Home Blog Page 1394

ओबीसी तसेच आर्थिक मागास प्रवर्गातील मुलींची १०० टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासन करणार – मंत्री चंद्रकांत पाटील

0

मुंबई, दि. 17 : आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची 100 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येईल, असा ठराव मराठा आरक्षण व इतर सोयीसुविधांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. हा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येऊन मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मागील तीन वर्षात प्रलंबित राहिलेल्या शुल्क प्रतिपूर्तीची 100 टक्के परतफेड करण्यासाठी येत्या अधिवेशनात तरतूद करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  मराठा आरक्षण व इतर सोयीसुविधांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची तसेच  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ तसेच सारथी महामंडळाची आढावा बैठक आज मंत्रालयात संपन्न झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास मंत्री  गिरीश महाजन, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे संचालक नरेंद्र पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते तसेच, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर, उमाकांत दांगट मधुकरराव कोकाटे,  डॉ. नवनाथ पासलकर  यांच्यासह संबंधित उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. पाटील म्हणाले की, मराठा समाजाला स्वतःचे स्वतंत्र आरक्षण मिळण्यासाठी सर्व्हे करण्यासाठी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले (निवृत्त) उच्च न्यायालय अलाहाबाद, न्यायमूर्ती मारोती गायकवाड (निवृत्त), न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) या तीन सदस्यीय समितीचे कामकाज प्रत्यक्ष  सुरू झाले असून  त्यांना आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल,असे त्यांनी सांगितले. ही समिती टाटा सामाजिक विज्ञान संस्था, गोखले शैक्षणिक संस्था आणि ऑल इंडिया पॉप्युलेशन सायन्स या तीन नामांकित संस्थाच्या माध्यामातून सर्वेक्षणाचे काम करणार आहे. तसेच आतापर्यंत सुरू असलेल्या नोंदीच्या कामात मराठवाड्यात 22 हजार कुणबी नोंदी नव्याने आढळल्या असल्याचे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

राज्यातील सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील लाभार्थींना उद्योग व्यवसायासाठीच्या कर्जाचा व्याज परतावा करण्याची सुविधा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांच्या जिल्हास्तरीय यंत्रणेच्या माध्यमातून व्यापक स्वरुपात सुरु आहे, सर्व जिल्ह्यात महामंडळाचे स्वतंत्र कार्यालय सुरु करावे, त्याचसोबत महामंडळाच्या विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून मराठा समाजातील रोजगार इच्छुकांसाठी रोजगार नोंदणी सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांच्या जिल्हास्तरीय तसेच विभागीय यंत्रणांचा आढावा घेऊन सर्व जिल्ह्यात महामंडळांच्या स्वतंत्र कार्यालयांची व्यवस्था करण्याचे सूचित केले. यासाठी प्राधान्याने महसूल, कौशल्य विकास तसेच सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयांच्या अखत्यारीतील जागेत महामंडळाचे स्वतंत्र कार्यालय सुरु करण्याचे सूचित केले ज्या ठिकाणी अशी जागा उपलब्ध नसेल त्याठिकाणी भाडयाने खाजगी जागेत तातडीने जिल्हा कार्यालयाची व्यवस्था कार्यान्वित करण्याचे सूचित केले. तसेच विभागीय स्तरावर महामंडळाने त्यांच्या विभागीय समन्वयकांच्या माध्यमातून रोजगार नोंदणी सुविधा सुरु करुन इच्छुकांचे रोजगार मेळावे आयोजन, संबंधित कंपन्यासोबत समन्वय साधावा. नोकरी इच्छुकांना मुलाखत प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देणे या माध्यमातून जास्तीत जास्त संख्यने रोजगार संधीची निर्मिती करावी. त्याचसोबत कर्ज इच्छुक लाभार्थींना व्यवसाय सुरु करण्यासाठीचे प्रशिक्षण प्राप्त करुन देण्याच्या दृष्टीने सारथी संस्थेसोबत समन्वय करण्याचे सूचित केले.

महामंडळाच्या योजनेमुळे व्यापक प्रमाणात लाभार्थींना सहाय्य मिळत आहे, त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी नवी मुंबई येथे महामंडळाच्या भवन उभारण्यासाठी सिडकोकडे पाच एकर जमीन ग्रहण करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा. महामंडळाने कर्ज दिलेल्या 71 हजार 376 लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करुन त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या रोजगाराची माहिती संकलित करावी. तसेच महामंडळाच्या पाच हजार कर्ज लाभार्थी यांची कर्ज परतफेड पूर्ण झाली आहे, त्यांचे सर्वेक्षण करावे अशा सूचना मंत्री श्री.पाटील यांनी संबंधितांना दिल्या. दहा हजार ते दोन लाख पर्यंतच्या बँकेतून घेतलेल्या कर्जाच्या 100 टक्के व्याज प्रतिपूर्तीचा निर्णय उपसमितीने घेतला आहे. त्याचप्रमाणे देशांतर्गत शिक्षणासाठी घेतलेल्या शैक्षणिक कर्जाच्या 100 टक्के व्याज प्रतिपूर्तीचाही निर्णय उपसमितीने घेतला असल्याचे मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

सारथीच्या पीएचडी फेलोशिपसाठीच्या विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा तातडीने घ्यावी

या बैठकीत मंत्री श्री.पाटील यांनी सारथीच्या पीएच.डी फेलोशिपसाठीच्या विद्यार्थ्यांची सीईटी परिक्षा तातडीने घेण्याचे सूचित केले. यामध्ये पात्र झालेल्या विद्यार्थांना गुणवत्ता यादीनुसार फेलोशिप देण्याची प्रक्रिया राबवण्याचे सूचित केले. तसेच सारथी संस्थेच्या योजना अमंलबजावणीचा आढावा घेऊन त्यांनी मराठा समाजातील तरुण तरुणींना उच्च शिक्षण, स्पर्धा परिक्षा यासह शेतकरी वर्गासाठीच्या सर्व योजनांची प्रवेश प्रक्रिया तसेच प्रशिक्षण संस्था यांची निवड प्रक्रीया पारदर्शकपणे करण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना दिल्या.

