले. कृषी, ग्रामविकास, अदिवासी विकास विभाग, शिक्षण, आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने आयुष्यमान भारत योजनेच्या लाभासाठी मोफत नोंदणी करुन घेण्यात यावी. जेणेकरुन सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा विमा कवच प्राप्त होईल. तसेच ही नोंदणी करण्यासाठी आशा अंगणवाडी सेविका, विद्यार्थी, नागरी सुविधा केंद्र याची मदत घेऊन उद्ष्टि पूर्ण करण्याचे निर्देश डॉ.कराड यांनी दिले. प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी  समन्वय असणे गरजेचे आहे. योजनांच्या प्रचारासाठी जिल्ह्यात ७ प्रचार रथ येणार आहेत.  प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत.

विविध योजनांचा आढावा

बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना,  प्रधानमंत्री जनधन योजना,  प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना,  प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना,  किसान क्रेडीट कार्ड, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, प्रधानमंत्री पोषण योजना, हर घल जल योजना, स्वामित्व योजना, अशा विविध योजनांचा आढावा डॉ. कराड यांनी घेतला.

कार्यशाळा घेऊन योजनेची माहिती पोहोचविणार

किसान क्रेडीट कार्ड,  जनधन योजना, महिला बचत गटांना अर्थसहाय्य देणे यासाठी आपण योजना निहाय शेतकरी, महिला, नव उद्योजक यांची कार्यशाळा घेऊन त्यांच्या पर्यंत माहिती पोहोचवू, त्याचे नियोजन करावे,असे निर्देशही डॉ. कराड यांनी यंत्रणेला दिले.  तसेच याबाबत प्रचार प्रसिद्धी करुन विविध माध्यमांद्वारे लोकांपर्यंत माहिती पोहोचवा,असे निर्देशही डॉ. कराड यांनी दिले. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात या यात्रेस प्रारंभ होईल अशी माहितीही यावेळी देण्यात आली.