आंबेडकर म्हणाले,’भुजबळांनी जरांगेंना आव्हान देण्याची काय गरज होती? दोन समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू

अकोला-आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. छगन भुजबळांनी जालन्यातील ओबीसी मेळाव्याच्या ठिकाणाहून मनोज जरांगेंना आव्हान देण्याची गरज काय होती असा सवालही त्यांनी विचारला.आज अकोल्यातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ओबीसी संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आंबेडकरांनी भुजबळांवर हल्लाबोल केला आहे.

वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न आहे. पण आम्ही हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात बैठका घेऊ. अंबडच्या आजच्या सभेत भुजबळांना जरांगेंना राजकीय आव्हान देण्याची गरज काय होती? आरक्षणावरून भांडून काय साध्य होणार? आपल्याला एकत्र राज्यातच रहायचं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सुटू शकतो. जरांगेंचा बोलविता धनी कोण विचारणाऱ्या राज ठाकरेंचा बोलविता धनी कोण? असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी विचारला आहे.

छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेला मनोज जरांगे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. मराठा समाजाने आता ठरवले आहे, आम्ही त्यांच्या टीकेला उत्तर देणार नाही. त्यांना तेच काम उरले आहे. लोकांचे खाल्ल्याने ते आतमध्ये जाऊन आले आहेत. कोण कुणाचे खात आहे सर्वांना माहित आहे. त्यामुळे त्यांनी यावर बोलू नाहीत. तुम्ही टीका केली तर, तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्ही कच्चे नाहीत. या राज्यात आम्ही वातावरण खराब होऊ देणार नाही. आता आम्ही देखील 50 टक्के आहे. लोकांचे पैसे खाता, रक्त पिता का? मग तुम्हाला कोण देव मानणार आहे. वयाने तुम्ही मोठे आहेत. आम्हाला काढायला लावू नयेत. आम्ही देखील तुमचा बायोडेटा काढला आहे. धमक्या देऊ नयेत, असे जरांगे म्हणाले.

भुजबळांची हकालपट्टी करा, संभाजीराजेंची मागणी

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ राज्याचे सामाजिक आरोग्य बिघडवण्याचे काम करत असल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी केला. त्यांनी या प्रकरणी भुजबळांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणीही केली आहे.छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात शुक्रवारी जालन्याच्या अंबड येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा झाली. या सभेत भुजबळ यांनी मराठा आरक्षणाचा चेहरा ठरलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर तिखट हल्ला चढवला. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी एका ट्विटद्वारे भुजबळांवर राज्याचे सामाजिक आरोग्य बिघडवण्याचा आरोप केला आहे.

छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत.सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असतील तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का? हे स्पष्ट करावे, अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या ट्विटद्वारे केली आहे.

छगन भुजबळ सभेत मनोज जरांगेवर हल्ला करताना म्हणाले की, आता मराठा समाजाचे नवे देव झालेत. दगडाला शेंदूर फासून देव कुठे झाला? आमची लेकरं बाळ आमची लेकरंबाळ ही दोनचं वाक्य येतात का? आम्हाला लेकंर बाळं नाहीत का? आजवर मराठा नेत्यांनी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेतली. अरे मराठा तरुणांनो, याच्या मागे कुठे लागलात? केंद्राने ओबासी आरक्षणाचा आदेश दिला. त्यानंतर तो शरद पवार यांनी मान्य केला. मराठा समाज अवैधपणे ओबीसी आरक्षणात शिरतोय. आरक्षण म्हणजे काय हे तर आधी समजून घ्या. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही.

अभिनेते देव आनंद जन्मशताब्दी वर्षानिमित्त कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

0

मुंबई, दि. 17 : प्रसिद्ध अभिनेते देव आनंद भारतीय चित्रपट विश्वातील एक दंतकथा होते. आपल्या करिष्माई व्यक्तित्वाने तसेच अभिनय कौशल्याने त्यांनी जनमानसावर अमीट छाप निर्माण केली. त्यांच्या चित्रपटांना दशके लोटली तरी देखील आजही त्यांच्या चित्रपटांमधील गाणी लोकांच्या जिभेवर आहेत. भारतीय चित्रपटाच्या सुवर्ण युगाचे ते एक निर्माते होते, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

देव आनंद यांच्या १०० व्या जयंती निमित्त त्यांच्यावरील ‘के दिल अभी भरा नहीं’ या कॉफी टेबल पुस्तकाचे  प्रकाशन राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १७) मुंबई येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

देव आनंद चित्रपट सृष्टीत आले, त्यावेळी भारतीय सिने सृष्टी एका वेगळ्याच उंचीवर होती. त्याकाळात एकापेक्षा एक अभिनेते व अभिनेत्रीच नव्हते, तर उत्कृष्ट गीतकार व संगीतकार देखील होते, असे सांगून आज देखील गाण्याच्या रिॲलिटी शो मध्ये लहान मुले जुनीच गाणी गातात यातच त्या गाण्यांचे यश आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

गेल्या काही वर्षात गुणगुणता येतील अशी गाणीच निर्माण होत नाहीत असे सांगून, संगीताच्या नावाखाली जे काही निर्माण होत आहे तो केवळ कल्लोळ आहे, अशी खंत राज्यपालांनी व्यक्त केली.

राज्यपाल पदाचा राजशिष्टाचार असल्यामुळे थिएटर मध्ये जाऊन सहज चित्रपट पाहता येत नाही किंवा मुंबईची प्रसिद्ध पाव भाजी खाता येत नाही या बद्दल खंत व्यक्त करुन एकेकाळी आपण मित्रांसह, रांगेत उभे राहून व प्रसंगी ‘ब्लॅक’ मध्ये तिकिटे घेऊन, चित्रपटांचे पहिल्या दिवशी पहिला शो पाहत असू, अशी आठवण श्री. बैस यांनी सांगितली.

पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी बसने लाहोर येथे जाताना त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना ‘भारतातून काय आणू’ असे विचारले.  त्यावर, भारतातून देव आनंद यांना घेऊन यावे, असे शरीफ यांनी सांगितले, व त्या नुसार वाजपेयी हे देव आनंद यांना घेऊन लाहोर येथे गेले, अशी आठवण राज्यपालांनी यावेळी सांगितली.

देव आनंद यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे केवळ मनोरंजनच केले नाही, तर त्यांनी लोकांचा आत्मविश्वास व आकांक्षा जागवल्या तसेच राष्ट्रीय एकात्मतेला चालना दिली असे राज्यपालांनी सांगितले.

देव आनंद यांच्या वरील या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज व वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

प्रकाशन सोहळ्याला वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईचे अध्यक्ष विजय कलंत्री, उपाध्यक्ष अजय रुईया, कझाकस्थानचे मानद वाणिज्यदूत महेंद्र सांघी, कोरस इंडियाचे अध्यक्ष आनंद थिरानी, वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या कार्यकारी संचालक रूपा नाईक, गायक अनुप जलोटा यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  यावेळी अनुप जलोटा यांनी देव आनंद यांच्या गाण्याच्या ओळी गायल्या.

पुण्यातील पूर रोखण्यासाठी २१३ कोटी रुपये खर्चाचे ४ टेंडर

पुणे – शहरातील पूरस्थिती रोखण्यासाठी महापालिकेने तयार केलेला आराखडा केंद्र सरकारने मंजूर केला आहे. यातून २१३ कोटी रुपयांची कामे केली जाणार असून, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चार निविदा काढल्या जाणार आहेत. त्यास आज महापालिकेच्या पूर्वगणन समितीने मान्यता दिली आहे.महापालिकेत आज झालेल्या पूर्वगणन समितीच्या बैठकीत या आराखड्यावर चर्चा झाली. त्यामध्ये पॅकेज एक १४७ कोटी, पॅकेज दोन २३कोटी, पॅकेज चार २१.६६ कोटी आणि पॅकेज चार २१.५० कोटी अशा एकूण २१३ कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता या कामाचे टेंडर्स काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

केंद्र सरकारने पुण्यासह मुंबई, चेन्नई, कोलकता, बंगळूर, हैदराबाद, अहमदाबाद या सात प्रमुख शहरांसाठी २५०० कोटी रुपयांची शहरी पूर जोखीम व्यवस्थापन योजना (अर्बन फ्लड रिस्क मॅनेजमेंट स्कीम) तयार केली आहे. पुणे शहरात या माध्यमातून २८६ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित केली असून, त्यापैकी केंद्र सरकारतर्फे १५ व्या वित्त आयोगातून २५० कोटी रुपये देणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला आहे.तसेच ही कामे पूर्वी पाच वर्षात केली जाणार होती. पण हवामानातील बदलामुळे आता तीन वर्षातच हे काम पूर्ण करावे लागणार आहे.या प्रकल्पात पूर रोखण्यासाठी नदी, नाल्यांना सेंसर्स बसविणे, धोकादायक ठिकाणी कॅमेरे बसविणे, पावसाचे पाणी टेकड्यांवर जिरविण्यासाठी चर खोदणे, कलव्हर्ट बांधणे, नाल्यांचे ड्रोन द्वारे मॅपिंग करणे, पावसाळी गटारांची क्षमता वाढविणे, सांडपाणी व्यवस्थापन करणे, नाल्यांवर गॅबियन वॉल उभारणे, ही कामे करण्यासाठी चार निविदा मलःनिसारण विभागातर्फे काढल्या जाणार आहेत. तर कमांड कंट्रोल रूम उभारण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे निविदा काढली जाईल.

मंगळवारी शहरातील काही भागाचा संपूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद

पुणे : वारजे जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत एस.एन.डी.टी. HLR आणि चतु:श्रृंगी पाईपलाईन जोडणी तसेच चांदणी चौक BPT कडे जाणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम येत्या मंगळवारी (दि.21) केले जाणार आहे. तसेच कोंढवे धावडे टाकी येथील जलवाहिनी दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे मंगळवारी शहरातील काही भागाचा संपूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर बुधवारी (दि.22) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी कळवले आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे व सहकार्य करावे असे आवाहन पालिकेमार्फत करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद असलेला भाग

एस.एन.डी.टी. HLR टाकी परिसर

हॅपी कॉलनी गल्ली क्र. 4, नवीन शिवणे, रामबाग कॉलनी, मोहोळ चौक, मोरे विद्यालय, हनुमान नगर, केळेवाडी, रामबाग कॉलनी परिसर, एम. आय. टी. कॉलेज परिसर, एल.आय.सी. कॉलनी, रामबाग कॉलनी, माधव बाग, मॉर्डन कॉलनी, जय भवानी नगर, शिवतीर्थ नगर, न्यू फ्रेंड्स कॉलनी, पौड रस्ता, किष्किंधानगर, कांचनबाग, लिलापार्क, सिल्हरक्रेस्ट ऑर्नेट, सरस्वती रोनक शिवगोरख, चिंतामणी सोसायटी, सुतारदरा, म्हातोबा नगर, आझाद वाडी, वनाज कंपनी मागील भाग, वृंदावन कॉलनी, वडारवस्ती, श्रमिक वसाहत गल्ली क्र. 1 ते 21, स्टेट बँक कॉलनी, वनदेवी समोरचा संपूर्ण परिसर, मावळे आळी, कोथरूड गावठाण, डहाणूकर कॉलनी, आनंदनगर, आयडियल कॉलनी, पौड रस्त्याचा भाग, गुजरात कॉलनी, मयूर कॉलनी, डी.पी रस्त्याची डावी बाजू, शिवशक्ती सोसायटी ते 20 ओवस सोसायटी पर्यंत

वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चतु:श्रृंगी टाकी परिसर –

सकाळ नगर, औंध रोड, आयटीआय रस्ता, औंध गाव आणि बाणेर रोड, पंचवटी, पाषाण,
निम्हण मळा भाग, लमाणतांडा वस्ती, पाषाण गावठाण, राजभवन, भोसले नगर, पुणे विद्यापीठ, स्पायसर कॉलेज,
आंबेडकर चौक ते बोपोडी भोईटे वस्तीपर्यंत. बाणेर बोपोडी इंदिरा वसाहत व कस्तुरबा वसाहत इ.

सन हॉरीझन, बालेवाडी जकातनाका, ग्रीन झोन टाकी परिसर

मोहननगर, लक्ष्मण नगर, राम नगर-राम इंदू पार्क, बालेवाडी गावठाण,दसरा चौक परिसर, पाटील निगर, शिवनेरी पार्क सन हॉरीझन, हाई-स्ट्रीट परिसर, 43 प्रायवेट ड्राईव्ह,मधुबन सोसायटी परिसर, बिट वाईज परिसर, एफ रेसिडन्सी, पार्क एक्सप्रेस परिसर, आयवरीस टॉवर इ.

कोंढवे धावडे टाकी परिसर

कोंढवे धावडे गावठाण, खडकवस्ती, 10 नंबर गेट, टेलीफोन एक्सचेंज परिसर,न्यू कोपरे परिसर, उत्तमनगर गावठाण, उत्तमनगर उर्वरित परिसर, देशमुख वाडी,सरस्वती नगर, पोकळेनगर, इंडस्ट्रीयल एरिया, शिवणे गावठाण, इंगळे कॉलनी इ.

भाऊबीजेच्या दिवशी बीट मार्शलांच्या तत्पर कर्तव्याची बहिणीला मिळाली भेट

पुणे- दिवाळी झालेली,भाऊ बीजेचा दिवस..घरातील आवराआवर,सणासुदीत कामाची धांदल अन तिच्याकडून चक्क मूल्यवान वस्तू असलेली बॅग विसरली,सणाच्या आनंदाची चेहऱ्यावरील छबी क्षणार्धात हरवलीती बिचारी रडकुंडीला आली .काय करावे तिला कळेनासे झाले,झालेल्या घटनेचा भार घरात ऐन सणात कुणा वर पडेल.या विअचाराने तिच्या मनात काहूर केलं होतं.अखेरीस ती रडतरडत धनकवडी पोलीस चौकीत आली.

पोलिसांनी सांगितले कि,चेहऱ्यावर न थांबता ओघळणारे अश्रू घेऊन आलेल्या या महिलेने चौकीत येऊन सांगितले की मोहननगर आंब्याचे झाड ते धनकवडी लास्ट बस स्टॉप असा रिक्षा प्रवास केला असताना माझी बॅग रिक्षातच राहिली असून या बॅगेमध्ये पाच हजार रुपये व दीड तोळ्याचा गंठण आहे.या महिलेचा रडवेला अवतार पाहून क्षणात अन्य प्रोसिजारच्या मागे न लागता धनकवडी बीट मार्शल यांनी आहेरांच्या घरापुढच्या लक्ष्मी ज्वेलर्स तसेच पोलीस स्टेशन येथे येऊन धनकवडी लास्ट बस स्टॉप येथील सीसी टीव्ही कॅमेरे चेक करून रिक्षाचा शोध घेतला. आणि त्या रिक्षा चालकास धनकवडी चौकीत बोलावून सदर महिलेची बॅग तसेच रोख रक्कम व सोन्याचा गंठण या महिलेच्या ताब्यात तातडीने देण्यात आली..विसरलेली मूल्यवान वस्तूची बॅग,शिवाय त्यात रोकड असलेली ती परत मिळेल कि नाही याची शास्वती नसल्याने अपार दुखः घेऊन आलेल्या या महिलेच्या चेहऱ्यावर पोलिसांच्या या कामगिरीने भाऊबीजेची भेट मिळाल्याचे समाधान झळकत होते.सहकारनगर पोलीस ठाण्यातील धनकवडीचे मार्शल पोलीस शिपाई सचिन वसंत येनपुरे ब नं 9831 आणि पोलीस शिपाई सुभाष रामचंद्र घाडगे 10546 यांनी दाखविलेल्या तत्परतेने सामान्य माणसाच्या मनातील पोलिसांची प्रतिमा निश्चित उजळणार आहे.

टाटा टेक्नॉलॉजीजची प्राथमिक समभाग विक्री २२ नोव्हेंबरपासून सुरू

· टाटा टेक्नॉलॉजीज लि.च्या २ रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक इक्विटी शेअरसाठी ४७५ ते ५०० रुपये असा किंमतपट्टा निश्चित.

· अँकर गुंतवणूकदारांच्या बोलीचा दिवस – मंगळवार, दि. २१ नोव्हेंबर २०२३.

· बोली / ऑफर खुल्या होण्याचा दिवस – बुधवार, दि. २२ नोव्हेंबर २०२३, बोली / ऑफर बंद होण्याचा दिवस – शुक्रवार, दि. २४ नोव्हेंबर २०२३.

· गुंतवणूकदारांना किमान ३० इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ३० इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावता येईल.

युनायटेड स्टेट्समध्ये सिक्युरिटीजची विक्री करण्यासाठी हा दस्तऐवज पात्र नाही. युनायटेड स्टेट्स सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनमध्ये नोंदणी नसताना किंवा तेथे नोंदणीत सूट मिळालेली नसताना, तिथे या सिक्युरिटीज दिल्या किंवा विकल्या जाऊ शकत नाहीत. युनायटेड स्टेट्समध्ये या सिक्युरिटीजची कोणतीही सार्वजनिक विक्री होणार नाही.

मुंबई, दि. १७ नोव्हेंबर २०२३ : टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड (कंपनी) या जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन विकास क्षेत्रातील डिजिटल सेवा कंपनीने आपल्या ६०,८५०,२७८ इक्विटी शेअर्सची प्राथमिक विक्री करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. येत्या बुधवारी, दि. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी ही विक्री सुरू होईल. शेअर्ससाठीची बोली / ऑफर बंद होण्याची शेवटची तारीख शुक्रवार, २४ नोव्हेंबर २०२३ असेल. बोली / ऑफर खुल्या होण्याच्या एक दिवस अगोदर, म्हणजे मंगळवारी, दि. २१ नोव्हेंबर २०२३ रोजी अँकर गुंतवणूकदारांना बोली लावता येईल.
या ऑफरसाठी शेअर्सचा किंमतपट्टा ४७५ ते ५०० रुपये असा निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना यामध्ये किमान ३० इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यापुढे ३० इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावता येईल.
कंपनीच्या या आयपीओमध्ये ६०,८५०,२७८ इक्विटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर रोख रकमेसाठी असणार आहे. तसेच (अ) टाटा मोटर्स लिमिटेडद्वारे ४६,२७५,००० इक्विटी शेअर्सची विक्री, (ब) अल्फा टीसी होल्डिंग्ज पीटीई लि.द्वारे ९,७१६,८५३ इक्विटी शेअर्सची विक्री आणि (क) टाटा कॅपिटल ग्रोथ फंड-१ द्वारे ४,८५८,४२५ इक्विटी शेअर्सची विक्री यांचा त्यात समावेश आहे.
‘सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स’मधील नियम क्र. ३१मध्ये नमूद केल्याप्रमाणे, सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) नियम, १९५७च्या नियम १९(२)(बी), सुधारित (“एससीआरआर”) नुसार ही ऑफर देण्यात येत आहे. ‘सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स’मधील नियमावली ६(२) नुसार, ही ऑफर ‘बुक बिल्डिंग’ प्रक्रियेद्वारे केली जात आहे. यामध्ये निव्वळ ऑफरच्या किमान ५० टक्के भाग हा पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“क्यूआयबी” आणि त्यांच्यासाठीचा “क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणानुसार वाटपासाठी उपलब्ध असेल. कंपनी लीड व्यवस्थापकांशी सल्लामसलत करून ‘क्यूआयबी पोर्शन’च्या ६० टक्क्यांपर्यंतचा हिस्सा ‘अँकर इन्व्हेस्टर्स’ना विवेकाधीन आधारावर वाटप करू शकेल आणि त्यातील एक तृतियांश भाग हा केवळ देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी राखीव ठेवण्यात येईल, हे यामध्ये गृहीत धरण्यात आले आहे. ‘अँकर इन्व्हेस्टर्स’ना देण्यात येणाऱ्या किंमतींपेक्षा अधिक रकमेची बोली देशांतर्गत म्युच्युअल फंडांकडून सादर होणे अपेक्षित आहे. ‘आयपीओ’ला कमी प्रतिसाद मिळाला किंवा ‘अँकर इन्व्हेस्टर्स’ना शेअर्सचे वाटप झाले नाही, तर उर्वरीत इक्विटी शेअर्स ‘नेट क्यूआयबी पोर्शन’मध्ये समाविष्ट केले जातील.

याशिवाय, ऑफर प्राईसच्या बरोबरीची किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची वैध बोली आल्यास, ‘नेट क्यूआयबी पोर्शन’चा ५ टक्के भाग केवळ म्युच्युअल फंडांना प्रमाणित आधारावर वाटपासाठी उपलब्ध असेल आणि उर्वरित ‘नेट क्यूआयबी पोर्शन’ हा म्युच्युअल फंडांसह सर्व ‘क्यूआयबी बोलीदारां’साठी (अँकर इन्व्हेस्टर्सव्यतिरिक्त) प्रमाणित आधारावर वाटपासाठी उपलब्ध असेल.
याशिवाय, या ऑफरमधील १५ टक्क्यांपेक्षा कमी शेअर्स बिगर-संस्थागत बोलीदारांना वाटप करण्यासाठी उपलब्ध असतील, उदा. (अ) ज्या अर्जदारांनी २ लाख रुपयांपेक्षा जास्त आणि १० लाख रुपयांपेक्षा कमी रकमेची बोली लावली असेल, अशांना बिगर-संस्थात्मक बोलीदारांसाठी उपलब्ध असलेल्या शेअर्सचा एक तृतीयांश भाग आरक्षित करून देण्यात येईल, आणि (ब) ज्या १० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची बोली लावली असेल, अशांना बिगर-संस्थात्मक बोलीदारांसाठी उपलब्ध असलेल्या शेअर्सचा दोन तृतीयांश भाग आरक्षित करून देण्यात येईल. या (अ) आणि (ब) या दोन्ही श्रेणींपैकी कोणत्याही श्रेणीत शिल्लक राहिलेले शेअर्स बिगर-संस्थागत बोलिदारांमधील इतर उप-श्रेणीसाठी काढून देण्यात येतील. मात्र याकरीता या बोली ऑफर किंमतीइतक्या किंवा त्यापेक्षा अधिक मूल्याच्या असायला हव्यात. तसेच सेबी आयसीडीआरच्या नियमांनुसार, किरकोळ वैयक्तिक बोलीदारांना वाटपासाठी ३५ टक्क्यांहून कमी शेअर्स उरणार नाहीत, हेही बघावे लागेल. यामध्येही ऑफर किमतीइतक्या वा त्यापेक्षा जास्त रकमेच्या बोली येणे अपेक्षित असेल.
‘द एम्प्लॉई रिझर्व्हेशन पोर्शन’च्या अंतर्गत शेअर्ससाठी अर्ज करणार्‍या पात्र कर्मचार्‍यांनी ऑफर किमतीच्या बरोबरीची किंवा त्याहून अधिक रकमेची वैध बोली लावल्यास, त्यांना इक्विटी शेअर्सचे वाटप केले जाईल. सर्व बोलीदारांना (अँकर इन्व्हेस्टर्स वगळता) ‘अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट’ (“एएसबीए”) प्रक्रियेचा वापर करणे अनिवार्य आहे. आपल्या संबंधित एएसबीए खात्याचा तपशील आणि ‘आरआयबी यूपीआय मेकॅनिझम’ वापरत असल्यास ‘यूपीआय’चा आयडी त्यांना याकरीता द्यावा लागेल. त्यानुसार त्यांच्या संबंधित बोलीची रक्कम ‘सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँकां’द्वारे (“एससीएसी”) किंवा यूपीआय यंत्रणेंतर्गत प्रायोजक बँकेद्वारे, संबंधित बोली रकमेच्या मर्यादेपर्यंत ब्लॉक केली जाईल. ‘अँकर इन्व्हेस्टर्स’ना ‘एएसबीए’ प्रक्रियेद्वारे ऑफरमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही.
रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे ऑफर केलेले इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड या दोन्हींवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
जेएम फायनान्शिअल लि., सीटीग्रूप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रा. लि. आणि बीओएफए सिक्युरिटीज इंडिया लि. या कंपन्यांना या ऑफसमध्ये बुक रनिंग लीड मॅनेजर (बीआरएलएम) म्हणून नेमण्यात आले आहे.

भारतीय लोक प्रशासन संस्थेमार्फत निबंध स्पर्धेचे आयोजन

0

मुंबई, दि. १७ :-  भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेमार्फत बी. जी.  देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सन २०२३-२०२४ मध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी जी २० : भारत टेकेड आणि शासन आपल्या दारी योजना हे दोन विषय देण्यात आले आहेत.

निबंध कोणत्याही एका विषयावर मराठी किंवा इंग्रजी भाषेत ३००० शब्दांपेक्षा कमी आणि ५००० शब्दांपेक्षा अधिक नसावा. निबंध विषयाच्या अनुषंगाने विश्लेषणात्मक, संशोधनपर व पदव्युत्तर दर्जाचा असावा. निबंध कागदाच्या एकाच पृष्ठभागावर टंकलिखित करून त्यावर केवळ टोपणनाव लिहून चार प्रतीत मानद अध्यक्ष, भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखा, तळ मजला, बँक ऑफ महाराष्ट्रच्या बाजुला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, मुंबई ४०००३२ या पत्त्यावर २८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सादर करावा.

स्पर्धकांनी निबंधावर आपले नाव किंवा कोणत्याही प्रकारची ओळख नमूद करू नये. निबंधाच्या प्रती व त्या सोबत वेगळ्या लिफाफ्यात स्पर्धकाचे नाव (मराठी व इंग्रजीतून); टोपणनाव, पत्ता, संपर्क क्रमांक व ईमेल नमूद करून पाठवाव्यात. निबंध स्पर्धा सर्वांसाठी खुली असून स्पर्धेची सविस्तर माहिती  www.iipamrb.org.in या संकेत स्थळावर उपलब्ध असल्याचे भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेचे मानद अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांनी कळविले आहे.

स्वाधार योजनेसाठी संपूर्ण १५० कोटी निधी वितरीत

0

मुंबई, दि. 17 : स्वाधार योजनेसाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी मंजूर करण्यात आलेला १०० टक्के निधी म्हणजेच १५० कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागाने वितरीत केला आहे. यापूर्वी या योजनेसाठी १०५ कोटी रुपयांचा निधी वितरीत झाला असून कालच उर्वरीत ४५ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. हा निधी अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येत आहे.

मागासवर्गीय मुलामुलींना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी राज्यात मागासवर्गीय मुलामुलींसाठी शासकीय वसतिगृहांची योजना राबविण्यात येते. राज्यात ४४१ शासकीय वसतिगृहे असून त्यामध्ये मुलांची २२९ व मुलींसाठी- २१२ वसतीगृहे सुरू आहेत. सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांपैकी इयत्ता ११ वी, १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता उपलब्ध करून घेण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आलेली आहे.

या योजनेच्या माध्यमातून मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रु. ६०,०००/-, इतर महसुली विभाग शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी रू.५१,०००/- व जिल्हयाच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रू.४३,०००/- इतकी रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाते.

हडपसरच्या सुरज रमेश पंडीत टोळीवर मोक्का कारवाई

पुणे-हडपसर मध्ये आपली दहशत पसरविणाऱ्या, वाहनांची तोडफोड करणा-या सुरज रमेश पंडीत ( टोळी प्रमुख) व त्यांचे इतर १० साथीदार यांचेवर पुणे पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे.
यातील फिर्यादी यांना दिनांक २५/१०/२०२३ रोजी गोसावी वस्ती, सुरक्षानगर रोड, हडपसर, पुणे येथे घराचे जिन्या मध्ये येवुन यश जावळे व युवराज बढे हे त्यांचे हातात धारदार लोखंडी हत्यार घेवुन तसेच त्यांचेबरोबर त्यांचे मित्र सुरज पंडीत, समीर ऊर्फ रॉम शेख, अक्षय राउत व इतर ४-५ अनोळखी इसम मोठमोठ्याने ओरडून व शिवीगाळ करुन फिर्यादी व त्यांचे वडीलांना मारहाण करुन जबरदस्तीने एकुण ३०,०००/- रुपये किंमतीचे सोन्याची अंगठी व रोख रक्कम असे घेवुन जावुन सार्वजनिक रोडवर येवुन हातातील लोखंडी हत्यार हवेत फिरवुन ” आमचा नाद कोणी करायचा नाही आम्ही भाई लोक आहोत असे बोलुन दहशत निर्माण केली व सार्वजनिक रोडच्या कडेला पार्क केलेल्या एकूण २२ वाहनांची त्यांचे कडील लोखंडी वस्तूच्या सहाय्याने तोडफोड करून आर्थिक नुकसान केलेले आहे म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. १६३१ / २०२३, भा.दं.वि. कलम ३९५, ३२३,४२७, ५०६, ५०४, आर्म अॅक्ट कलम ४(२५), क्रिमिनल लॉ अॅमेंडमेंट अॅक्ट कलम ३७ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) १३५ प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
दाखल गुन्हयाच्या तपासा दरम्यान यातील निष्पन्न आरोपी १) सुरज रमेश पंडीत, वय-२९ वर्षे, रा. निलेश क्लासिक सोसायटी, ए विंग, फ्लॉट २१, हांडेवाडी रोड, हडपसर, पुणे (टोळी प्रमुख) २) यश प्रदिप जावळे, वय २३ वर्षे, रा. श्रीराम चौक, गुलाम अलीनगर, सातवनगर रोड, हडपसर, पुणे ३) युवराज प्रकाश बढे, वय २३ वर्षे रा. साई कॉलनी, वाडकरमळा, मोहम्मदवाडी, हडपसर, पुणे आ.क्र.१ ते ०३ यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. ४) अक्षय राऊत, रा. सैय्यदनगर, महंमदवाडी रोड, पुणे ५) समीर बागवान, रा. वाडकर मळा, महंमदवाडी रोड, पुणे ६) शिवा कानगुले रा. चिंतामणीनगर, हांडेवाडी रोड, पुणे (टोळी सदस्य) इतर ४ ते ५ अनोळखी इसम हे WANTED आरोपी आहेत.
गुन्हयाचे तपासा मध्ये सदर आरोपी सुरज रमेश पंडीत ( टोळी प्रमुख) याने गुन्हेगारी टोळी तयार केली असून ते सर्व हडपसर, काळे पडळ, गोसावीवस्ती, हांडेवाडी रोड, या भागात त्यांचे टोळीचे वर्चस्व वाढविण्यासाठी संघटीत गुन्हे करीत असले बाबत तपासामध्ये निदर्शनास आले आहे. तसेच ते व त्यांचे इतर साथीदार मिळुन परिसरातुन कोयते हत्यारे दाखवुन खंडणी स्वरुपात पैसे उकळतात. छोटे व्यवसायिक व दुकानदार तसेच पथारीवाले यांना दमदाटी करुन त्यांचे मनामध्ये दहशत निर्माण करुन त्यांचेकडुन हप्ता घेतात. त्यांचे दहशतीमुळे नागरीकांचे मनात भिती निर्माण झालेली असुन त्यांचे विरुध्द कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नसल्याने सदरील टोळीचे वर्चस्व हडपसर परीसरात वाढत असल्याचे दिसुन येत आहे
तसेच त्याचे विरुध्द पुणे शहर, पुणे ग्रामीण मधील वेग-वेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यातील ०२ आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेविरूध्द यापुर्वी घातक शस्त्राने जिवे ठार मारणे, जबर दुखापत करणे, जबरी चोरी करणे, खंडणी गोळा करणे, नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणे अशा प्रकारे स्वतःस व टोळीचे सदस्यास अवैध मार्गाने आर्थिक लाभ व इतर फायदा व्हावा या उददेशाने गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार संघटितपणे करीत आहेत. त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत.

प्रस्तुत गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३(२), ३(४) चा अंतर्भाव करणे कामी,हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी पोलीस उप-आयुक्त, परीमंडळ -०५, पुणे शहर, विक्रांत देशमुख यांचे मार्फतीने अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रकरणाची छाननी करून हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. १६३१ / २०२३ भा.दं.वि. कलम ३९५, ३२३,४२७,५०६,५०४,आर्म अॅक्ट कलम ४ (२५), क्रिमिनल लॉ अॅमेंटमेंट अॅक्ट कलम ३७ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (२), ३(४) या कलमाचा अंतर्भाव करण्याची अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे, श्रीमती. अश्विनी राख हया करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त पुणे संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, मा.पोलीस उप-आयुक्त परीमंडळ – ५,पुणे शहर, विक्रांत देशमुख, सहा पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर श्रीमती अश्विनी राख, त्यांचे मार्गर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर, रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे), विश्वास डगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), संदिप शिवले, सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती. सारिका जगताप, पोलीस उप-निरीक्षक महेश कवळे, निगराणी पथकातील पोलीस अंमलदार, प्रविण शिंदे, महेश उबाळे, राजश्री खैरे, वसीम सय्यद, गिरीश एकोर्गे, बाबा शिंदे, हनुमंत झगडे यांनी कारवाई केली आहे.
मा.पोलीस आयुक्त,पुणे शहर, रितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारीक लक्ष देवुन, शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजा मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शना खाली मोक्का अंतर्गत केलेली ही ८६ वी कारवाई आहे.

“पर्वती” चे वैभव टिकविण्यासाठी सर्वतोपरी मदतीचे चंद्रकांतदादा पाटील यांचे वचन

पर्वतीवरील विकास कामांची पाहणी व “नानासाहेब पेशवे” यांच्या समाधीस अभिवादन

पुणे–“पर्वती” टेकडीला मोठा ऐतिहासिक वारसा असून ही टेकडी पुण्याचे वैभव आहे, ते टिकविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे वचन ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. त्यांनी आज पर्वतीवर श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले, तसेच येथे उभारण्यात आलेल्या श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी करतानाच आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या विकासनिधीतून केल्या जात असलेल्या विविध विकास कामांची ही पाहणी केली व त्या कामांची प्रशंसा करतानाच कार्य प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले. त्यांच्या समवेत देवदेवेश्वर संस्थान चे अध्यक्ष रमेश भागवत, भाजप चे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, गिरीश खत्री व इतर मान्यवर उपस्थित होते. श्री. भागवत यांनी पर्वतीचा संपूर्ण इतिहास समजावून सांगताना कार्तिक स्वामी मंदिर, देवदेवेश्वर मंदिर, संग्रहालय, सदरेतील गणपती, पर्वताई देवी इ स्थळांची माहिती दिली. तसेच याठिकाणी युद्ध स्मारक उभारण्याचा संकल्प असून निधीची प्रतीक्षा आहे असे सांगताच मा. चंद्रकांतदादांनी त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे वचन दिले. मला पेशव्यांचा इतिहास ज्ञात असून नानासाहेब पेशवे यांनी आधुनिक पुणे उभारले,पहिली भूमिगत पाणीपुरवठा योजना, तळ्यातला गणपती, लकडी पूल, शनिवारवाड्याचे सुशोभिकरण यासह अनेक व्यापारी पेठांची उभारणी त्यांनी केली आहे.म्हणून त्यांचे यथोचित स्मारक व्हावे आणि त्यांनी उभारलेल्या पर्वतीस गत वैभव प्राप्त व्हावे यासाठी मी कटीबद्ध असल्याचे ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.

ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढविला

0

बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ
मुंबई-
राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढविण्याचा तसेच बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आता ही योजना 2027-28 या वर्षापर्यंत राबविण्यात येईल.

स्वतंत्र इमारत नसलेल्या 2000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीना 15 लाख ऐवजी 20 लाख रुपये व 2000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना 18 लाख ऐवजी 25 लाख अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच, यापुर्वी ग्रामपंचायत स्वनिधीची असलेली अट देखील रद्द करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत बांधकामासाठी यापेक्षा अधिक निधीची आवश्यकता अतिरिक्त निधी केंद्र व राज्य शासनाच्या इतर योजना, वित्त आयोग निधी, जिल्हा ग्राम विकास निधी, स्थानिक विकास निधी (खासदार,आमदार निधी) इ. बाबींमधून देण्यात येईल. राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय नाही, अशा 4252 ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय बांधण्यासाठी मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेस 2018- 19 ते 2021 – 22 या 4 वर्षांसाठी मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार 1748 ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम सुरु असून, याकरीता आतापर्यंत 3813.50 लाख रुपये इतका निधी खर्च करण्यात आला आहे.

१ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेसाठी ३४१ शिफारशी

0

मुंबई-

राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे आज राज्य मंत्रिमंडळात सादरीकरण करण्यात आले. राज्याला १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध ३४१ शिफारशी या परिषदेने केल्या आहेत.  हे सादरीकरण मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांनी केले.

राज्याच्या जीडीपी (विकास दर) १७ टक्के साध्य करणे, फॅब आणि इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनाला गती देऊन १८ टक्के विकास साधणे, कृषी क्षेत्रात १३ टक्के वाढ करणे, राज्यातील सिंचन प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी अधिकचा निधी नाबार्ड तसेच इतरांकडून मिळविणे, ४० टक्क्यांपेक्षा जास्त सिंचन पूर्ण झालेले ७५ प्रकल्प वेगाने पूर्ण करणे, मुंबई आणि एमएमआर परिसरात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा तसेच आर्थिक विकासाचे उपक्रम राबविणे, कौशल्य विकासात २०२८ पर्यंत १५ दशलक्ष नोकऱ्या निर्माण करणे तसेच आरोग्य, पर्यटन, ऊर्जा या विभागात देखील महत्त्वपूर्ण आवश्यक बदल करून या क्षेत्राचा विकास करणे, जिल्ह्यांचा समतोल विकास करणे आणि यासाठी १५ जिल्ह्यातील २७ तालुक्यांवर विशेष लक्ष देणे, शेतकरी उत्पादक संस्थांना बळकट करणे व शीतगृहांमध्ये वाढ करणे अशा स्वरुपाच्या शिफारशी यामध्ये करण्यात आलेल्या आहेत.

राज्यातील शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात:मार्गदर्शक तत्त्वांना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

0

मुंबई-आता राज्यातील  शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठ स्थापण्याकरिता मार्गदर्शक तत्त्वांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  यामुळे विद्यापीठांवरील भारही कमी होऊन शैक्षणिक संस्थांचे एक शक्तीशाली जाळे तयार होऊन विद्यार्थ्यांना अधिक संधी प्राप्त होतील. राज्यपाल हे कुलपती या नात्याने या समूह विद्यापीठांच्या कुलगुरुंची नियुक्ती करतील.  ही विद्यापीठे सार्वजनिक विद्यापीठे राहणार आहेत.

राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात अशा प्रकारे चांगल्या शैक्षणिक संस्थांचे समूह विद्यापीठांमध्ये रुपांतर करण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे.  त्यानुसार राज्यात डॉ.होमीभाभा राज्य विद्यापीठ, मुंबई,  हैद्राबाद सिंध नॅशनल कॉलिजिएट विद्यापीठ,मुंबई,  कर्मवीर भाऊराव पाटील, सातारा अशी 3 समूह विद्यापीठे आहेत.

समूह विद्यापीठासाठी इच्छुक असणारे प्रमुख महाविद्यालय शैक्षणिकदृष्ट्या उच्च कामगिरी करणारे, आवश्यक ती पायाभूत सुविधा, प्रशिक्षित आध्यापक तसेच समुह विद्यापीठाच्या दृष्टीने समन्वय करण्यासाठी सक्षम असणारे महाविद्यालय किंवा संस्था असावी.  समुह विद्यापीठ तयार करण्यासाठी एकाच व्यवस्थापन किंवा शैक्षणिक संस्थेच्या किमान दोन व कमाल पाच अनुदानित किंवा विना अनुदानित महाविद्यालयाचे एकत्रिकरण करणे आवश्यक राहील.  कृषी व आरोग्य विज्ञान वगळता इतर सर्व पारंपरिक व व्यवसायीक महाविद्यालये समूह विद्यापीठात समाविष्ट होऊ शकतील.  पाच पेक्षा जास्त महाविद्यालये किंवा संस्था समूह विद्यापीठात समाविष्ट करण्यासाठी राज्य शासन मुल्यांकन करेल.

समुह विद्यापीठातील प्रमुख महाविद्यालय मागील 20 वर्षांपासून कार्यरत असावे.  तसेच या महाविद्यालयात किमान 2 हजार विद्यार्थी असावेत तसेच ही संख्या मिळून सहभागी महाविद्यालयांमध्ये किमान 4 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी आवश्यक आहे.  या महाविद्यालयांकडे एकत्रितपणे 15 हजार चौ.मी. इतके एकत्रित बांधकाम आवश्यक असून विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी 4 हेक्टर जागा आणि राज्यातील उर्वरित भागासाठी 6 हेक्टर जागा असावी.

प्रमुख महाविद्यालय हे किमान 5 वर्षांपासून स्वायत्त दर्जा प्राप्त असलेले असावे किंवा या महाविद्यालयास नॅकचे किमान 3.25 सीजीपीए मानांकन किंवा समतुल्या एनबीए गुण असणे आवश्यक आहे किंवा एकूण अभ्यासक्रमांपैकी 50 टक्के अभ्यासक्रम एनबीए द्धारा मान्यताप्राप्त असावे. याशिवाय इतरही काही आवश्यक बाबी या मार्गदर्शक तत्वात नमूद करण्यात आलेल्या आहेत.  विद्यापीठाचे कामकाज व्यवस्थित चालविण्यासाठी कुलगुरू आणि कुलसचिव यांच्यासह 7 पदे निर्माण करण्यात येतील.  यासाठी राज्य शासनाकडून 1 कोटी रुपये अशी रक्कम पहिल्या 5 वर्षांकरिता विद्यापीठाला देण्यात येईल.